शाळासिध्दी लेखमाला - 1
शाळासिध्दी – शाळा मूल्यांकनाचा राष्ट्रीय कार्यक्रम - शाळांच्या सर्वांगिण विकासाचा राजमार्ग
शाळेचे सामर्थ्य स्त्रोत – शालेय आवार (क्षेत्र क्रमांक 1 – गाभामानके क्रमांक 1 )
शालेय आवार (शालेय परिसर)
1. शाळेचे सामर्थ्य स्त्रोत (भौतिकसुविधा)–
शालेय आवार (शालेय परिसर)- शालेय भौतिक सुविधांचा विद्यार्थ्यांच्या अध्ययनावर व अध्यापकांच्या अध्यापनावर होत असतो.विद्यार्थी दिवसाचे 6/7 तास शाळेत असतात. अशावेळी ते ज्या भौतिक वातावरणात राहतात ते वातावरण उत्साही, स्वास्थपूर्ण, मनाला प्रसन्न करणारे असणे आवश्यक आहे. असे वातावरण निर्माण करण्याचे कार्य शालेय आवार करते. शालेय आवार किंवा शालेय परिसर शाळेच्या सामर्थ्याचा महत्वाचा घटक आहे. जेंव्हा आपण एखाद्या परिसराचा उल्लेख करतो तेंव्हा त्या परिसरातील कितीतरी बाबी आपल्या डोळ्यासमोर येतात. उदाहरणार्थ आपण रेल्वे स्टेशन असा उल्लेख केल्यास आपल्या डोळ्यासमोर प्लेटफॉर्म, लोखंडी रुळ, शेड, सिग्नल,दुकाने, घड्याळ ,दर्शक फलक, सुरक्षा यंत्रणा व आसपासच्या कितीतरी गोष्टी दिसुन येतात. अगदी त्याच प्रमाणे शालेय परिसर म्हटला की शालेय इमारत, वर्गअध्ययन अध्यापन कार्यासाठी उपयोगात येणा-या खोल्या, ग्रंथालय, प्रयोग शाळा , धान्य साठवणूक, इतर शालेय कामकाजासाठी वापरण्यात येणा-या खोल्या यांचा समावेश होतो. या बरोबरच शालेय वातावरण प्रसन्न व आनंददायी बनविण्यासाठी आवश्यक असलेल्या शालेय बगीचा, वृक्षारोपण, शालेय कुंपण (वॉल कम्पांऊंड), रंगकाम, सजावट यांचादेखिल समावेश होतो. शाळा मोठी असेल तर शालेय इमारत रचना, प्रवेशद्वार, अंतर्गत रस्ते, दिशादर्शक फलक, लॉन (हिरवळ),सभागृह,पार्कींग,स्वच्छतागृहे इत्यादींचा समावेश होतो. शालेय परिसरातील प्रत्येक गोष्टीचे महत्व आहे. विद्यार्थ्याच्या सर्वांगिण विकासामध्ये बौध्दीक विकास, शारीरिक विकास, मानसिक विकास, भावनिक विकास, सांस्कृतिक विकास, दृष्टीकोन व विविध कौशल्यांचा विकास यांचा समावेश होतो. वरील सर्व विकास कार्यात शालेय परिसर महत्वाची भूमिका पार पाडीत असतो. शालेय परिसर आकर्षक असल्यास त्या शाळेत बालकांना व पालकांना प्रवेश घ्यावा असे वाटते. घरातील वातावरणामधून विद्यार्थी शालेय परीसरात आल्यानंतर त्याचे मन प्रसन्न असणे आवश्यक असते. प्रसन्न वातारणामध्ये अध्ययनाची गोडी वाढते. शालेय कामकाजाची सुरुवात प्रसन्नपणे व्हावी याकरीताच शालेय परिपाठाचे आयोजन असते.विद्यार्थी अध्ययनास तयार व्हावा, अध्ययनासाठी मानसिक व शारीरिक तयारी व्हावी यासाठी शालेय परिपाठ घेतला जातो. शालेय आवार हे विद्यार्थ्यांना परिपाठासाठी मोकळेपणाने बसता यावे इतके मोठे असायला हवे. शाळेला काही प्रसंगी शैक्षणिक कार्यक्रमाचे आयोजन करता यावे यासाठी सभागृहाची आवश्यकता असते. सभागृहामुळे विविध सांस्कृतिक कार्यक्रम परिणामकारकपणे घेता येतात. शालेय आवार व शालेय आवारात सहभागी सर्व घटकांचा वापर हा विद्यार्थ्यांना सहज करता यावा तसेच सर्व ठीकाणी विद्यार्थी सुरक्षा लक्षात घेतलेली असावी. सुरक्षेच्या दृष्टीने प्रत्येक ठीकाणी व्यवस्था असणे आवश्यक ठरते. वापर , सुरक्षा व उपयोगीता ही अत्यंत महत्वाची बाब ठरते.शालेय परिसरामध्ये विद्यार्थ्यांचा शारीरिक विकासासाठी विविध क्रीडा प्रकारचे खेळ घेण्यासाठी क्रिडांगणे असायला हवी. त्याच बरोबर मधल्या सुटीत वर्गाबाहेर बसण्यासाठी जागा, शक्य असल्यास मोठ्या झाडांची सावली असावी. शालेय परिसर म्हणजे शाळेच्या इमारतीच्या आसपासची भौतिक स्थिती असेही म्हटले जाते. शाळा नव्याने सुरु करतांनाच शालेय परिसराच्या बाबतीत पुढील बाबी लक्षात ठेवाव्यात.
1. शाळा वस्तीपासून किंचित दूर असावी.
2. प्रत्येक विद्यार्थ्यास शाळा प्राथमिक असल्यास 1 किमी व माध्यमिक असल्यास 2 किमी पेक्षा जास्त अंतर शाळेत पोहोचण्यासाठी असू नये.
3. शाळा शहरातील भर वस्तीत असू नये.
4. शाळेजवळ कारखाने, सिनेमागृह, दफनविधी स्थान, कचरा डेपो इत्यादी असू नये.
5. शाळेभोवती मैदान असावे.
6. शाळा पानथळ जागी असू नये.
7. शाळेत पोहोचण्यासाठी पक्का रस्ता असावा.
8. शाळेला लागून मोठ्या इमारती असू नयेत.
शाळा वर्ग खोल्यासह इतर खोल्या स्वच्छतागृहे , स्वयंपाक गृहे प्रयोगशाळा,ग्रंथालय यांच्या एकत्रित विचारातून शालेय इमारत उभी असते. शाळा इमारतीमध्ये मुख्याध्यापकांसाठी स्वतंत्र खोली /कार्यालय असते. मुख्याध्यापक कार्यालय हे शालेय इमारतीमध्ये अशाप्रकारे असावे जेणेकरुन सर्व वर्ग व शालेय परिसर देखिल मुख्याध्यापकांच्या नजरेच्या टप्प्यात यावेत. शालेय इमारत ही अनेक आकाराची असू शकते. प्रत्येक आकाराचे काही फयदे तोटे आहेत.शालेच्या वर्तमानकालीन व भविष्यकालीन गरजा लक्षात घेऊन शाळा इमारतीचा आकार असावा. I, L, O, U, E अशा विविध आकारात बांधल्या जातात. या सर्व प्रकारात इंग्रजी E आकारातील रचना ही मोठ्या शाळांसाठी उपयोगी ठरते. शालेय परिसरात असलेले मुलांचे व मुलींचे स्वच्छतागृहे हे शक्यतो इमारतीच्या परस्परांच्या विरुध्द दिशेला असायला हवे. पिण्याचे पाणी हे देखिल परिसराच्या मध्यवर्ती ठीकाणी व विद्यार्थ्यांच्या दृष्टीने सुविधायुक्त असावे. सांडपाण्याचे नियोजन केलेले असावे.
इमारतीच्या बाबतीत आवश्यक बाबी –
1. प्रत्येक विद्यार्थ्यास कमीत कमी 07 चौरस फूट जागा गृहीत धरुन वर्ग खोल्यांचे क्षेत्रफळ निश्चित करावे.
2. प्रयोगशाळा, ग्रंथालय, सभागृह इत्यादी शक्यतो वर्गखोल्यापासून दूर असावे.
3. भरपूर सूर्यप्रकाश वर्गात येईल असे दक्षिण – पूर्व दिशेने बांधकाम असावे.
4. इमारत पक्की असावी.
5. खिडक्या भरपूर असाव्यात व उंचावर असाव्यात.
6. इमारत रंगकाम केलेले असावे.
7. ठराविक कालावधित दुरुस्ती व रंगकाम केलेले असावे.
वरील सर्व बाबी या मोठ्या शाळांसाठी असल्या तरी त्यामुळे लहान शाळांना मार्गदर्शक अशा आहेत.
बालकाच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 व शासन निर्णय दिनांक 29 जून 2013 नुसार शालेय आवार व परिसराबाबत खालील निकष व नियम यांचा उल्लेख करण्यात आलेला आहे.
अ) शालेय आवार –
* प्रत्येक शाळेला प्रवेशद्वारासह संरक्षक भिंत असावी.
* पक्की संरक्षक भिंत शक्य नाही तेथे तारेचे कुंपण, डीडोनिया /मेहंदी सारख्या वनस्पतीचे
कुंपण(green fencing) असावे.
* जेथे वाहतुकीचा रस्ता, जंगली श्वापदे, कॅनॉल, ओढा, नदी असे अडथळे आहेत तेथे पक्की
संरक्षकभिंत असावी.
* आवारभिंतीची उंची जमिनीपासून किमान सहा फूट असावी. व प्रवेशद्वार दहा फूट रुंद असावे.
* शाळेच्या आवारामध्ये निलगिरी, सुरु, गुलमोहोर, व कडुलिंब यासारख्या मोठ्या झाडांची लागवड
सावलीसाठी करावी.
शासन निर्णयामध्ये शालेय आवारात शाळेत किमान कोणकोणत्या बाबी असायला हव्यात याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. तसेच प्रत्येक शाळेने वरील निकषाची पूर्तता करण्याचे सांगितले आहे. शाळा जर वरील निकषाची पूर्तता करीत नसेल तर पूर्ततेसाठी तीन वर्षाचा कालावधी देण्यात आलेला आहे.
शाळासिध्दी कार्यक्रमात प्रत्येक गाभामानकांचा विचार उपलब्धता, पर्याप्तता व उपयोगीता या तीन दृष्टीकोनामधून केला जातो.
1. शालेय आवार उपलब्ध आहे काय ?
2. शालेय आवार पर्याप्त आहे काय ?
3. शालेय आवार उपयोगी आहे काय ?
या तीन प्रश्नांची उत्तरे ही प्रत्येक शाळेने स्वत: च्या विकासासाठी प्रामाणिकपणे दिल्यास त्या शाळेची गुणवत्ता दिसून येते. एखाद्या शाळेत शालेय आवार आहे ही झाली उपलब्धता. त्या शाळेतील सर्व मुले आवारात परिपाठासाठी बसू शकतात तसेच विविध क्रीडाप्रकारासाठी, विविध कार्यक्रमासाठी शालेय आवार पुरेसे आहे ही झाली पर्याप्तता. या दोन्ही पेक्षा महत्वाचे ठरते ती आहे उपयोगिता .उपयोगिता म्हणजेच गुणवत्ता. शाळेतील आवार हे समतल आहे.शालेय आवार हे विद्यार्थी अध्ययन अध्यापनास अनुकुल करण्यासाठी शालेय इमारत रंगकाम केले जाते. शालेय भिंती व शालेय कंपांऊंडवर विविध अध्ययन पुरक चित्रे, आशय लिहीलेले आहेत. शालेय आवारात हिरवळ, फुलझाडे, आकर्षक प्रवेशद्वार, दिशादर्शक फलक आहेत.विद्यार्थी, शिक्षक व पालक यांचा विचार करून सुख सुविधा आहेत.शालेय आवार किंवा परिसराचे अंतरंग व बाह्यरंग दोन्हीचा विचार विद्यार्थी विकासासाठी केलेला आहे. अशावेळी वरील सर्व बाबीमधून त्या गाभामानकाची उपयुक्तता दिसून येते. म्हणजेच गुणवत्ता दिसून येते. गुणवत्ता ही उपलब्धतेकडून पर्याप्तता व शेवटी उपयोगीता अशी वाढत जाते. शाळासिध्दी कार्यक्रमामध्ये या तीन प्रश्नावर आधारीत वर्णन विधाने आहेत. वर्णन विधाने ही देखिल उपलब्धता, पर्याप्तता व उपयोगीता अशीच गुणवत्ता दर्शवितात. प्रत्येक शाळेने या तीन प्रश्नानुसार व वर्णन विधानानुसार आपल्या शाळेची स्तर निश्चिती करावयाची असते. निवडलेल्या वर्णन विधानानुसार आपल्या शाळेची नेमकी स्थिती समजल्यानंतर शाळेला आपल्या विकासाचा आराखडा तयार करता येतो. विकास आराखड्याचा पुढील टप्पा कोणता याचे ही मार्गदर्शन शाळासिध्दी वर्णन विधाने करतात. या आराखड्यामध्ये विकासाचा प्राधान्यक्रम ठरऊन नियोजनबध्द पध्दतीने शाळेचा विकास घडऊन आणता येतो. यामध्ये एक वर्षात साध्य करावयाची भौतिक सुविधा व गुणवत्ता, दोन वर्षात साध्य करावयाची भौतिक सुविधा व गुणवत्ता, तीन वर्षात साध्य करावयाची भौतिक सुविधा व गुणवत्ता निश्चित करता येते. एक प्रकारे शाळेच्या विकासाचा परिपूर्ण असा आराखडा तयार होतो.
शालेय आवार / परिसराशी संबंधीत खालील प्रश्न मूल्यमापन प्रक्रीयेमध्ये विचारले जातात. उपयुक्तता किंवा गुणवत्ता केवळ याच प्रश्नाशी संबंधित आहे असे नाही. सदर प्रश्न हे केवळ त्या गाभामाणकांच्या विषयी माहीती घेण्यासाठी प्रातिनिधीक स्वरुपात विचारण्यात आले आहेत. या प्रश्नाच्या उत्तरापेक्षा गुणवत्ता ही मोठी बाब आहे.
शालेय आवाराच्या बाबतीत खालील महत्त्वाचे प्रश्न शाळासिद्धी मध्ये विचारले जातात.
1) शालेय आवाराचे एकूण क्षेत्र ?
(चौरस मीटर किंवा चौरस फुटामध्ये )
2) शाळेच्या इमारतीची स्थिती - चांगली / किरकोळ दुरुस्तीची गरज / इमारत नाही / मोठ्या दुरुस्तीची गरज
3) इमारतीची नियमित देखभाल केली जाते काय?
4) जागेचा मालकी हक्क कोणाचा ?
5) शाळेचे मैदान समतल आहे काय ?
6) शाळेला प्रवेश द्वार आहे काय?
7) शाळेला संरक्षक भिंत / तारेचे कुंपण विटांची भिंत / मेहंदी/ डीडोनिया इत्यादी वनस्पतीचे कुंपण / इतर आहे काय ?
8) इमारतीचे एकूण क्षेत्रफळ - (चौरस मीटर किंवा चौरस फुट मध्ये )
9) शाळेत झाडेझुडपे हिरवळ फळझाडे परसबाग आहे काय?
10 ) परिसरात मोठी झाडे आहेत काय ?
11) प्रार्थना परिपाठ यासाठी पुरेशी जागा आहे काय ?
12 ) इतर कार्यक्रम घेण्यासाठी पुरेशी जागा आहे काय ?
13 ) शालेय परिसर स्वच्छ व सुंदर आहे काय ?
14 ) शालेय इमारत व जागा याबाबतीचे मालकी हक्काबाबतचे दाखले व कागदपत्रे शाळेत उपलब्ध आहेत काय ?
15) शालेय इमारतीची दुरुस्ती केव्हा झाली ?
16) नूतनीकरण सजावट इतर कामे याबाबतचे दाखले किंवा रजिस्टर किंवा ठराव इमारत दुरुस्तीचा दिनांक
17) शालेय स्वच्छतेबाबतच्या नोंदी नोंदवह्या इतर नोंदी उपलब्ध पुरावे आहेत काय ?
वरील प्रश्नांचा हेतू हा शालेय परिसराशी संबंधीत माहीती मिळविणे या बरोबरच शालेय परिसराचे संपूर्ण चित्र समोर उभे करणे आहे. शाळासिध्दीमध्ये प्रत्येक घटकाचा सुक्ष्म विचार केला जातो. स्वयं मूल्यमापन व बाह्य मूल्यमापन करण्याआधी मुख्याध्यापक व निर्धारकांनी वरील माहीतीचा अभ्यास शाळा विकासाच्या दृष्टीकोनातून करणे आवश्यक आहे. वरील माहीतीनंतरच वर्णनविधाने अभ्यासणे उचित ठरते. शाळासिध्दी कार्यक्रमामध्ये उपलब्धता, पर्याप्तता व उपयोगिता या तीनही दृष्टीकोनातून वर्णनविधाने तयार केलेली आहे.त्यानुसार गुणदान केलेले आहे. मुख्याध्यापक व निर्धारकांनी वर्णनविधाने वाचन करुन आपल्या शाळेला कोणते वर्णनविधान लागु होते याची निवड करावी. वर्णनविधानाची निवड करतांना वरीलप्रमाणे वस्तूस्थिती दर्शक प्रश्न, प्रत्यक्ष परिस्थिती, विद्यार्थी शिक्षक मुलाखती, दाखले, पुरावे यांचा आधार घ्यावा. वर्णनविधानाची निवड ही अतिशय प्रामाणिकपणे व वस्तूनिष्ठ्पणे करावी.
वर्णन विधानानुसार गुणदान खालीलप्रमाणे.
1) a) शालेय परिसरामध्ये मोकळी जागा आहे. परंतू मोकळी जागा ही अपुरी व परीपाठासाठी मर्यादित आहे. कच्ची अर्धी पक्की तंबू प्रकारची इमारत उपलब्ध आहे सुरक्षा भिंत किंवा कुंपण अस्तित्वात नाही किंवा सलग नाही. मोठ्या अंतरावर आहे. कुंपणाच्या आत बगीचा किंवा झाडे नाहीत.
b) मोकळी जागा केवळ परीपाठासाठी वापरली जाते. मैदान समतल आहे. आवार स्वच्छ व सुव्यवस्थित ठेवलेला नाही . जमीन खिडक्या इत्यादी मध्ये मध्ये मोठ्या दुरुस्तीची गरज आहे .
( वरील वर्णनविधाने लागु होत असल्यास 1 गुण देण्यात यावे. )
2) a) मोकळी व बांधकाम केलेली जागा सभागृह प्रार्थनेच्या जागेसह पुरेशी आहे मात्र सर्व विद्यार्थ्यांना सामावून घेण्यासाठी अपुरी आहे.सुरक्षा भिंत आहे मात्र प्रवेश द्वारा विना. पक्की इमारतीत अस्तित्वात आहे. कुंपणा मध्ये काही झाडे व बगीचा आहे.
b) परीपाठाची जागा सभागृह शारीरिक कसरती व कार्यक्रमाचे आयोजन इत्यादी सारख्या इतर उपक्रमांसाठी वापरली जाते. मैदान समतल आहे. जमीन भिंती छत दरवाजे यांच्या किरकोळ दुरुस्तीची आवश्यकता आहे. प्रसंगी देखभाल केली जाते.
( वरील वर्णनविधाने लागु होत असल्यास 2 गुण देण्यात यावे. )
3) a) प्रार्थनेसाठी ठराविक जागेसह विद्यार्थ्यांच्या मुक्त संचारासाठी भरपूर मोकळी व बांधलेली जागा आहे. प्रवेश द्वार व झुडपासह सुरक्षा भिंत, कुंपण अस्तित्वात आहे. सुस्थिती ठेवलेली बाग व हिरवळ आहे.
b) मोकळी जागा व इमारत स्वच्छ व नीटनेटके देखभाल केलेली आहे.वेळोवेळी दुरुस्ती केली जाते.
( वरील वर्णनविधाने लागु होत असल्यास 3 गुण देण्यात यावे. )
वर्णनविधाने ही गुणवत्तेचे वर्णन करतात. तसेच गुणवत्तेचा चढता क्रम दर्शवितात. त्यामुळे शाळेला स्वत:चे स्थान समजते.गाभाघटकाचे सर्व गुण मिळवायचे असल्यास शाळेने नेमकेपणाने काय करावे हे देखिल समजते. वर्णनविधान निवड केल्यानंतर शाळेला स्वत:चे गुणवत्तेमधील स्थान समजते. त्यानंतर प्रत्येक शाळेला शाळेला सुधारणेसाठी नियोजन करावे लागते. या सुधारणेसाठी नियोजनात सुधारणेचा प्राधान्यक्रम ठरवावा लागतो. प्राधान्यक्रमानुसार प्रस्तावित कार्यवाही कोणती करणार हे देखिल नमूद करावे लागते. या कार्यवाहीसाठी किती कालावधी लागणार याचा देखिल उल्लेख करावा लागतो. अशाप्रकारे कालबध्द व नियोजनबध्द सुधारणेचे नियोजन तयार होते.
अशाप्रकारे शाळासिध्दी कार्यक्रमामध्ये शाळा आवार / शाळा परिसराचे महत्व अनन्यसाधारण आहे.
असिफ शेख,
कार्यक्रम अधिकारीRMSAत
शाळासिध्दी – शाळा मूल्यांकनाचा राष्ट्रीय कार्यक्रम - शाळांच्या सर्वांगिण विकासाचा राजमार्ग
शाळेचे सामर्थ्य स्त्रोत – क्रीडांगण, क्रीडा साधने / साहित्यासह (क्षेत्र क्रमांक 1 – गाभामानके क्रमांक 2 )
क्रीडांगण, क्रीडा साधने / साहित्यासह
बालकाच्या सर्वांगिण विकासामध्ये शारीरिक विकास महत्वाचा असतो. व्यक्तीच्या एकूणच जीवनामध्ये शरीर निरोगी व बलवान असणे आवश्यक असते. व्यक्तीच्या जन्मानंतर टप्प्या टप्प्याने शारीरीक विकास होत असतो. शारीरिक विकासाचा परीणाम आरोग्य व वर्तनावर होत असतो. विविध प्रकारचे व्यायाम, विविध प्रकारचे खेळ,कृती, नाचणे, गाणे इत्यादी कृतीमधून शारीरिक विकास होत असतो.लहान मुलांचा स्वभाव खेळकर असतो. छोट्या मोठ्या खेळामधून बालके आनंद मिळवत असतात. वेगवेगळया व्यायाम प्रकारामधून व खेळामधून बालकांच्या वेगवेगळ्या अंगाचा विकास होत असतो.शाळेमध्ये क्रीडांगण उपलब्ध असल्यास विद्यार्थ्यांना वरीलप्रकारचे वेगवेगळे खेळ खेळता येतात. अध्ययन अध्यापन यामधून आलेला कंटाळा खेळामुळे दूर होतो.
राज्यात क्रीडा संस्कृतीचा प्रसार व जोपासना होण्यासाठी पोषक वातावरण तयार करणे आवश्यक आहे हे जाणून महाराष्ट्र राज्याने स्वतंत्र क्रीडा धोरण जाहीर केलेले आहे. अशा प्रकारे स्वतंत्र क्रीडा धोरण जाहीर करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे.सन 1996 च्या क्रीडा धोरणामध्ये खेळाडू तयार करणे, सन 2001 च्या क्रीडा धोरणामध्ये खेळाद्वारे सर्वांसाठी सुदृढता या बाबी केंद्रस्थानी ठेऊन क्रीडा धोरण तयार करण्यात आले होते. राज्य क्रीडा क्षेत्रात अग्रगण्य राहावे, नागरिकांमध्ये व्यायामाची आवड जोपासावी,राज्यामध्ये राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार व्हावे यासाठी सुधारीत क्रीडाधोरण 2012 मध्ये तयार करण्यात आले. या धोरणानुसार प्रत्येक शाळेमध्ये क्रीडांगण व क्रीडासाहीत्याची आवश्यकता स्पष्ट केलेली आहे. राज्याच्या क्रीडा धोरणामध्ये शाळा संबंधी खालील महत्वपूर्ण घटकांचा समावेश करण्यात आलेला आहे.
2. शाळांचा तालुका / जिल्हा / राज्य क्रीडास्पर्धामध्ये सहभाग
3. जिल्हास्तरीय क्रीडास्पर्धेमध्ये प्राविण्य मिळविण्या-या शाळांना प्रोत्साहनात्मक अनुदान
5. खेळाडूंना शासकीय निमशासकीय सेवेत आरक्षण व थेट नियुक्ती
6. शालेय विद्यार्थ्यांमध्ये योगासनाचे महत्व जागविणे.
7. खेळांसाठी जादा तासिका उपलब्ध करुन देणे तसेच क्रीडा/ शारीरिक शिक्षण या विषयाचा अभ्यासक्रमात समावेश करणे.
8. शारीरिक शिक्षण या विषयासाठी सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन कार्यपध्दती.
याबरोबरच शासन स्तरावरुन क्रीडांगण व क्रीडा साधनांच्या बाबतीत विविध आयोग, समिती , शासन निर्णय व परिपत्रके प्रसिध्द करण्यात आलेली आहेत. डॉ यशपाल यांच्या कमिटीने ज्या महत्वपूर्ण शिफारशी केलेल्या आहेत. त्यामध्ये क्रीडा क्षेत्राचा विशेष उल्लेख केलेला आहे. इयत्ता 1 ली ते 10 वी तील विद्यार्थ्यांसाठी वेळापत्रकात क्रीडा या विषयासाठी आठवड्याला किमान 5 तासिका असाव्यात असे नमूद केलेले आहे. वेळापत्रकात जरी 5 तासिका क्रीडा विषयासाठी राखून ठेवलेल्या असल्या तरी प्रत्यक्षात या तासिकांच्या वेळेमध्ये इतर विषयाच्या तासिका घेण्यात येतात. वेळापत्रकाची प्रभावी अंमलबजावणी करुन क्रीडा विषयाच्या तासिका क्रीडा विषयासाठीच उपयोगात आणाव्यात तसेच खेळासाठी पोषक शरीर रचनेची गरज पाहता वेळापत्रकांना मंजूरी देत असतांना सकाळच्या सत्रातील शाळांनी वेळापत्रकातील पहिल्या तासिका क्रीडा विषयासाठी ठेवाव्यात. दूपारच्या सत्रातील शाळांनी वेळापत्रकातील शेवटच्या तासिका क्रीडा विषयासाठी ठेवाव्यात. अशाप्रकारे दररोज किमान एक तासिका खेळासाठी अनिवार्य करण्याचे नमूद केलेले आहे. अध्ययनाचे ओझे ही संकल्पना स्पष्ट करतांना कमिटीने विद्यार्थ्यांच्या मनावर “न समजता केलेल्या अध्ययनाचे ओझे असते” असे स्पष्ट केलेले आहे.अशाप्रकारचे मनावरील ओझे कमी करण्यासाठी खेळ/ क्रीडा प्रकार उपयोगी असतात. कर्नाटक मधील एका शाळेत शनिवारी दप्तराविनाशाळा भरते. या दिवशी विद्यार्थी विना गणवेश विना दप्तर शाळेत येतात. आवडीनुसार वेगवेगळे खेळ प्रकार खेळतात. त्यामुळेत्यांच्यामधील अध्ययनाचा ताण तर जातोच शिवाय व्यायामाची व खेळाची आवड निर्माण होते. कुमठे बीट, सातारा येथील शाळांमधूनक्रीडांगणावर विद्यार्थ्यांना विविध प्रकारच्या खेळांचा सराव दिला जातो.खेळातून शिक्षण, आनंददायी अध्यापन पध्दती विद्यार्थी सर्वांगिण विकासात महत्वाची ठरते. “Our Children Deserve The Best”प्रत्येक मुलाला गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यासाठी अध्यापन पध्दती ही कृतियुक्त व आनंददायी असणे आवश्यक असते. कृतियुक्त खेळ व अध्ययन अध्यपनात क्रीडांगण व क्रीडासाहीत्याचे स्थान महत्वाचे आहे.
केंद्रीय सल्लागार मंडळ दिल्लीच्या शालेय बांधकाम समितीच्या मतानुसार (1986) माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेसाठी 160 विद्यार्थ्यासाठी 2 ते 3 एकर, 320 विद्यार्थ्यांसाठी 4 ते5 एकर, 480 विद्यार्थ्यांसाठी 6 ते 7 एकर क्रीडांगण असायला हवे.
v केवळ मोकळे मैदान म्हणजे क्रीडांगण नव्हे.
v विशिष्ट खेळासाठी तज्ञांकडून क्रीडांगणे तयार करुन घ्यावी.
v प्रत्येक खेळासाठी आखिव व तयार केलेले क्रीडांगण असावे.
v सर्व क्रीडांगणाला भिंतीचे किंवा तारेचे कुंपण असावे.
v कोणत्या वर्गाने कोणत्यावेळी क्रीडांगणाचा वापर करावा याचे वेळापत्रक असावे.
v क्रीडासाहीत्य ठेवण्याची स्वतंत्र सोय असावी..
v शाळेत किमान चार खेळाची मैदाने आखलेली असावी.
कबड्डी – लहान गट - लांबी 11 मीटर × रुंदी 8मीटर , कर्ण 13.60 मीटर
मोठा गट - लांबी 12.50 मीटर × रुंदी10 मीटर , कर्ण 16.00 मीटर
खो खो – लहान गट - लांबी 25 मीटर × रुंदी 14मीटर ,
दोन खुंटामधील अंतर 19.90 मीटर,खुंटाची उंची 1 मीटर
मोठा गट - लांबी 29 मीटर × रुंदी 16मीटर ,
दोन खुंटामधील अंतर 23.50 मीटर,खुंटाची उंची 1.2 मीटर
व्हॉलीबॉल - लांबी 18 मीटर × रुंदी 9 मीटर ,कर्ण 20.13 मीटर
क्रिकेट – खेळपट्टी दोन विकेटमधील लांबी 20 मीटर , रुंदी 5 फूट.
लांब उडी – खड्ड्याचा आकार लांबी 9 मीटर × रुंदी 2.75 मीटर (खड्ड्यात वाळू असावी.)
धावपट्टी लांबी 20 ते 30 मीटर × रुंदी 1.22 मीटर
उंच उडी – खड्ड्याचा आकार लांबी 5 मीटर × रुंदी 3 मीटर (खड्ड्यात वाळू असावी.)
धावपट्टी लांबी 25मीटर × रुंदी 1.22 मीटर
शालेय क्रीडांगण व साहीत्याबाबतीत काही महत्वाचे संदर्भ -
1. केंद्र शासनाच्या Whole School Development Plan नुसार प्राथमिक शाळेसाठी 4000 चौरस मीटर क्रीडांगण असावे.
2. National Building Code नुसार शाळेकरीता 0.40 हेक्टर जागा(एक एकर) म्हणजेच 4000 चौरस मीटर असावी. पैकी 2000 चौरस मीटर क्रीडांगणासाठी क्षेत्र असावे.
3. केंद्र शासनाच्या 26 आक्टोबर 2012 च्या पत्रान्वये प्रत्येक शाळेच्या आवारात शाळा व्यवस्थापन समितीने खेळण्यासाठी जागा उपलब्ध करणे आवश्यक आहे.
4. शाळेकरीता किमान क्षेत्रफळाचे क्रीडांगण उपलब्ध नसल्यास शाळेच्या आसपास असलेल्या परिसरामध्ये शाळा व्यवस्थापन समितीने बालकांना खेळण्यासाठी संबंधिताकडून ( ग्रामपंचायत, नगर परिषद,नगरपालिका, महानगर पालिका , खाजगी मालकीची जागा ) यांचे ना हरकत प्रमाणपत्र घेऊन तात्पुरत्या स्वरुपात क्रीडांगण उपलब्ध करुन द्यावे.
5. क्रिडांगणाच्याबाबतीत सुधारीत निकष - बालकाच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 व शासन निर्णय दिनांक 29 जून2013 नुसार 500 विद्यार्थी संख्या असलेल्या शाळेमध्ये जागेच्या उपलब्धतेनुसार क्रीडांगणाचे क्षेत्र 2000 चौरस मीटर (20 गुंठे ) इतके असावे. तसेच शाळेतील विद्यार्थी संख्या कमी असल्यास 18 मीटर × 36 मीटर म्हणजेच 648 चौरस मीटर ( 6 गुंठे ) इतके किमान क्षेत्रफळाचे क्रीडांगण असावे.
शासन निर्णयामध्ये शालेय क्रीडांगण व क्रीडा साधनामध्ये शाळेत किमान कोणकोणत्या बाबी असायला हव्यात याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. तसेच प्रत्येक शाळेने वरील निकषाची पूर्तता करण्याचे सांगितले आहे. शाळा जर वरील निकषाची पूर्तता करीत नसेल तर पूर्ततेसाठी तीन वर्षाचा कालावधी देण्यात आलेला आहे. शाळासिध्दी कार्यक्रमात प्रत्येक गाभामानकांचा विचार उपलब्धता, पर्याप्तता व उपयोगीता या तीन दृष्टीकोनामधून केला जातो.
शालेय क्रीडांगण व क्रीडा साधने उपलब्ध आहे काय ?
शालेय क्रीडांगण व क्रीडा साधने पर्याप्त आहे काय ?
शालेय क्रीडांगण व क्रीडा साधने उपयोगी आहे काय ?
या तीन प्रश्नांची उत्तरे ही प्रत्येक शाळेने स्वत: च्या विकासासाठी प्रामाणिकपणे दिल्यास त्या शाळेची गुणवत्ता दिसून येते. एखाद्या शाळेत क्रीडांगण व क्रीडा साधने आहे ही झाली उपलब्धता. क्रीडांगण व क्रीडा साधने ही निकषानुसार विद्यार्थीसंख्येनुसार आहे, ही झाली पर्याप्तता. या दोन्ही पेक्षा महत्वाचे ठरते ती आहे उपयोगिता .उपयोगिता म्हणजेच गुणवत्ता. शाळेतील क्रीडांगणावर विद्यार्थी शालेय वेळेशिवाय इतर वेळेत व सुटीमध्ये सुध्दा व्यायाम व शारीरिक विकासाच्या खेळासाठी हजर असतात. जिल्हास्तरीय , राज्यस्तरीय क्रीडास्पर्धामध्ये सहभागी होतात ही झाली गुणवत्ता. शाळासिध्दी कार्यक्रमामध्ये या तीन प्रश्नावर आधारीत वर्णन विधाने आहेत. वर्णन विधाने ही देखिल उपलब्धता, पर्याप्तता व उपयोगीता अशीच गुणवत्ता दर्शवितात. प्रत्येक शाळेने या तीन प्रश्नानुसार व वर्णन विधानानुसार आपल्या शाळेची स्तर निश्चिती करावयाची असते. निवडलेल्या वर्णन विधानानुसार आपल्या शाळेची नेमकी स्थिती समजल्यानंतर शाळेला आपल्या विकासाचा आराखडा तयार करता येतो. विकास आराखड्याचा पुढील टप्पा कोणता याचे ही मार्गदर्शन शाळासिध्दी वर्णन विधाने करतात. या आराखड्यामध्ये विकासाचा प्राधान्यक्रम ठरऊन नियोजनबध्द पध्दतीने शाळेचा विकास करता येतो. यामध्ये एक वर्षात साध्य करावयाची भौतिक सुविधा व गुणवत्ता, दोन वर्षात साध्य करावयाची भौतिक सुविधा व गुणवत्ता, तीन वर्षात साध्य करावयाची भौतिक सुविधा व गुणवत्ता निश्चित करता येते. क्रीडांगण व क्रीडा साधनांशी संबंधीत खालील प्रश्न मूल्यमापन प्रक्रीयेमध्ये विचारले जातात. उपयुक्तता किंवा गुणवत्ता केवळ याच प्रश्नाशी संबंधित आहे असे नाही. सदर प्रश्न हे केवळ त्या गाभामाणकांच्या विषयी माहीती घेण्यासाठी प्रातिनिधीक स्वरुपात विचारण्यात आले आहेत. या प्रश्नाच्या उत्तरापेक्षा गुणवत्ता ही मोठी बाब आहे.
क्रीडांगण व क्रीडा साधनांच्या बाबतीत खालील महत्त्वाचे प्रश्न शाळासिद्धी मध्ये विचारले जातात.
1) क्रीडांगणाचे क्षेत्रफळ ( उपलब्ध असल्यास ) - (चौरस मीटरमध्ये)
2) क्रीडांगण नसल्यास शाळेतील मोकळ्या जागेचे क्षेत्रफळ - (चौरस मीटर मध्ये)
3) क्रीडांगण उपलब्ध नसल्यास पर्यायी व्यवस्था कोणती आहे ?
4) क्रीडेसाठी खेळासाठी राखीव वेळ ठेवला आहे काय ?
5) शालेय क्रीडा स्पर्धा होतात काय ?
6) क्रीडांगणावर कोणकोणती मैदाने आखलेली आहेत- (शाळेत किमान चार मैदाने आखलेली असावीत.)
7) क्रीडेसाठी प्रशिक्षक प्रशिक्षण सुविधा आहे काय ?
8) क्रीडांगणावर खेळाचे साहित्य पुरेसे उपलब्ध आहे काय? (प्रत्येक विद्यार्थ्यास साहित्य मिळावे इतपत )
9) खेळाच्या साहित्याचा विद्यार्थी नियमित वापर करतात काय ?
10) खेळ, क्रीडा ,इतर सहशालेय उपक्रमांची यादी, विविध उपलब्ध उपकरणे साहित्य यांची यादी समर्थक पुरावे, क्रीडांगण /मैदान जागा क्षेत्रफळ मालकी हक्क याबाबतची कागदपत्रे,उतारे, पुरावे उपलब्ध आहेत काय ?
11) शाळेला स्वतःचे क्रिडांगण नसल्यास ज्यांचे असेल त्यांचे ना हरकत प्रमाणपत्र आहे काय ?
12) मागील वर्षी घेतलेल्या विविध क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमांच्या नोंदी आहे काय ?
13) क्रीडा साहित्य खरेदी केल्याचा दिनांक व साठा नोंदवही आहे काय ?
14) क्रीडा , खेळासाठीचे वेळापत्रक व प्रशिक्षक माहिती क्रीडा स्पर्धा सहभाग व प्रमाणपत्रेआहेत काय ?
15) कलाशिक्षण व इतर सहशालेय उपक्रमांची यादी तसेच उपकरणे व साधने साठानोंदवही आहे काय?
वरील प्रश्नांचा हेतू हा क्रीडांगण व क्रीडा साधनांशी संबंधीत माहीती मिळविणे या बरोबरच शालेय क्रीडांगण व क्रीडा साधनांचेसंपूर्ण चित्र समोर उभे करणे आहे. स्वयं मूल्यमापन व बाह्य मूल्यमापन करण्याआधी मुख्याध्यापक व निर्धारकांनी वरील माहीतीचा अभ्यास शाळा विकासाच्या दृष्टीकोनातून करणे आवश्यक आहे. वरील माहीतीमिळविल्यानंतरच वर्णनविधाने अभ्यासणे उचित ठरते. शाळासिध्दी कार्यक्रमामध्ये उपलब्धता, पर्याप्तता व उपयोगिता या तीनही दृष्टीकोनातून वर्णनविधाने तयार केलेली आहे. त्यानुसार गुणदान केलेले आहे. मुख्याध्यापक व निर्धारकांनी वर्णनविधाने वाचन करुन आपल्या शाळेला कोणते वर्णनविधान लागु होतात हे ठरवावे.वर्णनविधानाची निवड करतांना अतिशय प्रामाणिकपणे व वस्तूनिष्ठपणे करावी.
वर्णन विधानानुसार गुणदान खालीलप्रमाणे.
1) a) क्रीडांगण उपलब्ध नाही शेजारील शाळेचे मैदान अथवा सामाजिक जागेचा वापर शाळा प्रसंगी करते. मर्यादित उपकरणे व साहित्य उपलब्ध आहे अथवा अभाव आहे.
b) विद्यार्थी कधीकधी केवळ तेच खेळ खेळताना दिसतात ज्यांना कमीत कमी साहित्याची गरज असते किंवा साहित्य लागत नाही.मार्गदर्शन व पर्यवेक्षण उपलब्ध नाही.
( वरील वर्णनविधाने लागु होत असल्यास 1 गुण देण्यात यावे. )
2) a) अपुऱ्या आकाराचे क्रीडांगण उपलब्ध आहे. ठराविक खेळासाठी प्रसंगी दुसऱ्या शाळेचे क्रीडांगण वापरले जाते. काही खेळासाठीच पुरेसे साहित्य व उपकरणे उपलब्ध आहे.
b) विद्यार्थी ठराविक खेळासाठी क्रीडांगणाचा चांगला वापर करतात.क्रीडा / खेळासाठी विशिष्ट वेळ राखलेला आहे. क्रीडांगणावरील कृतीचे नेहमी पर्यवेक्षण केले जाते. साहित्य व्यवस्थित ठेवलेले आहे व आवश्यकतेनुसार उपलब्ध करून दिले जाते. शाळेच्या क्रीडांगणावर किंवा बाहेर क्रीडा प्रकार घेतले जातात.
( वरील वर्णनविधाने लागु होत असल्यास 2 गुण देण्यात यावे. )
3) a) शाळेच्या आवारात पुरेसे आकाराचे क्रीडांगण व साहित्य उपलब्ध आहे. विविध खेळासाठी साहित्य पुरेसे आहे आणि उपकरणे देखील पुरेशी आहेत.
b) विद्यार्थी सुनियोजितपणे विविध क्रीडा किंवा खेळ प्रकारात सहभागी होतात. क्रीडेसाठी प्रशिक्षण सुविधा उपलब्ध आहे. शाळा सर्व साहित्याची यादी ठेवते व आवश्यकतेनुसार झीज भरते. शाळा दरवर्षी आंतरशालेय क्रीडा स्पर्धा आयोजित करते.( वरील वर्णनविधाने लागु होत असल्यास 3 गुण देण्यात यावे. )
वर्णनविधाने ही गुणवत्तेचे वर्णन करतात. तसेच गुणवत्तेचा चढता क्रम दर्शवितात. त्यामुळे शाळेला स्वत:चे स्थान समजते.गाभाघटकाचे सर्व गुण मिळवायचे असल्यास शाळेने नेमकेपणाने काय करावे हे देखिल समजते. वर्णनविधानाची निवड केल्यानंतर शाळेला स्वत: चे गुणवत्तेमधील स्थान समजते. त्यानंतर प्रत्येक शाळेला सुधारणेसाठी नियोजन करावे लागते. या नियोजनात सुधारणेचा प्राधान्यक्रम ठरवावा लागतो. प्राधान्यक्रमानुसार प्रस्तावित कार्यवाही कोणती करणार हे नमूद करावे लागते. या कार्यवाहीसाठी किती कालावधी लागणार याचा उल्लेख करावा लागतो. अशाप्रकारे कालबध्द व नियोजनबध्द सुधारणेचे नियोजन तयार होते.
कार्यक्रम अधिकारीRMSAतथा राज्यसंपर्क अधिकारी शाळासिध्दी.
शाळासिध्दी – शाळा मूल्यांकनाचा राष्ट्रीय कार्यक्रम - शाळांच्या सर्वांगिण विकासाचा राजमार्ग
शाळेचे सामर्थ्य स्त्रोत – वर्ग खोल्या आणि इतर खोल्या (क्षेत्र क्रमांक 1 – गाभामानके क्रमांक 3 )
वर्ग खोल्या आणि इतर खोल्या
विद्यार्थ्यांचा शालेय जीवनातील बराचसा वेळ वर्गखोलीमध्ये जात असतो. त्यामुळे वर्गखोली ही विद्यार्थी अध्ययनास अनुकूल असायला हवी. प्रचलित निकषानुसारशाळेतील वर्गखोल्या शाळेतील शिक्षक संख्येनुसार असायला हव्या. वर्ग खोलीचे आकार आयताकार,वर्तुळाकार, चौरस, षटकोनी अशाप्रकारचे असू शकतात. परंतु सामान्यत: आयताकार आकाराची खोली ही अध्ययन अध्यापनासाठी व्यवस्थित मानली जाते. प्रत्येक वर्ग खोलीचे माप हे विद्यार्थी संख्येवर अवलंबून असते. प्रत्येक विद्यार्थ्यासाठी सात ते दहा चौरस फूट जागा असावी असा संकेत आहे. शिक्षकांच्या टेबल खुर्चीसाठी तसेच त्यांना विद्यार्थ्यांमध्ये येण्या जाण्यासाठी जागा असायला हवी. वर्गखोलीची उंची देखिल महत्वाची आहे. खोलीमध्ये भरपूर प्रकाश येण्यासाठी व खोलीतील हवा शुध्द राहण्यासाठी उंची सुमारे 12 ते 18 फूट असायला हवी. वर्गामध्ये 40 ते50 विद्यार्थी चार - पाच तास बसणार असतात त्यामुळे हवा शुध्द राहावयास हवी. हवा आणि प्रकाशाच्या दृष्टीकोनातून खोलीला खिडक्याही भरपूर असाव्यात. खिडक्यांची उंची इतकी असावी की त्यातून येणारा उजेड विद्यार्थ्यांच्या डेस्कवर पडेल आणि खिडक्या साधारण्त: विद्यार्थ्यांच्या डाव्या हाताला असाव्यात . कारण लिहितांना त्यांच्या हाताची सावली पडणार नाही. खिडक्यांना पांढरी काच असल्यास पावसाचे वेळी किंवा उन्हाळ्यामध्ये खिडकी बंद असली तरी वर्गात भरपूर प्रकाश राहतो.
फळा हा शिक्षकाचा मित्र असतो. त्याचे वर्गखोलीतील स्थान अतिशय महत्वाचे असते. प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षक शिकवित असतांना फळा दिसू शकेल असा असावा. दोन खिडक्यांच्या मध्ये फळा असू नये. प्रत्येक वर्गामध्ये शिक्षकांना अध्ययन अध्यापनाचे साहीत्य ठेवण्यासाठी कपाट असावे. वर्गातील जमीन मातीची किंवा लाकडाची असू नये कारण लाकडाचा आवाज येतो. मातीची असल्यास लवकरच खराब होते. धूळ निघते. त्याचा परिणाम स्वच्छतेवर होतो. खोलीला पांढरा किंवा फिक्कट रंग असावा. हल्ली वर्गखोली ही विद्यार्थ्यांना आवडेल अशा आकर्षक पध्दतीने तयार केल्या जात आहेत. खोलीलाच अध्ययन अध्यापनाचे साहीत्य मानून खोलीच्या भिंतींचा वापर विविध चित्रे, तक्ते यासाठी केला जात आहे. वर्ग भिंतीला जमिनीलगत बोलके फळे तयार करुन घेतले जात आहेत. काही शाळांमधून जमिनीलगत फळे तयार करुन विद्यार्थ्यांना त्यावर लेखन करण्याची संधी दिली जाते. वर्गात पाटी न वापरता या फळ्यांचा वापर केला जातो. एवढेच नव्हे तर वर्गातील फरशी देखिल अध्ययन अध्यापनासाठी अनुकूल केली जाते. त्यावर रंगकाम , चित्रकाम केले जाते. भाषा विषयातील अक्षर, शब्द व वाक्य लेखन, गणितातील अंक, बेरीज वजाबाकीची उदाहरणे जमिनीवर सरावासाठी लिहीली जातात. विद्यार्थी मोठ्या आवडीने या जमिनीभोवती बसतात. आनंदाने शब्द लेखन , वाक्य तयार करणे, गोष्ट तयार करणे , गणित सोडविणे यासारख्या क्रिया करतात. जमिनीप्रमानेच वर्ग खोलीचे छत देखिल आकर्षक व अध्ययन अनुकूल केले जाते. बहुतेक शाळेत छतावर आकाशगंगा दाखविली जाते.
Building As Learning Aid (BALA) – केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयातील एक अभ्यासगट राजस्थान राज्यात सुरु असलेल्या लोक जुंबिश या शैक्षणिक कार्यक्रमाच्या अभ्यासासाठी गेला होता. या अभ्यासगटामध्ये शिक्षणतज्ञासह वास्तूविशारद देखिल होते. या अभ्यासगटाने राजस्थानमधील 60 शाळांचा अभ्यास केला. अभ्यासभेटी दरम्यान त्यांना शाळांच्या इमारती व वर्गखोल्यांचा वापर शैक्षणिक साधन म्हणून करता येईल काय ? अशी कल्पना सुचली. वास्तूविशारद, शिक्षणतज्ञ व नवोपक्रमशील शिक्षकांच्या मदतीने त्यांनी शाळा इमारत, वर्गखोल्या व शालेय परिसराचा एक आराखडा तयार केला. या आराखड्यालाच पुढे BALA - Building As Learning Aid ( शालेय इमारत/ वर्गखोली एक शैक्षणिक साधन ) असे नाव मिळाले. या अभ्यासगटातील वास्तूविशारद व शिक्षणतज्ञ डॉ कबीर वाजपेयी यांनी यावर सविस्तर लेखन करुन एक पुस्तिका प्रकाशित केलेली आहे. BALA च्या माध्यमातून 150 साधने शालेय इमारत/ वर्गामध्ये तयार करता येतात. ही अभिनव कल्पना सध्या भारतात रुजली असून मोठ्या प्रमाणात लक्षवेधी ठरली आहे. सर्व शिक्षा अभियान कार्यक्रमांतर्गत Child Friendly Elements याच आराखड्यानुसार तयात करण्यात आलेले आहेत. व्यक्तीच्या विकासात व सामाजिक जडण घडणीमध्ये शाळांचा महत्वपूर्ण वाटा असतो. वैश्विक नागरिक तयार करण्याचे कार्य शाळा करत असते. अशाप्रकारे विद्यार्थ्यांच्या अत्यंत संवेदनशील टप्प्याला आकार देतांना खुप काळजी घ्यावी लागते. शैक्षणिक गुणवत्ताविकासात वर्गखोली व शैक्षणिक साधने प्रभावीपणे वापरावी लागतात. मुलांच्या जिज्ञासेला व कल्पनाशक्तीला वाव मिळायला हवा. शैक्षणिक साधने ही विद्यार्थ्याला अध्ययन अनुभवाबारोबरच खुप काही शिकवित असतात. वर्गातील साधने तयार करणे, हाताळणे, उपयोजन करणे यासारख्या कृतीतून विद्यार्थी कौशल्यांचा विकास होत असतो. या सर्वांचा विचार करुन वर्गखोली तयार करायला हवी. वर्गखोली ही फक्त इमारत किंवा खोली नसून विद्यार्थ्यांचा विकासासाठी एक वैशिष्ट्यपूर्ण जागा आहे. वर्गखोली विद्यार्थ्याचे कुतूहल जागे करुन त्यांना सक्रिय बनविते. शैक्षणिक साधन म्हणून कल्पकतेने बनविलेली वर्गखोली विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न निर्माण करुन त्यांना उत्तरे शोधायला लावते. समस्या जाणून घ्यावयास उद्युक्त करते. वातावरणाशी समरस होत भविष्य घडवायला मदत करते. शिकणे व शिकविणे हे आनंददायी होण्यासाठी नाविन्यपूर्ण शैक्षणिक साधन म्हणून वर्गखोलीकडे पाहावयास हवे. वर्गखोलीतील भिंत, फरशी, छत, दारे, खिडक्या, फर्निचर यांचा अध्ययन अध्यापनात जास्तीत जास्त वापर करणे महत्वाचे ठरते.
वर्गखोली बरोबरच शाळेमध्ये खालील खोल्यांची आवश्यकता असते.
1. मुख्याध्यापक खोली - शालेय कामकाजामध्ये वर्ग अध्यापनाबरोबरच इतर प्रशासकीय कामे करावी लागतात. जास्त पटसंख्या असलेल्या शाळांना निकषानुसार मुख्याध्यापक दिले जातात. मुख्याध्यापकांना आपले शालेय कामकाज करण्यासाठी स्वतंत्र खोली / कार्यालयाची आवश्यकता असते. सर्वच मोठ्या व जास्त पटसंख्येच्या शाळांमधून अशा प्रकारचे मुख्याध्यापक कार्यालय/ खोली दिसून येते. जिल्हा परिषदेच्या उच्च प्राथमिक शाळांमधून शाळेच्या वर्गखोलीसमोर असलेल्या पत्र्याच्या शेडचा (पढवी/ व्हरांडा) वापर करुन मुख्याध्यापक खोली तयार केलेली आहे. सर्व शिक्षा अभियान अंतर्गत नविन शाळांसाठी 2 खोल्याचे बांधकाम करतांना स्वतंत्र मुख्याध्यापक खोली तयार करण्यात येत आहे. दोन षटकोनी वर्गखोल्यांच्या मध्ये तयार होणा-या जागेचा उपयोग करुन ही खोली तयार केली जाते. त्यामुळे जवळपास सर्वच शाळांमधून मुख्याध्यापक खोली दिसून येते. विविध शाळा अभिलेखे, विद्यार्थी दाखले, प्रवेश व निर्गम विषयक कामकाज व इतर कामे यासाठी मुख्याध्यापक खोली आवश्यक ठरते.
2. संग्रहालय – कला, साहित्य , विज्ञान व ऐतिहासिक क्षेत्रातील साहित्यांचा संग्रह ज्या ठिकाणी केला जातो त्या ठिकाणाला संग्रहालय असे म्हणतात. ज्ञानग्रहणाचा खरा आधार जिज्ञासा व प्रेरणा आहे. संग्रहालयातील वस्तूंना पाहिल्यावर विद्यार्थ्यांच्या मनात जिज्ञासा निर्माण होते. विद्यार्थ्यांच्या मनात विविध प्रश्न निर्माण होतात. अशाप्रकारे संग्रहालयातील वस्तूंना पाहून निर्माण झालेले प्रश्न हेच अध्ययनासाठी आवश्यक असतात. हे प्रश्न विद्यार्थ्याला प्रेरणा देतात, कृती करायला लावतात व आपले कृतीयुक्त अध्यापनाचे उद्दीष्ट साध्य होते. संग्रहशीलतेमुळे निरिक्षणाची सवय लागते. निरिक्षणामुळे ज्ञान प्राप्ती होते. विद्यार्थी संख्या व शाळेच्या गरजेनुसार प्रत्येक शाळेत संग्रहालय असायला हवे. शाळा लहान असल्यास अध्ययन अध्यापनासाठी आवश्यक असलेल्या वस्तूंचा, साहित्यांचा संग्रह शिक्षकाकडे असायला हवा. ज्ञानरचनावादी शाळांमधून अध्ययन साहित्यांचे संग्रह असलेले साहित्य कोपरे तयार केल्याचे दिसून येतात.
3. सभागृह – विद्यार्थी सर्वांगिण विकासासाठी शाळा विविध उपक्रमांचे आयोजन करीत असते. सांस्कृतिक कार्यक्रम, विविध नेत्यांची जयंती व पुण्यतिथी, प्रासंगिक कार्यक्रम, वक्तृत्व व विविध स्पर्धा यासारख्या कार्यक्रमासाठी सभागृहाची आवश्यकता असते. प्रत्येक शाळेला विद्यार्थी पटसंख्येचा विचार करुन एक सभागृह असायला हवे. शाळा कमी पटसंख्येची व लहान असेल तर एका वर्गखोलीचा उपयोग सभागृह म्हणून केला जातो. सर्व विद्यार्थी एकाच वेळी एकत्र बसु शकतील अशाप्रकारची रचना सभागृहाची असायला हवी. साधारणपणे सभागृहाचा आकार 60 फूट लांब, 40 फूट रुंद व 25 ते 30 फूट रुंद असावा. सभागृहात शाळेच्या गरजेनुरुप व उपलब्ध तरतुदीनुसार सुविधा असाव्यात. या सुविधामध्ये सर्वांपर्यंत आवाज पोहोचण्यासाठी ध्वनीक्षेपक, बसण्याची सुविधा, प्रवेशासाठी स्वतंत्र दरवाजे, बाहेर पडण्यासाठी स्वतंत्र दरवाजे असावेत. पाहुण्यांना बसण्यासाठी , व्याख्यानासाठी , कार्यक्रमासाठी मंच तयार करावयाचा असल्यास तो प्रवेशद्वाराच्या विरुध्द बाजूस असावा. सभागृहामध्ये वायुविजनचा विचार करुन पंखे व खिडक्यांची सुविधा असावी. खाजगी व मोठ्या शाळा , महाविद्यालयामधून हल्ली वातानुकुलित व सर्व सुविधायुक्त सभागृह पाहावयास मिळत आहे.
4. साहित्य खोली – विद्यार्थ्यांच्या शारीरिक, भावनिक , बौध्दीक विकासासाठी शाळा विविध कार्यक्रम व उपक्रम घेत असते. यासाठी विविध साहित्यांची आवश्यकता असते. शारीरिक शिक्षण व आरोग्य विषयात फूटबॉल,व्हॉलीबॉल , क्रीकेट, बॅडमिंटन, लांब ऊडी, उंच ऊडी, धावणे इत्यादी शारीरिक खेळाप्रमाणे बुध्दीबळ, कॅरम यासारख्या कौशल्यावर आधारीत खेळाचे साहीत्य ठेवावे लागते. प्रभात फेरी, साहित्य कवायत, सांस्कृतिक कार्यक्रम याबरोबरच क्रिडांगण मोजण्यासाठी, आखण्यासाठी देखिल कितीतरी साहित्याची आवश्यकता असते. स्वच्छता करण्यासाठी , दुरुस्ती करण्यासाठी लागणारे साहित्य शाळेत ठेवावे लागते. शाळेतील फर्निचर , डेडस्टॉक यासर्व साहित्यासाठी शाळेत स्वतंत्र खोली असते. या खोलीमध्ये साहित्य रचना किंवा मांडणी योग्य पध्दतीने केल्यास पाहिजे असलेली वस्तू किंवा साहित्य सहज प्राप्त करता येते.
5. ग्रंथालय – बालकाच्या सक्तीच्या व मोफत शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 नुसार प्रत्येक शाळेत ग्रंथालय सक्तीचे करण्यात आलेले आहे. शाळेतील विद्यार्थी संख्या विचारात घेऊन प्रती विद्यार्थी 5 पुस्तके या प्रमाणात ग्रंथालयात पुस्तके असायला हवी. किमान 200 पुस्तके ग्रंथालयात असायला हवी. ग्रंथालयातील पुस्तकांसाठी कपाट असावे. पुस्तके ही विषयानुसार ठेवलेली असावी. विद्यार्थी वाचनासाठी पुस्तके देण्यात यावी. ग्रंथालयात पुस्तक नोंदीसाठी पुस्तक साठानोंद रजिष्टर, पुस्तक देवघेव रजिष्टर असावे. लहान व कमी पटसंख्या असलेल्या शाळेचे ग्रंथालय व मोठ्या व जास्त पटसंख्या असलेल्या शाळेचे ग्रंथालय हे शाळांनी आपल्या शाळेतील विद्यार्थी वय, आवड, शिक्षक व मानसशास्त्राचा आधार घेऊन तयार करायला हवे. आधुनिक युगामध्ये संगणक, आधुनिक तंत्र व ई मेडीया, ई साहित्याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. यासर्व गोष्टींचा विचार करुन ग्रंथालय तयार करायला हवे.
(ग्रंथालय हे एक स्वतंत्र गाभामानक असल्याने त्याविषयी अधिक माहिती स्वतंत्र लेखामधून देण्यात येणार आहे. )
6. प्रयोगशाळा – आधुनिक विचार व नवनविन कल्पना यावर आधारीत आजच्या विज्ञानयुगात केवळ पुस्तकी ज्ञानाला महत्व राहिलेले नाही. पुस्तकी ज्ञानाबरोबरच प्रात्यक्षिक कार्य व प्रयोगाला अत्यंत महत्व आलेले आहे. कोणतेही कार्य करतांना सहजता, अचुकता व योग्य गती म्हणजेच कौशल्य असायला हवे. हे कौशल्ये प्राप्त करण्यासाठी कार्याशी संबंधीत सराव विद्यार्थ्याला देणे गरजेचे आहे. हा सराव प्रयोगशाळेमधून देता येतो. कोणतेही प्रात्यक्षिक कार्य तज्ञ व्यक्तीच्या मार्गदर्शनात करणे म्हणजे प्रयोग करणे होय. प्रयोगशाळा म्हणजे एक असे स्थान जेथे विद्यार्थ्यांना स्वत;च्या हाताने कार्य करण्याची संधी मिळते. शास्त्रीय भाषेत सांगायचे झाल्यास एक अशी खोली जेथे सर्व यांत्रिक उपकरणे व साधने ठेवलेली आहेत व त्या साधनाद्वारे स्वत:च्या हाताने कार्य पूर्ण करुन निष्कर्ष प्रस्थापित केले जातात, त्या स्थानाला प्रयोगशाळा असे म्हणतात. प्रयोगशाळेत विद्यार्थी ज्या पध्दती स्वीकारतात त्याचे स्वरुप व शास्त्रीय नियम विद्यार्थ्याला स्पष्ट समजतात. त्या ज्ञानाचा बाहेरच्या जगाशी संबंध विद्यार्थ्याला जोडता येतो. म्हणुनच प्रत्येक शाळेमध्ये प्रयोगशाळा अत्यावश्यक करण्यात आलेल्या आहेत.
(प्रयोगशाळा हे एक स्वतंत्र गाभामानक असल्याने त्याविषयी अधिक माहिती स्वतंत्र लेखामधून देण्यात येणार आहे. )
7. स्वयंपाक खोली – प्रत्येक सजीवाच्या बाबतीत अन्न हा अतिशय महत्वाचा घटक आहे. शाळेत आलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला संतुलित आहार वेळेत मिळावा यासाठी शालेय शिक्षण विभागाने मध्यान्ह भोजन योजना सुरु केलेली आहे. विद्यार्थ्यांच्या वयाचा व आहाराचा अभ्यास करुन त्याला वेगवेगळ्या प्रकारचा आहार या योजनेमध्ये दिला जातो. मध्यान्ह भोजन योजनेमध्ये केवळ आहारच नव्हे तर स्वच्छता , धान्याची साठवण, अन्न शिजविणे, अन्न वाटप करणे, वेळेचे वितरणाचे व्यवस्थापन , आचारी आरोग्य, विद्यार्थी वजन व आहार विषयक नोंदी इत्यादी सर्व गोष्टीचा विचार केला जातो. अन्न साठविणे व शिजविणे करीता स्वतंत्र स्वयंपाक खोली असावी असे बालकाच्या सक्तीच्या व मोफत शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 मध्ये नमूद करण्यात आलेले आहे. विद्यार्थी संख्येनुसार प्रत्येक शाळेत स्वयंपाक गृह असावे.
(स्वयंपाक गृह हे एक स्वतंत्र गाभामानक असल्याने त्याविषयी अधिक माहिती स्वतंत्र लेखामधून देण्यात येणार आहे. )
8. स्वच्छतागृह – स्वच्छता हा आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. विद्यार्थी व शिक्षक आरोग्यासाठी प्रत्येक शाळेमध्ये स्वच्छतागृह हे सक्तीचे करण्यात आलेले आहे. प्रत्येक शाळेमध्ये मुलांसाठी, मुलींसाठी व विशेष गरजाधारक विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह असायला हवे. स्वच्छतागृहामध्ये पाण्याची सुविधा असावी. मुलांसाठी व मुलींसाठी असलेले स्वच्छतागृह हे परस्पराच्या विरुध्द दिशेला असायला हवे. शालेय इमारतीच्या दक्षिण दिशेला मुलांचे स्वच्छतागृह असल्यास शालेय इमारतीच्या उत्तर दिशेला मुलींचे स्वच्छतागृह बांधण्यात यावे. विशेष गरजाधारक विद्यार्थ्यांसाठी असलेल्या स्वच्छतागृहाला उताराचा रस्ता (रॅंम्प) , कमोड पध्दतीचे भांडे असावे.
(स्वच्छतागृह हे एक स्वतंत्र गाभामानक असल्याने त्याविषयी अधिक माहिती स्वतंत्र लेखामधून देण्यात येणार आहे. )
9. संगणक खोली – अध्ययन व अध्यापनामध्ये संगणक अतिशय प्रभावी माध्यम ठरत आहे. विविध ऍप व संगणकीय कार्यक्रमाच्या माध्यमातून शास्त्रीय संकल्पना व आशय अधिक स्पष्टपणे शिकविता येतो. प्रत्येक शाळामधून संगणक असल्यास वेगाने गुणवत्ता साध्य होणार आहे. संगणक साक्षरता ही आधुनिक काळाची गरज झालेली आहे. शहरातील व मोठ्या शाळामधून संगणक लॅब तयार करण्यात आलेल्या असून विद्यार्थ्यांना अध्ययनाच्या संधी निर्माण करुन दिल्या जात आहे. अवघड वाटणारा आशय , संकल्पना विद्यार्थी आवडीने शिकत असतांना दिसत आहे. लहान व कमी पटसंख्येच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळामधून देखिल सध्या संगणक उपलब्ध आहेत.
10. शिक्षक विश्रामिका (स्टाफ रुम) – माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधून शिक्षक विश्रामिका असते. वर्ग अध्यापनासाठी माध्यमिक स्तरावर विषयनिहाय शिक्षक असतात. आपल्या विषयाची तासिका नसतांना शिक्षक विश्रामिकामध्ये शिक्षक संदर्भ ग्रंथाचे वाचन, विद्यार्थी नोंदी, उत्तर पत्रिका तपासणे, निबंध, स्वाध्याय, गृहपाठ इत्यादी तपासणी करण्याचे कार्य करत असतात.
नामांकित मोठ्या शाळामध्ये व आंतरराष्ट्रीय शाळांमध्ये वर उल्लेख केलेल्या खोल्याबरोबरच भाषा, गणित,विज्ञान, इतिहास, भूगोल, कला, क्रिडा, कार्यानुभव इत्यादी विषयाच्या विषय निहाय खोल्या असतात. या खोल्या संबंधित विषयाचा अभ्यासक्रम, अध्ययन अध्यापन साहित्य व उपकरणासह अद्ययावत अशा तयार केलेल्या असतात. यासोबतच स्वतंत्र प्रेक्षागृह व करमणूक हॉल तयार केलेले असतात.
शाळेमध्ये वरीलप्रमाणे वर्गखोल्याशिवाय इतर खोल्या उपलब्ध असतात.
शाळा लहान व कमी पटाची असल्यास वरील खोल्यांची शैक्षणिक गरज व महत्व विचारात घेऊन एकाच खोलीमध्ये दोन / चार विषयाच्या अध्ययन अध्यापनासाठी आवश्यक असलेले साहित्य व सुविधा केलेल्या असतात.
केंद्र शासनाचे मार्गदर्शक सूचनेनुसार व बालकाच्या सक्तीच्या व मोफत शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 नुसार वर्गखोली व इतर खोलीसंदर्भात दिलेले निकष.
v प्राथमिक शाळेतील 30 विद्यार्थी संख्या व उच्च प्राथमिक शाळेतील 35 विद्यार्थ्यांकरिता स्वतंत्र वर्ग खोली असावी. खोलीचे क्षेत्रफळ 490 चौरस फूट(व्हरांड्यासह) इतके असावे.
v वर्ग खोलीचे बांधकाम पक्के असावे.
v वर्गखोलीत विद्युतीकरण तसेच लेखनासाठी फलकअसावा.
v वर्गात हवा खेळती रहावी याकरिता पुरेशा खिडक्या असाव्यात
v सर्व वर्गखोल्यांचे बांधकाम पक्के व भूकंपरोधक असणे आवश्यक असून पक्के म्हणजेच आरसीसी असावे.
v प्रत्येक वर्गखोली करिता एक किंवा शाळेमध्ये किमान दोन याप्रमाणे अग्निशमन यंत्र उपलब्ध करावी.
v प्रत्येक वर्गखोली करिता एक किंवा शाळेमध्ये एकवैद्यकीय प्रथमोपचार पेटी उपलब्ध असावी.
v अग्निशमन यंत्राची व वैद्यकीय प्रथमोपचार पेटीची तपासणी दर तीन महिन्यांनी शिक्षणाधिकारी प्राथमिक, शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यामार्फत करावी.
वरील निकष हे राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या शाळांकरिता लागू राहतील.
वर्ग खोल्या आणि इतर खोल्यांच्या बाबतीत खालील महत्त्वाचे प्रश्न शाळासिद्धी मध्ये विचारले जातात.
1) शाळेत उपलब्ध वर्गखोल्यांची संख्या ?
2) शाळेत उपलब्ध इतर खोल्यांची संख्या (कृपया उल्लेख करावा) ?
3) विविध उद्देशासाठी उपलब्ध इतर खोल्या (वर्गखोल्या व्यतिरिक्त) प्रत्येक खोलीच्या वापरासह लिहावे.
4) ग्रंथालयासाठी स्वतंत्र खोली आहे काय ?
5) प्रयोगशाळेसाठी स्वतंत्र खोली आहे काय ?
6) शालेय पोषण आहारासाठी स्वतंत्र खोली आहे काय ?
7) शाळेत स्वच्छतागृह आहे काय ?
मुख्याध्यापक व निर्धारकांनी वर्णनविधाने वाचन करुन आपल्या शाळेला कोणते वर्णनविधान लागु होतात हे ठरवावे.वर्णनविधानाची निवड करतांना अतिशय प्रामाणिकपणे व वस्तूनिष्ठपणे करावी.
वर्णन विधानानुसार गुणदान खालीलप्रमाणे.
1) a) वर्गखोल्या भरगच्च आहेत मुख्याध्यापकांच्या खोलीशिवाय इतर खोली उपलब्ध नाही. फर्निचर उपलब्ध आहे मात्र अपुरे आहे.
b) वर्ग खोली व इतर खोल्यांमध्ये वायुवीजन असमाधानकारक आहे.नैसर्गिक व दिव्यांचा प्रकाश अपुरा आहे. काही खोल्यांमध्ये निम्नदर्जाचे फलक व काही तक्ते, नकाशे आहेत. फर्निचर निम्न दर्जाचे व दुरुस्तीची गरज असणारे किंवा बदलण्याची गरज असणारे आहेत.
( वरील वर्णनविधाने लागु होत असल्यास 1 गुण देण्यात यावे. )
2) a) काही वर्ग भरगच्च आहेत. मुख्याध्यापक व शिक्षकांसाठी खोल्या उपलब्ध आहेत. शाळेच्या गरजेपुरते पुरेसे फर्निचर उपलब्ध आहे.
b) खोल्यांमध्ये वायुविजन चांगले आहे. नैसर्गिक प्रकाश व आवश्यक तेथे पंखे आहेत. बहुतांश खोलीमध्ये भिंतीवर नकाशे व तक्ते टांगलेले आहेत. फर्निचर आरामदायक व विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार आहेत.
( वरील वर्णनविधाने लागु होत असल्यास 2 गुण देण्यात यावे. )
3) a) विद्यार्थी गटकार्य व इतर उपक्रमासाठी सर्व वर्गखोल्यात पुरेशी जागा आहे. कार्यालय, भांडार, कला इत्यादीसाठी वेगवेगळ्या खोल्या आहेत. प्रत्येक खोलीत पुरेसे बाक व खुर्च्या आहेत. शिक्षकांना कपाट व लॉकर्स आहेत.
b) प्रत्येक वर्गखोलीत वायुवीजन व प्रकाश चांगला आहे. इतर खोल्या सुसज्ज आहेत. आकर्षक वातावरण निर्मितीसाठी चित्रांचा वापर केला आहे. फर्निचर व्यवस्थित व आकर्षक लावलेले आहे. वयानुरूप व विशेष गरजा असणाऱ्या बालकांच्या अनुरूप फर्निचर आहे.
( वरील वर्णनविधाने लागु होत असल्यास 3 गुण देण्यात यावे. )
वर्णनविधाने ही गुणवत्तेचे वर्णन करतात. तसेच गुणवत्तेचा चढता क्रम दर्शवितात. त्यामुळे शाळेला स्वत:चे स्थान समजते. गाभाघटकाचे सर्व गुण मिळवायचे असल्यास शाळेने नेमकेपणाने काय करावे हे समजते.वर्णनविधानाची निवड केल्यानंतर शाळेला स्वत: चे गुणवत्तेमधील स्थान समजते. त्यानंतर प्रत्येक शाळेला सुधारणेसाठी नियोजन करावे लागते. या नियोजनात सुधारणेचा प्राधान्यक्रम ठरवावा लागतो.प्राधान्यक्रमानुसार प्रस्तावित कार्यवाही कोणती करणार हे नमूद करावे लागते. या कार्यवाहीसाठी किती कालावधी लागणार याचा उल्लेख करावा लागतो. अशाप्रकारे कालबध्द व नियोजनबध्द सुधारणेचे नियोजन तयार होते.
कार्यक्रम अधिकारीRMSAतथा राज्यसंपर्क अधिकारी शाळासिध्दी.
शाळासिध्दी – शाळा मूल्यांकनाचा राष्ट्रीय कार्यक्रम - शाळांच्या सर्वांगिण विकासाचा राजमार्ग
शाळेचे सामर्थ्य स्त्रोत – विद्युतीकरण व विद्युत उपकरणे (क्षेत्र क्रमांक 1 – गाभामानके क्रमांक 4 )
विद्युतीकरण व विद्युत उपकरणे
माणसाच्या विकासाचा संपूर्ण इतिहास पाहता, माणसाच्या प्रगतीत विद्युत उर्जेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जगाच्या इतिहासात जसजसा उर्जेच्या विविध पर्यायांचा शोध लागत गेला, तसतसे मानवी विकासाच्या विविध वाटांना वळण मिळत गेले. आज प्रत्येक व्यक्तिला सकाळी उठल्यापासून रात्री झोपेतसुद्धा विजेची आवश्यकता असते. मानवी जीवनाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा व निसर्गात सर्वत्र आढळणारा ऊर्जेचा प्रकार म्हणजे विद्युत होय. अवकाश, वातावरण, जीवसृष्टी, द्रव्य, अणूंना एकत्रित ठेवणारे रासायनिक बंध व खुद्द अणू या सर्व ठिकाणी विद्युत आढळते. वीज चमकणे किंवा पडणे म्हणजे निसर्गातील विद्युत होय. प्राण्यातील एक तंत्रिका कोशिका लगतच्या दुसऱ्या तंत्रिका कोशिकेकडे पाठवीत असणारा अतिशय दुर्बल विद्युतीय आविष्कार म्हणजे विद्युत होय. अंबर या द्रव्यावर लोकरी कापड घासल्यास अंबर विद्युत भारित होते; तर विशिष्ट ईल मासे इतर प्राण्यांना विजेचा झटका देऊ शकतात. ही देखिल विद्युतची विविध रुपे होय.विद्युत / विज दिसत नाही, तिला गंध नसतो अथवा तिला आवाजही नसतो. तथापि वीज कार्य करते. प्रकाश वा उष्णता निर्माण करण्याची व तिचा व्यावहारिक वापर करण्याची पुष्कळ तंत्रे विसाव्या शतकात पुढे आली आहे. त्यामुळे तिचे उपयोग वाढत जाऊन वीज हे आधुनिक समाजाचे एक महत्वाचे अंग बनले आहे.
विजेबद्दलचा पहिला उल्लेख इ. स.पू. सहाव्या शतकात सापडतो. ग्रीक तत्त्वज्ञ व संशोधक मायलीटसचे थेलीझ ( इ.स. पू. ६४०–५४६ ) यांना असे आढळले की, अंबर नामक धूपाच्या जातीच्या खड्यावर लोकरीच्या कापडाने घासल्यास धूलिकण, कागदाचे कपटे इ. हलके पदार्थ त्याच्याकडे आकर्षित होतात; परंतु विजेबद्दल काहीच कल्पना नसल्याने त्यांना अंबराच्या या विचित्र वाटणाऱ्या गुणधर्माची संगती लावणे कठीण झाले. त्यानंतर खूप वर्षांनी ब्रिटिश संशोधक विल्यम गिल्बर्ट यांच्या लक्षात आले की, काच, गंधक, मेण, लाख या पदार्थांत देखील अंबरसारखा गुणधर्म आहे. या गुणधर्माचे वर्णन करण्यासाठी त्यांनी ‘इलेक्ट्रॉन’ हा नवा शब्द वापरला. अंबरला ग्रीक भाषेत ‘इलेक्ट्रॉन’ व लॅटिन भाषेत ‘इलेक्ट्रम’ म्हणतात. त्यावरून त्यांनी इलेक्ट्रिसिटी हा शब्द तयार केला व हाच शब्द रूढ झाला. इ.स. १६०० मध्ये विल्यम गिल्बर्ट यांनी घर्षणजन्य विजेवर खूप प्रयोग केले. त्यांनी निरनिरळ्या पदार्थांची विद्युत प्रवाहाचे संवाहक आणि दुर्वाहक अशा गटांत विभागणी केली. काही द्रव्यांतून वीज वाहते व काहींतून वाहत नाही, असे स्टिफन ग्रे यांनी १७२९ साली शोधून काढले. धन आणि ऋण विद्युत भारांत फरक करावा लागण्याचे कारण म्हणजे काही विद्युत भारित पदार्थांत एकमेकांत आकर्षण आढळले; तर दुसऱ्या काही पदार्थांचे ते प्रतिसारण करीत असल्याचे आढळले. दोन धन विद्युत भार एकमेकांस दूर ढकलतात. दोन ऋण विद्युत भार देखील परस्परांस आकर्षित करतात. यावरून सम विद्युत भारांत प्रतिसारण असते आणि विषम विद्युत भारांत आकर्षण असते, असा नियम लक्षात आला. पुढे एकोणिसाव्या शतकात शास्त्राची जशी प्रगती होत गेली तसा द्रायू सिध्दांतांचा त्याग करण्यात आला; परंतु धन आणि ऋण विद्युत् हे शब्द आणि समभार-प्रतिसारण, विषमभार-आकर्षण हा नियम कायम ठेवण्यात आला.बेंजामीन फ्रँक्लिन यांनी १७४६ साली विजेविषयीचे प्रयोग करायला सुरुवात केली. त्यांनी गडगडाटी वादळात पतंग उडविण्याचा सुपरिचित प्रयोग केला. पतंगाला बांधलेल्या टोकदार तारेवर आकाशातील विजेचा आघात (तडिताघात) झाला व ती वीज पतंगाच्या ओल्या कागदामध्ये आली व तेथे विजेमुळे ठिणगी निर्माण झाली. आकाशातील वीज ( तडित) ही परिचयातील विद्युत असल्याचे या प्रयोगाने सिध्द झाले. गेओर्क झिमोन ओहम यांनी विद्युत रोधाविषयीचे नियम शोधून काढले व ते त्यांच्या नावाने ओळखले जातात. यानंतर ओर्स्टेड, मायकेल फॅराडे, क्लार्क मॅक्सवेल, जॉर्ज जॉनस्टन स्टोनी, रिचर्ड फिलिप्स फाइनमन यांनी केलेल्या शोधांमुळे आज आपण पाहत असलेल्या विद्युत उर्जेचे रुप उदयास आले आहे.
जगातील बहुतेक वीजनिर्मिती मोठ्या जनित्रांमार्फत होते व त्याकरिता दगडी कोळसा, खनिज तेल अथवा नैसर्गिक वायू हे इंधन म्हणून वापरले जातात. ऋण विद्युत् भारित इलेक्ट्रॉन व धन विद्युत् भारित प्रोटॉन हे अणूचे दोन मुख्य विद्युत् भारित घटक असून प्रॉटॉन अणुकेंद्रात असतात, तर इलेक्ट्रॉन अणुकेंद्राभोवती फिरत असतात. या दोन कणांवरील विद्युत भारांमधील प्रेरणांवर सर्व विद्युतीय आविष्कार अवलंबून असतात. या धन व ऋण विद्युत् भारांमधील आकर्षण प्रेरणांमुळे अणुकेंद्र व त्याभोवतीचे इलेक्ट्रॉन धरून ठेवले जाऊन अणू बनतो. काही परिस्थितींत अणूमधील एक वा अनेक इलेक्ट्रॉन मुक्त होतात आणि ते धातू वा अन्य द्रव्यातून अगर शलाकारूपात वाहत गेल्याने विद्युत प्रवाह निर्माण होतो. यंत्रसामग्री तसेच घरगुती वापराची यंत्रोपकरणे चालविणे, शाळेतील, रस्त्यावरील व घरातील दिवे प्रज्वलित करणे,कारखान्यामधून धातूचा मुलामा देणे, वितळजोडकाम करणे,वाहकपट्टे फिरविणे, भट्ट्यांमधून बाहेर पडणाऱ्या वायूंमधील प्रदूषक कण साक्याच्या रूपात काढून टाकणे वगैरे असंख्य कामांकरिता वीज लागते. शिवाय दूरध्वनी, दूरचित्रवाणी व रेडिओ (प्रेषण व ग्रहण), चित्रपट, रडार, संगणक, रोबॉट, अवकाशयाने,कृत्रिम उपग्रह, विमाने, जहाजे, रेल्वे, मोटारगाड्या इ. ठिकाणी विजेचा वापर होतो. अशा रीतीने वीज ही वापरावयास सुटसुटीत असल्याने तिच्यामुळे समाजात परिवर्तन घडून आले आहे.
भारतात सर्वाधिक विकास साधलेले महाराष्ट्र राज्य उद्योग, उत्पन्न,राहणीमान या सर्व आघाड्यांवर अग्रेसर आहे. तरीही वीज या पायाभूत सुविधेच्या उपलब्धतेची समस्या मात्र राज्याला आजही भेडसावते आहे. वीज नसल्यामुळे शाळांशाळांमध्ये होणारे शैक्षणिक, वैयक्तिक,व्यावसायिक, नुकसान हे मोजण्याच्या पलीकडचे आहे. विकासाची चाके सुद्धा विजेसारखी पायाभूत सुविधा नसल्याकारणाने मंदावण्याची शक्यता असते. प्रगत महाराष्ट्राचा विचार करतांना व भविष्यातील शाळेचा विचार करता शाळेला शक्य असल्यास विजेच्या बाबतीत स्वावलंबी व्हायलाच हवे. आजच्या आधुनिक युगात विजेचा वापर हा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. विद्यार्थीसंख्या व विजेचा वापर लक्षात घेऊन प्रत्येक शाळेने आपली विजेची गरज निश्चित करायला हवी. विजेच्या निर्मितीचे स्त्रोत आपल्याला पाहिजे त्या प्रमाणात निर्माण करायला हवे. काही विजेचे स्त्रोत हे नैसर्गिकरित्या मुबलक प्रमाणात मोफत मिळतात. जसे सूर्यप्रकाश, पाणी, वारा, समुद्री लाटा इत्यादी. सूर्यप्रकाशाची ऊर्जा विद्युत उर्जेमध्ये रूपांतर करताना मोठ्या प्रमाणात पैसा व तांत्रिकदृष्ट्या अडचणी निर्माण होतात.असे असले तरी सूर्यप्रकाशाच्या साह्याने शाळेत आवश्यक उर्जा / विद्युत निर्मिती करणे शक्य आहे. आंतरराष्ट्रीय व नामांकित शाळांमधून अशा प्रकारे विद्युत निर्मिती केली जात आहे. शाळा आपल्या आवश्यकतेनुसार सोलर पॅनलच्या साह्याने अशाप्रकारची विद्युत सुविधा उपलब्ध करुन घेत आहेत.वारा व समुद्री लाटा यांचे रूपांतर विद्युत उर्जेमध्ये करत असताना भौगोलिक अडचणी असतात. कारण ही गोष्ट प्रत्येक ठिकाणी मुबलक प्रमाणात मिळत नाही. पाण्याचा विचार केला असता. आजपर्यंत आपण फक्त काही प्रमाणात धरणे बांधून त्या पाण्यापासून विजेचे निर्माण करीत आहोत. ज्या ऊर्जा आपल्याला मोफत मिळतात त्याचा उपयोग विजेचे रूपांतर करण्यासाठी आजपर्यंत फक्त तीन ते पाच टक्के आपण उपयोग करून घेतलेला आहे. कृत्रिमरित्या वीज निर्मिती आपण कोळसा व रासायनिक स्त्रोतापासून तयार करून विजेचा वापर करतो. परंतु भौगोलिक पाहणीनुसार आपल्या देशातला कोळसा अंदाजे 40 ते 50 वर्ष पुरतील या प्रमाणात साठा आहे असे लक्षात येते. तसेच कोळश्यापासून विजेचे निर्माण करताना क्षमता 29ते 30 टक्के आहे. तसेच रासायनिक स्त्रोताचा विचार केला असता आपल्या देशामध्ये रासायनिक स्त्रोत हे दुसऱ्या देशापासून घ्यावे लागतात. कोळसा आणि रासायनिक स्त्रोत या दोन्ही गोष्टींचा वापर करून आज आपण आपल्या वापरात असलेली जवळपास 65 ते 70टक्के वीज निर्माण करतो. वरील सर्व बाबींचा विचार करताना असे लक्षात येते की, आजपासूनच आपण विजेची बचत करणे आवश्यक आहे. भविष्याच्या दृष्टीने विचार केला असता आपल्या देशातील विजेचे स्त्रोत व लागणारी वीज यामध्ये 25 वर्षांनंतर मोठी तफावत येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यादृष्टीने आजपासूनच विजेची बचत करणे व स्त्रोत निर्माण करणे हे अत्यंत आवश्यक व काळाची गरज आहे. केंद्रीय ऊर्जा विभागाने विजेची बचत करण्यासाठी उच्चतम तंत्रज्ञानाचा वापर प्रत्येकानी करावा असे नमूद केले आहे. त्यासाठी नवीन तंत्रज्ञानानुसार ट्युबलाईटच्याऐवजी सी.एफ.एल. व आता एल.ई.डी. लाईटचा वापर करावा अशी शिफारस केलेली आहे.जेणेकरून विजेची बचत होईल. कारण एल.ई.डी.बल्बची प्रकाश विस्तारण क्षमता ही प्रत्येक व्हॅटच्या प्रमाणात प्रकाश उत्सर्जित करते. तसेच प्रत्येक व्हॅटला लागणारा विद्युत प्रवाह दोन्ही गोष्टीच्या (सी.एफ.एल. आणि ट्युब लाईट) प्रमाणात फारच कमी लागतो. त्यामुळे वीजेचा वापर कमी होईल. त्याचप्रमाणे महाराष्ट्र ऊर्जा विकास प्राधिकरण नैसर्गिकरित्या उपलब्ध असलेल्या उर्जेचा वापर करण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करीत आहे. सूर्यप्रकाशाची ऊर्जा व तिचा वापर दैनंदिन वापरात कशाप्रकारे करता येईल याची जाणीव लोकांना करून दिली जात आहे. त्यामध्ये सौरऊर्जा लाईट, सौरऊर्जा हिटरचा वापर आपण आपल्या दैनंदिन जीवनात केल्यास आपण जागरूक नागरिक म्हणून आपल्या देशाला वीज बचत करण्यासाठी अप्रत्यक्षरित्या मदत करू शकतो. त्याचप्रमाणे आपण आपल्या दैनंदिन वापरात लागणाऱ्या विजेच्या वस्तुंचा सदुपयोग आवश्यकतेनुसार करून घेतल्यास वीज बचत करू शकतो. कारण आवश्यकता नसल्यास ताबडतोब वीज उपकरणे फॅन, लाईट बंद करून घेणे. तसेच ए.सी. चा वापरही इकॉनॉमिक मोडमध्ये केल्यास वीज बचत होईल व त्याचबरोबर क्लोरोफ्लोरो कार्बनसुद्धा कमी प्रमाणात उत्सर्जित होईल. त्यामुळे पृथ्वीच्या परिमंडलामधील जी ओझोन लेअर कमी होत आहे,ती कमी प्रमाणात होईल. तसेच नैसर्गिक सूर्यप्रकाशाचा वापर आपल्या शालेय, दैनंदिन घरगुती व कार्यालयामध्ये करून घेतल्यास लागणारी वीज ही कमी होऊ शकते. सी.एफ.एल. व सौरउर्जेचा वापर प्रत्येकाने काळाची गरज ओळखून दैनंदिन जीवनात करण्यास सुरूवात केली तर देशातील वीज वापर काही प्रमाणात कमी होईल. ही वाचणारी वीज आपल्या पुढील आयुष्यात उपयोगी पडू शकते. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाबळेवाडी ता शिरुर जिल्हा पुणे या शाळेमध्ये अशाप्रकारे सौर उर्जेचा वापर मोठ्याप्रमाणात केलेला आहे. प्रत्येक शाळेने आपल्या विद्यार्थीसंख्येनुसार शाळेत वीजेची व्यवस्था करायला हवी. वरीलप्रमाणे विद्युत सुविधा व प्रगतीचा सहसंबंध पाहता बालकाच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009नुसार व राज्य शासनाच्या निकषानुसार प्रत्येक शाळेत विद्युत सुविधा व विद्युत उपकरणे सक्तीची केलेली आहे.
1) प्रकाशाचे दिवे ( बल्ब ) - शाळेमध्ये वर्गखोल्याबरोबरच इतर खोल्यांचा समावेश असतो. प्रत्येक खोलीमध्ये विद्यार्थी अध्ययन व अध्यापनविषयक कामकाज चालते. अशावेळी वर्गात पुरेशा प्रमाणात उजेड किंवा प्रकाश असायला हवा. वर्गाचा आकार पाहून वर्गात योग्य ते बल्ब किंवा प्रकाश सुविधा करायला हवी. प्रत्येक विद्यार्थ्याला फळ्यावर लेखन केलेले सहज आणि स्पष्ट दिसेल व वाचन करता येईल अशाप्रकारचा उजेड असायला हवा. कित्येक वेळा कमी उजेड असल्याने विद्यार्थ्यांना फळ्यावरील लेखन स्पष्ट दिसत नाही अशावेळी विद्यार्थ्यांच्या डोळ्यावर ताण येऊन डोळ्याचे विकार होतात. चष्मा लागतो. विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो. म्हणूनच वर्गात उजेड असणे अत्यंत महत्वाचे असते.
2) पंखे - एका वर्ग खोलीमध्ये 40 ते 50 विद्यार्थी सहा ते सात तास बसलेले असतात. अशा वेळी सर्व मुलांना खेळती व शुध्द हवा मिळायला हवी. विद्यार्थी श्वसनावाटे मोठ्या प्रमाणावर कार्बन डायऑक्साईड वायू बाहेर पडलेला असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना लवकर थकवा येण्याची शक्यता असते. विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असते. वर्गखोलीला खिडक्या असल्यास उत्तम. उन्हाळा असतांना उष्णतेचा त्रास सर्वश्रुत आहे. वर्गात अधिक विद्यार्थी असल्यास उकाडा वाढलेला असतो. उकाड्यामुळे अध्ययन अध्यापनावर परिणाम होण्याची शक्यता असते.अशावेळी वर्गात पंखा असल्यास हवा खेळती राहण्यास मदत होते. शाळा आपल्या दर्जानुसार पंख्याबरोबर कुलर, वातानुकुलित व्यवस्था करतांना दिसत आहेत.
3) ध्वनिक्षेपक (लाऊड स्पीकर)- शाळेमध्ये स्वातंत्र्य दिवस, गणतंत्र दिवस, प्रासंगिक कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करावे लागते. विद्यार्थी संर्वांगिण विकासामध्ये अशा उपक्रमाचा महत्वपूर्ण वाटा असतो. ध्वनिक्षेपकाद्वारे देशभक्तीपर गीते, विद्यार्थी कला गुणांचा कार्यक्रम सादर करुन वातावरण निर्मिती करता येते. ध्वनिक्षेपकामुळे आवाज स्पष्टपणे सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतो. परिपाठामध्ये ध्वनिक्षेपकाचा प्रभावी वापर केल्यास मुलांमध्ये सभाधीटपणा, वक्तृत्व , भाषण- संभाषण इत्यादी कौशल्यांची निर्मिती होते. जास्त पटसंख्या व जास्त वर्ग खोल्या असलेल्या शाळांमधून काही प्रसंगी वर्गात सूचना देण्यासाठी , परिपाठासाठी ध्वनिक्षेपकाचा उपयोग केला जातो.
4) रेडीओ व दूरदर्शन – शिकण्याच्या प्रक्रियेमध्ये अध्यापन साहित्याची भूमिका असते. अध्यापन साहित्यामध्ये दृकसाधने, श्राव्य साधने , दृकश्राव्य साधने अशा विविध प्रकारची साधने वापरली जातात. आधुनिक व बदलत्या कालानुरुप ही साधने देखिल बदलत आहे. 20 वर्षापूर्वी रेडीओचा वापर प्रभावी दृकसाधन म्हणून केला जात असे. इंग्रजी अध्याप्न पध्दती व कृतीपाठ रेडीओवर प्रसारीत केले जात असत. त्याचा परिणाम अतिशय चांगला होत असे. वर्गामध्ये विद्यार्थ्यांसमोर रेडीओ पाठ घेतला जात असत. रेडीओत सांगितल्याप्रमाणे वर्गात प्रात्यक्षिक घेतले जात असत. आजही विविध वाहिन्यावरुन शैक्षणिक मार्गदर्शन केले जात आहे. रेडीओप्रमाणेच दूरदर्शन हे दृकश्राव्य साधन म्हणून अतिशय प्रसिध्द माध्यम आहे. तज्ज्ञामार्फत घेतल्या जाणा-या पाठाचा लाभ विद्यार्थी घेतांना दिसून येतात. घराघरातून दूरदर्शन लोकप्रिय झालेले आहे. या लोकप्रियतेचा फायदा शैक्षणिक गुणवत्ता व विद्यार्थी सर्वांगिण विकासासाठी करता येतो.
5) संगणक – रेडीओ, टू इन वन टेपरेकॉर्डर, दूरदर्शन संच या सर्वांची जागा हल्ली संगणक घेतांना दिसत आहे. संगणकामुळे संपूर्ण जगामध्ये मोठी क्रांती झालेली आहे. अध्ययनामध्ये, अध्यापनमध्ये व मूल्यमापनामध्ये देखिल संगणक वापर केला जात आहे. विद्यार्थ्यांना संगणक हाताळण्याची संधी आता प्राथमिक शाळेपासूनच उपलब्ध होत आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळामधून देखिल अध्यापनासाठी संगणकाचा वापर केला जात आहे. विद्यार्थी स्वत: संगणकाच्या साह्याने पाठावरील प्रश्न क्लिक करुन सोडवितांना दिसून येत आहेत. संगणकामुळे शिकण्यात एकाग्रता वाढून स्वत: घेतलेले ज्ञान विद्यार्थ्यांच्या चिरकाल स्मरणात राहते. प्रगत व प्रयोगशील शाळांमधून विद्यार्थ्यांच्या हातातील वह्या पुस्तके जाऊन त्यांच्या हातात लॅपटॉप व नोटपॅड दिसू लागले आहेत. संगणकाबरोबरच इंटरनेट कनेक्शन, प्रिंटर, स्कॅनर इत्यादी साहित्य आवश्यक झाले आहे.
6) प्रक्षेपक (प्रोजेक्टर) - शाळेची माहिती, प्रशिक्षण या बरोबरच इतर माहिती देण्यासाठी शाळांमधून प्रोजेक्टरचा वापर केला जातो. PPT चे सादरीकरण, व्याख्याने, चर्चासत्रे यासाठी प्रोजेक्टर आवश्यक असते. तंत्रज्ञानाचा वापर करणा-या नवोपक्रमशील शिक्षकांनी पाठ्यांशावर आधारीत आकर्षक व मुलांना आवडतील अशा चित्रफिती तयार केलेल्या आहेत. या चित्रफिती दाखविण्यासाठी प्रोजेक्टरचा वापर होतो. शिक्षणामध्ये काम करणा-या अनेक संस्था व व्यक्ती यांचे मार्गदर्शन प्रोजेक्टरच्या साह्याने दाखविता येते. अध्ययन व अध्यापनाध्ये प्रोजेक्टरचा वापर अतिशय प्रभावी ठरत आहे.
7) पाणी शुध्दीकरण यंत्र - विद्यार्थी, शिक्षक व शाळेतील संबंधित सर्व व्यक्तीच्या आरोग्याचा विचार करता शाळेत पिण्यासाठी शुध्द पाणी उपलब्ध होणे आवश्यक आहे. शासनाकडून काही उच्च प्राथमिक शाळांमध्ये पाणी शुध्दीकरण यंत्र उपलब्ध करुन देण्यात आले होते. राज्यातील काही जिल्हा परिषद व्यवस्थापनाने आपल्या जिल्हा निधीमधून काही शाळांना पाणी शुध्दीकरण यंत्रणा उपलब्ध केलेली आहे. शालेय गुणवत्ता व उपयोगितेचा विचार करता पाणी शुध्दीकरण यंत्रासोबत पाणी थंड करण्याची यंत्रणा, शीतकपाट उपलब्ध असावे. काही शाळांमधून थंड पाणी , गरम पाणी असणारी विद्युत उपकरणे उपलब्ध आहेत.
8) विज्ञान विषयक व प्रयोगशाळेत आवश्यक विद्युत उपकरणे –प्रत्येक शाळेमध्ये प्रयोगशाळा असतेच. प्रयोगशाळा म्हटले कितीतरी उपकरणे व साधने आली. यामधील बहुतेक साधने ही विद्युत सुविधेवर अवलंबून असतात. या साधनांची निगा व काळजी महत्वाची असते. ही साधने अद्ययावत ठेवावी लागतात. यामध्ये SLIDE PROJECTOR, FILMSTRIPS, EPIDIASCOPE, OVER HEAD PROJECTOR, VCR, LCD PROJECTOR, MICROSCOPE, COMPUTER, LAPTOP इत्यादी साधनांचा समावेश होतो.
वरील सर्व उपकरणे किंवा शाळेला आवश्यक असणारी विद्युत उपकरणे वापरता येण्यासाठी शाळेमध्ये विद्युत सुविधा असणे सक्तीचे करण्यात आलेले आहे. विद्युत सुविधेचा विचार करतांना विद्युतीकरणाची पध्दती, अंडर ग्राऊंड वायरींग, आवश्यकतेनुसार कळफलक (बोर्ड ) यांच्याकडे सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून पाहिले जाते. ए ग्रेडशाळा व आंतरराष्ट्रीय शाळांना स्वत:ची विद्युत यंत्रणा , सौर उर्जा, विद्युत जनित्र, इन्व्हर्टर असायला हवे. विद्युत सुविधा वापरत असतांना विजेचा धक्का लागू नये याची काळजी घेतली जावी. वीज ही जीवनावश्यक सुविधा आहे. मात्र ती काळजीपूर्वक वापरली नाही, तर आग लागणे, झटका बसणे व मृत्यूही ओढवणे यांसारखे धोके तिच्यामुळे उद्भवू शकतात. त्यासाठी प्रत्येक शाळेत आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत व्यवस्था व उपाययोजना असायला हवी. उपाययोजनामध्ये शाळेत अग्नीशमन यंत्रे, प्रथमोपचार पेटी प्रथम प्राधान्याने असायला हवी.
केंद्र शासनाचे मार्गदर्शक सूचनेनुसार व बालकाच्या सक्तीच्या व मोफत शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 नुसार विद्युतीकरण व विद्युत उपकरणे संदर्भात दिलेले निकष.
v शाळेला विद्युत सुविधा व सर्व खोल्यांमध्ये कलफलकासह विद्युतीकरण.
v प्रत्येक वर्गात उजेडासाठी दिवे व वायुविजनासाठी पंखे.
v प्रत्येक वर्गखोली करिता एक किंवा शाळेमध्ये किमान दोन याप्रमाणे अग्निशमन यंत्र उपलब्ध करावी.
v प्रत्येक वर्गखोली करिता एक किंवा शाळेमध्ये एकवैद्यकीय प्रथमोपचार पेटी उपलब्ध असावी.
v अग्निशमन यंत्राची व वैद्यकीय प्रथमोपचार पेटीची तपासणी दर तीन महिन्यांनी शिक्षणाधिकारी प्राथमिक, शिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी प्राधिकृत केलेल्या अधिकाऱ्यामार्फत करावी.
वरील निकष हे राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या शाळांकरिता लागू राहतील.
विद्युतीकरण व विद्युत उपकरणे याबाबतीत खालील महत्त्वाचे प्रश्न शाळासिद्धी मध्ये विचारले जातात.
अ) पंखे असलेल्या खोल्यांची संख्या –
ब) दिव्यांची सुविधा असलेल्या खोल्यांची संख्या –
2. विद्युत उपकरणांची उपलब्धता
क) सी डी प्लेयर ड) एल सी डी प्रोजेक्टर
इ) विद्युत जनित्र ई ) इतर --- (कृपया उल्लेख करावा)
मुख्याध्यापक व निर्धारकांनी वर्णनविधाने वाचन करुन आपल्या शाळेला कोणते वर्णनविधान लागु होतात हे ठरवावे. वर्णनविधानाची निवड करतांना अतिशय प्रामाणिकपणे व वस्तूनिष्ठपणे करावी.
वर्णन विधानानुसार गुणदान खालीलप्रमाणे.
1) a) विजेची तरतूद नाही. विजेरी वर चालणारे रेडिओ सारखी उपकरणे आहेत.
b) विशिष्ट प्रसंगी शाळा जनरेटर किंवा विजेरी आणि इतर विद्युत उपकरणे उसनवारीने किंवा भाड्याने भाडेतत्वाने घेते.
( वरील वर्णनविधाने लागु होत असल्यास 1 गुण देण्यात यावे. )
2) a) वीज पुरवठा अनियमित आहे.वीज खंडित झाल्यास पर्यायी व्यवस्था नाही. सर्व खोल्यांमध्ये विजेचे दिवे पंखे आहेत. विद्युत उपकरणे टीव्ही रेडिओ इत्यादी उपलब्ध आहे.
b) कळफलक विद्युत वाहक तारा सुस्थितीत आहे. विजेची उपकरणे पंखे इत्यादी वेळोवेळी दुरुस्त केली जातात.
( वरील वर्णनविधाने लागु होत असल्यास 2 गुण देण्यात यावे. )
3) a) वीज खंडित प्रकरणी शाळेला स्वतःची विज आधार प्रणाली जसे विद्युत जनित्र इन्व्हर्टर आहे. सर्व खोल्यांमध्ये विज दिवे आणि पंखे आहे. ध्वनिव्यवस्था व्यवस्थित आहे.
b) शॉर्टसर्किटमुळे लागणारी आग टाळण्यासाठी एम सी बी कळांचा वापर केलेला आहे. सर्व विद्युत उपकरणे नियमित तपासली जातात दुरुस्त केली जातात.चालू स्थितीत ठेवली जातात.
( वरील वर्णनविधाने लागु होत असल्यास 3 गुण देण्यात यावे. )
वर्णनविधाने ही गुणवत्तेचे वर्णन करतात. तसेच गुणवत्तेचा चढता क्रम दर्शवितात. त्यामुळे शाळेला स्वत:चे स्थान समजते.गाभाघटकाचे सर्व गुण मिळवायचे असल्यास शाळेने नेमकेपणाने काय करावे हे समजते. वर्णनविधानाची निवड केल्यानंतर शाळेला स्वत: चे गुणवत्तेमधील स्थान समजते. त्यानंतर प्रत्येक शाळेला सुधारणेसाठी नियोजन करावे लागते. या नियोजनात सुधारणेचा प्राधान्यक्रम ठरवावा लागतो. प्राधान्यक्रमानुसार प्रस्तावित कार्यवाही कोणती करणार हे नमूद करावे लागते. या कार्यवाहीसाठी किती कालावधी लागणार याचा उल्लेख करावा लागतो. अशाप्रकारे कालबध्द व नियोजनबध्द सुधारणेचे नियोजन तयार होते.
कार्यक्रम अधिकारीRMSAतथा राज्यसंपर्क अधिकारी
शाळासिध्दी – शाळा मूल्यांकनाचा राष्ट्रीय कार्यक्रम - शाळांच्या सर्वांगिण विकासाचा राजमार्ग
शाळेचे सामर्थ्य स्त्रोत – ग्रंथालय (क्षेत्र क्रमांक 1 – गाभामानके क्रमांक 5 )
व्यक्ती, समाज व राष्ट्राच्या जडणघडणीत ग्रंथ व ग्रंथालयाचे महत्त्व अनन्यसाधारण असे आहे. माहिती, ज्ञान, मनोरंजन आणि जिज्ञासापूर्तीचे उत्कृष्ट साधन म्हणून ग्रंथांची उपयोगितता सर्वश्रुत आहे. म्हणूनच बौद्धीक विकासाचे शक्तीकेंद्र आणि सामाजिक विकासाचे ऊर्जाकेंद्र म्हणून ग्रंथालयांची नितांत आवश्यकता आहे. ग्रंथालयाचे अस्तित्व प्राचीन काळापासून आहे. प्राचीन भारतातील तक्षशीला व नालंदा विद्यापीठे ग्रंथालयासाठी प्रसिध्द होती. विद्यार्थ्यांचा शैक्षणिक व बौद्धिक विकास त्याकाळी ग्रंथालायाद्वारे करून घेतला जात असे. प्राचीन काळ ते आधुनिक काळ ग्रंथालयाचा प्रवास पाहता ग्रंथालय हे शैक्षणिक व सामाजिक जीवनाचा अविभाज्य घटक आहे. शैक्षणिक दृष्टीने अध्ययन अध्यापन व मूल्यमापन पध्दतीचा पाया हा अभ्यासक्रम, पाठ्यक्रम व पाठ्यपुस्तकावर अवलंबून असतो.अभ्यासक्रम व पाठ्यक्रम हे शिक्षणाच्या तात्विक, मानसशास्त्रीय अधिष्ठानानुरुप संदर्भीय पुस्तकामधून देश व समाजाच्या गरजेनुरुप,उद्दीष्टानुरुप निवडलेले असतात. संदर्भ पुस्तके व संदर्भ ग्रंथ हे केवळ शिक्षणच नव्हे तर एकूणच समाजजीवनासाठी उपयोगी असतात.पुस्तके व संदर्भ ग्रंथ प्रत्येक व्यक्ती, संस्था व शाळेच्या संग्रही असायला हवेत. समृध्द ग्रंथालयामधून जीवनसमृध्द करणारी पुस्तके, संदर्भग्रंथ पाहावयास मिळतात. व्यक्तीच्या जीवनात ग्रंथालयाला महत्त्वाचे स्थान असून ग्रंथालयसेवा मोफत मिळणे हा व्यक्तीचा हक्क व राष्ट्राची जबाबदारी आहे. ग्रंथालयविषयक हा दृष्टिकोन इंग्लंड,अमेरिका यांसारख्या प्रगत राष्ट्रांत मान्य झाला व ग्रंथालय–चळवळीचे मूळ सर्व प्रथम तेथे रुजले गेले. इंग्लंडमध्ये एफ. ए. एबर्ट व एडवर्डझ यांच्या प्रयत्नांमुळे १८५० मध्ये सार्वजनिक ग्रंथालयविषयक पहिला कायदा मंजूर झाला. या कायद्यान्वये जनतेकडून कर वसूल करून स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत ग्रंथालये स्थापन करण्यात आली. तेथे सर्वांना मोफत ग्रंथालयसेवा मिळू लागली. १९६४ मध्ये पब्लिक लायब्ररीज अँड म्युझियम्स ॲक्ट मंजूर झाला. या कायद्यान्वये सार्वजनिक ग्रंथालयांची व्यवस्था ही राष्ट्राची जबाबदारी होय, हे तत्त्व मान्य करण्यात आले. त्यानुसार कायद्याप्रमाणे ४२,८६८ ग्रंथालये सुरू करण्यात आली. अमेरिकेत १८४८ मध्ये मॅसॅचूसेट्स येथे पहिला ग्रंथालय–कायदा मंजूर झाला व त्यानुसार बॉस्टन येथे सार्वजनिक ग्रंथालयाची स्थापना करण्यात आली.
भारतातील ग्रंथालय चळवळ - भारतातील ग्रंथालय चळवळीचा प्रारंभ बडोद्याचे श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांनी आपल्या संस्थानात केलेल्या योजनाबद्ध अशा मध्यवर्ती तसेच जिल्हावार, तालुकावार व ग्रामवार ग्रंथालयांच्या स्थापनेने झाला. विसाव्या शतकाच्या पहिल्या दशकात चळवळीचे हे पहिले पाऊल पडले. तत्पूर्वी मुंबई सरकारने १८०८ मध्ये केलेली ग्रंथालयांच्या नोंदींची तरतूद, एकोणिसाव्या शतकात भारतातील प्रमुख शहरी स्थापन झालेल्या नेटिव्ह जनरल लायब्ररीज, १८६७ मध्ये मंजूर झालेला प्रेस अँड रजिस्ट्रेशन ऑफ बुक्स ॲक्ट, इंपीरियल लायब्ररीची स्थापना (१९१२) इ. गोष्टी ग्रंथालय चळवळीच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत.१९२४ मध्ये ग्रंथालयसंघाचे बडोदे येथे कार्य सुरू झाले व ग्रंथालयशास्त्राच्या शिक्षणाची भारतात प्रथमच सोय झाली.बडोदे संस्थानात सुरू झालेल्या ग्रंथालय चळवळीचे पडसाद इतरत्रही उमटले व त्या त्या प्रदेशाच्या शैक्षणिक गरजा आणि प्रगती यांनुसार ग्रंथालय चळवळीची पावले पुढे पडत गेली. विशेषतः मद्रास, बंगाल, पंजाब व मुंबई या प्रांतांनी स्वातंत्र्यपूर्वकाळात ग्रंथालयाच्या क्षेत्रात मोठी प्रगती केली. ग्रंथालयीन कार्यकर्त्यांच्या बरोबरच समाजसेवक, राजकीय नेते व देणगीदार यांचे पाठबळ ग्रंथालय चळवळीला लाभले. डॉ. रंगनाथन यांना आधुनिक भारतीय ग्रंथालय चळवळीचे जनक म्हटले जाते. त्यांनी ग्रंथालयशास्त्रविषयक विपुल लेखनही केले आहे. १९४८ मध्ये मंजूर झालेला कायदा, निरनिराळ्या विद्यापीठांनी सुरू केलेले ग्रंथालयशास्त्राचे अभ्यासक्रम इ.कारणांनी ग्रंथालय चळवळीला व्यापक स्वरूप प्राप्त झाले आहे.
भारत सरकारने ज्या पंचवार्षिक योजना आखल्या,त्यांमधूनही ग्रंथालय चळवळीचे पाऊल पुढेच पडत गेले. पहिल्या पंचवार्षिक योजनेत सर्व राज्यांतून सार्वजनिक ग्रंथालयपद्धती अस्तित्वात यावी, अशी तरतूद करण्यात आली होती. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत व तिसऱ्या पंचवार्षिक योजनेत सुव्यवस्थित ग्रंथालय योजना हे शिक्षण व्यवस्थेचे एक अंग होय हे मान्य करण्यात आले, त्याप्रमाणे आर्थिक तरतूद करण्यात आली होती. चौथ्या पंचवार्षिक योजनेत ग्रंथालयाबाबत करावयाच्या उपक्रमांचा सर्वांगीण विचार व्हावा, म्हणून नियोजन आयोगाने भारतातील तज्ञ ग्रंथपालांची एक समिती नियुक्ती केली होती. पाचव्या पंचवार्षिक योजनेच्या काळातही ग्रंथालयविकासाचा विचार करण्यासाठी एक समिती नेमण्यात आली होती. यानंतर आलेल्या सर्वच पंचवार्षिक योजनामधूनसुसज्ज आधुनिक ग्रंथालायाद्वारे मनुष्यबळाचा विकास हे तत्व डोळ्यासमोर ठेऊन नियोजन केले गेले.
महाराष्ट्रात ग्रंथालय प्रसाराची सुरुवात १९२१ साली झाली. श्री द. वा. जोशी यांच्या पुढाकारातून महाराष्ट्र मोफत वाचनालय परिषद भरली व महाराष्ट्रीय वाचनालय संघाची स्थापना झाली. मुंबई सरकारने नेमलेल्या फैजी समितीचा सार्वजनिक पुस्तकालयांच्या विकासासंबंधीचा अहवाल १९४० मध्ये प्रसिद्ध झाला. फैजी समितीच्या शिफारशीनुसार १९४७ मध्ये मध्यवर्ती, प्रादेशिक, जिल्हा आणि तालुका वाचनालयांची रीतसर उभारणी सुरू झाली. महाराष्ट्र राज्याची १९६० मध्ये स्थापना झाल्यानंतर १९६२ मध्ये महाराष्ट्रातील विभाग ग्रंथालय संघांनी परस्परांत सहकार्य वाढावे आणि सर्व राज्याचे प्रतिनिधीत्व करू शकेल अशी संघटना निर्माण करावी, या उद्देशाने महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघाची स्थापना केली असून ग्रंथालय चळवळ जनताभिमुख करण्याचे महत्त्वाचे कार्य ह्या संघटनेने चालविले आहे. महाराष्ट्रात १९६७ मध्ये ग्रंथालय कायदे मंजूर करण्यात आले. स्वतंत्र अशी शासकीय ग्रंथालय खाती या कायद्यांनी अस्तित्वात आली असून सार्वजनिक ग्रंथालयांची स्थापना, संगोपन आणि संघटन हे कार्य होत आहे.
ज्ञानविज्ञानाची प्रचंड वाढ व त्यांविषयीचे साहित्य संशोधनासाठी उपलब्ध करून देण्याची सातत्याची निकड यांमुळे ग्रंथालय क्षेत्रात सहकाराची गरज निर्माण झाली. नजीकच्या दोन ग्रंथालयांतच नव्हे, तर प्रांतांतील देशातील व आंतरराष्ट्रीय ग्रंथालयांतही परस्पर देवाणघेवाण व सहकार्याची आवश्यकता असल्यामुळे हे करणाऱ्या संघटना निर्माण झाल्या. ज्ञानसाहित्याची आंतर–ग्रंथालयीन देवघेव, सामूहिक ग्रंथखरेदी, वर्गीकरण–सूचिलेखनादी तांत्रिक बाबतीत सहकार्य, अंधांकरिता सोयी, मोफत वा सवलतीची टपालवाहतूक इ. सहकार्याच्या काही बाबी होत. उपलब्ध ग्रंथसंपत्तीचा जास्तीत जास्त उपयोग हे ग्रंथालय सहकाराचे साध्य होय व त्यासाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्था स्थापन झाल्या आहेत. त्यांपैकी काही ख्यातनाम संस्थांची माहिती अशी : (१) इंटरनॅशनल फेडरेशन फॉर डॉक्युमेंटेशन (१८९५). (२) इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ लायब्ररी असोसिएशन्स (१९२७). (३) युनेस्को ग्रंथालय विभाग (१९४६). (४) फार्मिंग्टन प्लॅन (१९४८): कार्नेगी कॉर्पोरेशनच्या विद्यमाने अमेरिकेतील ग्रंथालयांत सहकार्य साधणारी संस्था. (५) स्कँडिनेव्हियन प्लॅन (१९५६) : डेन्मार्क,नॉर्वे, स्वीडन.अशाप्रकारे ग्रंथालय निर्मिती व ग्रंथालयाचा वापर सर्वच क्षेत्रामध्ये सुरु झाला.
शालेय शिक्षणात ग्रंथालयांचा वापर - शालेय शिक्षणाच्या गुणवत्तावाढीमध्ये शालेय ग्रंथालयाचे योगदान फार मोठे आहे.ग्रंथालयात उपलब्ध असलेल्या साहित्यांचा अधिकाधिक वापर करण्यास शिक्षक आणि विद्यार्थी यांना प्रवृत्त करणे आणि त्यांना आवश्यक त्या ग्रंथालय सेवा उपलब्ध करून देणे हे शालेय ग्रंथालयाचे उद्दिष्ट असते. शालेय शिक्षणात शालेय ग्रंथालयाचा अधिकाधिक वापर होणे ही आजची शैक्षणिक गरज आहे. केवळ पाठय़पुस्तकांतून दिल्या जाणाऱ्या शिक्षणातून शिक्षणाची उद्दिष्टय़े साध्य होऊ शकत नाहीत. त्या भागविण्याचे कार्य शालेय ग्रंथालय विधिध सेवांच्या आणि उपक्रमांच्या द्वारे पार पाडू शकते. ग्रंथालयाने विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लावून त्यांना आवश्यक ते साहित्य उपलब्ध करून दिले आणि त्याचा वापर करण्याचे शिक्षण दिले तर विद्यार्थ्यांमध्ये स्वाभाविकच ज्ञानार्जनाची आवड निर्माण होते. म्हणून आजच्या शालेय शिक्षणात विद्यार्थ्यांना ग्रंथालयाचा वापर करण्याची संधी प्राप्त करून देऊन त्यांची ज्ञानार्जनाची, जिज्ञासापूर्तीची नैसर्गिक भूक भागविण्याचे कार्य शालेय ग्रंथालयाने केले पाहिजे. ग्रंथालयाच्या या कार्याचे यश विद्यार्थी ग्रंथालय साहित्याचा वापर किती व कसा करतात यावर अवलंबून असते. म्हणूनच विद्यार्थ्यांना आवश्यक ते साहित्य उपलब्ध करून देऊन त्याचा वापर करण्याचे शिक्षण ग्रंथालयाने विद्यार्थ्यांना द्यायला हवे. ग्रंथालयीन साधनांचा विद्यार्थ्यांना अधिकाधिक वापर करता यावा म्हणून ग्रंथालयाने विविध सेवांचे आणि उपक्रमांचे आयोजन करावयास हवे. उदा. विविध शालेय उपक्रमामध्ये विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. यामध्ये चित्रकला, निबंध,हस्ताक्षर, वक्तृत्व , वाद विवाद अशा स्पर्धांचा समावेश असतो.ग्रंथालयामधून या सर्व स्पर्धांवर मार्गदर्शन करणारी पुस्तके उपलब्ध करुन देता येतात. ऐतिहासिक संदर्भ , भूगोल , नागरिकशास्त्र यावर देखिल सखोल माहिती देणारी पुस्तके उपलब्ध करुन देता येतात.शाळेतील सर्वच विषयाच्या अध्ययन अध्यापन व मूल्यमापनासाठी ग्रंथालयाची मदत होते. म्हणूनच बालकाच्या मोफत सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 नुसार प्रत्येक शाळेत ग्रंथालय सक्तीचे करण्यात आलेले आहे.
शालेय ग्रंथालयाचे स्वरूप- ग्रंथालय साहित्याचा संग्रह करताना विशिष्ट उद्दिष्टय़े डोळ्यासमोर ठेवलेली असतात. शाळेत एकच मध्यवर्ती ग्रंथालय असावे की, वर्ग- ग्रंथालये असावीत या संबंधी निश्चित भूमिका शाळाचालकांनी व मुख्याध्यापकांनी स्वीकारली पाहिजे. ही भूमिका स्वीकारताना त्यांनी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवावयास हवी ती ही की, शालेय ग्रंथालयाचे यश विद्यार्थी व शिक्षकांना ग्रंथालय साहित्याचा वापर करण्याची संधी किती आणि कशी मिळेल यावर अवलंबून असते.
1. मध्यवर्ती ग्रंथालय- शाळेत उत्तम ग्रंथालय सेवा उपलब्ध करून देण्यासाठी एकच मध्यवर्ती ग्रंथालय असणे ही एक आदर्श ग्रंथालय व्यवस्था आहे. कारण संपूर्ण शाळेसाठी एकच सुसज्ज ग्रंथालय असले की, शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना चांगली ग्रंथालय सेवा उपलब्ध करून देता येते. मध्यवर्ती ग्रंथालयात सर्व साहित्य एकाच ठिकाणी असल्यामुळे ग्रंथपालाच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना त्या साहित्याचा अधिक काळ वापर करण्याची संधी मिळते. मध्यवर्ती ग्रंथालयाचे हे फायदे लक्षात घेऊन मुख्याध्यापकांनी शाळेत मध्यवर्ती ग्रंथालय स्थापन करावयास हवे. ग्रंथालय हे ज्ञान प्राप्त करून घेण्याचे एक प्रभावी साधन आहे.
2. वर्ग ग्रंथालये- प्रत्येक शाळेत मध्यवर्ती ग्रंथालय व प्रशिक्षित ग्रंथपाल असणे ही एक आदर्श ग्रंथालय पद्धती आहे. परंतु आजच्या शाळांच्या जागेच्या अडचणी लक्षात घेता सर्वच शाळांना मध्यवर्ती ग्रंथालय उपलब्ध करून देणे शक्य नाही. ज्या शाळा मध्यवर्ती ग्रंथालय सुरू करू शकत नाहीत त्या शाळांत वर्ग-ग्रंथालये अपरिहार्य आहेत. वर्ग-ग्रंथालये योजनाबद्ध पद्धतीने व्यवस्थितरित्या चालविली तर विद्यार्थी विकासात मोठी मदत होते.महाराष्ट्र राज्य शासनाने नेमलेल्या चिपळूणकर समितीने आपल्या अहवालात वर्ग-ग्रंथालयासंबंधी पुढील विचार व्यक्त केले आहेत. ‘‘वर्ग-ग्रंथालये ही शालेय ग्रंथालयात महत्त्वाची प्रथा आहे. या प्रथेत वर्गग्रंथालय प्रमुख म्हणून काम पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना ग्रंथपालनाच्या कामाचा अनुभव मिळून नेतृत्वाचे गुण विकसित होण्यास मदत मिळते. इतर विद्यार्थ्यांना ग्रंथालयाच्या कार्याचे जवळून निरीक्षण करावयास मिळते.
3. पुस्तक , ग्रंथ देवघेव- विद्यार्थ्यांना ग्रंथ घरी वाचायला देणे हे ग्रंथालयाचे महत्त्वाचे शैक्षणिक कार्य आहे. विद्यार्थ्यांना शाळेच्या वेळेत पुस्तके व संदर्भ ग्रंथ वाचायला वेळ मिळत नाही म्हणून त्यांना ग्रंथ घरी नेता येतील, अशी व्यवस्था केली पाहिजे. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करून ती वाढीला लावण्यासाठी या ग्रंथ देवघेव सेवेची फार गरज आहे.
4. ग्रंथालय तासिका - माध्यमिक शाळांतून सर्व वर्गासाठी आठवड्यातून कमीत कमी एक ग्रंथालय तासिका असायला हवी. या तासिकेत मध्यवर्ती ग्रंथालयातील किंवा वर्ग-ग्रंथालयातील पुस्तके विद्यार्थ्यांना वाचायला मिळू शकतात. या तासिकेत विद्यार्थ्यांना ग्रंथ घरी वाचायला देण्याचे कामही करता येते. या तासिकेचा उपयोग विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी ग्रंथपालाला आणि वर्गशिक्षकांना करता येतो. वाचन-पेटय़ा, पुरवणी वाचन- पेटय़ांतील पुस्तकांचा वापर करून विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी या तासिकेचा चांगला उपयोग करता येतो. विद्यार्थ्यांमध्ये ग्रंथप्रेम आणि वाचनप्रेम निर्माण करून त्यांना ग्रंथालयाचा वापर करण्यास उद्युक्त करण्यासाठी ग्रंथालय तासिकेचा चांगला उपयोग होतो.
ग्रंथालयाचे काही उपक्रम- शालेय ग्रंथालयाचा अधिकाधिक वापर व्हावा आणि विद्यार्थ्यांना ग्रंथालय सेवेचा फायदा मिळावा म्हणून जे काही उपक्रम ग्रंथालयाला हाती घेता येतात त्यापैकी काही उपक्रमांचा येथे विचार केला आहे.
a) वाचन पेटय़ा- ग्रंथालय तासात किंवा विद्यार्थ्यांना मोकळा वेळ मिळतो त्या वेळेत वाचनासाठी त्यांना ग्रंथालयातून चांगले वाचनसाहित्य वाचन पेटय़ांतून देता येते. या पेटय़ा तयार करताना ग्रंथपालाने विद्यार्थ्यांना वाचायला प्रवृत्त करण्याचा दृष्टिकोन डोळ्यापुढे ठेवावयास हवा. प्रत्येक पेटीत नोंदवही ठेवावी.
b) पुरवणी वाचन पेटय़ा- उच्च प्राथमिक व माध्यमिक वर्गातील विद्यार्थ्यांनी क्रमिक पुस्तकांव्यतिरिक्त काही अवांतर वाचन करण्याच्या हेतूने शिक्षण विभागाने पुरविलेली पुस्तके विद्यार्थ्यांकडून वाचून घ्यावीत. या पुस्तकांच्या पेटय़ांतील पुस्तके वाचायला वर्ग शिक्षकांनी आणि विषय शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिल्यास विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची सवय लागते. शैक्षणिकदृष्टय़ा ही अतिशय उपयुक्त योजना आहे. ती ग्रंथालयाने व्यवस्थित राबविली पाहिजे.
c) मधल्या सुट्टीत वाचन- शाळेच्या दिनचर्येत विद्यार्थ्यांना रिकामा वेळ असा फार कमी मिळतो यामुळे ज्या विद्यार्थ्यांना वाचनाची आवड असते अशा विद्यार्थ्यांना वाचनाचा लाभ मिळावा म्हणून मधल्या सुट्टीत त्यांना ग्रंथालयात पुस्तके उपलब्ध करून द्यावीत.
d) नियतकालिके व वृत्तपत्रे- मासिके व वृत्तपत्रे विद्यार्थ्यांना शाळेच्या वेळेत इच्छा असूनही वेळेअभावी वाचता येत नाहीत. वास्तविक नियतकालिके आणि वृत्तपत्रे यांचे शालेय विद्यार्थ्यांनी वाचन करणे शैक्षणिकदृष्टय़ा महत्त्वाचे आहे. विद्यार्थी या चांगल्या वाचन साहित्यापासून वंचित राहू नयेत म्हणून विद्यार्थ्यांना ती मधल्या सुट्टीत किंवा शाळा सुटल्यावर वाचता येतील, अशी खास सोय करावी.
e) १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी खास सोय- १० वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेतील यशाची चिंता असते. या विद्यार्थ्यांचा त्यांच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून शालेय ग्रंथालयाने विचार करून त्यांना त्यांच्या अभ्यासात जेवढी मदत करता येईल तेवढी केली पाहिजे. त्यांना अभ्यासोपयोगी पुस्तके आणि इतर साहित्य उपलब्ध करून देऊन त्या साहित्याचा त्यांना वापर करता यावा म्हणून शाळेच्या वेळेबाहेर त्यांची वाचनाची खास सोय केली पाहिजे. ज्या विद्यार्थ्यांच्या घरी अभ्यासाची सोय नसते, अशा विद्यार्थ्यांना ग्रंथालयाच्या या उपक्रमाचा निश्चितच फायदा होतो आणि ग्रंथालय आपल्या शाळेच्या शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्याच्या कामात सहभागी होऊ शकते.
f) विशेष परीक्षांसाठी पुस्तके- शाळेतील बरेच विद्यार्थी बाहेरच्या विशेष परीक्षांना बसतात.अशा विद्यार्थ्यांना परिक्षांना बसायला उत्तेजन देऊन त्यांना लागणारी पुस्तके व इतर साहित्य ग्रंथालयाने उपलब्ध करून द्यावे. शाळेतील विद्यार्थ्यांचे या परीक्षेतील यश शाळेला निश्चितच भूषणावह असते आणि या यशातील ग्रंथालयाचा वाटा महत्त्वाचा असतो.
g) व्यवसाय मार्गदर्शन- विविध अभ्यासक्रमांची आणि व्यवसायाची माहिती देणारी पुस्तके आणि माहितीपत्रके विद्यार्थ्यांना ग्रंथालयात उपलब्ध करून द्यावीत. शिवाय विद्यार्थ्यांना हवी असलेली माहिती व्यवसाय मार्गदर्शन केंद्राकडून त्यांना मिळवून द्यावी.
h) वाचन दोरी उपक्रम - प्राथमिक शाळामधून हल्ली वाचन दोरी उपक्रम मोठ्या प्रमाणावर यशस्वी होतांना दिसतो. यामध्ये वर्गात समोरच्या भिंतीवर एक दोरी बांधली जाते. विद्यार्थी वय, आवड व अभ्यासक्रम विचारात घेऊन दोरीवर पुस्तके लटकविली जातात.विद्यार्थी त्यांच्या उपलब्ध वेळेनुसार पुस्तके घेऊन वाचन करतात.ठराविक कालावधीनंतर पुस्तके बदलली जातात. अशाप्रकारे ग्रंथालयामधून विद्यार्थी सर्वांगिण विकासासाठी चालना मिळते.
सद्यस्थितीचा विचार करता ग्रंथालय अतिशय सुसज्ज असायला हवे. ग्रंथालयात असलेली पुस्तके ही विद्यार्थ्यांचा वयोगट, बालमानसशास्त्र व अध्ययन अध्यापन पध्दतीचा विचार करुन घेतलेली असावी. ही पुस्तके दरवर्षी गरजेनुसार व उपलब्ध निधीनुसार घेण्यात यावी. पुस्तकांच्या नोंदीसाठी पुस्तक साठानोंद रजिष्टर, पुस्तक लेखक,किंमत व उपयोगिता विषयक नोंदीचे रजिष्टर, विद्यार्थी,शिक्षक पुस्तक देवघेव रजिष्टर असायला हवे. ग्रंथालयात ग्रंथालयीन नियम लिहिलेले असावेत. पुस्तकांची वर्गवारी करुन ती पुस्तके विषयनिहाय कपाटात,रकान्यात रचून ठेवलेली असावीत. कपाटाला असलेल्या काचेमधून पुस्तकांची नावे व लेखक यांची वाचन करता येतील अशाप्रकारची रचना असावी. पुस्तकांचे विषयनिहाय, घटकनिहाय, लेखक निहाय तालिकिकरण केलेले असावे. ग्रंथालयमध्ये विद्यार्थ्यांना बसून वाचन करता येईल अशाप्रकारची सुविधा असायला हवी. ग्रंथालयात बसून विद्यार्थ्यांना वर्तमानपत्रे , साप्ताहिके, मासिके वाचन करता यावीत.आधुनिक काळात संगणकाचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.विद्यार्थी आवडीचा व आधुनिक तंत्राचा विचार करता ई साहित्य उपलब्ध असायला हवे. संगणकाद्वारे विद्यार्थी नेटवर उपलब्ध पुस्तके वाचन करु शकतील, अभ्यास करु शकतील अशाप्रकारची सुविधा उपलब्ध असायला हवी. अध्यापन करत असतांना विषय शिक्षकांनी आठवड्यातून किमान एक ग्रंथालय तासिकेचे नियोजन करायला हवे.
सातारा जिल्ह्यातील कुमठे बीट येथील प्रत्येक शाळेत ग्रंथालय समृध्द करण्यासाठी ग्रंथालय विकास चळवळ सुरु करण्यात आलेली आहे. प्रत्येक शाळेतील ग्रंथालय समृध्द करण्यासाठी समाजातील दानशुर व्यक्ती, संस्था यांचेकडून पुस्तक रुपाने मदत घेतली जात आहे.
भिलार या सातारा जिल्ह्यातील गावाची ओळख “पुस्तकांचे गाव”म्हणून देशभर झाली आहे. गावातील प्रत्येक घरामध्ये विविध पुस्तकांचा संग्रह दिसून येतो. प्रत्येक घराच्या समोर , घरात बसून तेथील पुस्तक वाचनाचा अनुभव घेता येतो.
शासनाने खडू-फळा योजने अंतर्गत प्राथमिक शाळांना पुस्तकसंच उपलब्ध करुन दिलेला आहे. तसेच सर्व शिक्षा अभियान अंतर्गत प्रत्येक शाळेला पुस्तक खरेदीसाठी निधी देखिल उपलब्ध करुन दिलेला होता.
एकंदरीत ग्रंथ हेच गुरु हा विचार करुन शाळेमधून ग्रंथालये तयार करायला हवीत.
केंद्र शासनाचे मार्गदर्शक सूचनेनुसार व बालकाच्या सक्तीच्या व मोफत शिक्षणाचा हक्क अधिनियम 2009 नुसार ग्रंथालय संदर्भात दिलेले निकष.
v प्रत्येक शाळेत विद्यार्थी व शिक्षक यांचेसाठी ग्रंथालयअसावे.
v विद्यार्थी संख्या विचारात घेता विद्यार्थी संख्येच्या प्रमाणात (1: 5) पुस्तके उपलब्ध असावी.
v प्राथमिक शाळा ( कमी पटाच्या )असल्यास कमीत कमी200 पुस्तके असावीत.
वरील निकष हे राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या शाळांकरिता लागू राहतील.
ग्रंथालय याबाबतीत खालील महत्त्वाचे प्रश्न शाळासिद्धी मध्ये विचारले जातात.
1. शाळेत ग्रंथालय आहे काय ?
2. ग्रंथालयासाठी स्वतंत्र खोली आहे काय ? ( असल्यास क्षेत्रफळ -----------------चौरस मीटर मध्ये )
3. ग्रंथालयात एकावेळी बसून वाचू शकतील अशा विद्यार्थ्यांची संख्या ?
4. ग्रंथालयाचे व्यवस्थापन ?
5. शाळेने वर्गणी लावलेले नियतकालिके ?
6. ग्रंथालयातील शब्दकोश व विश्वकोश वगळता प्रति 100 विद्यार्थी पुस्तकांची संख्या ?
7. ग्रंथालयासाठी संगणक उपलब्ध आहे काय ?
वरील प्रश्नासह शाळासिध्दी कार्यक्रमात वर्णन विधाने दिलेली असतात.या वर्णन विधानानुसार शाळा स्वयं मूल्यमापन व बाह्य मूल्यमापन होत असते. मुख्याध्यापक व निर्धारकांनी वर्णनविधाने वाचन करुन आपल्या शाळेला कोणते वर्णनविधान लागु होतात हे ठरवावे. वर्णनविधानाची निवड करतांना अतिशय प्रामाणिकपणे व वस्तूनिष्ठपणे करावी.
वर्णन विधाने व वर्णन विधानानुसार गुणदान खालीलप्रमाणे.
a) पुस्तके अपु-या संख्येने आहेत. ग्रंथालय कक्ष किंवा वाचनाची जागा उपलब्ध नाही.
b) पुस्तकाचे व्यवस्थित तालिकीकरण केलेले नाही. वेळापत्रकात विशिष्ट ग्रंथालय तासिका नाही. घरी साधारणत: पुस्तके दिली जात नाहीत.
( वरील वर्णनविधाने लागु होत असल्यास 1 गुण देण्यात यावे. )
2) a) पुस्तके, मासिके व वृत्तपत्रे पुरेशा संख्येने उपलब्ध आहेत. आणि नियमितपणे अद्ययावत केली जातात. वाचनाची जागा/ ग्रंथालय कक्ष उपलब्ध आहे. ई पुस्तके किंवा डीजीटल साहित्य उपलब्ध नाही.
b) पुस्तके नीट ठेवलेली आहेत. तालिकीकरण केलेले आहे व नियमित दिली जातात. वेळापत्रकात ग्रंथालय तासिका ठेवल्या आहेत. जेंव्हा स्त्रोत उपलब्ध असतात तेव्हा नवीन पुस्तके घेतली जातात.
( वरील वर्णनविधाने लागु होत असल्यास 2 गुण देण्यात यावे. )
3) a) पुस्तकांचा मोठा साठा आहे.नियतकालिके, मासिके, वृत्तपत्रे यांची नियमित वर्गणी भरली जाते.ग्रंथालयासाठी पुरेशा वाचनाच्या जागेसोबत स्वतंत्र कक्ष उपलब्ध आहे. ई पुस्तक किंवा डीजीटल साहित्य उपलब्ध आहे.
b) पुस्तके नीट तालिकीकरण केली आहेत. रकान्यामध्ये व्यवस्थित रचली आहेत व विद्यार्थी शिक्षकाद्वारे वापरली जातात. ई पुस्तके व डिजीटल साहित्य वापरण्याची संधी ग्रंथालयात दिली जाते.ग्रंथालयातील स्त्रोत अभ्यासक्रम पूर्ततेत मदत करतात. शिक्षक व विद्यार्थी यांचे वय, भाषिक पार्श्वभूमी, शैक्षणिक गरजा लक्षात घेऊन नियमितपणे नवीन पुस्तकांची भर योग्य निवड प्रक्रिया अवलंबून घातली जाते.

1) a) पुस्तके अपु-या संख्येने आहेत. ग्रंथालय कक्ष किंवा वाचनाची जागा उपलब्ध नाही.

No comments:
Post a Comment