Saturday, July 18, 2015

आज मुंबई येथे महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाच्या राज्य कार्यकारिणीची बैठक झाली.बैठकीत शासनाने आमच्या मागण्यांवर 21 जुलै पर्यन्त निर्णय न घेतल्यास पुढील प्रमाणे चार टप्प्यात राज्यभर आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. (1)दि.22 जुलै रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चे काढून जिल्हाधिकार्यां मार्फत मा. शिक्षण मंत्र्यांना निवेदन देण्यात येईल. (2) दि.24जुलै पासून राज्यातील सर्व 60 हजार क.महाविद्यालयीन शिक्षक काळ्या फिती लावून काम करतील. (3)दि. 28 जुलै रोजीे आझाद मैदान,मुम्बई येथे राज्यातील सर्व जिल्हा कार्यकारिणी सदस्य व मुम्बई विभागातील शिक्षक जेल भरो आंदोलन करतील. (4)दि.1 ऑगस्ट रोजी राज्यातल्या सर्व तालुका तहसिलदार कार्यालयांवर उपोषण करण्यात येईल. तरीही शासनाने मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेतला नाही तर ऑगस्ट मधे पुढील आन्दोलनाबाबत राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत निर्णय घेण्यात येईल.. प्रा.अनिल देशमुख.सरचिटणीस,म.रा.क.महाविद्यालयीन शिक्षक महासंघ.(MFJCTO


No comments:

Post a Comment

Featured Post

email writing

लिखाण कौशल्य: प्रत्येक परिस्थितीसाठी योग्य शैली कशी निवडावी शाळेतील निबंध लिहिणे महत्त्वाचे आहेच, पण कार्यक्षम लिखाण - जसे की ईम...