http://mr.vikaspedia.in/education/childrens-corner/93693e93294792f-90592d94d92f93e93891594d93092e/93693e93094093093f915-93693f91594d937923
शारीरिक शिक्षण उद्दिष्टे
http://www.sscboardmumbai.in/2014/%◾ *शारीरिक शिक्षण* ◾
◾ *शारीरिक शिक्षणाचा अभ्यासक्रम*
मुलामुलींच्या शारीरिक, बौद्धिक, भावनिक व सामाजिक विकासासाठी आनंददायी, गतिमान व क्षमतावर्धक अशा शारीरिक हालचालींद्वारे नियोजनपूर्वक दिले जाणारे शिक्षक. हालचाल हा शारीरिक शिक्षणाचा पाया असून शरीर हे शारीरिक शिक्षण प्राप्त करण्याचे प्रमुख माध्यम आहे. असे असले, तरी शारीरिक शिक्षणाचे उद्दिष्ट केवळ शरीरापुरतेच मर्यादित नाही; तर शरीराबरेबरच मन, भावना, विचार इत्यादींवर होणारे संस्कारसुद्धा त्यात अंतर्भूत आहेत.
विविध शारीरिक हालचालींद्वारे व्यक्तीला मिळणाऱ्या अनुभवाचे संघटित ज्ञान म्हणजे शारीरिक शिक्षण, अशी व्याख्या डी. ओबर्ट्युफर यांनी केली आहे. शारीरिक शिक्षण हा एका मोठ्या समग्र अशा विषयाचा एक भाग असून त्याचा संबंध महत्त्वाच्या स्नायूंच्या हालचालींशी आणि त्यांच्याशी संबंधित असणाऱ्या क्रियांशी आहे. अशी व्याख्या डॉ. जे. बी. नॅश यांनी केली आहे. 'महत्त्वाच्या स्नायु-हालचालींमधून मिळणाऱ्या परिपूर्ण अनुभवाद्वारे बालकाची सर्वाधिक अंतिम टप्प्यापर्यंतची वाढ व विकास साधणाऱ्या प्रक्रिया -समुच्चयास शारीरिक शिक्षण असे म्हणतात', अशी कल्पना ब्राउनेल यांनी मांडलेली आहे. 'शारीरिक हालचालींद्वारे शरीर, मन व आत्मा यांचा परिपूर्ण व योग्य विकास साधून बालकाच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास साधणे, म्हणजे शारीरिक शिक्षण होय', अशी व्याख्या भारताच्या केंद्रीय शारीरिक शिक्षण व मनोरंजन सल्लागार मंडळाने केलेली आहे.
◾ *शारीरिक शिक्षणाची उद्दिष्टे*
शारीरिक शिक्षण व मनोरंजनाच्या आराखड्यामध्ये शारीरिक शिक्षणाची पुढील उद्दिष्टे निश्चित केलेली आहेत :
(१) कार्यक्षमतेचा विकास : इंद्रियविकास आणि शरीराची सुदृढता यांवर शरीराची कार्यक्षमता अवलंबून असते. इंद्रियांचा विकास कृतिपूर्ण परिश्रमातून होतो आणि त्यासाठी लहानपणापासून होणाऱ्या हालचाली कारणीभूत ठरतात. इंद्रियांना पोषक ठरणाऱ्या व त्यांची कार्यक्षमता वाढवणाऱ्या हालचाली शिकवणे, हे शारीरिक शिक्षणाचे महत्त्वाचे उद्दिष्ट.
(२) मज्जासंस्था व स्नायुसंस्था यांतील सहकार्यात्मक विकास : शारीरिक क्रियांचे कौशल्य वाढवणे, हे शारीरिक शिक्षणाचे दुसरे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. लहान मुलांच्या सर्व नैसर्गिक हालचाली प्रयत्नाने आणि सरावाने हळुहळू सफाईदार होत जातात. चालणे, धावणे, उड्या मारणे, फेकणे, झेलणे, शरीराचा तोल सांभाळणे या मूलभूत क्रिया सहजपणे व कौशल्यपूर्ण होणे आवश्यक असते. लहान वयातच मुलांना योग्य मार्गदर्शन केल्यास त्यांच्या स्नायू व मज्जासंस्था यांतील सहसंबंध सुधारून वरील मूलभूत क्रिया कौशल्यपूर्ण होऊ शकतात.
(३) व्यक्तिमत्त्वाचा विकास : व्यक्तीचा शारीरिक, बौद्धिक, भावनिक, सामाजिक विकास साधून तिच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगिण विकास करणे. हे शारीरिक शिक्षणाचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. व्यक्तीचा बांधा, शारीरिक शिक्षणाचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. व्यक्तीचा बांधा, शारीरिक ठेवण, वर्तन विशेष, अभिरुची, अभिवृत्ती, कर्तृत्व आणि कला-गुण यांचा वैशिष्ट्यपूर्ण संघात म्हणजे व्यक्तिमत्त्व होय. यांतील अनेक घटकांचा विकास शारीरिक शिक्षणाने साधला जातो. त्यांतील काही प्रमुख उपघटक पुढीलप्रमाणे :
शारीरिक आरोग्यामध्ये व्यक्तिगत स्वच्छता, व्यायाम, आहार, आरोग्यविषयक सवयी, विश्रांती, मनोरंजन इत्यादींचा समावेश होतो. ह्या सर्व गोष्टी शारीरिक शिक्षणांतर्गत समाविष्ट होतात. मानवी मनावरदेखील शारीरिक शिक्षणाचे योग्य संस्कार होतात. शारीरिक शिक्षणातील योगाभ्यासाद्वारे मानसिक स्वास्थ्याची प्राप्ती होते. व्यक्तीचे मानसिक स्वास्थ्य समाजाशी निगडित आहे. म्हणूनच शारीरिक शिक्षणाद्वारे शारीरिक, मानसिक, सामाजिक सुस्थिती साधणे, हे एक उद्दिष्ट ठरवण्यात आले आहे.
शारीरिक शिक्षणामुळे निर्णयशक्तीचा विकासही साधला जातो. शारीरिक शिणातील विविध क्रीडांमध्ये अनेक वेळा तत्काळ निर्णय घेण्याचे प्रसंग येतात. उदा., कबड्डीमध्ये घोटापकड केव्हा करावी, चढाई वा बचाव केव्हा करावा, या संदर्भात तत्क्षणी चटकन व योग्य निर्णय घ्यावे लागतात. त्यामुळे निर्णय घेण्याच्या क्षमतेत वाढ होऊ शकते.
भावनांवर नियंत्रण ठेवून त्यांना आवर घालणे, मानसिक स्वास्थ्याच्या दृष्टीने हितावह असते. शारीरिक शिक्षणामधील विविध स्पर्धांमधून जयपराजयामुळे व्यक्ती आनंद किंवा दु:ख या भावनांचा अनुभव घेते. सुरुवातीस जरी त्या अधिक जोरदार स्वरूपात व्यक्त झाल्या, तरी हळूहळू खेळाडूंमध्ये त्यांवर नियंत्रण ठेवण्याची क्षमता प्राप्त होते. संघ किंवा देशासाठी खेळत असताना त्यातून संघनिष्ठा, समाजनिष्ठा, राष्ट्रनिष्ठा इ. भावना वाढीस लागतात. भावनांवर नियंत्रण ठेवणारी व्यक्ती समाजात योग्य समायोजन साधून आनंदी जीवन जगण्यास लायक बनते. आत्मविश्वास, सदाचार, धैर्य, प्रामाणिकपणा, वक्तशीरपणा, दया, न्याय, तत्परता, निष्ठा इ. वैयक्तिक गुणांचा विकास शारीरिक शिक्षणाच्या माध्यमातून होतो. तसेच सहकार्य, बंधुभाव, आदरभाव, सहानुभूती, परोपकारबुद्धी, संघभावना, निष्ठा, खिलाडूवृत्ती, नेतृत्व, आज्ञाधारकपणा, सेवावृत्ती, सत्यप्रियता, शिस्त इ. सामाजिक गुणांच्या विकासाचे धडे ह्या माध्यमातून व्यक्तीस मिळतात.
शारीरिक शिक्षणातील अनेक क्रीडाविषयक बाबी सदाचाराचे तसेच नैतिक मूल्यांचे शिक्षण देतात. क्रीडांगणे ही बालकास सदाचारास प्रवृत्त करून चारित्र्य-घडणीचे काम करतात.
hsc .ssc board mumbai.
(४) मनोरंजन : व्यक्तीला आनंद, समाधान व स्वास्थ प्राप्त करून देणारी क्रिया म्हणजे मनोरंजन होय. म्हणूनच मनोरंजन हा शारीरिक शिक्षणाचा अविभाज्य भाग होय.
वरील सर्व उद्दिष्टांबरोबरच व्यावसायिक कार्यक्षमतेचा विकास, सहजप्रवृत्तींचा विकास व उदात्तीकरण, व्यक्तीच्या राष्ट्रीयत्वाचा विकास हीदेखील शारीरिक शिक्षणाची इतर महत्त्वाची उद्दिष्टे आहेत.
शारीरिक शिक्षणाचा अभ्यासक्रम -
प्राथमिक स्तरावर इयत्ता पहिली ते पाचवीच्या अभ्यासक्रमात शारीरिक शिक्षण व आरोग्य ह्या विषयांतर्गत अनौपचारिक अनुकरणात्मक हालचाली, कृतियुक्त गाणी, गोष्टी नाट्यीकरण, मनोरंजनात्मक खेळ, कसरतीचे व्यायाम इत्यादी उपक्रमांवर विशेष भर देण्यात येतो. प्राथस्तरामधील विद्यार्थ्यांच्या वयाचा विचार करून त्यांच्या शरीरावर व विविध अवयवांवर योग्य तो ताबा मिळवून कौशल्य संपादन करण्याच्या दृष्टीने धावणे, फेकणे, उड्या मारणे, साध्या कसरती यांचा अंतर्भाव या अभ्यासक्रमात केलेला आहे. तसेच देशी खेळांबरोबरच क्रिकेट, फुटबॉल, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल यांसारख्या विदेशी खेळांचा परिचय व्हावा या उद्देशाने या खेळांना स्थान दिलेले आहे. आरोग्यशिक्षणाचे उद्दिष्ट म्हणजे बालकांना आरोग्यविषयक मूल्यांची सर्वसाधारण कल्पना देऊन आरोग्यविषयक सवयी व कृती अंगी बाणवण्याची सवय वाढीस लावणे व त्यांच्या आरोग्याचा दर्जा वाढविणे हे आहे. शारीरिक शिक्षण व आरोग्य या विषयासाठी एकूण वेळेच्या १/१० भारांश देण्यात आलेला आहे. शिक्षणशास्त्र पदविकाप्राप्त व खेळातील प्रावीण्य संपादन केलेले शिक्षक हा विषय शिकविण्यास पात्र असतात.
उच्च प्राथमिक स्तरावरील इयत्ता ६ वी ते ८ वी च्या शारीरिक शिक्षणाच्या अभ्यासक्रमात विकासात्मक व्यायामप्रकार, मैदानी उपक्रम, मोठे खेळ, तालबद्ध हालचाली, योगासने, कवायत, द्वंद्वात्मक व्यायामप्रकार यांचा समावेश केलेला आहे. देशी खेळांबरोबरच क्रिकेट, फुटबॉल, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल यांसारखे विदेशी खेळ, तसेच बीम वर्क, व्हॉल्टींग हॉर्स, जांबिया, लाठी, धनुर्विद्या व जूदो यांचा समावेश इयत्ता ७ वी व ८ वी साठी केला आहे. आरोग्यशिक्षणाचाही त्यात समावेश आहे. एकूण वेळेच्या १/१० भारांश शारीरिक शिक्षण व आरोग्यशिक्षण या विषयांसाठी देण्यात आलेला आहे. त्यानुसार दर आठवड्यासाठी प्रत्येक वर्गास चार तासांचे नियोजन करावे लागते.
माध्यमिक स्तरावरील इयत्ता ९ वी व १० वी मधील मुलामुलींची उंची झपाट्याने वाढत असते. तसेच समाजमान्यता प्राप्त करणे, नायकत्व करणे, सहकार्याच्या अवधानाचे केंद्र बनणे, अशा प्रवृत्ती त्यांच्यात दिसू लागतात. काहीतरी धाडसी कृत्य करण्याकडे त्यांचा कल असतो. त्यासाठी शारीरिक शिक्षणाच्या अभ्यासक्रमामध्ये दंड, बैठका, पुलअप्स, मैदानी स्पर्धा, बॅडमिंटन, बास्केटबॉल, क्रिकेट, फुटबॉल, हॅंडबॉल, हॉकी, कबड्डी, खोखो, व्हॉलीबॉल, टेबल-टेनिस, पोहणे, व्यायामी खेळ, मल्लखांब, योगासने, कुस्ती किंवा जूदो ई. प्रकारांचा समावेश करण्यात आलेला आहे. एकूण वेळेच्या १/१० भारांश शारीरिक शिक्षण व आरोग्यशिक्षण या विषयांसाठी देण्यात आलेला आहे. त्यानुसार दर आठवड्यासाठी प्रत्येक वर्गास चार तासांचे नियोजन करणे आवश्यक असते.
खेळ व इतिहास
कबड्डी
कबड्डी हा खेळ मूळ दक्षिण आशियातला मात्र आता आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळला जाणारा सांघिक मैदानी खेळ आहे. या खेळात दोन संघ मैदानाच्या दोन बाजू राखून आळीपाळीने प्रतिस्पर्धी संघावर चढाया करायला एक खेळाडू पाठवतात. प्रत्येक संघात बारा खेळाडू असतात. प्रत्यक्ष सामन्यात सात खेळाडू खेळतात. इतर पाच खेळाडू बदली खेळाडू म्हणून खेळवले जातात. पुरुषांसाठी वीस मिनिटांचे, तर महिलांसाठी पंधरा मिनिटांचे दोन डाव खेळवले जातात. संपूर्ण सामन्यात बरोबरी झाल्यास पुन्हा पाच मिनिटांचे दोन डाव खेळवतात.
महाराष्ट्र व मध्य प्रदेश या राज्यांत हुतुतू, कर्नाटक व तामिळनाडूमध्ये चाडू-गुडू, केरळमध्ये वंदिकली, पंजाबमध्ये झबर गगने, तर बंगालमध्ये दो-दो या नावाने हा खेळ खेळला जायचा. इ.स. १९३४ मध्ये या खेळाचे नियम तयार झाले. इ.स. १९३६ मध्ये हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, अमरावती यांनी या खेळाच्या प्रसारासाठी बर्लिन ऑलिंपिकमध्ये प्रदर्शनीय सामना खेळून दाखवला. इ.स. १९३८ पासून हा खेळ भारतात राष्ट्रीय खेळ म्हणून ओळखला जाऊ लागला.
पुरूषांच्या तुलनेत आता महिलांच्या कबड्डीलाही व्यावसायिकदृष्ट्या चांगले दिवस आलेले आहेत. पण तरीही अजूनही महिलांचा खूप जास्त सहभाग कबड्डीमध्ये दिसत नाही. कबड्डी हा खेळ आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळला जातो. इतर खेळांना जसा सर्व स्तरातून पाठिंबा मिळतो तसा कबड्डीला मिळत नसल्याने चांगला आणि लोकप्रिय खेळ असूनही हा खेळ काहीप्रमाणात मागे पडतो आहे, हे नाकारता येत नाही. अस्सल भारतीय खेळ म्हणून ओळखला जाणारा खेळ म्हणजे कबड्डी. भारताच्या गावागावात हा खेळ मोठया जोमाने खेळला जातो. खेळाची लोकप्रियताही मोठी आहे. पण तरीही हा खेळ हवा तसा प्रसिद्धीस आलेला दिसत नाही.
पुरुष, महिलांसाठी वेगवेगळ्या आकाराची मैदाने असतात. पुरुषांसाठी १२.५० मी. बाय १० मी., तर महिलांसाठी ११ मी. बाय ८ मी. असे आयताकृती क्रीडांगण बनवतात. ते बनवतांना बारीक चाळलेली माती व शेणखत यांचा वापर करून एकसारखे सपाट मैदान बनवले जाते. पूर्वी फक्त खुल्या मैदानावर होणारा हा खेळ आता बंदिस्त जागेत व मॅटवरही खेळवला जायला लागला आहे. जोशपूर्ण असणारा हा खेळ, त्याच्या सामन्यांची चुरस बघतांना मजा येते.
खो खो
एक लोकप्रिय भारतीय खेळ. या खेळास केव्हा सुरुवात झाली, याची माहिती मिळत नाही. आटयापाटया वा मृदंगपाटी यांचा उल्लेख जसा संत साहित्यात आढळतो, तसा खोखोचा उल्लेख सापडत नाही. गेल्या शतकाच्या अखेरीस खोखो खेळला जात असावा, असे म्हटले जाते.
शिवाशिवी या खेळाला जगातील एक प्राथमिक खेळ मानतात. पाठलाग करणारा एक खेळाडू दमल्यानंतर त्याला विश्रांती देऊन दुस-याला हे काम करावयास सांगावयाचे, ही या खेळातील मूळ कल्पना आहे.
इतर खेळांप्रमाणेच खोखोचेही प्रारंभी काही नियम नव्हते. १९१४ साली पुhttp://www.sscboardmumbai.in/2014/%E0%A5%AF-%E0%A4%B5%E0%A5%80-%E0%A5%A7%E0%A5%A8-%E0%A4%B5%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%B5-%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95/ण्याच्या डेक्कन जिमखान्याने भारतीय स्वरूपाचे खोखोचे सामने प्रथम सुरू केले आणि खेळाला नियमबध्दता व शिस्त आणली. अखिल महाराष्ट्र शारीरिक शिक्षण मंडळाने १९३५ साली खोखोचे नियम छापून प्रसिध्द केले. त्यांत खेळाडूंच्या अनुभवांनुसार व संबंधितांशी विचारविनीमय करून त्यानंतर अनेक सुधारणा केल्या व हिंदी आणि इंग्रजी भाषांत हे नियम प्रसिध्द करून अखिल भारतात या खेळाचा प्रसार केला. आता हे नियम सर्वत्र मान्य झालेले आहेत. महाराष्ट्रात राज्य सरकारच्या साहाय्याने गेली काही वर्षे दरवर्षी क्रीडामहोत्सव होतो. त्यात खोखो समाविष्ट झाल्यामुळे खेडोपाडी या खेळाचा प्रसार झालेला असून खोखोच्या स्वतंत्र संस्थाही निघालेल्या आहेत. अखिल भारतीय खोखो फेडरेशन ही खोखोची प्रातिनिधिक संस्था आहे. तिने केलेले नियम सर्वत्र पाळले जातात.
या खेळाचे सामने अखिल भारतीय पातळीवरही होतात. अखिल भारतीय शारीरिक शिक्षण महामंडळ, आंतरविद्यापिठीय क्रीडासंस्था इ. संस्थांतर्फे हे सामने घेतले जातात.
खोखोचे क्रीडांगण १११ फूट (३३.६ मी.) लांब व ५१ फूट (१५.५ मी.) रूंद असते. मध्यपाटीची रूंदी १ फूट (३० सेंमी.) व लांबी ८१ फूट (२४.६८ मी.) असते. खुंटाची ऊंची ४ फूट (१.३६ मी.) व परीघ १३’ ते १६’ (३३.०२ ते ४०.६४ सेंमी.) असतो. दोन्ही खुंटांपासून अनुक्रमे पहिल्या पाटीचे अंतर ८१/२ फूट (२.५४ मी.) असते. बाकी सर्व पाटयांचे मधील अंतर ८ फूट (२.४३ मी.) असते. खुंटांच्या दोन्ही बाजूला १५’*५१’ (४.५६ मी. ८१५.५४ मी.) असे चौकोन असतात. नऊ नऊ खेळाडूंच्या दोन संघांत हे सामने होतात. दर ८ फूट (२.४३ मी.) अंतरावर आठ खेळाडू एकाआड एक एकमेकांच्या विरुध्द बाजूकडे तोंडे करून बसतात. नववा खेळाडू एका खुंटाजवळ उभा राहतो. खेळणा-या संघातील तीन खेळाडूच सुरुवातीला क्रीडांगणात असतात. पंचांनी इशारा देताच खेळाला प्रारंभ होतो. पहिले तीन खेळाडू बाद झाल्यानंतर दुसरे तीन खेळाडू बाद झाले, की लोण होते व डावाचा वेळ शिल्लक असल्यास पुन्हा पहिले तीन खेळाडू पळतीसाठी मैदानात उतरतो. प्रत्येक संघात दोन राखीव खेळाडू असतात. खेळताना एखादा उतरतो. प्रत्येक संघात दोन राखीव खेळाडू असतात. खेळताना एखादा खेळाडू जबर जखमी झाल्यास सरपंचाच्या परवानगीने राखीव खेळाडू खेळू शकतो; पण प्रतिस्पर्धी संघाच्या कप्तानला ही गोष्ट सांगावी लागते.
बसलेल्या खेळाडूला पाठलाग करणा-याने मागून स्पर्श करून 'खो' देणारा त्याची जागा घेतो. खो मिळयावाचून खेळाडूने उठावयाचे नसते. पाठलाग करणाराला दिशा बदलता येत नाही. उठल्याबरोबर त्या खेळाडूची स्कंधरेषा (दोन्ही खांद्यांना जोडणारी कल्पित रेषा) ज्या बाजूला वळलेली असेल, त्या बाजूलाच त्याला वळावे लागते किंवा ती मध्यपाटीस समांतर असेपर्यंत त्याला वळता येते. पाठलाग करणाराला खेळाडूंच्या मधून किंवा खुंटांमधून जाता येत नाही. खुंटाला वळसाच घालावा लागतो किंवा खांबाजवळील रेषेला स्पर्श करून पुन्हा परतता येते. चौकोनात पाठलाग करणाराला कसेही फिरता येते.
खेळणा-याने सीमारेषांत राहूनच खेळावयाचे असते. बसलेल्या खेळाडूंना त्याने स्पर्श केल्यास तो बाद होतो. प्रत्येक डाव लहान वयाच्या स्पर्धकांसाठी ५ मिनिटांचा आणि मोठयांसाठी ७ मिनिटांचा असतो. प्रत्येक डावानंतर २१/२ मिनिटे आणि दोन डावानंतर पाच मिनिटे विश्रांती असते. एका डावात जितके खेळाडू बाद होतील, तितके गुण विरूध्द संघाला मिळतात. एखाद्या संघाचे गुण प्रतिस्पर्धी संघापेक्षा १२ गुणांनी जास्त असल्यास हा आघाडीवर असलेला संघ दुस-या संघास पुन्हा बसण्यास म्हणजे पाठलाग करण्यास सांगू शकतो. पाठलाग करताना नियमभंग केला, तर पंच ताबडतोब ती चूक सुधारावयास लावतात. त्यामुळे खेळणा-याच्या पाठलागात खंड पडून त्याला काही वेळ मिळतो. एका सामन्यासाठी प्रत्येक संघाला दोन वेळा खेळावे लागते.
खोखोच्या सामन्यासाठी दोन पंच, एक सरपंच, एक गुणलेखक आणि क्वचित प्रसंगी काही सामन्यांत वेळाधिकारी असतो. अन्यथा ही कामगिरी सरपंच पार पाडतो. पळताना जरूरीप्रमाणे वेग कमीजास्त करणे, हुलकावणी देणे, योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी मधली पाटी ओलांडून पलीकडे जाणे इ. कौशल्ये आत्मसात करण्याकरिता चापल्य, समयसूचकता व पाठलागाच्या वेळी योग्य अंतर ठेवण्याची समजूत या गोष्टींची खेळाडूंना पुष्कळच तयारी करावी लागते. या खेळात वैयक्तिक आणि सांघिक कौशल्याला वाव मिळतो. गुजरात व महाराष्ट्र ही राज्ये या खेळात अग्रेसर आहेत.
खोखोच्या राष्ट्रीय स्पर्धेत सर्वोकृष्ट खेळाडूला एकलव्य पारितोषिक दिले जाते. १९७५ साली बडोद्याला झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत हा मान मुलांपैकी हेमंत जोगदेव व मुलींत कु. मेढेकर हीस मिळाला. हे दोघे खेळाडू महाराष्ट्राच्या संघातील होते.
उभा खोखो आणि चौरंगी बैठा खोखो असे खोखोचे दोन प्रकार आहेत. ते शाळकरी मुलांना थोडया जागेत खेळण्यासाठी व खोखोच्या तयारीसाठी उपयुक्त आहेत.
ffree bmi checker

No comments:
Post a Comment