Tuesday, September 15, 2015

नमस्कार मित्रांनो, गणेश उस्तव हा सण आपल्या प्रत्येकाच्या घरात आपण आनंदाने साजरा करतो. भाग्यालीखीत परिवारातर्फे गणेश उस्तवाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा ! गणेश मूर्ती कशी असावी ? एकदंती, चार हात असलेली पाश व अंकुश हि दोन आयुधे हाती असलेली, दर्शन घेणार्याला प्रसन्न मुद्रेने आशीर्वाद देणारी, लाल वर्णाची, लंबोदर, सुपासारखे मोठे कान असलेली, केशरी रंगाच्या गंधाचा सर्वांगाला लेप असलेली अशा पद्धतीची गणेश मूर्ती असावी. घरातील पूजेसाठी ९ ते १० इंच उंची असलेली आसनस्थ, व्यवस्थित मांडी घातलेली किंवा एक पाय उभा व एक पाय मांडी घातल्या प्रमाणे दुमडलेला अशी गणेश मूर्ती असावी. गणेश प्रतीष्टापनेसाठी मुहूर्त - भाद्रपद शुद्ध चतुर्थी मध्यानकाळाला ज्या दिवशी असेल तो दिवस गणेश स्थापनेचा असतो, प्रतीष्टपणा म्हणजे आपण आणलेली शाडूमातीची मूर्ती पूजना साठी सजीव करणे. गणेश चतुर्थी गुरुवार दिनांक १७/०९/२०१५ रोजी आहे. या दिवशी प्रातःकाल पासून मध्यान्ह पर्यंत म्हणजेच दुपारी ०१:३० पर्यंत गणेशाची प्रतीष्टापना करावी. गुरुवारी सूर्यास्तापूर्वी घरात वाजत गाजत गणेश मूर्ती आणावी, गणेशावर नवीन वस्त्र घालून घरात आणावे. घरात ज्या ठिकाणी प्राण प्रतीष्टापना करणार आहोत, तेथे गणेशास झाकून ठेवावे. खालील प्रमाणे गणेश प्रतिष्ठापना करावी - १) चतुर्थी दिवशी पहाटे उठून स्नान करून आई, वडील, गुरु जणांना नमस्कार करावा. २) त्यानंतर घरातील देवांची पूजा करून गणेशाची प्रतीष्टापना करावी. " ओम गं गणपतेय नम: " म्हणत पूजा करावी." वक्रतुंड महाकाय " हा श्लोक म्हणत ध्यान करावे. दुर्वा तुपात बुडवून गणपतीच्या सर्व अंगास लावावी. ३) त्यानंतर गणेशाच्या हृदयस्थानी बोट ठेऊन २१ वेळा ओमकार जप करावा. दुर्वा पाण्यात बुडवून गणेशाच्या हात,मुख व पायाला लावाव्यात. नंतर पंचामृताने व पाण्याने हाच विधी करावा. ४) दुर्वा, अक्षदा , कुंकू गणेशाच्या मस्तकावर ठेवावे. उदबत्ती, धूप व दीपाने गणेशास ओवाळावे. पंचामृताचा नैवेद्य दाखवावा. नंतर गणेशाच्या डोक्यावरच्या अक्षदा काढून डोक्यावर पाणी शिंपडून अभिषेक करावा. ५) या नंतर गणेशास तांबडे किंवा भगवे वस्त्र, जानवे घालावे. केवडा,अत्तर, गंध,चंदन लावावे. ६) जास्वंदीची फुले तसेच २१ प्रकारच्या पत्री वाहाव्यात. गूळखोबरे यांचा नैवेद्य दाखवावा. ७) तसेच फळे व विडा गणेशा समोर ठेऊन संकल्प करावा. ८) नंतर गणेशाची आरती व मंत्र पुष्पांजली म्हणून पूजा पूर्ण करावी. ९) व सर्वात शेवटी मनातली इच्छा गणेशास बोलावी. सूचना :- नामस्मरण = या १० दिवसात रोज नियमित पणे ठरलेल्या वेळी अथर्व शीर्षाचा पाठ म्हणावा, व मनातील इच्छा बोलाव्यात त्या पूर्ण होण्यास व गणेशाची कृपा प्राप्त होण्यास मदत होईल. तसेच " ओम गं गणपतेय नम: " हा मंत्र रोज कायम म्हणावा

No comments:

Post a Comment

Featured Post

HSC english Board practice paper for study

https://online.fliphtml5.com/ykpcc/hmpl/