Reach With Information AS A Guideline To Help The Students Throw The Different Links For Share Knowledge
Sunday, August 16, 2015
[16/08 09:52] Rautp,blogspot,in: कोणी म्हणत seven days and seven nights च package म्हणजे मधुचंद्र मी म्हणतो चांदणी रात्र, एक झोपाळा, हातात हात आणि खांद्यावर तिचे डोके म्हणजे मधुचंद्र कोणी म्हणत Paris च्या संध्याकाळ ची रोषणाई म्हणजे मधुचंद्र मी म्हणतो तिला अचानक भेट दिली कि तिच्या डोळ्यातली ती चमक म्हणजे मधुचंद्र कोणी म्हणत काश्मीर च्या बागेत एकत्र फिरणं म्हणजे मधुचंद्र मी म्हणतो न सांगता एखादा गजरा तिच्या डोक्यात माळण म्हणजे मधुचंद्र कोणी म्हणत fancy आणि stylish कपडे घालून नवऱ्याबरोबर फिरणं म्हणजे मधुचंद्र मी म्हणतो सणाच्या दिवशी नव्वारी साडी, टिकली अन नाकात नत म्हणजे मधुचंद्र कोणी म्हणत तिला गुलाबाचा गुच्छ देणं म्हणजे म्हणजे मधुचंद्र मी म्हणतो सगळ्यान देखत एक क्षण चोरून तिला "छान दिसत आहेस" म्हणणं आणि ते ऐकून तिचा चेहरा गुलाबी होणं म्हणजे मधुचंद्र कोणी म्हणत तिच्या सुंदरतेवर कविता करणं म्हणजे मधुचंद्र मी म्हणतो ती माहेरी असताना प्रत्येक कवितेत तिला पाहणं म्हणजे मधुचंद्र कोणी म्हणत लाजेचा पडदा काढून एकामेकांना जाणून घेणं म्हणजे मधुचंद्र मी म्हणतो लग्नाच्या २५ वर्षानंतर सुद्धा उखाणा घेताना लाजणं म्हणजे मधुचंद्र कोणी म्हणत लग्नानंतर १० दिवस असतो मधुचंद्र मी म्हणतो मनात प्रेम जागं ठेवला तर आयुष्यभर टिकतो हा मधुचंद्र [16/08 09:55] Rautp,blogspot,in: माझे मित्र श्री संपत माने यांनी सुंदर विचार मांडला आहे. " एखाद्याने तुम्हाला क्षमा केली याचा अर्थ तुमच्या चुकीची तिव्रता आणि स्वरूप कमी झालेले नसते ". विचार केला तर त्यांचे विचार आपल्या मनाला पटतात. झालेल्या चुकीची तीव्रता - स्वरूप कमी झालेलं नसतं. पण समोरच्याला जेव्हा त्याची चूक उमजते तेव्हा त्याला क्षमा केली जाते आणि अशी क्षमा करणे गरजेचे आहे असं मला वाटतं. समजा, कारण नसतांना आपण एखाद्या व्यक्तीशी भांडलो, नको त्या शिव्या दिल्या, तर त्याला राग येणार हे साहजिक आहे. पण आपली झालेली चूक ही गैरसमजूतीने होती, आपण भांडलो ही आपली चूक झाली, भांदावयास नको होतं हे ज्यावेळी कळून येतं त्यावेळी आपण त्या व्यक्तीची क्षमा मागतो. झालेली चूक कबूल करतो. आपण आपली चूक कबूल केली म्हणून समोरची व्यक्ती आपल्याला क्षमा करते. तरीही त्याच्या मनात झालेल्या अपमानाची तीव्रता कमी झालेली नसते. ती अपमानाची तीव्रता त्याच्या मनाच्या कोपऱ्यात राहते. काही व्यक्ती वेळ आली की बोलून दाखवितात काही व्यक्ती बोलून दाखवीत नाहीत. आपलं आयुष्य सुंदर आहे नी ते आपल्याला अधिकाधिक सुंदर करायचं आहे तर नेहमी वागतांना बोलतांना विचार करून वागलं - बोललं पाहिजे. विनाकारण कुणी आपल्याकडून अपमानीत होणार नाही याची काळजी घ्यावयास हवी.आपल्या आयुष्यात नेहमी क्रिया तशी प्रतिक्रिया होतं असते याचा विचार करणे गरजेचे आहे. साध्या साध्या गोष्टीतून आपल्याला शिकावयास मिळतं असतं, आपलाही दृष्टीकोन शिकण्याचा हवा. खरं ना, पटतंय ना. प्रदीप नरहरि केळकर… [16/08 09:56] Rautp,blogspot,in: नक्की वाचा , तुमच्या फायद्यासाठी पानाचा देठ मजबूत नसेल तर पान गळून पडत. कारण पिकलेला किंवा कमजोर देठ पानाला कधीच साथ देत नाही ! थोडीही वाऱ्याची झुळूक येता ते पान गळून खाली पडतं. तसेच आपल्या जीवनाचेही आहे.रोगी शरीर ही आपल्या जगण्याला साथ देत नाही व आपल्या देहातून ते बाहेर पडतं एक पान गळून पडले तर झाडाला काही फरक पडत नाही,कारण झाडाला अनगिनत पाने आहेत तसेच आपण या दुनियातून गेलो तर,या संसाराला काही फरक पडत नाही मित्रांनो हा मानव जन्म भेटला तर का कीड़क,रोगी,बीमार राहुन जगायचं मला माहीत नाही की मी या जन्मा अगोदर काय होतो ! मेल्या नंतर काय होणार,हे मला माहीत नाही व याच्याशी काही घेणे देने नाही.मला फक्त येवढे माहीत आहे की हा माझा मानव जन्म आहे.व या जन्मात मला निदान साठ वर्ष तरी स्वस्थ व निरोगी जगायचं मित्रांनो आपण सर्वाना वेळ देतो - आपण जिथे काम करतो तिथे,आपल्या कुटुंबाला,मित्राला,देवाला,नातेवाईकाला पण आपण आपल्या शरीरासाठी कधी वेळ दिला का ? आपण चोवीस तासामधे निदान एक तरी तास वेळ देतो का ? माझ सांगायचे तात्पर्य येवढेच आहे की,या चोवीस तासामधला एक तरी तास आपले शरीर निरोगी करण्यासाठी ठेवा. सकाळी रोज जर आपण व्यायाम केला थोडे धावलो तर नक्कीच आपण साठ वर्ष निरोगी राहाल. हा मेसेज दुसऱ्या ग्रुप मधे पाठवला नाही तरी चालेल पण आत्मसात नक्की करा [16/08 10:13] Rautp,blogspot,in: एका गरीबाच्या झोपडीत सायंकाळचे सात वाजले की एका छोट्याशा देवळीत एक रॉकेलच्या तेलाचा दिवा पेटतो. दिवसभर काबाड़ कष्ट करणारे, उन्हा तान्हात कधी भाकरीविना कधी पाण्याविना राब राब राबणारे ते दोन जीव त्या छोट्याशा दिव्याच्या मंद प्रकाशात विसावा घेतात. दिवसभर घामाने,मातीने माखलेले ते त्यांचे शरीर त्या झोपडीत दिव्याच्या प्रकाशात मंत्रमुग्ध होउन दगडाच्या भिंतीला टेका देऊन शांत पणे पडते. दिवसभर भर उन्हात लोखंडाच्या तिकासी,पहारीने दगड मातीचे काम करणाऱ्या त्या पोटाची भूक आपल्या पेक्षा न्यारीच. खरी भूक म्हणजे काय त्या पोटाला विचारावी ! दिवसभर AC च्या थंड्या हवेखाली व नरम गादीच्या खुर्चीखाली बसून चार वेळा चहा पिऊन दुपारचे भरपेट जेवण व मधेच मनात आले त्याची चव चाखणारे आपले पोट, जेंव्हा रात्री DINNER ला डाइनिंग टेबलवर बसतो, तेंव्हा मनाला एक प्रश्न पडतो आज आपण काय खायायचे अन् का खायायचे ? कारण ज्या पोटाला भूक या शब्दाचा अर्थच कळत नाही ते पोट फक्त DINNER या नावासाठी पोटात काहीतरी घालण्याचा प्रयत्न करतो. दहा दहा ट्यूब लाइट असणाऱ्या त्या घरातल्या वेक्तीला काय माहीत अंधार म्हणजे काय ? खरतर त्या वेक्तीचे घर कितीही प्रकाशमय असले तरी त्यांच्या जीवनात अंधारच असतो. व त्या अंधाराला डावलन्यासाठी तो सतत पळत असतो खरा प्रकाश शोधायला, खरे जीवन शोधायला ! त्या झोपडीतील ते दोन जीव मात्र आपली पोटाची आग विझवन्यासाठी चुलीत लाकडे टाकून आग लावतात व त्याच्यात आपल्या पोटाला विसावा देणारे अन्न, वरण भात बनवून जर्मनच्या ताटात आनंदात वरपतात. आणि रात्रीचे 8: 30/9: 00 वाजता आपल्या झोपडीचे ते तुटके मूटके कवाड (दरवाजा )बंद करून ठिगळ्याच्या गोदड्यावर निवांत झोपतात शांतपणे बिना पंखा बिना AC अगदी गाढ झोपी गेलेले ते दोन जीव. आणि त्या देवळीतला दिवा अगदी शांतपणे डोलत डोलत त्यांना प्रकाश देत राहतो ! इकडे आलीशान घरामध्ये AC च्या थंडगार हवेत नरम आलीशान बेडवर मात्र दुसऱ्या दोन जीवाला झोप येत नव्हती . रात्रीचे बारा वाजले होते तरी यांचे डोळे उघडेच होते. हे दोघे उद्याचा विचार करत होती, जो दिवस अजून उजेडलाच नाही. दोघापैकी एक मधेच बोललं " डार्लिंग तुला काय वाटते उद्या कोणत्या कंपनीचे शेअर विकत घ्यावे ? . . [16/08 10:26] Rautp,blogspot,in: आज 16 ऑगस्ट... कालच सर्वांनी स्वातंत्र्यदिन साजरा केलेला. आणि आज पुन्हा रोजच्या सारखीच शाळा भरलेली... प्रार्थना होताच हेडमास्तरांचा पहिलाच प्रश्न: "काल कोण कोण नव्हते आले रे?" एकूण 169 च्या संख्येतून 7-8 चेहरे उभे राहिले. मग एकेक फेकाफेकी सुरु झाली!! डोके दुखत होते...पोटात दुखत होते... वगैरे कारणे सुरु झाली!! या सगळ्यांमध्ये 7 वी ला असलेल्या गणू चा ही नंबर होता... "का रे गण्या का नाही आलास" मास्तरांनी विचारले. "सर.. शेतावर गेलतो.. आय म्हणलि चार दिस शेताला पाणी नाई... म्हणून आमच्या शेजारच्या काकांचि मोटर आणून पाणी चालु करायचे व्हते..." -गणु. गण्या चे उत्तर ऐकून पूर्ण वर्ग हसु लागला!! "मूर्खा! आजारी नव्हतास तरी नाही आलास? मास्तर थोड़े तापले होते... "स्वातंत्र्यदिन म्हणजे काय ते कळते का? कळते का???" मास्तरांचा आवाज आणखी चढ़ला... गणु शांतच उभा राहिला. त्यात पूर्ण वर्ग तोंड लपवत हसत होता हे पाहुन तो आणखिच ओशाळला... मास्तर पुन्हा सुरु झाले..." गधड्या, आपल्या स्वातंत्र्य वीरांनी स्वतः चे जीव देऊन देशाला 15 ऑगस्ट 1947 साली आपल्याला इंग्रजांपासून स्वतंत्र केले म्हणून आज आपण सुखी आहोत" असे म्हणत त्याच्या कानशिलात चापट लगावली... "जाऊ दया ओ सर... ह्या मंद मुलांना फक्त खायचे प्यायचे अन झोपायचे एवढेच कळते!!" मास्तरांच्या शेजारी बसलेल्या जोशी मॅडम नी आगीत तेल ओतले... विषय संपला. ...पण गण्याचे तोंड मात्र दिवस भर पडलेलेच होते. साडेपाच वाजले. शाळा सुटली. गणू मात्र अजूनही स्वातंत्र्याच्याच विचारात होता.... " नक्की काय आस्तेय हे स्वातंत्र्य बितंत्र्य? मागच्या वर्षी सावकाराचे कर्ज फिटत नाही म्हणून बापानी जीव दिला... तेव्हा भारत स्वतंत्र नव्हता काय? आय रोज शेतात राबते आणि आपल्याला खायला घालते... तीला स्वातंत्र्य द्यायला इंग्रज विसरले असतील काय? ताई कॉलेजवरुन येताना ती कट्टया वरची टारगट मुले तिची छेड़ काढतात... याला स्वातंत्र्य म्हणत असतात काय? मागच्या महिन्यात वरच्या आळीतुन फिरताना मला एका माणसाने "ए म्हाराच्या" म्हणून हाक मारली होती... म्हणजे तो माणूस पण इंग्रज असेल काय?? " एव्हाना गण्याचे 12 वर्षाचे डोके काहीच्या काही विचार करीत-करीत जड झाले होते.... घरी पोहोचला... लगेचच दप्तर टाकून दिले... आणि गुरांना चरायला नेण्यासाठी बाहेर पडला.... ....घराच्या ओठ्यावर कोपऱ्यात गेली 2 वर्षे पाळुन ठेवलेला पोपट होता... तिकडे सहज नजर गेली... "ह्या मिठुला आपण जंगलातुन पकडून आणले.... पिंजऱ्यात् ठेवले... मस्त खाऊ पिऊ सुद्धा घातले... एवढेच काय तर 2 वर्षात हा आता माणसासारखा काही काही बोलू सुद्धा लागलाय....पण याचा अर्थ तो आनंदात असेल असे नाय ना!!" "... ह्याला आपण पिंजऱ्यात टाकले.... म्हणजे आपण इंग्रज झालोय!! आणि हा? हा तर स्वातंत्र्यवीर!!" गण्या त्याच्यापाशी गेला... सहजच न्याहाळले... पण आज त्याची नजर नेहमीपेक्षा खुपच वेगळी होती. जणू त्याला स्वातंत्र्याचा उलगडा झाला होता... इतक्यात पोपट बोलला "जय हिंद!! भारत माता की जय!!" बहुधा कालच्या स्वातंत्र्य रॅली मधून त्या बोलक्या पोपटाने सुद्धा काही शब्द उचलले होते!! गणु आणखी पुढे झाला... "मी इंग्रज, तू स्वातंत्र्यवीर... मी इंग्रज... आणि तू स्वातंत्र्यवीर$$$" असे काहीसे पुटपुटत पिंजऱ्याचे दार उघडले!!! पोपटाने उंच अवकाशात झेप घेतली!! खरे स्वातंत्र्य तर आज मिळाले होते... त्या पोपटाला... आणि गणुच्या विचारांनाही
Subscribe to:
Post Comments (Atom)
Featured Post
राजा भगवंतराव ज्यू कॉलेज११ वी १२ वी कला व विज्ञान शाखेत शिकत असणार्या विध्यार्थ्यासाठी आरोग्य आणि शारीरिक शिक्षण विषयची लिंक...
-
EN GLIS H Y UVAKBHARATI Standard - XII BBIG TV CH 22 29 9954 The Coordination Committee formed by G.R. No. Abhyas - 2116/(Pra.Kra.43/...
-
Std. XI (Marks: 50) Time- Two and Half Hours Section I- Prose Q.1 (A) Read the extract and complete the activities given below. ...
-
"The Raja of Aundh" A short story by G. D. Madgulkar Translated by Vinaya Bapat. I had seen the Raja. He was never so pompous ...
No comments:
Post a Comment