*भिमसेनी कापूर*
===========
अनेकांना कापूर म्हणजे काय हेच माहित नाही. केमिकल कापूर नी नैसर्गिक कापूर यातील फरक.
आपण जो कापूर पुजेत वापरतो तो चक्क रासायनिकरित्या बनवलेला असतो. क्यॆम्फ़र म्हणुन ओळखला जाणारा हा प्रकार किटोन कार्बॊन संयुगांच्या वर्गात मोडतो ज्याच्या ज्वलनाने हवेत शुध्दता न होता प्रदुषणच होणार आहे.बाजारात स्वस्त मिळणारे कापूर हा एक प्रकारचा मेणचट , ज्वलनशील नी पांढरट प्रकारचा रासायनिक प्रकार असतो . हा टरपिनॉईड चा रासायनिक फॉर्म्युला असून क्याम्फर लौरेल [ camphor laurel (Cinnamomum camphora), ] ह्या आशिया खंडाच्या जंगलात सापडणार्या झाडात तसेच काही लौरेल कुटुंबीय झाडांच्या सालींमध्ये आढळतो. पण जो आयुर्वेदिक कापूर असतो त्याला भिमसेनी कापूर म्हणुन ओळखले जाते. हे कापराच झाड कस दिसतं ?, कुठे मिळतं नी आपण कसे वापरतो? असे अनेकसे प्रश्न मला जंगम सरांनी लिहुन पाठवले होते. सरांसारखेच प्रश्न बहुतेकांना पडू शकतात. .
अशिया खंडातल्या पुर्वेकडच्या काही देशांमधील जंगलांमध्ये एक सदाहरीत झाड आढळते [ Dryobalanops aromatica -family Dipterocarpaceae ] . सुमात्रा, ईंडोनेशिआ आणि बोर्निओया देशांमध्ये आढळणाऱ्या ह्या झाडापासून कापूर निर्मिती होते. नैसर्गिक उत्पादन असलेल्या कापराची किंमत महाग असते ज्याचा उपयोग खाण्यात, औषधांमध्ये, पुर्वापार धार्मिक विधींमध्ये केला जातो. मात्र हल्ली जो कापूर आपण अगदी स्वस्त भावात विकत घेतो तो टरपेन्टाईन प्रकारातलं ज्वालाग्रही रसायन असतं. हेच रासायनीक प्रमाण आपल्या विक्स वेपोरब वगैरे सारख्या औषधांमध्ये वापरलेले असते. हा कापूर खाण्यास योग्य नसतो. याचे सेवन झाल्यास अनेक घातक परिणाम होऊ शकतात.
भिमसेनी कापूर हा आयुर्वेदिक उत्पादन असून त्यात कुठल्याही रसायनांचा सहभाग नसतो. सुमात्रा, बोर्निऒ च्या जंगलात साधारण ८० ते १०० फ़ूट वाढणाऱ्या या झाडापासून हा भिमसेनी कापूर मिळतो. ही झाडं जसजशी मोठी होत जातात, तसतसं यांच्या उभ्या आडव्या खाचांमध्ये कापराची निर्मिती होते. हे प्रमाण कमी असल्यानेच हा कापूर महाग असतो. अनेक शतकांपासून या देशांमधून अनेक ठिकाणी कापूराचा अर्क पाठवण्याचा व्यवसाय सुरु होता. कापराचे झाड अतिशय उंच वाढतेच नी जमिनीत लांबवर मुळं रुजवते. या झाडाचे बहुतेक सर्व भाग वापरले जातात. मोठ्यामोठ्या बांधकामांसाठी तसेच मजबूत वापरासाठी [जसे की रेल्वेच्या स्लीपर्स फ़ळ्या] या झाडाच्या लाकडाचा वापर होतो कारण कापराचे लाकूड अतिशय मजबूत समजले जाते. या ताडमाड झाडाची फ़ुलं मात्र अगदी नाजूक एखाद सेमी असतात जी घोळक्यात येतात. यातूनच पुढे येणारी फ़ळं साधारण ५ ते ६ सेमीची नी पाच फ़ाक्यांची असतात. यातूनच या झाडाचे बी बनते. या झाडाच्या पानांपासून पुर्वापार तैलार्क बनवला जातो जो आजही अनेक देशांमधे त्वचेच्या अनेक उत्पादनांमधे वापरला जातो.
आता हे वाचल्यावर अनेकांना हा प्रश्न छळू शकतो की भारतात ही झाडं आहे का? हो, आहेत. आपल्या अनेक शासकिय व संशोधन करणाऱ्या संस्थांमध्ये ही झाडं लावून त्यावर प्रयोग केले जाताहेत. भारताखेरीज, चीन, जपान सह अनेक पाश्चिमात्य देशांमधे याच्या औषधी गुणधर्मांवर अधिकाधीक संशोधन होतय. आपले पुर्वज खुप हुशार ज्यांना या नैसर्गिक घटकांचा उपयोग व वापर सुपरिचीत होता. आज आपल्याकडे विज्ञानाने दिलेली अनेक साधने असताना आपण शास्त्रिय द्रुष्टिकोन न ठेवता केवळ आंधळेपणाने काहीही फ़ोरवर्ड करत सुटतो. ज्याला खरा कापूर काय आहे हे पहायच असेल तर वनौषधीच्या दुकानात जाऊन भिमसेनी कापूर पहा. हिमालयत जाणाऱ्या गिर्यारोहकांना हा कापूर माहित आहे कारण तो जवळ बाळगला जातो. आयुर्वेदाचार्य़ांना माहित आहे कारण ते त्यांच्या कामात वापरतात. मग आपण सर्वसामांन्यांनीच मागे का रहावं? मी या लेखात कुठलेही आयुर्वेदिक, औषधी गुणधर्म तसेच रासायनिक सूत्रे अथवा गुणधर्म याबद्दल लिहिलेलं नाही. मी रसायन शास्त्राची अभ्यासक नसल्याने त्याबद्दल भाष्य करणे टाळले आहे नी निव्वळ आयुर्वेदिक कापराबद्दल लिहिले आहे कारण हा लेख निव्वळ या झाडाबद्दल आहे जे आपल्याला माहित करुन घ्यायच आहे.
=============================================
कापूर हा देवपूजेसाठी, आरतीसाठी वापरतात. त्याच्या सुगंधाने घरात प्रसन्न वातावरण होते. पण नेहमीच्या कापरापेक्षा आयुर्वेदिक भीमसेनी कापूर हा आरोग्याच्या दृष्टीनेही खूप गुणकारी आहे.
भीमसेनी कापूर कापूर हा कुठल्याही विशिष्ट आकारात येत नाही. स्फटिकासारखा येतो. याचे गोल, चौकोनी वडीत रूपांतर करता येत नाही. कारण नेहमीच्या कापराप्रमाणे यात मेण नसते.रासायनीक कापुर पाण्यावर तरंगतो.भिमसेनी कापुर तरंगत नाही.
सर्दी, खोकला झाला असल्यास एका पातेल्यात गरम पाणी घेऊन त्यात कापराची पूड टाकून त्याची वाफ घ्यावी.
हा कापूर नाकाला, कपाळाला, छातीला लावलेला तरी चांगला. लहान मुलांनाही लावला तरी चालेल.
रुमालावर कापराची पूड करून ती हुंगावी किंवा एखाद्या लहानशा डबीत घेऊन सोबत ठेवावा. आराम मिळेल.
बर्फाळ प्रदेशात गेल्यावर चालताना श्वास लागत असल्यास हा कापूर हुंगावा.
सांधेदुखीचा त्रास असलेल्यांनी तिळाच्या तेलातून हा कापूर सांध्यांना लावावा. तिळाच्या तेलाचा वास उग्र असल्यामुळे हे कापूरमिश्रित तेल लावल्यावर कपडय़ांना वास येतो.
सतत सर्दीचा त्रास होत असल्यास तिळाच्या तेलात कापराची पूड मिसळून ते तेल केसांच्या मुळाला लावावे किंवा खोबरेल तेलात हा कापूर मिसळून ते तेल केसांच्या मुळाला लावावे. कोंडा कमी होतो.
दाढदुखीकरिता छोटासा खडा किडलेल्या दातात ठेवावा. तो आपोआप विरघळतो व लाळ पोटात गेल्यास काही अपाय नाही.
खोकल्याकरिता आयुर्वेदिक कंपनी याच कापराचा उपयोग करतात.
काही सूचना
प्रवासी बॅग, कपडे साठवण्याच्या बॅगमध्ये कापूर ठेवला तर एक सुगंध येतो. कपड्यांना कसर, झुरळ लागत नाही.
पावसात कपडे चांगले वाळत नाहीत, ओलसर राहून त्यांना कुबट वास येतो. अशावेळीही कापूर ठेवावा.
घरात डास जास्त असल्यास झोपताना सभोवती हा कापूर ठेवा. डास फिरकत नाहीत, अन्य कीटकही लांब राहतात.
कापूर पायमोज्यात घातल्यास कुबट वास नाहीसा होईल आणि शिवाय मोज्यामुळे जी खाज पायाला सुटते ती नाहीशी होईल.
कापराचे वैज्ञानिक महत्त्व
वैज्ञानिक संशोधनामुळे सिद्ध झाले आहे की, कापराच्या सुगंधाने जिवाणू, विषाणू, लहान कीटक नष्ट होतात. त्यामुळे वातावरण शुद्ध राहते व आजार दूर राहतात.
No comments:
Post a Comment