Friday, October 2, 2015

[03/10 07:38] rautpblogspot.in: मंदिरात का जावे? देवपूजा का करावी? या मागचे शास्त्रीय कारण काय? भारतीय मंदिरे एक उर्जेचा स्त्रोत आहेत कि अंधश्रद्धा याचा शास्त्रीय दृष्टीकोनातून शोधघेण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न ...... अनादी काळा पासून मनुष्य ईश्वर व ईश्वरी शक्तींच्या शोधात आहे.आताया ईश्वरी शक्ती म्हणजे काय? किंवा त्या आपलेअस्तित्व कोठे दाखवतात हे पाहणे खूप महत्वाचे ठरेल. सर्वात आधी आपण शक्ती म्हणजे काय ते पाहू. शक्ती म्हणजे चुंबकीय क्षेत्र आपल्या दैनंदिन जीवनात आपण शक्ती (power) चुंबकीय क्षेत्र निर्माण करून उत्पन्न करतो उदा: इलेक्ट्रिक मोटर यात आपण विजेच्या सहायाने चुंबकीय क्षेत्र निर्माण करतो ,त्यात शक्ती निर्माण होते व मोटर कार्य करू लागते. त्याचप्रमाणे आपल्या पूर्वजांना मानवी शक्तींचा शोध लागला तो या चुंबकीय शक्ती मधूनच. त्यांनी ओळखले कि मानवाने जर स्वत:मध्ये चुंबकीय (क्षेत्र) शक्ती निर्माण केल्या तर त्यास सर्व प्रकारच्या शक्ती व सामर्थ्य प्राप्त होऊ शकते.त्यालाच आपण ईश्वरी शक्ती म्हणतो. आणि या शक्ती निर्माण करण्यासाठी एक माध्यम हवे होते जसे मोटारीला वीज हे मध्यम आहे. आणि हे मध्यम होते पिर्रॅमीड. पिर्रॅमीड ज्या विशिष्ट कोनात बांधला जातो त्या प्रकारच्या रचनेत मोठ्या प्रमाणात चुंबकीय क्षेत्र निर्माण होते हेआपल्या पूर्वजांनी सखोल संशोधनातून ओळखले होते.म्हणूनच आपल्या संस्कृतीतील सर्व नामांकित मंदिरेहि या पिर्रॅमिडच्या आकाराची बांधली आहेत.मंदिराचा कळस हा एक पिर्रॅमिडचा भाग आहे. म्हणून भारतातील सर्व मंदिरांचा कळस हा मुख्य भाग मानला जातो. तसेच ही सर्वमंदिरे उंच डोंगरावर बांधली गेली आहेत. उदा -तिरुपती बालाजी मंदिर, वैष्णवी माता मंदिर, अमरनाथ मंदिर. पूर्ण भारतात अशाच प्रकारे वेगवेगळ्या आकाराची , उंचीची हजारो मंदिरे विविध प्रांतात डोंगर माथ्यावरच बांधलेली आढळून येतात व हि सर्व मंदिरे वैेदिक शास्त्रानुसार बांधली गेली आहेत (किंवा डोंगरावर बांधली नसली तरी पिर्रॅमिडाच्या आकाराची बांधली गेली आहेत) आणि फक्त हिंदू संस्कृतीतच नव्हे तर मुस्लीम, ख्रिश्चन या संस्कृती मध्ये सुद्धा याच तंत्र ज्ञानाचा बेमालूम वापर केला गेला आहे. ही मंदिरे प्रामुख्याने डोंगर माथ्यावर बांधण्याचे प्रमुख कारण काय तर अशा जागेवर पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र सर्वाधिक आहे. या मागचे शास्त्रीय कारण काय असू शकते? तुम्ही जर नीट निरीक्षण केलेत तर तुमच्या लगेच लक्षात येईल की डोंगर हा पिर्रॅमीडचाच एक नैसर्गिक उत्तमप्रकार आहे. आणि या डोंगराच्या सर्वोत्तम शिखरावर सर्वात जास्त चुंबकीय क्षेत्र अस्तित्वात असते. मुख्यतः अशा जागेवर मंदिरे बांधल्याने त्या मंदिराच्या गाभार्यात चुंबकीय व विदुयत तरंग हे उत्तर व दक्षिण दिशेच्या मध्यावर एकत्रित होतात. व याच कारणाने मुख्यमूर्ती ही देवळाच्या मध्यभागी स्थापित केली जाते, त्याला "गर्भगृह" किवा "मूलस्थान" असे म्हटले जाते. खरेतर प्रथम मूर्तीची स्थापना करून मग मंदिर उभारले जाते. हा "गाभारा "म्हणजे ज्या ठिकाणी पृथ्वीचे सर्वाधिक चुंबकीय क्षेत्र असलेली जागा. आपल्याला माहित आहे का,ताम्रपटावर काही वैेदिक मंत्र लिहून त्या मुख्यमूर्तीच्या पाया खाली पुरल्या जात असत. ते ताम्रपट म्हणजे नक्की काय असते? तर हे ताम्रपट म्हणजे देव किवा पुजारी यांना श्लोक आठवून देण्यासाठी ठेवलेली पत्र नव्हेत. तर ताम्रपात्र पृथ्वीतील चुंबकीय शक्ती खेचून घेवून त्या सभोवतालच्या वातावरणात पसरवत असतात. मंदिरात प्रदक्षिणा का घालतात? याचेही उत्तर यातच दडलेले आहे. प्रदक्षिणा म्हणजे काय तर मुळ गाभार्यातील मूर्ती भोवती एक चक्कर मारणे. म्हणजेच चुंबकीय क्षेत्र भोवती चक्कर मारणेेे होय. जसे इलेक्ट्रिक मोटर मध्ये शाफ्ट व रोटरच्या फिरण्याने त्या मोटर मध्ये विद्युत चुंबकीय क्षेत्र निर्माण होते त्याच प्रमाणे गाभार्यात मूर्ती भोवती फिरण्याने मानवी शरीरात चुंबकीय शक्तींचा स्त्रोत निर्माण होऊन मानवास चुंबकीय शक्तींची प्राप्ती होते ज्यास आपण ईश्वरी शक्ती मानतो. म्हणूनच जी व्यक्ती दररोज मंदिरात येते व मुख्य मूर्तीच्या प्रदक्षिणा करतेत्या व्यक्तीचे शरीर वातावरणातील चुंबकीय तरंग शोषून घेते. ही सगळी प्रक्रिया खूप सावकाश होत असते आणि दररोज केलेली प्रदक्षिणा ह्या सर्व सकारात्मक शक्ती शरीराला ग्रहण करण्यास मदत करते. शास्त्रीयदृष्ट्या ह्या सर्व सकारात्मक चुंबकीय शक्ती आपल्या निरोगी आयुष्य जगण्यासाठी आवश्यक असतात त्या आपणास मंदिरातूनच प्राप्त होतात. मंदिरात ध्यान केल्याने किंवा नुसते शांत बसल्याने सुद्धा आपणास या सर्व शक्ती खूप मोठ्या प्रमाणात प्राप्त होतात. मंदिरात होणारा घंटानाद व मंत्रोचार यातून निघणार्या ध्वनी कंपनामधून मानवाच्या मेंदूतील अन्तरपटलावर या शक्तीचा परिणाम वाढतो व मनावरील ताण तणावकमी होण्यास मदत होते. मंदिरात होणारी [03/10 07:40] rautpblogspot.in: व खाजगी प्रश्नांना (दुःख्) विसरायला मदत करते. फुलाचा सुगंध आणि कापूर व धूप या मुळे मंदिराचे वातावरण प्रसन होते. ह्या सगळ्या गोष्टी मंदिरातील सकारात्मक शक्ती वाढवण्यास मदत करतात. मंदिरातील “तीर्थ“ म्हणजे काय? मंदिरातील गाभार्यात असणार्या देवतेला विशिष्ट मिश्रणाने स्नान घातले जाते. हे मिश्रण म्हणजेच पाणी,दुध, मध,दही, वेलचीपूड, कापूर ,केशर, लवंग तेल, तूप, तुळशी पाने यांचे मिश्रण असते. जेव्हा ह्या मिश्रणाने मूर्तीला अभिषेक केला जातो तेव्हा मूर्ती मधील चुंबकीय शक्ती त्या मिश्रणात मिसळतात व हे मिश्रण चुंबकीय शक्तीने भरून जाते यालाच आपण तीर्थ असे म्हणतो. हे मिश्रण "तीर्थ” प्रत्येक भक्ताला प्रसाद म्हणून वाटले जाते. हे “तीर्थ” चुंबकीय शक्तीचे स्तोत्र असते. ह्या तीर्थात असलेल्या गोष्टी मुळे लवंग तेल दातदुखी कमी करते, केशर व तुळशी पाने सर्दी व खोकला या पासून संरक्षण करते आणि कापूर श्वासदुर्गंधीं नाहीशी करतो. चुंबकीय शक्तीने भरलेले हे “तीर्थ” रक्तशुद्धी करते. हे प्रयोगावरून सिद्ध झाले आहे. म्हणूनच हे “तीर्थ“ भक्तांना प्रसाद म्हणून दिले जाते. ह्या मुळेच आपण दररोज देवदर्शन करून आपण निरोगी राहू शकतो. म्हणूनच आपले पूर्वज किवा वडीलधारी मंडळी आपल्याला देवदर्शन करण्यास सांगत असावी ज्यायोगे आपले बरेच शारीरिक त्रास नष्ट होण्यास मदत होत असे. ह्या मागे कुठलीही अंधश्रद्धा दडलेली नाही. काही वेळा,भक्तांना वाटते कि मंदिरातील पुजारी आपल्या (अध्यात्मिक) ताकतीच्या जोरावर कठीण आजार दूर करतील, पण असे होत नाही. जेव्हा मंदिरात “दीपाराधना“ केली जाते किंवा आरती केली जाते आणि जेव्हा मंदिरातील गाभार्याचे मुख्य दरवाजे उघडले जातात तेव्हा सकारात्मक शक्ती तिथे असलेल्या लोकांमध्ये खेचल्या जातात. मंदिरात उपस्थित असलेल्या सगळ्या भक्तांवर पाणी शिंपडून चांगल्या शक्ती त्यांच्या पर्यंत पोहोचवल्या जातात आणि म्हणूनच काही मंदिरात पुरुषांना उर्ध्ववस्त्र घालण्यास मनाई आहे (दक्षिणे कडील देवळात) आणि तसेच महिला भक्तांना अंगावर आभूषण घालण्यास सांगितले जाते. ह्या आभूषण द्वारे (सोने, चांदी विद्युतशक्ती प्रवाहक आहेत) महिलांना सकारात्मक शक्ती मिळवण्यास मदत होते. आपल्याकडे नवीन विकत घेतलेले दागिने प्रथम देवाच्या चरणासी ठेवून मगच घातले जाते. तसेच काही नवीन वस्तू (पुस्तके ,वाहन) देवाचा आशीर्वाद घेवून मगच वापरल्या जातात तसेच कोणत्याही शुभ कार्यास सुरवात करण्या आधी मंदिरात जाऊन देव दर्शन घेऊन त्या देवतेचा आशीर्वाद घेणे त्या मागे सुधा हीच भावना असते असे दिसून आले आहे.दिवसभराच्या कामाच्या धावपळीत आपण खूप शक्ती वाया घालवतो आणि देवळात दिलेल्या भेटीने आपल्याला खूप प्रसन्न वाटते. देवळात पसरलेल्या सकारात्मक शक्ती मुख्यता मुख्य मूर्तीच्या सभोवती पसरलेल्या असतात,ज्या आपल्या शरीर व मेंदू खेचून घेते. तुम्हाला माहित आहे का, प्रत्येक वैष्णव(विष्णू भक्त) दररोज २ वेळा विष्णू मंदिरात पूजा करतो. आपल्या पूजा पद्धती ह्या एवढ्या कठीण नाहीत.किवा कोणी एका माणसाने अथवा त्याच्या भक्तांनी आपल्या पूजा पद्धती ठरवलेल्या नाहीत. ह्या सगळ्या पूजा पद्धती आपल्या पूर्वजांनी योग्य अभ्यास,सखोल संशोधन व शास्त्रीय निकषावरून मानवी जीवन सुखकर करण्यासाठी शोधून काढल्या आहेत.

No comments:

Post a Comment

Featured Post

              राजा  भगवंतराव ज्यू कॉलेज११ वी १२ वी कला व विज्ञान शाखेत शिकत असणार्या विध्यार्थ्यासाठी आरोग्य आणि शारीरिक शिक्षण विषयची लिंक...