Friday, August 31, 2018

विनोद !

विनोद म्हणजे स्पॉट पेमेंट ...
ताबडतोब कळला तर तो विनोद! तो विनोद होता असे इतर कुणी सांगावे लागणे हा दुसरा विनोद आणि इतर लोक टाळ्या वाजवू लागल्यानंतर आपणही टाळ्या वाजविणे हा तिसर्‍या दर्जाचा विनोद! अख्ख्या महाराष्ट्राला नव्हे, तर जगात जिथे जिथे मराठी माणूस आहे त्याला एकाच वेळेला एकाच ‘टायमिंग’ला हसायला भाग पाडणे हा महाविनोद !

हास्यामध्ये पर्यवसित होणाऱ्या जीवनविषयक सुखात्म जाणिवेची प्रतीती देणारा धर्म म्हणजे विनोद असे सर्वसाधारणपणे म्हणता येईल. विनोदाला समानार्थी ‘ह्यूमर’ हा इंग्रजी शब्द मुळात लॅटिन असून त्याचा अर्थ आर्द्रता वा द्रव असा होतो. संस्कृत ‘विनोद’ या संज्ञेची फोड ‘वि+नुद्’ (आनंद देणे. रिझवणे; किंवा घालवणे, दूर करणे म्हणजे दुःख, निराशा इ. घालवणे) अशी केली जाते. विनोदाच्या अर्थाने ह्यूमर ही संज्ञा प्रथमतः अठराव्या शतकात वापरात आली. तुच्छता, निंदाव्यंजकता वा टवाळखोरपणा ह्यांहून वेगळा असा प्रसन्न, आनंददायी. भावरूपात्मक विनोद ‘ह्यूमर’ या संज्ञेने सूचित केला गेला.

विनोद हा जसा साहित्यातून आविष्कृत होतो, तसाच तो चित्रातून दृश्यरूपाने प्रकटतो; नाटकामधून अभिनीत होतो; सर्कशीतून, तमाशातून कृतिरूपाने प्रकट होतो. विनोद हा केवळ कलाप्रकारातूनच प्रकट होतो असे नव्हे; तर प्रत्यक्ष जीवनातही घडत असतो व तो साधारणतःसर्वांना प्रिय व आस्वाद्य वाटतो. विनोदाला प्रत्यक्ष जीवनामध्ये स्थान असल्यामुळे विनोदाचा विचार केवळ साहित्याचा वा कलाविष्काराचा भाग म्हणून न होता, जीवनानुभवाच्याही अंगाने होणे स्वाभाविक आहे. अनेक कलाप्रकारांशी निगडित असलेल्या आणि प्रत्यक्ष जीवनातही सातत्याने प्रकटणार्याअ विनोदाचा विचार बराच गुंतागुंतीचा ठरतो. विनोदाची निर्मिती कशी होते, हे सांगणाऱ्याउपपत्ती जशा जीवनाच्या अनुषंगाने मांडल्या जातात, तशाच त्या कलेच्या अनुरोधानेही मांडल्या जातात. शब्द या माध्यमाचा उपयोग करून वाङ्मयातून प्रकट होणारा विनोद स्वाभाविकपणे विविध रूपे धारण करून प्रकट होतो. म्हणून वाङ्मयीन विनोदाच्या विचाराला महत्त्वाचे स्थान प्राप्त होते. विनोद या संकल्पनेचे स्वरूप ध्यानात येण्यासाठी विनोदाची निर्मिती का व कशी होते, हे सांगणाऱ्याउपपत्तींचा परामर्श घेणे उपयुक्त ठरते. विनोदाची संकल्पना ही गुंतागुंतीची असल्यामुळे तिचे स्वरूप विशद करण्याच्या दृष्टीने प्राचीन काळापासून आजपर्यंत अनेकविध नवनवीन उपपत्ती तत्त्वज्ञ, मानसशास्त्रज्ञ, प्रतिभावंत लेखक, समीक्षक आदींनी मांडलेल्या आहेत. ह्या उपपत्ती विनोदाच्या स्वरूपावर काही एक प्रकाश टाकत असल्याने, त्यांचा परामर्श घेऊन विनोदाचे स्वरूप उलघडता येईल.

विनोदाची निर्मिती कशी होते याबद्दल काही उपपत्ती आशयाला महत्त्व देऊन, तर काही उपपत्ती अभिव्यक्तिवैशिष्ट्याला अथवा तंत्रविशेषांना महत्त्व देऊन मांडल्या गेल्या आहेत. आशयाला महत्त्व देऊन मांडल्या गेलेल्या बहुतेक उपपत्ती ह्या व्यंगकल्पना, आक्रमणकल्पना व क्रीडावृत्ती ह्या कल्पनांच्या अनुरोधाने मांडल्या गेल्या आहेत. ह्या उपपत्ती विनोदाच्या निर्मितिप्रक्रियेवर व स्वरूपावर कितपत यथार्थ प्रकाश टाकतात, हे पाहता येईल.

कोणतीही साहित्यकृती अपरिहार्यपणे मानवी जीवनातील अनुभवाचे चित्रण करीत असते. साहित्यातून आविष्कृत होणारा हा जीवनानुभव म्हणजेच कलाकृतीचा आशय होय. अनुभवाच्या मूलभूत स्वरूपावरून वाङ्मयकृतीत चित्रित होणाऱ्या अनुभवांचे शोकात्म आणि सुखात्म असे दोन प्रकार पडतात व ते वाचकांच्या ठिकाणी शोकात्म वा सुखात्म स्वरूपाची जाणीव निर्माण करतात. काही अनुभव संमिश्र असतील, काही अनुभव एकच एक विशिष्ट भावनिक परिणाम साधत नसतील, तरीही शोकात्म आणि सुखात्म असे जावनाविषयक अनुभवाचे दोन मूलभूत प्रकार आहेत, असे विधान करावे लागते. कारण हे दोन्ही मानवी जीवितप्रेरणेशी निगडीत असतात. माणसाची जीवनेच्छा, जीवितप्रेरणा जेव्हा पराभूत होते, जीवनच विनाशाकडे अपरिहार्यपणे जाते, जीवनविरोधी शक्ती प्रबळ होतात असे चित्रण केले जाते, तेव्हा जीवनविषयक शोकात्म जाणिवेची प्रतीती येते. उलट जेव्हा माणसाची जीवन जगण्याची इच्छा अथवा जीवितप्रेरणा चित्रित केली जाते, त्याच्या ईप्सितांची प्राप्ती, इच्छांची परिपूर्ती चित्रित होते, तेव्हा जीवनविषयक सुखात्म स्वरूपाची जाणीव निर्माण होते. म्हणून जीवनविषयक शोकात्म आणि सुखात्म अनुभव हे मूलभूत स्वरूपाचे वर्गीकरण मानावे लागते. या अनुभववैशिष्ट्याने वाचकाच्या ठिकाणी निर्माण होणारी जाणीव शेकात्म की सुखात्म, हे ठरते. ही जाणीव निर्माण करणारा अनुभव हा कालकृतींचा आशय होय.

आशयाला महत्त्व देऊन मांडल्या गेलेल्या विनोदनिर्मितिविषयक उपपत्तींमध्ये व्यंगकल्पना ही एक प्रभावी कल्पना असल्याचे दिसून येते. विनोदाची निर्मिती ही कोणत्या ना कोणत्या तरी व्यंगाचे दर्शन झाल्याने, चित्रण केल्याने होते, असे व्यंगकल्पनेला महत्त्व देऊन मांडल्या गेलेल्या विनोदविषयक उपपत्तीचे सूत्र दिसून येते. काही उपपत्ती ह्या सामान्य स्वरूपात व्यंग हे विनोदनिर्मितीचे कारण असल्याचे सांगून विनोदनिर्मितीची प्रक्रिया विशद करतात...

आयुष्य म्हणजे काय ?

रोज सकाळी जीवावर उदार होऊन, अत्यंत कष्टाने अंथरुणातून शरीर उचलून दिवसाची सुरुवात करणं म्हणजे आयुष्य नव्हे
तर उत्साहाने ‘आजचा दिवस माझाच आहे’ म्हणत, स्मित हास्याने जागं होणं म्हणजे आयुष्य…

जुन्या कष्टदायक आठवणींना चिटकून राहून आताचा प्रत्येक क्षण वाया घालवणं म्हणजे आयुष्य नव्हे
तर आलेल्या प्रत्येक क्षण त्या क्षणात राहून जगणं, त्याचा आनंद लुटणं म्हणजे आयुष्य

आपल्या जीवनात घडलेल्या वाईटासाठी, परिस्थिती आणि लोकांना दोष देत राहणं म्हणजे आयुष्य नव्हे ..
तर जे काही घडलं त्याची जबाबदारी स्वतः घेणं, त्यातून चांगलं काय ते शिकून, चांगलं घडवणं म्हणजे आयुष्य

जे न मिळालं त्यासाठी सततची तक्रार करणं म्हणजे आयुष्य नव्हे
तर जे काही मिळालंय त्यासाठी सातत्याने कृतज्ञ राहणं म्हणजे आयुष्य

वादळ संपण्याची, पाऊस थांबण्याची वाट बघत आडोश्याला लपणं म्हणजे आयुष्य नव्हे
तर बाहेर पडून, बेधुंद होऊन, पावसात मनसोक्त भिजणं म्हणजे आयुष्य

Whats App, Facebook वर न पाहिलेल्या १०० मित्रांशी तासंतास गप्पा मारणं, मेसेज फॉरवर्ड करणं म्हणजे आयुष्य नव्हे
तर जुन्या एखाद्या मित्राला कॉल करून, भेटून कॉलेजबाहेरच्या चहाच्या टपरीवर कटिंग पीत मनसोक्त गप्पा मारणं म्हणजे आयुष्य

आपल्यात राहून, केवळ आपल्यासाठी जगणं म्हणजे आयुष्य नव्हे
तर इतरांच्या जीवनात योगदान करून, त्यांना आपलंसं करणं म्हणजे आयुष्य

लोक दोष देतील, टीका करतील, त्याने खचून जाणं म्हणजे आयुष्य नव्हे
तर आपल्या स्वप्नांवर ठाम राहून, स्वतःवर विश्वास ठेवून, ध्येयपुर्तीची वाटचाल करणं म्हणजे आयुष्य

गर्दीत जाऊन, गर्दीचा भाग होणं आणि गर्दीत भर होऊन जगणं म्हणजे आयुष्य नव्हे
गर्दीत राहून, मोठी स्वप्न बाळगून, ती पूर्ण करून, त्या गर्दीतूनही उठून दिसणं म्हणजे आयुष्य !!

- विनोद मेस्त्री

*भिमसेनी कापूर*
===========
अनेकांना कापूर म्हणजे काय हेच माहित नाही. केमिकल कापूर नी नैसर्गिक कापूर यातील फरक.

आपण जो कापूर पुजेत वापरतो तो चक्क रासायनिकरित्या बनवलेला असतो. क्यॆम्फ़र म्हणुन ओळखला जाणारा हा प्रकार किटोन कार्बॊन संयुगांच्या वर्गात मोडतो ज्याच्या ज्वलनाने हवेत शुध्दता न होता प्रदुषणच होणार आहे.बाजारात स्वस्त मिळणारे कापूर हा एक प्रकारचा  मेणचट , ज्वलनशील नी पांढरट प्रकारचा  रासायनिक  प्रकार असतो . हा टरपिनॉईड चा रासायनिक फॉर्म्युला असून क्याम्फर लौरेल [ camphor laurel (Cinnamomum camphora), ] ह्या आशिया खंडाच्या जंगलात सापडणार्या झाडात तसेच  काही लौरेल कुटुंबीय झाडांच्या सालींमध्ये आढळतो.  पण जो आयुर्वेदिक कापूर असतो त्याला भिमसेनी कापूर म्हणुन ओळखले जाते. हे कापराच झाड कस दिसतं ?, कुठे मिळतं नी आपण कसे वापरतो? असे अनेकसे प्रश्न मला जंगम सरांनी लिहुन पाठवले होते. सरांसारखेच प्रश्न बहुतेकांना पडू शकतात. .

अशिया खंडातल्या पुर्वेकडच्या काही देशांमधील जंगलांमध्ये एक सदाहरीत झाड आढळते                [ Dryobalanops aromatica -family Dipterocarpaceae  ] . सुमात्रा, ईंडोनेशिआ आणि बोर्निओया देशांमध्ये आढळणाऱ्या ह्या झाडापासून कापूर निर्मिती होते. नैसर्गिक उत्पादन असलेल्या कापराची किंमत महाग असते ज्याचा उपयोग खाण्यात, औषधांमध्ये, पुर्वापार धार्मिक विधींमध्ये केला जातो. मात्र हल्ली जो कापूर आपण अगदी स्वस्त भावात विकत घेतो तो टरपेन्टाईन प्रकारातलं ज्वालाग्रही रसायन असतं. हेच रासायनीक प्रमाण आपल्या विक्स वेपोरब वगैरे सारख्या औषधांमध्ये वापरलेले असते. हा कापूर खाण्यास योग्य नसतो. याचे सेवन झाल्यास अनेक घातक परिणाम होऊ शकतात.

भिमसेनी कापूर हा आयुर्वेदिक  उत्पादन असून त्यात कुठल्याही रसायनांचा सहभाग नसतो. सुमात्रा, बोर्निऒ च्या जंगलात साधारण ८० ते १०० फ़ूट वाढणाऱ्या या झाडापासून हा भिमसेनी कापूर मिळतो. ही झाडं जसजशी मोठी होत जातात, तसतसं यांच्या उभ्या आडव्या खाचांमध्ये कापराची निर्मिती होते. हे प्रमाण कमी असल्यानेच हा कापूर महाग असतो. अनेक शतकांपासून या देशांमधून अनेक ठिकाणी कापूराचा अर्क पाठवण्याचा व्यवसाय सुरु होता. कापराचे झाड अतिशय उंच वाढतेच नी जमिनीत लांबवर मुळं रुजवते. या झाडाचे बहुतेक सर्व भाग वापरले जातात. मोठ्यामोठ्या बांधकामांसाठी तसेच मजबूत वापरासाठी [जसे की रेल्वेच्या स्लीपर्स फ़ळ्या] या झाडाच्या लाकडाचा वापर होतो कारण कापराचे लाकूड अतिशय मजबूत समजले जाते. या ताडमाड झाडाची फ़ुलं मात्र अगदी नाजूक एखाद सेमी असतात जी घोळक्यात येतात. यातूनच पुढे येणारी फ़ळं साधारण ५ ते ६ सेमीची नी पाच फ़ाक्यांची असतात. यातूनच या झाडाचे बी बनते. या झाडाच्या पानांपासून पुर्वापार तैलार्क बनवला जातो जो आजही अनेक देशांमधे त्वचेच्या अनेक उत्पादनांमधे वापरला जातो.

आता हे वाचल्यावर अनेकांना हा प्रश्न छळू शकतो की भारतात ही झाडं आहे का? हो, आहेत. आपल्या अनेक शासकिय व संशोधन करणाऱ्या संस्थांमध्ये ही झाडं लावून त्यावर प्रयोग केले जाताहेत. भारताखेरीज, चीन, जपान सह अनेक पाश्चिमात्य देशांमधे याच्या औषधी गुणधर्मांवर अधिकाधीक संशोधन होतय. आपले पुर्वज खुप हुशार ज्यांना या नैसर्गिक घटकांचा उपयोग व वापर सुपरिचीत होता. आज आपल्याकडे विज्ञानाने दिलेली अनेक साधने असताना आपण शास्त्रिय द्रुष्टिकोन न ठेवता केवळ आंधळेपणाने काहीही  फ़ोरवर्ड करत सुटतो. ज्याला खरा कापूर काय आहे हे पहायच असेल तर वनौषधीच्या दुकानात जाऊन भिमसेनी कापूर पहा. हिमालयत जाणाऱ्या गिर्यारोहकांना हा कापूर माहित आहे कारण तो जवळ बाळगला जातो. आयुर्वेदाचार्य़ांना माहित आहे कारण ते त्यांच्या कामात वापरतात. मग आपण सर्वसामांन्यांनीच मागे का रहावं? मी या लेखात कुठलेही आयुर्वेदिक, औषधी गुणधर्म तसेच रासायनिक सूत्रे अथवा गुणधर्म याबद्दल लिहिलेलं नाही. मी रसायन शास्त्राची अभ्यासक नसल्याने त्याबद्दल भाष्य करणे टाळले आहे नी निव्वळ आयुर्वेदिक कापराबद्दल  लिहिले  आहे कारण हा लेख निव्वळ या झाडाबद्दल आहे जे आपल्याला माहित करुन घ्यायच आहे. 

=============================================

कापूर हा देवपूजेसाठी, आरतीसाठी वापरतात. त्याच्या सुगंधाने घरात प्रसन्न वातावरण होते. पण नेहमीच्या कापरापेक्षा आयुर्वेदिक भीमसेनी कापूर हा आरोग्याच्या दृष्टीनेही खूप गुणकारी आहे.

भीमसेनी कापूर  कापूर हा कुठल्याही विशिष्ट आकारात येत नाही. स्फटिकासारखा येतो. याचे गोल, चौकोनी वडीत रूपांतर करता येत नाही. कारण नेहमीच्या कापराप्रमाणे यात मेण नसते.रासायनीक कापुर पाण्यावर तरंगतो.भिमसेनी कापुर तरंगत नाही.
सर्दी, खोकला झाला असल्यास एका पातेल्यात गरम पाणी घेऊन त्यात कापराची पूड टाकून त्याची वाफ घ्यावी.
हा कापूर नाकाला, कपाळाला, छातीला लावलेला तरी चांगला. लहान मुलांनाही लावला तरी चालेल.
रुमालावर कापराची पूड करून ती हुंगावी किंवा एखाद्या लहानशा डबीत घेऊन सोबत ठेवावा. आराम मिळेल.
बर्फाळ प्रदेशात गेल्यावर चालताना श्वास लागत असल्यास हा कापूर हुंगावा.
सांधेदुखीचा त्रास असलेल्यांनी तिळाच्या तेलातून हा कापूर सांध्यांना लावावा. तिळाच्या तेलाचा वास उग्र असल्यामुळे हे कापूरमिश्रित तेल लावल्यावर कपडय़ांना वास येतो.
सतत सर्दीचा त्रास होत असल्यास तिळाच्या तेलात कापराची पूड मिसळून ते तेल केसांच्या मुळाला लावावे किंवा खोबरेल तेलात हा कापूर मिसळून ते तेल केसांच्या मुळाला लावावे. कोंडा कमी होतो.
दाढदुखीकरिता छोटासा खडा किडलेल्या दातात ठेवावा. तो आपोआप विरघळतो व लाळ पोटात गेल्यास काही अपाय नाही.
खोकल्याकरिता आयुर्वेदिक कंपनी याच कापराचा उपयोग करतात.
काही सूचना
प्रवासी बॅग, कपडे साठवण्याच्या बॅगमध्ये कापूर ठेवला तर एक सुगंध येतो. कपड्यांना कसर, झुरळ लागत नाही.
पावसात कपडे चांगले वाळत नाहीत, ओलसर राहून त्यांना कुबट वास येतो. अशावेळीही कापूर ठेवावा.
घरात डास जास्त असल्यास झोपताना सभोवती हा कापूर ठेवा. डास फिरकत नाहीत, अन्य कीटकही लांब राहतात.
कापूर पायमोज्यात घातल्यास कुबट वास नाहीसा होईल आणि शिवाय मोज्यामुळे जी खाज पायाला सुटते ती नाहीशी होईल.

कापराचे वैज्ञानिक महत्त्व
वैज्ञानिक संशोधनामुळे सिद्ध झाले आहे की, कापराच्या सुगंधाने जिवाणू, विषाणू, लहान कीटक नष्ट होतात. त्यामुळे वातावरण शुद्ध राहते व आजार दूर राहतात.

Featured Post

              राजा  भगवंतराव ज्यू कॉलेज११ वी १२ वी कला व विज्ञान शाखेत शिकत असणार्या विध्यार्थ्यासाठी आरोग्य आणि शारीरिक शिक्षण विषयची लिंक...