Thursday, April 9, 2020

*जागतिक जैविक युद्धात प्रतिबंध हाच उपाय,संयमाचीही कसोटी..*

'मानवजातीच्या शत्रूसंगे युद्ध आपुले सुरू'

कोरोना तथा कोव्हीड-१९ विषाणूने जगभरात कहर माजविला असून मानवजातीच्या अस्तित्वाला आव्हान निर्माण झाले आहे. जगाने विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात दोन महायुद्धे पाहिली. कोरोना मुळे युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली असली तरी हे महायुद्ध नव्हे,मात्र जैविक युद्ध निश्चितच आहे.

इतिहासाचा अभ्यासक म्हणून दोन महायुद्धे,त्यानंतरचे शीतयुद्ध यांच्या पार्श्र्वभूमीवर घेतलेला हा आढावा.

सध्या प्रशासनात अवांतर  वाचनास वेळ मिळत नाही, त्यातून लिहावयास वेळ मिळणे दुरापास्तच!लाॅकडाऊनच्या काळात मिळालेल्या वेळेमुळे टाकलेला  हा एक दृष्टिक्षेप!

कोरोनावर सध्यातरी प्रतिबंधाशिवाय कोणताही इलाज नाही. त्यामुळे या जागतिक महामारीचा अंत केव्हा व कसा होणार हे आजतरी कोणी सांगू शकत नाही.
लाॅकडाऊन मुळे व्यापार-उद्योगधंदे ठप्प झाल्याने दोन्ही महायुद्धात झालेल्या वित्तीय हानीपेक्षा कितीतरी अधिक पटीने नुकसान कोरोना संकटाने होत आहे, जिवित-मनुष्यहानी महायुद्धांच्या तुलनेने कमी करणे मानवाच्याच हाती आहे.भारताने याबाबत अन्य देशांच्या तुलनेत केलेली उपाययोजना चांगली आहे.या कठिण काळाला सामोरे जायचे असेल तर शासन-प्रशासनाचे आदेश पाळायलाच हवेत.

प्रशासनातील एक अधिकारी व नैतिक कर्तव्य म्हणून सर्वांना केलेले आवाहन..! Stay@Home

No comments:

Post a Comment

Featured Post

HSC english Board practice paper for study

https://online.fliphtml5.com/ykpcc/hmpl/