Saturday, August 15, 2015

यशाचा युनिक इंडेक्स घेऊन बीएसस्सीचा खर्च भागवला. तिसऱ्या वर्षी बीएसस्सीला ८८ टक्के मिळवून शिवाजी विद्यापिठात एमएस्सीसाठी प्रवेश घेतला. एमएस्सी सुरू असतानाही शिकवणी वर्ग सुरू ठेवून खर्चाचा भार हलका केला. या सर्व प्रवासात दीपक यांच्या डोळ्यासमोर एकच होते, ते म्हणजे जे समोर येईल त्याचा सामना करायचा. कारण याशिवाय समोर पर्यायदेखील नव्हता. परिस्थितीत बदल झाला पाहिजे, हेच डोळयासमोर ठेवून त्यांनी वाटचाल सुरू ठेवली. एमएस्सीला डिस्टींक्शनमध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर शिवाजी विद्यापीठाच्या पदार्थ विज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. सी. डी. लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी पीएचडी साठीचे संशोधन सुरू केले. लोखंडे सरांच्या मार्गदर्शनाखाली दीपक यांनी अवघ्या अडीच वर्षात 'एनर्जी स्टोरेज डिव्हायसीस' या विषयात पीएचडी पूर्ण केली. २०११ मध्ये पीएचडी प्राप्त केल्यानंतर डॉ. दीपक यांनी दक्षिण कोरियातील ग्वांगजू इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी येथे दोन वर्षे संशोधक म्हणून काम केले. त्यानंतर त्यांची निवड जर्मनीच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा 'अलेक्झांडर व्हॉन हंबोल्ट' फेलोशीपसाठी झाली. त्याअंतर्गत त्यांनी जर्मनीतील केम्निट्झ युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी येथे दोन वर्षे संशोधन केले. त्यानंतर जगातील आणखी एका प्रतिष्ठेच्या 'मेरी क्युरी' फेलोशीपसाठी त्यांची निवड झाली. ही फेलोशीप मिळविणारे ते शिवाजी विद्यापीठाचे पहिलेच विद्यार्थी आहेत. या फेलोशीप अंतर्गतच सध्या ते स्पेन येथील संस्थेत संशोधन करीत आहेत. डॉ. डुबल यांच्या नावावर एक युरोपियन आणि एक स्पॅनिश अशी दोन पेटंट्स जमा असून विविध आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये त्यांचे ९० हून अधिक शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. त्यांच्या शोधनिबंधांची दोन हजारांहून अधिक सायटेशन्स झाली असून त्यांचा 'एच इंडेक्स' २७ इतका आहे. एका शोधनिबंधाला किमान दहा सायटेशन्स मिळाल्यानंतर त्याची दखल घेणाऱ्या 'आय टेन इंडेक्स' मध्ये त्यांचा इंडेक्स ४९ इतका सशक्त आहे. 'नेचर' या संशोधन पत्रिकेत त्यांचे तीन शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. लंडनच्या रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्रीच्या 'केमिकल सोसायटी रिव्ह्यू' या ३३.३८ इतका इम्पॅक्ट फॅक्टर असणाऱ्या विज्ञानपत्रिकेत त्यांचा 'हायब्रीड मटेरिअल्स फॉर हायब्रीड डिव्हाइसेस' हा शोधनिबंध प्रकाशित झाला आहे. 'रिसर्च गेट' वरून सुमारे १८ हजार संशोधकांनी त्यांचे शोधनिबंध डाऊनलोड केले आहेत तर १३ हजार संशोधकांनी पाहिले आहेत. रिसर्चगेटवरील त्यांचा स्कोअर ३७.१६ इतका उत्तम आहे. आजवरच्या प्रवासाबाबत बोलताना डॉ. दीपक डुबल आपल्या आईच्या कष्टाबाबत हळवे होतात. आईचे काबाडकष्ट आणि तिचा आपल्या मुलांवरील विश्वासच या साऱ्या प्रवासात प्रेरणादायी ठरल्याचे ते सांगतात. शिवाय पीएचडीचे मार्गदर्शक डॉ. लोखंडे सर यांनी वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शनामुळेच संशोधनाच्या क्षेत्रात एवढी मोठी झेप घेणे शक्य झाल्याचे ते सांगतात. डॉ. डुबल म्हणाले, 'आजही मी ज्यावेळी एखाद्या शाळेत अथवा कॉलेजमध्ये एखाद्या व्याख्यानासाठी जातो, त्यावेळी अभ्यासातील पहिल्या तीन क्रमांकांच्या पुढच्या मुलांकडे माझे जास्त लक्ष असते. वर्गात एकूण ४० मुले असतील तर पहिले तीन सोडून पुढील जे ३७ विद्यार्थी असतात, जे अभ्यासात जेमतेम असतात, त्यांच्यामध्ये तुम्हीदेखील डॉ. दीपक डुबल बनू शकता हा विश्वास जागवण्याचा प्रयत्न करतो. कारण प्रत्येकात एक युनिकनेस असतोच. गरज असते ती हा युनिकनेस ओळखून त्यावर मेहनत घेण्याची.' Times | Aug 15, 2015, 02.23 AM IST दहावीपर्यंत अभ्यासात जेमतेम असणारा एक मुलगा पुढे आपल्या करिअरचा ग्राफ वाढवत नेतो आणि स्पेनमधील एका नावाजलेल्या इन्स्टिट्यूटमध्ये संशोधक म्हणून आपला ठसा उमटवतो. डॉ. दीपक डुबल यांचा किल्ले मच्छिंद्रगडसारख्या एका छोट्या खेडयातून सुरू झालेला प्रवास युवा संशोधकांसाठी रोमांचकारी तसेच दिशादर्शक आहे. मेडिकल, इंजिनिअरिंग आणि कम्प्युटर सायन्सच्या जमान्यात थोडा वेगळा विचार केला तरी सगळे वेड्यात काढतात. सध्या स्कोप कशाला आहे आणि हा कुणीकडे निघाला आहे, अशी उपेक्षा केली जाते. परंतु स्कोप असा कुठे नसतोच, तो आपण निर्माण करायचा असतो. ज्या फिल्डमध्ये आपण असतो, त्यात ज्यावेळी आपण टॉप करतो, त्यावेळी स्कोप आपोआप निर्माण होतो हे डॉ. दीपक प्रकाश डुबल यांनी आपल्या कर्तृत्वाने सिध्द केले आहे. सांगली सातारा जिल्ह्यांच्या सीमेवरील किल्ले मच्छिंद्रगड (ता. वाळवा) या गावातील एक सर्वसामान्य मुलगा ते बार्सिलोना (स्पेन) येथील कॅटलन इन्स्टिट्यूट ऑफ नॅनोसायन्स अॅन्ड नॅनोटेक्नॉलॉजी येथील तरूण संशोधक हा डॉ. डुबल यांचा प्रवास होतकरू आणि परिस्थितीशी झुंजणाऱ्या हजारो मुलांच्या मनात प्रेरणेचा अंकुर फुलविणारा आहे. शिवाजी विद्यापीठातून पीएचडी झालेल्या अवघ्या २९ वर्षांच्या डॉ. डुबल यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या दोन स्पॅनिश आणि एक ब्राझिलियन विद्यार्थी पीएचडी करत आहेत. नुकतीच त्यांची जागतिक विज्ञानपत्रिकांच्या यादीत अग्रमानांकित असणाऱ्या ''नेचर पब्लिशिंग ग्रुप' च्या संपादकीय मंडळावर निमंत्रित म्हणून निवड झाली आहे. अल्पशिक्षित शेतकरी आईवडील आणि बेताची आर्थिक परिस्थिती. त्यातच सातवीत असताना वडील वारले. अशा परिस्थितीत दीपक यांच्या आईने दुसऱ्यांच्या शेतात मोलमजुरी करून दीपक आणि त्यांच्या बहिणीला वाढवले. दिवसाला ४० रूपये मजुरीवर त्या माऊलीने मुलांचे शिक्षण सुरू ठेवले. नववीपर्यंत जेमतेम ५५ ते ५७ टक्क्यांपर्यंत मार्क मिळवणाऱ्या दीपकला दहावीला आयुष्यात पहिल्यांदा फर्स्टक्लास मिळाला. हा ग्राफ पुढे वाढत गेला आणि १२ वी सायन्सला ८२ टक्के मार्क मिळाले. यानंतर त्यांना त्यावेळी क्रेझ असलेल्या इंजिनिअरिंगला जायचे होते. पण त्याच दरम्यान इंजिनिअरिंगची फी वाढली होती आणि खिशात ५०० रूपेयेही नव्हते. त्यामुळे सर्व मित्र इंजिनिअरिंगला अॅडमिशन घेत असताना दीपकना मात्र बीएसस्सी (पदार्थ विज्ञान) ला अॅडमिशन घ्यावे लागले. पण घडते ते चांगल्यासाठीच या उक्तीनुसार दीपकना या मार्गावरूनच आपले ध्येय गाठता आले. बीएस्सीला असताना दीपकनी आईवरील जबाबदारी कमी व्हावी म्हणून खासगी शिकवणी घेऊन बीएसस्सीचा खर्च भागवला. तिसऱ्या वर्षी बीएसस्सीला ८८ टक्के मिळवून शिवाजी विद्यापिठात एमएस्सीसाठी प्रवेश घेतला. एमएस्सी सुरू असतानाही शिकवणी वर्ग सुरू ठेवून खर्चाचा भार हलका केला. या सर्व प्रवासात दीपक यांच्या डोळ्यासमोर एकच होते, ते म्हणजे जे समोर येईल त्याचा सामना करायचा. कारण याशिवाय समोर पर्यायदेखील नव्हता. परिस्थितीत बदल झाला पाहिजे, हेच डोळयासमोर ठेवून त्यांनी वाटचाल सुरू ठेवली. एमएस्सीला डिस्टींक्शनमध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर शिवाजी विद्यापीठाच्या पदार्थ विज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. सी. डी. लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी पीएचडी साठीचे संशोधन सुरू केले. लोखंडे सरांच्या मार्गदर्शनाखाली दीपक यांनी अवघ्या अडीच वर्षात 'एनर्जी स्टोरेज डिव्हायसीस' या विषयात पीएचडी पूर्ण केली. २०११ मध्ये पीएचडी प्राप्त केल्यानंतर डॉ. दीपक यांनी दक्षिण कोरियातील ग्वांगजू इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी येथे दोन वर्षे संशोधक म्हणून काम केले. त्यानंतर त्यांची निवड जर्मनीच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा 'अलेक्झांडर व्हॉन हंबोल्ट' फेलोशीपसाठी झाली. त्याअंतर्गत त्यांनी जर्मनीतील केम्निट्झ युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी येथे दोन वर्षे संशोधन केले. त्यानंतर जगातील आणखी एका प्रतिष्ठेच्या 'मेरी क्युरी' फेलोशीपसाठी त्यांची निवड झाली. ही फेलोशीप मिळविणारे ते शिवाजी विद्यापीठाचे पहिलेच विद्यार्थी आहेत. या फेलोशीप अंतर्गतच सध्या ते स्पेन येथील संस्थेत संशोधन करीत आहेत. डॉ. डुबल यांच्या नावावर एक युरोपियन आणि एक स्पॅनिश अशी दोन पेटंट्स जमा असून विविध आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये त्यांचे ९० हून अधिक शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. त्यांच्या शोधनिबंधांची दोन हजारांहून अधिक सायटेशन्स झाली असून त्यांचा 'एच इंडेक्स' २७ इतका आहे. एका शोधनिबंधाला किमान दहा सायटेशन्स मिळाल्यानंतर त्याची दखल घेणाऱ्या 'आय टेन इंडेक्स' मध्ये त्यांचा इंडेक्स ४९ इतका सशक्त आहे. 'नेचर' या संशोधन पत्रिकेत त्यांचे तीन शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. लंडनच्या रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्रीच्या 'केमिकल सोसायटी रिव्ह्यू' या ३३.३८ इतका इम

No comments:

Post a Comment

Featured Post

              राजा  भगवंतराव ज्यू कॉलेज११ वी १२ वी कला व विज्ञान शाखेत शिकत असणार्या विध्यार्थ्यासाठी आरोग्य आणि शारीरिक शिक्षण विषयची लिंक...