Thursday, July 23, 2015

अकरावी 'एमसीव्हीसी' अभ्यासक्रमात बदल राज्य शिक्षण मंडळाची मान्यता नसतानाही उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा निर्णय पुणे - राज्य शिक्षण मंडळाने तयार केलेल्या व्यावसायिक अकरावीच्या अभ्यासक्रमास (एमसीव्हीसी) सरकारची मान्यता नसताना उच्च व तंत्र शिक्षण विभागाने अभ्यासक्रमास मान्यतेचा शासन निर्णय जारी केला आहे. तो याच वर्षीपासून लागू करण्यास सांगितले आहे. हा अभ्यासक्रम अचानक लादला जात असल्याची टीका व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या शिक्षकांनी केली आहे. व्यावसायिक अकरावी, बारावीचे नियंत्रण व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय करते. राज्यात सुमारे 950 संस्थांच्या माध्यमातून 30 व्यावसायिक अभ्यासक्रम चालविले जातात. त्याची परीक्षा राज्य बोर्ड घेत असल्याने संचालनालयाच्या मदतीने अभ्यासक्रम तयार करण्याचे कामही बोर्ड करते. त्याला सरकारची मान्यता मिळाल्यानंतर अभ्यासक्रम लागू होतो. या अभ्यासक्रमाला शालेय शिक्षण विभागाची मान्यता मिळण्यापूर्वीच उच्च व तंत्र शिक्षण संचालनालयाने वेगळा शासन निर्णय जारी केला. त्यामुळे दोन्ही अभ्यासक्रम वेगळे असण्याची शक्‍यता शिक्षकांनी वर्तविली आहे. या अभ्यासक्रमाची पुस्तकेही तयार झालेली नाहीत. महाराष्ट्र व्यावसायिक अभ्यासक्रम शिक्षक संघटनेचे अध्यक्ष डॉ. युगल रायलू म्हणाले, ‘नव्या अभ्यासक्रमास विरोध नाही. मात्र, त्याची घाई केली जात आहे. शिक्षकांचे प्रशिक्षण घेऊन तो लागू करायला हवा. उच्च व तंत्र शिक्षण संचालनालयाने 4 जुलै रोजी उशिरा शासन निर्णय जारी केला. अकरावी, बारावीची परीक्षा बोर्ड घेत असल्याने त्यांनी अभ्यासक्रम बदलाच्या सूचना दिल्या पाहिजेत. त्यांच्याकडून अधिकृत सूचना नाही. याच वर्षी बदल करायचा होता, तर प्रशिक्षणासह पुस्तक निर्मितीचे काम मार्चमध्ये पूर्ण व्हायला हवे होते.‘‘ ‘जुनीच पुस्तके वापरा‘ जिल्हा व्यवसाय शिक्षण अधिकारी राजेंद्र घुमे म्हणाले, ‘राष्ट्रीय कौशल्य विकास आराखड्यानुसार गेल्या वर्षी अभ्यासक्रम बदलण्याचा निर्णय झाला. मात्र, तांत्रिक अडचणीमुळे त्याला स्थगिती मिळाली. तोच अभ्यासक्रम या वर्षी लागू होत आहे. पुस्तके छापण्यास दिली असून, दोन महिन्यांत तयार होतील. तोपर्यंत शिक्षकांनी जुन्या पुस्तकांच्या आधारे सामाईक धडे शिकविण्यास सुरवात करावी. व्यावसायिक अभ्यासक्रमाची पुस्तके मराठीतून बाजारात आणली जाणार आहेत.‘‘ - नव्या अभ्यासक्रमात पूर्वीचे 30 विषय एकत्र करून 20 विषय केले. - व्यावसायिक अभ्यासक्रम करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सुमारे 70 हजार. - नवा अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण घेण्याऐवजी शिक्षकांचे तीन तासांचे प्रबोधन वर्ग. - अकरावीचे वर्ग 15 जुलै रोजी सुरू झाल्यानंतर व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागाची अभ्यासक्रम बदलाची कनिष्ठ महाविद्यालयांना सूचना. अभ्यासक्रमाला मान्यता नाही राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गंगाधर म्हमाणे यांनी व्यावसायिक अकरावी, बारावीच्या अभ्यासक्रमाला सरकारची मान्यता नसल्याचे सांगितले. ते म्हणाले, ‘अभ्यासक्रम तयार करून एप्रिल महिन्यात मान्यतेसाठी शालेय शिक्षण विभागाकडे पाठविला आहे. त्यांची मान्यता आली नसल्याने शिक्षण संस्थांना अभ्यासक्रम बदलण्यासंबंधी सूचना पाठविलेल्या नाह

No comments:

Post a Comment

Featured Post

what is Genre

This list presents a comprehensive overview of major literary genres, encompassing both fictional and non-fictional forms. Let's break t...