Saturday, August 8, 2015

नव्या फोनमध्ये घेताना… सध्या अधिकाधिक आधुनिक स्मार्टफोन अक्षरशः दररोज बाजारात दाखल होत आहेत. त्यामुळे अनेक जण आपला स्मार्टफोन कमी कालावधीतच अपग्रेड करतात. त्यामुळे डेटा जुन्या स्मार्टफोनमधून नव्या फोनमध्ये घेणे, हे मात्र कठीण होऊन बसते. हे अवघड वाटणारे काम सोपे करण्यासाठी या काही टिप्स... सर्व फोटो आणि व्हिडिओ जुन्या फोनमधील फोटो आणि व्हिडिओ नव्या फोनवर ट्रान्स्फर करण्यासाठी सगळ्यात आधी ते फोनमधून कम्प्युटरवर घ्यावेत आणि नंतर दुसऱ्या फोनमध्ये घ्यावेत. कम्प्युटर नसल्यास खालीलपैकी एखादी पद्धत वापरता येऊ शकेल. मेमरी कार्डचा वापर : ईएस फाइल एक्स्प्लोअरचा वापर करून प्रथम तुमच्या फोन मेमरीतील फोटो आणि व्हिडिओ मायक्रोएसडी कार्डवर घ्या. हे कार्ड दुसऱ्या फोनमध्ये घातल्यावर तुमचा सगळा डेटा त्या फोनवर जातो. या अॅपमध्ये एका वेळी अनेक फाइल्स सिलेक्ट करता येण्याची आणि नव्या ठिकाणी पाठवण्याची सोय आहे. 'वाय-फाय'चा वापर : तुमच्या फोनमध्ये मायक्रोएसडी कार्डचा स्लॉट नसेल, तर तुमचे फोटो आणि व्हिडिओ दुसऱ्या फोनवर वायरलेस पद्धतीने पाठवता येतात. एका फोनमधून दुसऱ्या फोनमध्ये वायरलेस डेटा ट्रान्स्फर करण्यासाठी प्ले स्टोअरवर अनेक अॅप्लिकेशन्स उपलब्ध आहेत. त्यात शेअरइट, क्झेंडर, एसएफटी (स्विफ्ट फाइल ट्रान्स्फर), सुपरबीम आदींचा समावेश आहे. अॅप ट्रान्स्फर फोनवरील अॅपच्या संपूर्ण बॅकअपसाठी हेलिअम हे अॅप चांगले आहे. यात बॅकअप घेतलेली अॅप नव्या फोनवर ट्रान्स्फरही करता येतात. तुम्हाला तुमचा अँड्रॉइड फोन रिसेट करायचा असेल, तर हेलिअम अॅप वापरल्यास तुमच्या फोनवरची अॅप्स तुम्हाला पुन्हा डाउनलोडही करावी लागत नाहीत. हे अॅप डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला फोनमधील ज्या अॅप्सचा बॅकअप घ्यायचा असेल, ती सिलेक्ट करा. 'अॅप डेटा ओन्ली' हा पर्याय सिलेक्ट केल्यास बॅकअपची फाइल लहान असेल, पण तुम्हाला डेटा नंतर डाउनलोड करावा लागू शकतो. तुम्हाला पूर्ण बॅकअप हवा असेल, तर हा पर्याय सिलेक्ट करू नका. मायक्रो एसडी कार्ड, एक्स्टर्नल यूएसबी स्टोअरेज किंवा पर्सनल कम्प्युटर या ठिकाणी तुम्ही बॅकअप घेऊ शकता. जाहिरातींपासून सुटका हवी असेल, बॅकअपचे वेळापत्रक ठरवायची सुविधा हवी असेल, ड्रॉपबॉक्स, गुगल ड्राइव्ह यांसारखी बॅकअप सोल्युशन्स हवी असतील, तर अॅपचे प्रीमिअम व्हर्जन घ्यावे लागते. काँटॅक्ट्स अनेक जण आपल्या फोनमधील काँटॅक्ट्स गुगल अकाउंटशी सिंक्रोनाइज करून ठेवतात. त्यामुळे नव्या फोनवरून साइन इन केल्यानंतर गुगल अकाउंटवरचे काँटॅक्ट्स आपोआप नव्या फोनमध्ये ट्रान्स्फर होतात. तुमचे काँटॅक्ट्स गुगल अकाउंटशी सिंक केलेले नसतील, म्हणजे केवळ फोनवरच सेव्ह केलेले असतील, तर ते नव्या फोनमध्ये ट्रान्स्फर करण्यासाठी दोन पद्धती आहेत. सिम कार्डचा वापर सिम कार्डवर २५० काँटॅक्ट्स सेव्ह करण्याची क्षमता असते. तुमचे काँटॅक्ट्स २५०पेक्षा कमी असतील, तर सिम कार्डद्वारे ते नव्या फोनवर ट्रान्स्फर करणे सहज शक्य आहे. त्यासाठी तुमच्या फोनच्या काँटॅक्ट्स अॅपमध्ये जाऊन इम्पोर्ट-एक्स्पोर्ट काँटॅक्ट्स हा पर्याय निवडा. त्यानंतर तुमच्या फोनवरून काँटॅक्ट्स सिम कार्डवर एक्स्पोर्ट करा. हे सिम कार्ड नव्या फोनमध्ये घालून तिथे 'इम्पोर्ट फ्रॉम सिम कार्ड' हा पर्याय वापरून ते सारे काँटॅक्ट्स फोनवर ट्रान्स्फर करता येतात. मेमरी कार्डचा वापर फोनमधील अॅड्रेस बुक मेमरी कार्डमध्ये ट्रान्स्फर करता येते. काँटॅक्टची फाइल फोनमध्ये '.vcf' या फॉरमॅटमध्ये सेव्ह होते. हे मेमरी कार्ड नव्या फोनमध्ये घालून काँटॅक्ट्स इम्पोर्ट करता येतात. या पद्धतीने हजारो काँटॅक्ट्सही ट्रान्स्फर करता येतात. की-बोर्ड, सेव्ह केलेले शब्द आपल्या स्मार्टफोनच्या कीबोर्डचे प्रशिक्षण देण्यासाठी बराच वेळ लागतो. नेहमी वापरले जाणारे शब्द, ठिकाणांची किंवा व्यक्तींची नावे तुम्ही की-बोर्डमध्ये अॅड करत राहता. त्यामुळे टायपिंग वेगाने करायला मदत होते. जेव्हा तुम्ही स्मार्टफोन बदलता, तेव्हा मात्र की-बोर्डला दिलेले हे सारे प्रशिक्षण वाया जाते आणि पुन्हा नव्याने सारे करावे लागते. स्विफ्टकी किंवा स्वाइप यांपैकी कोणता की-बोर्ड तुम्ही वापरत असाल, तर मात्र ही समस्या येत नाही. या की-बोर्डसाठी अकाउंट तयार होते. त्यामुळे तुम्ही फोनच्या की-बोर्डमध्ये सेव्ह केलेले शब्द सर्व्हरला सेव्ह होतात. फोन बदलल्यावर तुम्ही अॅप पुन्हा डाउनलोड करून साइन इन केले, की तुमचे सेव्ह केलेले शब्द तुम्हाला पहिल्याप्रमाणेच वापरता येतात. टेक्स्ट मेसेज काँटॅक्ट्स ट्रान्स्फर करणे तसे सोपे असले, तरी फोनमधील मेसेज ट्रान्स्फर करणे काहीसे गुंतागुंतीचे असते. 'फ्री एसएमएस बॅकअप अँड रिस्टोअर अॅप' (रितेश साहू) या कामासाठी उपयुक्त आहे. या अॅपवर जाहिराती असतात, पण त्याद्वारे एकदम सोप्या पद्धतीने 'वन टच बॅकअप आणि रिस्टोअरेशन' शक्य आहे. त

No comments:

Post a Comment

Featured Post

              राजा  भगवंतराव ज्यू कॉलेज११ वी १२ वी कला व विज्ञान शाखेत शिकत असणार्या विध्यार्थ्यासाठी आरोग्य आणि शारीरिक शिक्षण विषयची लिंक...