Thursday, July 23, 2015

आज संध्याकाळी मा.शिक्षणमंत्रयांबरोबर झालेल्या बैठकीत सर्व मगण्यांवर सकारात्मक चर्चा झाली.संच मान्यतेतील त्रुटी दुर करण्यासाठी दि.28 जुलैला मा. शिक्षण सचिव, आयुक्त व संचालक यांच्या सोबत बैठक घेऊन दि.15 ऑगस्ट पर्यन्त ऑनलाईन संच मान्यता करण्यात येईल,अन्यथा ऑफलाइन पद्धतीने संचमान्यता करण्यात येईल.उपसंचालकांनी मान्यता दिलेल्या पायाभूत पदांवरील शिक्षकांच्या वेतनासाठी तातडीने आर्थिक तरतूद करण्यात येईल,उर्वरित पदांना मान्यतेबाबत उपसंचालकांना सहनुभूतिने निर्णय घेण्याचे आदेश देण्यात येतील.आईटी विषयाबाबत व अर्थ खात्याशीसंबंधीत मगण्यांवर अर्थ मंत्रयांबरोबर 15 ऑगस्ट पर्यन्त संयुक्त बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल.तसेच इतर मगण्यांवरही 15 ऑगस्ट पर्यन्त निर्णय घेण्याचे आश्वासन मा.मंत्र्यांनी दिले व आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले त्यास प्रतिसाद म्हणून 15 ऑगस्ट पर्यन्त आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय महासंघाने घेतला आहे. .. धन्यवाद ! प्रा.अनिल देशमुख. सरचिटणीस,म.रा.क.म.शिक्षक महासंघ.(MFJCTO)

Featured Post

speech writing important points for writing skills

...