१० खास गोष्टी
पिंगली यांची शेवटची इच्छा अपूर्णच राहिली. कारण...
जाणून तिंरग्याचे रचनाकार पिंगली वेंकैया यांच्याबद्दलच्या १० खास गोष्टी
पिंगली वेंकैया
भारतीय राष्ट्रध्वजाचे म्हणजेच तिरंग्याचे आद्य रचनाकार पिंगली वेंकैया यांची आज १४२वी जयंती आहे. आजच्याच दिवशी १८७६ साली त्यांचा सध्याच्या आंध्रप्रदेश राज्यात असणाऱ्या मच्छलीपट्टम येथील भतलामपेनूमारू येथे जन्म झाला होता. त्यांच्या जयंतीनिमित्त जाणून घेऊयात त्यांच्याबद्दलच्या काही खास गोष्टी…
वयाच्या १९व्या वर्षीच ते ब्रिटीश लष्करात भरती झाले. ते दक्षिण आफ्रिकेमधील अँग्लो बोएर युद्धामध्ये सैनिक म्हणून ब्रिटिशांच्या बाजूने लढले.
याच काळात त्यांची आणि महात्मा गांधींची दक्षिण आफ्रिकेमध्ये भेट झाली. त्यानंतर पुढील पन्नास वर्षाहून अधिक काळ हे दोन्ही नेते एकमेकांच्या संपर्कात होते.
पिंगली हे जियोलॉजीमध्ये डॉक्टरेट होते. ते हिरे खाण उत्खन्नातील तज्ञ होते. त्यामुळेच त्यांना डायमंड वेंकैया हे टोपणनाव देण्यात आले होते.त्याचप्रमाणे कापसावरील संशोधनामध्ये त्यांना विशेष स्वारस्य असल्याने त्यांना कॉटन वेंकैया नावानेही ओळखले जायचे.
त्यांना उर्दू तसेच जपानी भाषेबरोबरच इतरही अनेक भाषा अवगत होत्या.
३१ मार्च १९२१ मध्ये पिंगली यांनी विजयवाडा येथे झालेल्या काँग्रेस कार्यकारणीच्या बैठकीमध्ये भगव्या आणि हिरव्या रंगाचा झेंडा भारतीय राष्ट्रध्वज म्हणून सादर केला. मूळचे जालंधरच्या असणाऱ्या लाला हंसराज यांनी या झेंड्यावर चर्खा असावा असे सांगत चर्ख्यासहीत हा झेंडा सादर केला तर गांधीजींनी भगव्या आणि हिरव्या रंगाच्यामध्ये पांढऱ्या रंगाच्या पट्टीचा सल्ला दिला. आणि अशाप्रकारे तिरंग्याचा जन्म झाला.
१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पिंगली यांच्या कल्पनेतून साकारलेल्या तिरंगी झेंड्याला भारताचा राष्ट्रध्वज म्हणून मान्यता मिळाली. भारतीय संविधान समितीने २२ जुलै १९४७ रोजी तिरंगा झेंडा भारताचा राष्ट्रध्वज असल्याचे जाहीर केले.
पिंगली यांची शेवटची इच्छा अपूर्णच राहिली. भारताचा तिरंगा दिल्लीतील लाल किल्ल्यावर फडकताना पाहण्याची त्यांची इच्छा होती. मात्र त्यांच्या कुटुंबाकडे त्यांना दिल्लीला पाठवण्याइतके पैसे नसल्याने त्यांची ही इच्छा पूर्ण होऊ शकली नाही.
१९६३ साली पिंगली यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर काही दशकांनी २००९ साली भारतीय पोस्ट खात्याने त्यांच्या सन्मानार्थ पोस्टाचे तिकीट जारी केले. स्वातंत्र्य लढ्यातील योगदानाबद्दल त्यांचा सन्मान करण्यासाठी हे तिकीट जारी करण्यात आले होते.

No comments:
Post a Comment