Saturday, August 15, 2015

५ कुतुहलजनक गोष्टी... देशाच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त, याविषयी लोकांना फारशा ठाऊक नसलेल्या आणि त्याच्याशी संबंधित अशा या ५ कुतुहलजनक गोष्टी... १५ ऑगस्ट हा आणखी तीन देशांचाही स्वातंत्र्यदिन आहे. दक्षिण कोरियानं जपानकडून १५ ऑगस्ट १९४५ ला स्वातंत्र्य मिळवलं. तर युनायटेड किंगडमकडून बहारीनला याच दिवशी १९७१ मध्ये आणि काँगोला फ्रान्सकडून १९६० मध्ये स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्यदिनासाठी १५ ऑगस्ट ही तारीखच का निवडण्यात आली याबाबतही काही वदंता आहेत. लॉर्ड माऊंटबॅटन यांनी याच तारखेची निवड केली कारण, जपाननं संयुक्त फौजांसमोर शरणागती पत्करली त्या गोष्टीला या दिवशी दोन वर्ष पूर्ण होत होती. तर माऊंटबॅटन यांनी ज्येष्ठ पत्रकार कुलदीप नायर यांना सांगितलं होतं, की भारतातली परिस्थिती त्यांच्या हाताबाहेर चालली होती. त्यामुळे ब्रिटीशांना लवकरात लवकर या देशातून बाहेर पडायचंच होतं. अन्यथा ब्रिटीशांनी १९४८ साली भारताला स्वातंत्र्य देण्याचं मान्य केलं होतं. स्वतंत्र भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांना लाल किल्ल्यावरुन राष्ट्रध्वज फडकावण्याचा मान तब्बल १७ वेळा मिळाला. त्यांनी यावेळी राष्ट्राला उद्देशून भाषणही केलं. आपला राष्ट्रध्वज बनवण्यासाठी खादी किंवा हातमागावर विणलेलं कापडच असायला हवं. अन्य कुठल्या साहित्याचा वापर करण्यास परवानगी नाही. असा वापर केल्यास कायद्यानुसार तीन वर्ष तुरुंगवास शिवाय दंड होऊ शकतो. सोन्याचा प्रतितोळा दर आज २५ हजारांच्या घरात आहे. १९४७ साली मात्र सोन्याचा प्रतितोळा दर हा ८८ रुपये होता. आज एक डॉलर म्हणजे सुमारे ६५ रुपये असा विनिमय दर आहे, १९४७ साली हाच विनिमय दर १ डॉलर म्हणजे १ रुपया असा होता.

No comments:

Post a Comment

Featured Post

what is Genre

This list presents a comprehensive overview of major literary genres, encompassing both fictional and non-fictional forms. Let's break t...