Thursday, August 16, 2018


अत्यंत महत्त्वाचे विध्यार्थी उपयोगी समुपदेशन संकलित एका ब्लॉग वरून वाचनीय 




आपल्या मनाला कसं सांभाळावं

जसं एखादं वाद्य वाजवण्यासाठी त्यामध्ये संतुलन जसं गरजेचं असतं. तंबोऱ्याच्या तारा कसल्या तर त्या तुटून जातील आणि त्या जर ढिल्या सोडल्या तर त्यामध्ये नाद निर्मिती होणार नाही. म्हणजेच त्याच्यामध्ये योग्य संतुलन असणं गरजेचं आहे. तसंच आपलं देखीलमनोविकार म्हणजे काय?
मनोविकार :  म्हणजे विचार, भावना आणि वर्तन यांचं संतुलन बिघडणं. यामुळं एका व्यक्तीला इतर लोकांशी जमवून घ्यायला आणि रोजची कामं करायला कठीण जातं.
मनोविकार हा एखाद्या व्यक्तीमधील दुर्बलतेमुळं किंवा स्वभाव-दोषामुळं होत नाही
मनोविकाराच्या लक्षणांचा कालावधी व तीव्रता व्यक्तीनुसार, तिच्या आजारानुसार व परिस्थितीनुसार कमी-जास्त असू शकते. हा आजार स्त्री-पुरुष, लहानमोठे, गरीब-श्रीमंत अशा कोणत्याही व्यक्तीला होऊ शकतो. एखाद्या व्यक्तीमध्ये काही दुर्बलता आहे किंवा तिच्या स्वभावात दोष आहे म्हणून हा आजार होतो असं नाही. उचित उपचार घेतल्यास व्यक्ती बरी होऊ शकते आणि आनंदी, अर्थपूर्ण जीवन जगू शकते. आहे. आपलं शरीर हे यंत्र आहे. शरीर-मन-मेंदू यामध्ये देखील योग्य संतूलन असणं गरजेचं आहे. शरीराचं यंत्र हे मनावर अवलंबून आहे. यासाठी आपलं मन सतत सकारात्मक विचारांमध्ये गुंतवूण ठेवणं गरजेचं आहे. थोडासाही ताण जाणवला तर त्यावर वेळीच उपचार करणं महत्त्वाचं आहे. जसं आपण पाय दुखतोय, गुडघा दुखतोय म्हणून डॉक्टरकडे जातो तसंच जरासंही मन दुखलं तरी डॉक्टरकडे जाणे गरजेचे आहे. मन आनंदी नसेल तर आपण समाधानी राहू शकत नाहीत.

ताण - तणाव घालवण्यासाठी सोपे उपाय

सर्वांत महत्त्वाचं म्हणजे तुम्ही आपल्या आवडीचा छंद जोपासणं गरजेचं आहे. सर्वांनी खेळायला पाहिजे कारण खेळ आपल्याला चांगल्या पद्धतीनं जगण्याचं शिकवत असतं. खेळामुळे आपण खूप आनंदी राहत असतो. वर्तमानात कसं आनंदी रहावं हे आपण खेळातून शिकतो. जसं की एखाद्या खेळाडून गोल केला तर तो आनंद साजरा करतो त्याला याची चिंता नसते की आपण उद्याचा सामना जिंकणार की हारणार. तो फक्त आजचा क्षण आनंदानं साजरा करत असतो. त्यामुळे सर्वांनी खेळणं खूप गरजेचं आहे. शिवाय आपल्याला ज्या गोष्टीमध्ये वेळ घालवणं गरजेचं आहे. ध्यानधारणा, सूर्य नमस्कार, योगा यामुळे देखील ताण तणाव खूप प्रमाणात कमी होतील. तसेच आपल्याला खूपच ताण जाणवत असेल तर मानसोपचार तज्ज्ञाचा किंवा समुपदेशकाचा सल्ला घेणं कधीही आवश्यक आहे.
नैराश्य असणाऱ्यांनी समाजाशी साधलेला संवाद
तणावाखाली असणारा रुग्ण एकांतप्रिय असतो. तो स्वत:च्या भावविश्वात रमणारा असतो. त्याने समाजाकडे नेहमी सकारात्मकतेने पाहणे गरजेचे आहे. तसंच त्याने नाटक किंवा चित्रपट पाहणे गरजेचे आहे. समाजातील विविध स्तरातील लोकांना भेटावे सर्वांशी बोलायला पाहिजे.

मानसिक आरोग्या विषयी

थोडक्यात याची व्याख्या करायची झाल्यास “संतुलित जीवनशैली” असणं म्हणजे मानसिक आरोग्य असं म्हणता येईल. मानसिक आरोग्य हे मेंदू, शरीर आणि मन या तिन्हींशी निगडीत असल्यामुळे या तिघांमध्ये संतुलन असणं खूप गरजेचं असतं. हे संतुलन जोपर्यंत आहे तो पर्यंत आपलं मानसिक आरोग्य चांगलं आहे असं समजलं जातं. सध्याच्या धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात अनेक कारणांमुळे आपलं मानसिक आरोग्य ढासळत चाललं आहे आणि आपण आपल्या जीवनातल्या आनंदीक्षणापासून वंचित राहत आहोत. परिणामी आपण अधिकच तणावग्रस्त बनत चाललं आहे
.
ताण-तणावाचे जास्त प्रमाण

सध्याच्या स्पर्धेच्या युगात तणाव हा सर्वांनाच जाणवतो. लहान मुलं, तरुण, पुरुष, महिला, तसंच वृध्दांना देखील तणावाला सामारे जावं लागतं. विशेष म्हणजे केवळ ८ ते १० वर्षांच्या मुला-मुलींमध्ये देखील या आजाराचे प्रमाण वाढत असल्याचं दिसून येत आहे आणि ही बाब खूप गंभीर आहे. उदाहरण द्यायचं झालं तर माझ्याकडे एका १० वर्ष मुलीचेपालक माझ्याकडे आले आणि ते म्हणाले की “माझ्या मुलीला अध्यात्माची फार ओढ लागलेली आहे आणि ती नेहमी म्हणत आहे की मला देवाकडे जायचे आहे”विशेष म्हणजे ते पालक खूप खुश होते की त्यांच्या मुलीला देवाकडे जायचे आहे. पण त्यांना हे माहितीच नव्हतं की त्यांच्या मुलीला एक मानसिक आजार आहे आणि हे आत्महत्येकडे जाण्याचं लक्षण असू शकतं. गंभीर बाब म्हणजे ते पालक मानसिक आजाराविषयी ते अनभिज्ञ होते. या वयोगटातल्या मुला-मुलीमधील वागण्याच्या बदलत जाणाऱ्या सवयीवरुन आपणाला याचा अंदाज येणं आवश्यक आहे. त्यांचं शांत शांत राहणं, चिडचिड करणं, बोलण्याच्या पद्धतीत बदल होणं अशा काही गोष्टींवरून आपणास लक्षात यायला हवं की ते मानसिक तणावाखाली आहेत. तरूण पिढीमध्ये तर तणावाचं कारण खूप वेगवेगळे असल्याचं दिसून येत आहे कारण बरेच तरूण फेसबुकवर मला खूप लाईक्स मिळाले, मला गर्लफ्रेंड नाही, मला बॉयफ्रेंड नाही अशा गोष्टींवरून देखील तणावाखाली जाताना पहायला मिळतात. वैवाहिक आयुष्य जगताना देखील जोडप्यांना तणावाखालून जावं लागतं.

शारीरिक वाढीचा या आजाराशी संबंध

‘पूर्वी वाढत्या वयात या आजाराचं प्रमाण दिसून येत असे. मात्र आज असं नाही म्हणता येणार कारण आज लहान वयातच अनेकांना तणाव दिसून येत असल्यानं मानसिक आजाराचं प्रमाण वाढत आहे. यामध्ये विद्यार्थ्यांचं प्रमाण सर्वांत जास्त आहे. विशेष म्हणजे केवळ ८ ते १० वर्षांच्या मुला-मुलींमध्ये देखील या आजाराचे प्रमाण वाढत असल्याचं दिसून येत आहे आणि ही बाब खूप गंभीर आहे.

मानसिक आजाराचे साधारणपणे प्रकार

डीप्रेशन हा सर्वात जास्त आढळणारा आजार आहे. हा आजार अनेकांमध्ये आढळून येतो मात्र त्याची कारणे वेगवेगळी असतात. स्क्रिझोफेनिया हा आजार देखील अनेकांमध्ये दिसून येतो. या आजारामध्ये व्यक्ती असंबंधित बोलत राहतो. त्याला बोलण्याचे भान राहत नाही. ऑप्शीसन्स कंपलसिव्ह डीसऑर्डर या आजारामध्ये व्यक्ती स्वच्छतेच्याबाबतीत अति जागरुक असतात. वारंवार हात धुणे ही सवय त्याच्यामध्ये असते. हात नाही धुतले तर आपल्याला काही होईल असे त्याला सतत वाटत असते. दुश:चिंता हा देखील एक आजार आहे. यामध्ये रुग्ण निरर्थक गोष्टींची चिंता करत असतो. कोणत्याही गोष्टीची अतिचिंता त्याला वाटत असते. साधारणपणे हे प्रकार आपल्याकडे मोठ्या प्रमाणात पहायला मिळतात.

मानसिक तणावाखालील लहान मुलमुली

नाही. सरसकटपणे असं म्हणता येणार नाही. साधारणपणे दोन प्रकारचे व्यक्तिमत्व असतात. एक सकारात्मक आणि दुसरं नकारात्मक. पहिल्या प्रकारातल्या एखादा अध्यात्माविषयी खूप बोलतो आहे, चर्चा करतो आहे, ज्ञान ग्रहण करतो आहे म्हणजे तो आयुष्याकडे सकारात्मकदृष्टीनं पाहतो आहे, आपल्या जीवनात आणि समाजात सकारात्मक बदल करतो आहे. हे खरंच समाजासाठी चांगलं आहे. पण नकारात्मक व्यक्ती मात्र त्यामध्ये गुरफटल्या जात असतो. उदाहरण द्यायचं झालं तर एखादा रुग्ण दैनंदिन कामं सोडून दिवसांतले अनेक तास देवासमोर बसलेला असतो, देवाची पूजा केली नाही तर मला काहीतरी होईल, माझं कुठलंच काम होणार नाही असे नकारात्मक विचार त्याच्यात निर्माण होतात.

मानसिक आरोग्य बिघडण्याचं कारणं

मानसिक आरोग्य बिघडण्याचं मुख्य कारण म्हणजे आजची जीवनशैली होय. आजच्या स्पर्धेच्या युगात मनात आलेली आणि हवी असलेली गोष्ट लगेच हवी आहे. कोणतीही गोष्ट प्राप्त करण्यासाठी जो संयम लागतो तो आजच्या पिढीमध्ये दिसून येत नाही. महत्त्वाकांक्षा असणं वेगळं आणि अतिमहत्त्वाकांक्षा असणं हे वेगळं. या अतिमहत्त्वाकांक्षेपायी आजचा तरूण तणाखाली येत आहे.

मानसिक रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण

हे प्रमाण उपचारातल्या नियमिततेवर अवलंबून आहे. मी आता पूर्णपणे ठिक झालो आहे आता मला उपचाराची गरज नाही असे वाटून अनेक रुग्ण औषधोपचार बंद करतात किंवा समुपदेशकाकडे जाणे थांबवतात. परिणामी रुग्ण पूर्णपणे बरा होत नाही. म्हणून रुग्णांनी औषधोपचार नियमित घेणे, मार्गदर्शक तत्वे पाळणे, थेरपी पूर्ण करणे खूप गरजेचे आहे.
लहान मुलांचे मानसिक आरोग्य बिघडण्याची नेमकी लक्षणं
आज सगळीकडे विभक्त कुटूंबपद्धती पहायला मिळत आहे. एकत्र कुटूंब पद्धती असताना सहाजिकच सर्वांना आपलं मन मोकळं करण्यासाठी घरात खूप लोकं असायची. विभक्त कुटूंबपद्धतीमध्ये सदस्यांची संख्या कमी असल्यानं लहान मुलं चिडचिडं बनत चालली आहेत. घरात त्यांच्याशी बोलायला कुणीच नसल्यानं मुलं त्यांच्या खेळण्याशी, बाहुल्यांशी बोलतात अनेकदा एकटंच काहीतरी करत बसतात तेव्हा मात्र त्यांच्या पालकांनी लक्ष द्यायला हवं की आपलं मुल एकट्यात काय करत आहे, काय बोलत आहे.
महत्वाचं म्हणजे आजच्या स्पर्धेच्या युगात लहान मुलांना वेळच मिळत नाही. कारण दिवसातले किमान ६ ते ८ तास शाळा, क्लासेस यांच्यात जातात. आजच्या आई वडिलांना वाटतं की माझं मुल स्पर्धेत पुढं जाण्यासाठी जन्मलं आहे. माझं म्हणणं आहे की तुम्ही आपल्या मुलाकडं एक सामाजिक व्यक्तिमत्व म्हणून पहा जे भविष्यात आपल्या समाजाचा एक भाग होणार आहे त्याला त्याप्रमाणं घडवा. तो जरी अभ्यासात कमी असेल तर त्यामध्ये सकारात्मक दृष्टीने बदल घडवून आणा.

गंभीर मानसिक आजाराचं प्रमाण

साधारणपणे गंभीर मानसिक आजाराचं प्रमाण ३० टक्के आहे. तसं पाहिलं तर आजच्या स्पर्धेच्या युगात प्रत्येक व्यक्तीला कोणता ना कोणता ताण असतोच. अनेक जण आपण केलेल्या कामाबद्दल समाधानी नसतात, ८ ते १० तास काम करुनही काम केल्याचं समाधान मिळत नाही. अशावेळी आपण आपल्या जीवनशैलीकडे बारकाईने पाहणं गरजेचं असतं. आपला जास्तीत जास्त वेळ कशात जात आहे, आपला जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे हे आपण पाहणं गरजेचं आहे. याकडे दुर्लक्ष केलं तर आपला प्रवास गंभीर मानसिक आजाराकडे होऊ शकतो.
मानसिक रुग्णांबद्दल महत्त्वाची बाब
ही महत्त्वाची बाब आहे. कारण रुग्ण तर सोडाच पण कुटूंबिय देखील हे मान्य करत नाहीत की आमच्या कुटूंबात कोणी मानसिक रुग्ण आहे. यासाठी वेगवेगळ्या प्रकारे रुग्णांना डॉक्टरपर्यंत आणण्यासाठी प्रयत्न केले जातात. जसे की त्याला डॉक्टरकडे जायचे आहे असं न सांगता आपल्याला एका मॅडमला भेटायला जायचे आहे असे सांगावे लागते. त्याला आवडणाऱ्या गोष्टींवर पहिल्यांदा चर्चा केली जाते. एकदा त्याचा विश्वास संपादन केला 
की, मग उपचाराला सुरूवात केली जाते.

मानसिक आजारामध्ये अनुवांशिकता आणि परिस्थितीजन्य प्रकार

तसं पाहिलं तर अनुवांशिकता खूप महत्त्वाची आहे. आपल्या आजोबा, वडील यांना जर एखादा मानसिक आजार असेल तर शक्यता असते की पुढल्या पिढीला याचा धोका असतो. तसंच परिस्थितीजन्य प्रकारात कुटूंब देखील महत्त्वाचा भाग असतो. आपण एका कुटूंबाचे घटक असतो. आपण कोणत्या कुटूंबातून आलोत, कुठल्या वातावरणात वाढलो आहोत, शिक्षण कोणत्या क्षेत्रात घेतलं आहे हे खूप महत्त्वाचं आहे. यातून देखील ते तणावाखालून जातात. तरूण पिढीमध्ये तर तणावाचं कारण खूप वेगवेगळे असल्याचं दिसून येत आहे कारण बरेच तरूण फेसबुकवर मला खूप लाईक्स मिळाले, मला गर्लफ्रेंड नाही, मला बॉयफ्रेंड नाही अशा गोष्टींवरून देखील तणावाखाली जाताना पहायला मिळतात.
मानसिक रुग्णाच्या प्रमाणात उपलब्ध मानसोपचार तज्ज्ञ किंवा समुपदेशक
तसं पाहिलं तर मानसिक रुग्णाच्या प्रमाणात खूपच कमी मानसोपचार तज्ज्ञ आणि समुपदेशक उपलब्ध आहेत. समाजातील संतुलन योग्य ठेवण्यासाठी तरूणांनी या क्षेत्राकडे वळणे गरजेचे आहे. करिअरसाठी हे क्षेत्र चांगलं आहे.ज्यांना समाजासाठी काहितरी करायचं आहे त्यांनी निश्चितच याकडे वळणं योग्य राहिल. मानसशास्त्र किंवा समाजशास्त्र या विषयात पदवी अथवा पदविका प्राप्त करुन समुपदेशानाचे कार्य करता येते. महत्त्वाचे म्हणजे समुपदेशकामध्ये संयम खूप महत्त्वाचा असतो. कारण मानसिक रुग्ण हा पूर्णपणे खचलेला असतो अशा वेळी समुपदेशकाने त्यामध्ये सामावून जाता तटस्थ राहून त्याच्याशी संवाद साधणं गरजेचं आहे. कंटाळून न जाता त्याला वारंवार मार्गदर्शन करणं गरजेच आहे.

लेखक - जयश्री श्रीवास्तव

सामजिक आरोग्य म्हणजे काय ? 

1. सामजिक आरोग्य
2. सामजिक आरोग्य चांगले नसणे म्हणजे (आजार) 
3. लक्षणे
4. उपाय
5. सामाजिक आरोग्य चांगले असेल तर

सामजिक आरोग्य : 
सामजिक आरोग्य म्हणजे आपण ज्या समाजाचे घटक आहोत त्या सर्वांशी चांगले वागणे, गुण्यागोविंदाने राहणे. सामाजिक प्रश्न किंवा अडचणी सोडवण्याचा आपणहून प्रयत्न करणे असे म्हणता येईल.
आपले आरोग्य खालील गोष्टींवर अवलंबून असते.
• अनुवंशिकता 
• सभोवतालचे वातावरण व जीवन
• जीवन पद्धती
• आहार व पोषण
• आरोग्य व औषधोपचार सेवा
• समाजाची आर्थिक स्थिती
• इतर गोष्टी जसे शिक्षण, शेती, उद्योगधंदा, ग्रामीण विकास इ
.
सामजिक आरोग्य चांगले नसणे म्हणजे (आजार) 

अगदी सहजपणे नेहमीची कामे करता न येणे किंवा त्यात अडचणी येणे म्हणजे आजार किंवा रोग.

लक्षणे
1. नेहमीची कामे न करता येणे, म्हणजे घरातील कामे, शेतीतील कामे, व्यवसायातील कामे
2. नीट विचार न करता येणे
3. मन गोंधळून जाणे
4. लक्ष न लागणे
5. निर्णय घेता न येणे
6. निरुत्साही वाटणे
7. भांडणे काढणे, वैर निर्माण करणे
8. सामाजिक कार्यक्रमांमध्ये उदा. लग्न समारंभ, मेळावे, यात्रा, नातेवाईकांच्या गाठीभेटी इ. गोष्टी नकोशा वाटणे.

उपाय
• सकस आहार घेणे
• स्वच्छता राखणे
• करमणूक किंवा मनोरंजन साधने यांचा वापर करणे.
• व्यायाम व विश्रांती
• समाजामध्ये मिसळणे
• इतरांच्या सुख-दु:खामध्ये सहभागी होणे
• ताण-तणाव व काळजी कमी करणे
• नातेवाईक व मित्रांमध्ये चांगले हितसंबंध प्रस्थापित करणे.

सामाजिक आरोग्य चांगले असेल तर

• सर्वांमध्ये मनमोकळेपणाने मिसळता येते.
• इतरांच्या अडी-अडचणी सोडवण्यात मदत करता येते.
• कोणतेही काम सहजपणे करता येते.
• कुटुंबातील व समाजातील लोकांना आधार देता येतो.
• वैयक्तीक, कौटुंबिक, सामाजिक अडी-अडचणी सोडविता येतात.
• समाजामध्ये मन मिळतो.
• समाजात सुख- शांती नांदावी यासाठी उत्साहाने प्रयत्न करता येतो.
• चांगले निर्णय घेता येऊ शकतात. ( वैयक्तीक, कौटुंबिक, आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय इ.)

internet  copy /pest

मानसिक आजाराची प्रमुख लक्षणे.! 

मानसिक आजार होण्याचे प्रमुख कारण म्हणजे आपल्या आधीच्या आई/वडिलांपैकी सहा पिढ्यांमध्ये कुणाला मानसिक आजार असेल तर शक्यता खूप असते. दुसरे कारण परिस्थितीवर अवलंबून असते. त्यामुळेही मानसिकतेवर विपरित परिणाम होतो.
मानसिक आजाराची प्रमुख लक्षणे म्हणजे अशा व्यक्ती संशयी प्रवृतीच्या होतात. त्यांना आपल्याविरुद्ध कुणी काही कटकारस्थाने रचतात असे वाटत रहाते. परत कुठल्यातरी विशिष्ट गोष्टीची सतत भिती वाटत राहते. त्या एकच गोष्ट सतत करीत राहतात. या आजारांची नावे म्हणजे डिप्रेशन, स्किझोफ्रेनिया (त्यात परत पॅरानॉईया एक प्रकार), कॅटॉटॉनिक, एक्सांयटी डिसऑर्डर, (दु:चिंता) बायपोलर डिसऑर्डर अशी आहेत. या आजारांच्या लक्षणावरुन ती ओळखता येतात.
स्किझोफ्रेनियामध्ये रुग्णाचे मन कशात लागत नाही. त्याच्या मनात सतत असंबंद्ध विचार येत राहतात. तो खूप आळशी बनतो. हा रुग्ण लगेच ओळखता येतो. कॅटॉटॉनिकमध्ये रुग्ण एकाच स्थितीत दिवसेंदिवस त्याच स्थितीत राहू शकतो. एका पायावर उभे राहिले तर तसेच, एकटक पहात राहिले तर तसेच राहतील. अशा रुग्णांना शॉक ट्रिटमेंट द्यावी लागते. पण अशा रुग्णांचे प्रमाण कमी असते.
पॅरानॉईयामध्ये रुग्ण संशयखोर असतात. ते सतत संशय घेत असतात. बायको असेल तर नवऱ्याचा, नवरा असेल तर बायकोचा. त्यामुळे अशा जोडप्यांमध्ये सतत भांडणे होतात. वैवाहिक जीवन कष्टप्रद होते. बऱ्याचदा अशा विवाहांची परिणती शेवटी घटस्फोटात होते. प्रसंगी काही रुग्ण जोडीदाराची हत्या पण करतात. त्यांच्या डोक्यात ते सतत कटकारस्थाने रचत असतात. कधीतरी शेवटी त्यांच्या हातून कृती घडते.
डिप्रेशन हे अनुवांशिकतेमुळे येऊ शकते. तसेच ते बाह्य वातारणामुळेही येऊ शकते. घरातील वातावरणही त्यास कारणीभूत असू शकते. अशी व्यक्ती मनातील गोष्टी कुणाशी बोलत नाही, ती एकलकोंडी बनते. त्यामुळे ती डिप्रेशनमध्ये लवकरच जाते. काहीवेळा अशा व्यक्तींच्या जीवनात असे काही प्रसंग येतात की, ते बोलत नाहीत आणि एकलकोंडेपणा वाढत जातो.
फोबियामध्ये व्यक्तीला एका विशिष्ट गोष्टीची भीती वाटत राहते. ही भीती उंचीची, पाण्याची, गर्दीची, सभेत बोलण्याची अशी असू शकते. एका मर्यादेपलिकडे भीती गेली की, त्याला फोबिया म्हणतात. रुग्णाच्या मानसिक आजाराचे निदान होण्यासाठी त्याचे कुटुंब, नातेवाईक, मित्र, सहकारी यांची भूमिका फार महत्त्वाची असते. त्यांनी रुग्णाची लक्षणे ओळखून त्याला तत्काळ मानसोपचार तज्ज्ञाकडे नेले पाहिजे.
या रुग्णांचे उपचार म्हणजे त्यांनी मानसोपचार तज्ज्ञाने लिहून दिलेली औषधे नियमितपणे घेणे, गरजेनुसार विद्युत लहरींचा वापर करणे ही होत. उपचारांचा कालावधी रुग्णाच्या आजाराच्या प्रमाणावर अवलंबून असते. स्किझोफ्रेनियामध्ये मात्र आयुष्यभर गोळ्या घ्याव्या लागतात. पॅरानॉईयाच्या रुग्णास डिप्रेशनमध्ये गोळ्यांच्या प्रमाणापेक्षा समुपदेशन जास्त महत्वाचे असते. डिप्रेशन काही काळापुरते असू शकते. वेळेवर व योग्य उपचाराने ते कायमचे बरे होऊ शकते. पण वेळीच उपचार न घेतल्यास असे रुग्ण आत्महत्येस प्रवृत्त होतात किंवा अन्य व्यक्तीची हत्याही करु शकतात. भावनिक, संवेदनशील व्यक्तींना डिप्रेशन येण्याची शक्यता जास्त असते.
समाजात आज जीवघेणी स्पर्धा, तुलना यामुळे डिप्रेशनचे प्रमाण वाढताना दिसते. यास एकल कुटुंबपद्धती मोठ्या प्रमाणात कारणीभूत आहे. संयुक्त कुटुंब पद्धतीत बोलण्यासाठी, समजून घेण्यासाठी घरातील आजी, आजोबा, काका, काकू, इतर भावंडे असतात. त्यामुळे संयुक्त कुटुंबात डिप्रेशनचे प्रमाण अत्यल्प असते. आईवडिल दोघेही नोकरीला असणाऱ्या कुटुंबातील मुलांमध्येही डिप्रेशनचे प्रमाण अधिक असते. परंतु दोघांनाही नोकरी/व्यवसाय करणे आवश्यकच असेल तर त्यांनी मुलांची भावनिक, मानसिक, बौद्धिक काळजी घेतली पाहिजे. त्यांच्याशी सतत संवाद साधला पाहिजे. लहान मुले आपल्याला वेळोवेळी समजून घेत असतात, त्यामुळे त्यांना आपण समजून घेतले पाहिजे. एकत्र चहा घेणे, निदान रात्रीचे जेवण एकत्र घेणे, घराशी संबंधित बाबींमध्ये त्यांचे मत विचारणे, त्यांना मान देणे अशा गोष्टी फार महत्वाच्या ठरतात.
व्यक्तीने कार्यालयात कामाला व्यक्तीगत पातळीवर घेऊ नये तर ते सामुहिक जबाबदारी म्हणून पार पाडले पाहिजे. एकमेकांविषयी द्वेष, मत्सर असता कामा नये. एकमेकांशी सतत संवाद साधला पाहिजे. कार्यालयात निरोगी आणि पोषक वातावरण राहिले पाहिजे.
आपले विचार अनियंत्रित होऊ नये म्हणून योगा आणि ध्यानधारणेचा फार उपयोग होतो. म्हणून प्रत्येक व्यक्तीने दररोज किमान दहा मिनिटे तरी ध्यानधारणा करायला हवी. त्यामुळे मन समतोल राहण्यास मदत होते. आपण मनाला सतत सकारात्मक सूचना देत राहिले पाहिजे. आपले मन हे रिकाम्या भांड्यासारखे असते. त्यात चांगले विचार टाकले तर चांगली कृती होते. नकारात्मक विचार टाकले तर व्यक्ती कृतीशून्य होते किंवा नकारात्मक बाबी करण्यास प्रवृत्त होते.
आयुष्यात आपण संकटाला कसे सामोरे जातो, तेही खूप महत्त्वाचे आहे. आपण नशिबाला, देवाला दोष देतो. पण संकटाला संधी समजलो तर आपण ते आव्हान पेलू शकतो आणि त्यातून मार्ग काढू शकतो. म्हणून व्यक्तीने भविष्याचा अतिविचार न करता, वर्तमानकाळ कसा चांगला होईल हे पाहिले पाहिजे. जीवनाकडे सकारात्मक वृत्तीने पाहिले पाहिजे. आजकाल आईवडिल दिवसभर बाहेर राहतात. पूर्वी मुले फक्त टीव्ही पाहू शकायची पण आता इंटरनेटमुळे चांगल्या गोष्टींबरोबर वाईट गोष्टीही मुलामुलींपर्यंत तत्काळ पोहोचतात. त्यामुळे पालकांनी मुलामुलींना योग्य वेळीच सर्व गोष्टी समजावून सांगितल्या पाहिजेत. संपूर्ण आयुष्य ही एक परीक्षा असते, हे आपण समजून घेतले पाहिजे.
ताणतणावांना दूर ठेवण्यासाठी व्यक्तीला काही ना काही छंद असला पाहिजे. आपली आवड काय आहे ? हे त्या व्यक्तीने ओळखले पाहिजे. वाचन, लेखन, पोहणे, फिरणे, खेळणे, सायकल चालविणे, मित्र मंडळींशी गप्पा गोष्टी करणे, असे काही ना काही छंद असलेच पाहिजेत, जेणेकरुन आपले मानसिक आरोग्य निश्चितच जपल्या जाईल.

लेखक: देवेंद्र भुजबळ

नैराश्यग्रस्त रुग्णांना हाताळताना काय कराल ?

1 स्पेस : आधार देणं म्हणजे सतत त्या व्यक्तीबरोबर असणं, असं नव्हे. अनेकदा आपला सहवास नैराश्यग्रस्त व्यक्तीला सहन होत नाही. म्हणून त्यांना त्यांचा अवकाश द्या. विशेषत: पुरुष रुग्णांना त्याची जास्त गरज भासते. 
2 दैनंदिन व्यवहार : नैराश्यग्रस्त व्यक्तींमध्ये रोजच्या साधारण गोष्टीही उरकण्याची ऊर्जा नसते. अशावेळी ‘अंघोळ कर’, ‘कपडे बदल’ असं सारखं सुचवू नये. नैराश्यग्रस्त व्यक्ती संध्याकाळी अधिक अँक्टिव्ह होतात. त्यावेळी त्यांना रोजच्या गोष्टी करू द्याव्या.
3 भेटीगाठी : साधारणपणे गप्पागोष्टी करणं, लोकांमध्ये मिसळणं यामुळे आपल्याला रिलॅक्स वाटतं. त्यामुळे आपण ते नैराश्यग्रस्तांना पुन्हा पुन्हा सुचवत राहतो. नैराश्यग्रस्त व्यक्तींना याचं दडपण येतं. आपण इतरांसारखे थट्टाविनोद करीत गप्पा मारू शकत नाही, याचं वैषम्य वाटत असतं म्हणूनच ते इतरांना टाळतात. सुचवावं; पण मागे लागू नये.  
4 मन : नैराश्यग्रस्तता हा मनोविकार आहे. निराशेचं सोंग घेऊन सहानुभूती मिळवणारे लोक वेगळे असतात. नैराश्यग्रस्त व्यक्तींना आपण कमकुवत असल्याची लाज वाटते,  हा मनाचा कमकुवतपणा नसून विकार ग्रस्ततेचं लक्षण आहे हे स्पष्ट शब्दात; पण थोडक्यात सांगावं.
 5. ओझं : ‘माझं जगणं मला ओझं वाटतंय’ - असे विचार नैराश्यग्रस्त व्यक्तींच्या मनात सतत असणं हा त्यांचा दोष नसतो. ताप आल्यावर अंगदुखी वाटते, तसं हे डिप्रेशनचं लक्षण असतं. अशावेळी  ‘आपल्या प्रेमाच्या माणसाचं ओझं वाटत नसतं. नैराश्याच्या वेदनेमुळे असे विचार येतात, जातील ते हळुहळु’, एवढंच म्हणावं.
6 नैराश्य : झटकून टाक ते नैराश्य ! - हे म्हणणं सोपं असतं. ते कळतं, पण वळत नसतं. रुग्णाला दोष न देता  ‘हळुहळु मावळेल नैराश्य’ असं म्हणावं. पुन्हा पुन्हा समजूत घालू नये. 
7. प्रयत्न : नैराश्यग्रस्त व्यक्तींना प्रयत्न करायचे असतात; पण करण्याची ऊर्जा नसते. त्यामुळे त्यांच्यापुढे अगदी सहजसाध्य उद्दिष्ट ठेवून ती पार करायला मदत करावी.
8. उपचार : नैराश्यग्रस्ततेमुळे अनेकदा, उपचारानं आपण बरे होऊ शकतो, यावर रुग्णांचा विश्वास नसतो. मग औषधोपचाराची टाळाटाळ होते. अशा वेळा प्रसन्नपणे हाताळाव्या. मोठमोठी लेक्चरं देऊ नये.
9. स्वीकार : ‘डिप्रेशन’ हा औषधोपचार, कुटुंबीयांचा आधार आणि नियमित मानसोपचारानं बरा होणारा विकार आहे.  डॉक्टरांच्या मदतीने उपचारांचा स्वीकार म्हणजे अर्धी लढई जिंकण्यासारखं असतं.


मनोरुग्ण? 

दैनंदिन आयुष्यातील ताणतणाव, परीक्षेतील अपयश, व्यवसायातील अडचणी, पिकांचे नुकसान, कर्जबाजारीपणा, प्रेमभंग, तीव्र नैराश्य किंवा तीव्र मानसिक आजार, व्यसनाधिनता, व्यक्तिमत्त्व दोष अशा अनेक कारणांमुळे व्यक्तीला मानसिक आजार होऊ शकतात. वेडेपणाची लक्षणे आढळून आलेल्या व्यक्ती मनोरुग्ण असून त्यावर उपचार करून काहीच फायदा नाही, असे ठरवून बहुतांश लोक मोकळे होतात. यावरून मनोरुग्णांबाबत समाजात जागरूकतेचा अभाव असल्याचे दिसून येते. दैनंदिन आयुष्यातील ताणतणाव, परीक्षेतील अपयश, व्यवसायातील अडचणी, पिकांचे नुकसान, कर्जबाजारीपणा, प्रेमभंग, तीव्र नैराश्य किंवा तीव्र मानसिक आजार, व्यसनाधिनता, व्यक्तिमत्त्व दोष अशा अनेक कारणांमुळे व्यक्तीला मानसिक आजार होऊ शकतात. स्पर्धात्मक युगात अपयश पचवू न शकणा-या व्यक्ती नैराश्याच्या आहारी जाऊन मानसिक आजाराला कारणाभूत ठरतायेत. या कारणांमुळे सध्या देशात मनोरुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढू लागली आहे. २०३० पर्यंत भारत मानो रुग्णांचा देश बनेल, अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली.दरवर्षी १० ऑक्टोबर हा दिवस ‘जागतिक मानसिक आरोग्य’ दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनानिमित्त मानसिक आजारासंदर्भात समाजात जागरूकता निर्माण करून मनोरुग्णांना दूर न करता त्यांची आपुलकीने काळजी घेतली पाहिजे, असा संकल्प यंदाच्या वर्षी मानसोपचार तज्ज्ञांनी केला आहे.
‘जागतिक मानसिक आरोग्य फेडरेशन’च्या संकेतस्थळावरून घेतलेल्या आकडेवारीनुसार; सध्या जगातील ३५ कोटी लोक नैराश्यग्रस्त आहेत. त्यातील केवळ दहा कोटी रुग्णच उपचार घेतात. २०३० पर्यंत या एकूण लोकसंख्येच्या ३० टक्के लोकांना हा आजार होण्याचा धोका आहे. त्यामुळे, नैराश्य या मानसिक आजारासंदर्भात समाजात जनजागृती करणे अतिशय गरजेचे आहे. मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर सांगतात की, मानसिक आरोग्य म्हणजे आयुष्यात येणा-या सगळ्या चांगल्या-वाईट अनुभवांना धीराने सामोरे जाणे. जीवनाच्या वाटेवर प्रत्येकाच्या आयुष्यात चढ-उतार येतात. जेव्हा आयुष्याचा प्रवास खडतर होतो, कधीतरी अशा वेळी नेमके काय करावे, कुणाला सांगावे हे प्रश्न मनात पडू लागतात. वारंवार त्याच गोष्टींचा विचार करत राहिल्याने व्यक्ती नैराश्याच्या आहारी जातो. नैराश्यावर वेळीच उपचार केला नाहीतर अशा व्यक्ती स्वत:साठी आणि इतरांसाठी धोकादायक ठरू शकतात. कारण, नैराश्य हा उपचारांनी बरा होणारा आजार आहे.

कुटुंब समुपदेशनाच्या टिप्स :-
           माफ करायला शिका.
1. स्वत:ला ओळखा, जग कळेल. स्वत:ला बदला, जग बदलेल.
2. प्रत्येक गोष्टीच्या/घटनेच्या/विषयाच्या दोन्ही बाजू शोधायची आपल्या मेंदूला सवय लावा. वैचारिक प्रगती होईल.
3. आपल्याशी तिखट बोलणार्या माणसांना समजून घ्या. त्यांच्या जीवनात ते स्वत: दु:खी असतात. त्यामूळे ते असे वागतात. त्यांच्यावर काय रागवायचे?
4. असूरक्षीतता रागाचे मूळ कारण आहे.
5. हसणे हे निकोप मानसिक आरोग्यासाठी आवश्यक असते तरी कारणाशिवाय हसणे हा एक मानसिक आजार आहे. जर मानसिक आरोग्य अबाधीत राखायचे असेल तर हसण्याची योग्य कारणे शोधा व मग हसा.
6. सकाळी आवरताना आळसावल्यासारखे वाटत असेल तर मौजमजेची, उत्साहाची गाणी लावा. कामे चटचट आटपतील पण या गाण्यांच्या आवाजाचा त्रास इतरांना होऊ देवू नका.
7. एखाद्याची मानसिकता जाणून घेण्यासाठी समुपदेशाद्वारे प्रश्नौत्तरे करून ती जाणून घेता येते.
8. रात्री झोपण्यापूर्वी किमान ५ मि. घ्या व दिवसातला घटनाक्रम आठवा. स्मरणशक्ती वाठविण्यासाठी, सद्सद्विवेक बुद्धी जागी ठेवण्यासाठी, मनाला चालना देण्यासाठी आणि झोप येण्यासाठी हा उत्तम एक्सरसाईझ आहे.
9. आत्महत्या करावीशी वाटत असेल तर मृत्यूनंतर काय होते हे जाणून घ्या. समस्येला व परीणामांना समजून घेणे हे समस्येतून समूळ मूक्त होण्याचा उत्तम मार्ग आहे.

कुटुंब समुपदेशन :-

समुपदेशन म्हणजे काय?

सम + उप + आदेश (आदेश - अत: + ईश) अशी प्राकृत मराठी संधीतून समुपदेशन हा शब्द तयार होतो. याचा अर्थ एखाद्याला उत्तम सल्ला देणे ज्याव्दारे समस्येला पर्याय निघेल व सर्वांचाच लाभ होईल.

कुटुंब समुपदेशनाची कार्य पध्दती कशी असते?

समुपदेशक व समस्येसंबंधीत व्यक्ती एकत्र बसून त्यांच्या समस्येवर चर्चा केली जाते. प्रथम समुपदेशक समस्या नीट ऎकून घेतो व आपल्या अनुभवाने, बुध्दीचातूर्याने, सदसदविवेक बुध्दीने यावर उपाय, पर्याय सांगून मार्गदर्शन करतो.

कोणकोणत्या समस्यांविषयी समुपदेशनाद्वारे मार्गदर्शन करता येते?

लहान मुलांच्या समस्या, आर्थिक समस्या, कौटुंबिक समस्या, पती पत्नीमधील समस्या, वृध्द व्यक्तींच्या समस्या, शारिरीक व मानसिक आजारपणाच्या समस्यांवर मार्गदर्शन घेता येते. मृत्यूची भिती किंवा अपंग मूल अश्या काही विशिष्ठ समस्यांवरही मार्गदर्शन करता येते. वास्तुसाई कन्सल्टंसीमध्ये प्रत्येक समस्येवर समाधान आहे.

समुपदेशनानंतर किती काळात लाभ मिळतात?

अगदी लगेच. कारण विचार बदलून जातात. जगाकडे, स्वत:कडे आणि स्वत:च्या समस्येकडे पहाण्याचा दृष्टीकोन बदलतो. समस्या नेमकी का घडली, त्यातून बाहेर कसे पडता येईल याचा नीट विचार करता येतो. किरकोळ समस्या असेल तर १ - २ मिटिंग्जद्वारे, मोठी समस्या असेल तर ३ - ४ मिटिंग्जद्वारे लाभ मिळतो.

समुपदेशनाद्वारे नेमका फायदा कसा होतो?

समुपदेशकाकडे बरेच ज्ञान व अनुभव असतो. सकारात्मक दृष्टीकोन असतो. तुम्ही स्वत:कडे व तुमच्या समस्येकडे ज्या दृष्टीने पहाता त्याहून वेगळी दृष्टी त्याच्याकडे असते. शिवाय छोट्या छोट्या टिप्स मूळे भोवतालची स्थिती बदलता येईल अश्या टिप्स समुपदेशक तुम्हाला देतो. त्यामुळे तुमची मते, विचार, परिस्थीती आटोक्यात येते.


भविष्यातील संधी वेगवेगळ्या स्पेशलायझेशन

क्लिनिकलसायकॉलॉजी
एखाद्या व्यक्तीच्या मनातील घालमेल ओळखून त्यावर मानसशास्त्रातील उपचारपद्धतीने इलाज करणारी एखादी व्यक्ति म्हणजे डॉक्टर त्याना विज्ञानाच्याभाषेत मनोविकार तद्न्य किंवा  मानसोपचार तदन्य असे देखील म्हणतात
सोशलसायकॉलॉजी
हे सायकॉलॉजिस्ट एखादा व्यक्तीच नाही तर संपूर्ण समाजावर होणा-या मानसिक प्रभावांचा अभ्यास करतात.
इंडस्ट्रीअलऑर्गनायझेशनसायकॉलॉजी
हे सायकॉलॉजिस्ट एखाद्या कंपनीमधील कर्मचा-यांचे मानसिकशास्त्र अभ्यासून कंपनीच्या विकासासाठी उपयुक्त अशा काय गोष्टी करता येतील यांचा अभ्यास करतात. तसेच एखाद्या ग्राहकाला आकर्षित करण्यासाठी काय करावं याचे सल्लेही देतात.
डेव्हलपमेंटसायकॉलॉजी
या विभागात एखाद्या व्यक्तीच्या थोडया किंवा संपूर्ण आयुष्यात झालेल्या त्याच्या मानसिकतेतील बदल यांचा अभ्यास केला जातो.
फॉरेन्सिकसायकॉलॉजी
ब-याचशा इंग्लिश वाहिन्यांवर या सायकॉलॉजिस्टच्या प्रमुख भूमिका असलेल्या गुन्हेगारी सिरीयल बघायला मिळतात. हे सायकॉलॉजिस्ट गुन्हेगारांचं मानसशास्त्र अभ्यासून गुनंची उकल करण्यास मदत करतात.
कौन्सिलिंगसायकॉलॉजी
एखाद्या व्यक्तीची मुलाखत घेतली जाते. त्यानंतर त्यांच्या काही चाचण्या घेतल्या जातात. मग त्यांना सल्ले देण्याचे काम हे सायकॉलॉजिस्ट करतात. व्यक्तींच्या भावनिक आणि गुप्त समस्यांची उकल हे करतात.
एज्युकेशनलसायकॉलॉजी
एखाद्या शिक्षणपद्धतीचा अभ्यास करून तसेच त्याचा विद्यार्थ्यांवरील प्रभावांची तपासणी करून योग्य शिक्षणव्यवस्था निर्माण करण्याची प्रमुख जबाबदारी असते ती एज्युकेशनल सायकॉलॉजिस्टची. याशिवाय पर्सनॅलिटी, कॉग्निटिव्ह, रिसर्च सायकॉलॉजी असेही काही प्रकार आहेत.
पात्रता 
डिग्रीपूर्व डिप्लोमा किंवा तत्सम कोर्सेस करण्यासाठी बारावी पास असणं महत्त्वाचं असतं. मास्टर्स कोर्स करण्यासाठी डिग्री कोर्स पास असणं तसंच एम. फील. किंवा पीएचडी करण्यासाठी मास्टर्स डिग्री असणं महत्त्वाचं असतं.
अभ्यासक्रमाचीओळख
बारावी आवश्यक. त्यानंतर कलाशाखेत सायकॉलॉजी हा विषय घेता येतो. त्यात स्पेशलायझेशन करता येतं. मास्टर्स करण्यासाठी डिग्री कोर्स उत्तीर्ण करणं आवश्यक असतं. भारतात ब-याचशा विद्यापीठांमध्ये एम. ए. आणि एम. एस्सी. इन सायकॉलॉजी करता येते. यापुढेही शिकायचं असल्यास एम. फील. आणि पीएचडी करता येते.
गुणवत्ता 
मानसोपचारतज्ज्ञ होण्यासाठी काही विशिष्ट अंगभूत गुण असावे लागतात.लोकांबद्दल आत्मीयता आणि मदत करण्याची ओढ संवेदनशील,धैर्यशील चांगली संवाद क्षमता कामात अनुभवलेली नकारात्मक ऊर्जा सहन करण्याची तयारी लोकांचे प्रश्न ऐकून ते सोडवण्यातील हातखंडा दयाशील राहून चिकाटीने काम करणं

मनोविकार म्हणजे काय?
मनोविकार :  म्हणजे विचार, भावना आणि वर्तन यांचं संतुलन बिघडणं. यामुळं एका व्यक्तीला इतर लोकांशी जमवून घ्यायला आणि रोजची कामं करायला कठीण जातं.
मनोविकार हा एखाद्या व्यक्तीमधील दुर्बलतेमुळं किंवा स्वभाव-दोषामुळं होत नाही
मनोविकाराच्या लक्षणांचा कालावधी व तीव्रता व्यक्तीनुसार, तिच्या आजारानुसार व परिस्थितीनुसार कमी-जास्त असू शकते. हा आजार स्त्री-पुरुष, लहानमोठे, गरीब-श्रीमंत अशा कोणत्याही व्यक्तीला होऊ शकतो. एखाद्या व्यक्तीमध्ये काही दुर्बलता आहे किंवा तिच्या स्वभावात दोष आहे म्हणून हा आजार होतो असं नाही. उचित उपचार घेतल्यास व्यक्ती बरी होऊ शकते आणि आनंदी, अर्थपूर्ण जीवन जगू शकते.

No comments:

Post a Comment

Featured Post

step in Book review

Certainly! Here’s a detailed step-by-step guide for HSC English students on how to write a book review. This structured approach will help y...