Saturday, July 18, 2015

Junior college teachers from Maharastra राज्यात शिक्षकांची हजारोपदे रिक्तमुंबई - शिक्षक-शिक्षकेतरकर्मचाऱ्यांची भरती बंदअसल्याने मुंबईत शिक्षकांच्या820 आणि शिक्षकेतरांच्या600हून अधिक जागा रिक्त आहेत.त्या त्वरित भरण्याचे आदेश उच्चन्यायालयाने दिले, परंतु दोनवर्षांपासून त्या भरलेल्यानाहीत, असा आरोप शिक्षकभारतीचे प्रमुख कार्यवाह सुभाषमोरे यांनी केला आहे.या रिक्त पदांमुळे होणाऱ्याशैक्षणिक नुकसानीस सरकारचेधोरण जबाबदार आहे.शिक्षणमंत्र्यांनी नागपूरअधिवेशनात आश्वासन देऊनहीत्याची अंमलबजावणी केलेलीनाही. या अधिवेशनात निर्णयन झाल्यास तीव्र आंदोलनकरण्यात येईल. त्यासाठीराज्यव्यापी बैठक मुंबईत 26 जुलैरोजी होणार असल्याचीमाहिती मोरे यांनी दिली.आरटीईनुसार विद्यार्थ्यांनागुणवत्तापूर्ण आणि दर्जेदारशिक्षण मिळण्यासाठीविषयनिहाय शिक्षक मिळणेबंधनकारक आहे; मात्र शिक्षकभरतीच्या परवानगीचेसर्वाधिकार शिक्षण आयुक्तांकडेगेल्यामुळे मुंबईत एवढ्या मोठ्याप्रमाणात पदे रिक्त राहिलीआहेत. रात्रशाळांमधील स्थितीतर याहून वाईट आहे. तेथेहीशिक्षकांची पदे रिक्त आहेत; तरशाळांनी विद्यार्थ्यांचेनुकसानहोऊ नये म्हणून नियुक्त केलेल्याशिक्षकांना सरकारी मान्यताआणि वेतनही दिले जात नाहीअशी स्थिती आहे. मुंबईत 150रात्रशाळा आहेत. बहुतांशशाळांमध्ये शिपाई आणि लिपिकनावालाही शिल्लक राहिलेलेनाहीत, असे मोरे यांनीसांगितले.ज्युनिअर कॉलेजच्या 935 मंजूरपायाभूत पदांवरील शिक्षकसातआठ वर्षे विनावेतन कामकरीत आहेत. त्यांच्यानियुक्त्यांना मान्यता मिळूनहीकेवळ तांत्रिक कारणासाठीत्यांचे पगार दिले जात नाहीत.राज्यातही अशीच स्थिती आहे.अक्षरशः हजारो पदे रिक्तआहेत, अशी माहिती मोरे यांनीदिली.


No comments:

Post a Comment

Featured Post

              राजा  भगवंतराव ज्यू कॉलेज११ वी १२ वी कला व विज्ञान शाखेत शिकत असणार्या विध्यार्थ्यासाठी आरोग्य आणि शारीरिक शिक्षण विषयची लिंक...