Wednesday, August 5, 2015

मानवी जीवनाच्या एकुण आठ अवस्था आहे ती प्राथमिक पासुन सर्वोच्च अशी गणली जाते यालाच अष्ट जीवन असेही म्हणतात मानवी जीवनातिल पहिले जीवन महणजे पशुतुल्यच होय नुसतेच खाने पिने व मौजमजा करने हेच यांचे जीवन होय यांना आध्यात्मिक गंध नसतो जगातील ९०% लोक हेच जीवन जगत असतात दुसरे जीवन हे भुतलावरील उच्च व प्रतिष्ठित जीवन होय सत्ता, संपत्ती व सर्व सुखाचा उपभोगघेत आयुष्याच्या उत्तरार्धात अध्यात्माकडे वाटचाल करतो अश्या भाग्यवंतावर गुरूकृपा होते सामान्यांना हेवा वाटेल असे हे जीवन लाखातुन एकाद्यालाच लाभते तिसरे जीवन म्हणजे शुन्यातुन विश्व निर्मान करणारे असते आपल्या आयुष्यात आपण अनेकदा आपले आदर्श निवडतो ते फक्त आपल्यासाठीच नसुन सर्व समाजाला आदर्श होतात अशी व्यक्ती समाजाला नवी दिशा, नवा विचार देते सामान्य जनतेत ती आदरानिय होते अनेक दशके यांचा प्रभाव कायम असतो महात्मा गांधी, डॉ आंबेडकर हे या जन्माचे उत्तम उदाहरण आहे चौथे जीवन म्हणजे आध्यात्मिक जीवन पुर्ण योगी, संत, उच्च साधक हे या जीवनात येतात यात सर्वच उच्च संत येतात पाचवे जीवन हजारो वर्षात एखाद्यालाच लाभते या व्यक्तिचे फार महान असते अनेक शतके त्यांचा समाजावर प्रभाव असतो त्यांनी दिलेली आदर्श व जीवन पध्दती हे अवलंबवुन व्यक्ती महान होतो संत ज्ञानेश्वर तुकाराम समर्थ रामदास व छत्रपती शिवप्रभु हे या जन्माचे उत्तम उदाहरण आहे सहावे जीवन म्हणजे आध्यात्मिक जीवनातील परीपुर्णता होय सर्व धर्मसंस्थापक हे या श्रेणीत येतात यांनी दिलेले नियम, आदेश ,उपदेश व जीवनपद्धत समाजासाठी एक धर्मच होतो येशु ख्रिस्त , गुरू नानकदेव , आदी शंकराचार्य, गुरू गोरक्षनाथ असे महान व्यक्ती या जन्माचे उत्तम उदाहरण होय सातवे जीवन म्हणजे अवतार ही कल्पना कारण हे जीवन म्हणजे एक दैवी कल्पना असते या व्यक्तीचे प्रत्येक कार्य अलौकिक असते महाकाव्य, दंतकथा यांचा नायक हाच व्यक्ती असते प्रभु रामचंद्र, श्री हनुमान, भगवान बुध्द हे या जन्माचे उदाहरण होय आठवे जीवन हे फक्त श्रीकृष्ण व भगवान शिवाचेच आहे कारणयेथे या सम हाच ही उक्ती सार्थ ठरते मित्रांनो मी हे जे अष्टजीवन मांडले आहे त्यानुसार आजच्या युगात फार फार तर तिसरे जीवन जगणारा एखादा व्यक्ती दिसतो

No comments:

Post a Comment

Featured Post

step in Book review

Certainly! Here’s a detailed step-by-step guide for HSC English students on how to write a book review. This structured approach will help y...