Saturday, September 5, 2015

Good morning . . . तू समजुन का घेत नाही.......... कसं गं तुला काही समजत नाही ! साधी,सरळ आणी सोपी गोष्ट आहे, तुझ्याशिवाय मला राहवत नाही ! इतक्या सहजासहजी जाऊ का विचारतेस, भावना का माझ्या तुला जाणवत नाही ! साधी,सरळ आणी सोपी गोष्ट आहे, तुझ्याशिवाय मला करमत नाही ! तू दुर असलीस की जगही खायला उठतं, कशातच लक्ष माझं लागत नाही ! एवढही तुला कसं कळत नाही, तुझ्याशिवाय माझ्या जगण्यालाच अर्थ नाही ! कधी कधी असं वाटतं, तू फक्त दाखवतेस की तुला समजत नाही ! माझ्या भावना तू चांगल्या जाणतेस, पण मुद्दामच तू मला भेटत नाही !! न भेटण्याने आता काही होणार नाही, मी तुझ्याशिवाय क्षणभरही जगु शकणार नाही ! आपले मिलन ही तर दैवाचीच इच्छा, त्याला तू किंवा मी टाळु शकणार नाही !! तुझं नि माझं जन्मोजन्मीचं नातं आहे, हा काही आज उद्याचा खेळ नाही ! तुझ्याशिवाय मी आणी माझ्याशिवाय तू, असं स्वप्नातही शक्य होणार नाही !! तू समजुन का घेत नाही.......... कसं गं तुला काही समजत नाही ! साधी,सरळ आणी सोपी गोष्ट आहे, तुझ्याशिवाय मला राहवत नाही ! तू हे समजुन का घेत नाही !! शरीर माझे आहे पण हृदय मात्र तुच आहेस कस सांगू तुला श्वास च्या कणाकणात तुच आहेस इतके इतके प्रेम करतो तुझ्या वर माझे मलाही सांगता येणार नाही अशी का छळवतेस मला खरच सांग ना प्रिये तु माझीच आहेस तू समजुन का घेत नाही.......... कसं गं तुला काही समजत नाही ! साधी,सरळ आणी सोपी गोष्ट आहे, तुझ्याशिवाय मला मी पणा नाही ! तू हे समजुन का घेत नाही !! तू समजुन का घेत नाही

No comments:

Post a Comment

Featured Post

              राजा  भगवंतराव ज्यू कॉलेज११ वी १२ वी कला व विज्ञान शाखेत शिकत असणार्या विध्यार्थ्यासाठी आरोग्य आणि शारीरिक शिक्षण विषयची लिंक...