Monday, July 22, 2024

*शिक्षण सप्ताह विशेष

https://youtu.be/8OzerRQJmXg?feature=shared


*शिक्षण सप्ताह विशेष* 

राज्यातील सर्व शाळांमधून आजच्या शिक्षण सप्ताहच्या पहिल्या दिवसाला उत्तम प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांनी आजच्या दिवसाच्या नियोजनानुसारच्या उपक्रमांमध्ये सक्रीय सहभाग नोंदविला आहे.

याच अनुषंगाने राज्यस्तरावरून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांचेमार्फत उद्या दिनांक २३/०७/२०२४ रोजी शिक्षण सप्ताहाचा दुसरा दिवस म्हणजेच *पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान (FLN)* वर आधारित दिवस असल्याने सकाळी ११:०० वाजता *पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान (FLN)* या विषयावर तज्ञांच्या वेबिनार सत्राचे आयोजन ऑनलाईन स्वरूपामध्ये करण्यात आलेले आहे. सदरच्या सत्राची
 *लिंक : https://youtube.com/live/HgbVAv32hWs?feature=share* 

तरी सदरच्या लिंक वर क्लिक करून आपण सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना सदरच्या सत्राचे प्रक्षेपण दाखविण्यात यावे. तसेच उद्याच्या नियोजित उपक्रमांचे देखील शाळांमध्ये आयोजन करण्यात यावे. *या सर्व उपक्रमांचे फोटो आपणांस यथावकाश उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या लिंक सोबतच सद्यस्थितीत विविध समाजमाध्यमांवर जसे - फेसबुक, इन्स्टाग्राम,ट्वीटर इत्यादी वर शेअर करत* असताना *#ShikshaSaptah #NEP2020 #PMSHRI #FoundationalLiteracy&Numeracy #Scertmaharashtra* या हॅशटॅगचा वापर करावा.

याचबरोबर FLN वरील काही चित्रफितींच्या लिंक खालीलप्रमाणे :- 

1) https://www.youtube.com/watch?v=8OzerRQJmXg&ab%20channel%20NCERTOFFICIAL 

2) https://www.youtube.com/watch?v=1HhhPPhQJdA&ab%20channel=NCERTOFFICIAL



सर्वांना शिक्षण सप्ताहाच्या द्वितीय दिवसासाठी शुभेच्छा!

*राहूल रेखावार (भा. प्र. से.)*
*संचालक* 
*राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे.*

No comments:

Post a Comment

Featured Post

मेजर ध्यानचंद

* Major Dhyan Chand: The Hockey Legend summary of Major Dhyan Chand’s inspirational story for your blog on the occasion of National Sports D...