Friday, August 31, 2018

आयुष्य म्हणजे काय ?

रोज सकाळी जीवावर उदार होऊन, अत्यंत कष्टाने अंथरुणातून शरीर उचलून दिवसाची सुरुवात करणं म्हणजे आयुष्य नव्हे
तर उत्साहाने ‘आजचा दिवस माझाच आहे’ म्हणत, स्मित हास्याने जागं होणं म्हणजे आयुष्य…

जुन्या कष्टदायक आठवणींना चिटकून राहून आताचा प्रत्येक क्षण वाया घालवणं म्हणजे आयुष्य नव्हे
तर आलेल्या प्रत्येक क्षण त्या क्षणात राहून जगणं, त्याचा आनंद लुटणं म्हणजे आयुष्य

आपल्या जीवनात घडलेल्या वाईटासाठी, परिस्थिती आणि लोकांना दोष देत राहणं म्हणजे आयुष्य नव्हे ..
तर जे काही घडलं त्याची जबाबदारी स्वतः घेणं, त्यातून चांगलं काय ते शिकून, चांगलं घडवणं म्हणजे आयुष्य

जे न मिळालं त्यासाठी सततची तक्रार करणं म्हणजे आयुष्य नव्हे
तर जे काही मिळालंय त्यासाठी सातत्याने कृतज्ञ राहणं म्हणजे आयुष्य

वादळ संपण्याची, पाऊस थांबण्याची वाट बघत आडोश्याला लपणं म्हणजे आयुष्य नव्हे
तर बाहेर पडून, बेधुंद होऊन, पावसात मनसोक्त भिजणं म्हणजे आयुष्य

Whats App, Facebook वर न पाहिलेल्या १०० मित्रांशी तासंतास गप्पा मारणं, मेसेज फॉरवर्ड करणं म्हणजे आयुष्य नव्हे
तर जुन्या एखाद्या मित्राला कॉल करून, भेटून कॉलेजबाहेरच्या चहाच्या टपरीवर कटिंग पीत मनसोक्त गप्पा मारणं म्हणजे आयुष्य

आपल्यात राहून, केवळ आपल्यासाठी जगणं म्हणजे आयुष्य नव्हे
तर इतरांच्या जीवनात योगदान करून, त्यांना आपलंसं करणं म्हणजे आयुष्य

लोक दोष देतील, टीका करतील, त्याने खचून जाणं म्हणजे आयुष्य नव्हे
तर आपल्या स्वप्नांवर ठाम राहून, स्वतःवर विश्वास ठेवून, ध्येयपुर्तीची वाटचाल करणं म्हणजे आयुष्य

गर्दीत जाऊन, गर्दीचा भाग होणं आणि गर्दीत भर होऊन जगणं म्हणजे आयुष्य नव्हे
गर्दीत राहून, मोठी स्वप्न बाळगून, ती पूर्ण करून, त्या गर्दीतूनही उठून दिसणं म्हणजे आयुष्य !!

- विनोद मेस्त्री

No comments:

Post a Comment

Featured Post

english grammar and practice filphtml book

https://online.fliphtml5.com/ykpcc/xphi/