Tuesday, August 27, 2024

मूळचा राजस्थान मधील जोधपूर येथील निर्मल चौधरी या तरुणाचे इतर अनेक तरुणांप्रमाणेच   UPSC स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण करण्याचे स्वप्न होते. इलेक्ट्रॉनिक्समध्ये बी.टेक पदवी घेऊन तो दिल्लीला गेला.

तीन वर्ष अथक प्रयत्न केला. तिसऱ्या प्रयत्नात तो मुख्य परिक्षेपर्यंत पोहचला मात्र नशिबाने त्याच्यासाठी वेगळीच योजना आखली होती.

त्याने दिल्लीत तीन वर्षे स्पर्धा परीक्षेसाठी तयारी केली होती. मात्र तिसऱ्यावेळेस अयशस्वी झाल्याने त्याच्या पालकांच्या सल्ल्यानुसार त्याने बंगलोर येथे खाजगी नोकरी करण्यास सुरुवात केली.

सुखकर जीवन, गलेलठ्ठ पगाराची नोकरी असली तरीदेखील निर्मलला कशाचीतरी कमतरता जाणवत होती. तो 18 महिन्यांनंतर जोधपूरला परतला. गावी परतल्यावर त्याने स्टार्टअप कल्पनांवर संशोधन करून उद्योजगतेचा प्रवास सुरू करण्याचा निर्णय घेतला.

संशोधनादरम्यान, निर्मलला आढळले की 'आशियातील तूपाची बाजरपेठ' म्हणून जोधपूरची ओळख असताना देखील या प्रदेशात कोणतेही तूप प्रक्रिया युनिट किंवा स्थानिक ब्रँड नाहीत. ही संधी पाहून त्याने 2021 मध्ये 2.5 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीने मिल्क स्टेशन या डेअरी ब्रँडची स्थापना केली.

सुरवातीस दुध उत्पादन व वितरणापासून सुरुवात करून, डेअरी ब्रँड मिल्क स्टेशनने साजूक तूप, ताक, लस्सी, पनीर, दही आणि उंटाच्या दुधाच्या विविध प्रकारच्या कुकीज, तसेच उंटाच्या दूधापासून बनवलेल्या साबणाचा उत्पादनात समावेश केला.

गेल्या 60 वर्षांत जगात उंटांची संख्या तिपटीने वाढली असताना, भारतातील उंटांची संख्या मात्र 80% पेक्षा कमी झाली आहे. भारतात फक्त राजस्थानमध्ये उंट आढळतात. त्यामुळे उंटाचे दूध‌ मुबलक प्रमाणात उपलब्ध असणे ही देखिल संधी हेरली.

उंटाच्या दूधापासून बनविलेल्या या कुकीज, साबण हे स्वयं-सहायता गटाच्या महिलांनी हाताने बनवले आहेत. या उत्पादनांचा समावेश करण्यामागे स्थानिक उंट पाळणाऱ्यांना त्यांच्या उपजीविकेसाठी आर्थिक आधार देणे हा उद्देश आहे.

सध्या मिल्क स्टेशन कंपनीकडे 14 कर्मचारी कार्यरत आहेत. दूध पुरवठा करणारे आणि उंटाच्या दुधापासून उत्पादन तयार करणारे 1000 पेक्षा जास्त स्थानिक लोक आहेत. मिल्क स्टेशनची सारी उत्पादने उच्च गुणवत्तेची, प्रिझर्व्हेटिव्ह मुक्त आणि केमिकल मुक्त आहेत.

मिल्क स्टेशन कंपनीचा FY22 मधील महसूल 11 कोटी रुपयांवरून FY24 मध्ये 35 कोटी रुपयांवर पोहोचला. पुढील 5 वर्षांत कंपनीने 100 कोटी रुपयांचा महसूल मिळवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.

No comments:

Post a Comment

Featured Post

              राजा  भगवंतराव ज्यू कॉलेज११ वी १२ वी कला व विज्ञान शाखेत शिकत असणार्या विध्यार्थ्यासाठी आरोग्य आणि शारीरिक शिक्षण विषयची लिंक...