Wednesday, August 5, 2015

Yoga pranayam दिनांक- १२/०५/२०१३ नमस्कार मित्रांनो, आज थोडेसे प्राणायामाबद्दल....आज श्वास आणि प्राणायामाबद्दल जास्तीत जास्त [परिपूर्ण नव्हे] माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. अवश्य अवश्य वाचा...कृपया कंटाळा करू नका...आवडले का ते अवश्य सांगा....केवळ "Like" मारून पुढे जाऊ नका. तुम्ही हा लेख तुमच्या संग्रही ठेवलात तरी चालेल. मित्रांनो प्राण हाच जीवनाचा आधार आहे. प्राण हेच जीवन आहे. प्राण हेच सर्वस्व आहे...पंचप्राणांनी प्रिय व्यक्तीला ओवाळणारी भारतीय नारी हेच तर सांगत असते. प्राण या नटाबद्दल आपल्याला जेव्हढी माहिती असते त्याच्या एक सहस्रांश सुद्धा माहिती २ नाकपुड्यांतून वाहणारया या "प्राण" म्हणजेच श्वासाबद्दल नसते. प्राण म्हणजे प्र + आन = विशिष्ट गतीने पुढे आणणे/ नेणे. जसे प्रकाश म्हणजे प्र + काश = पुढे + पोकळीला आवरण करीत जाणे,प्रगती म्हणजे पुढे + गती अर्थात पुढे नेणारी गती होय. प्राण या सृष्टीत "ओतप्रोत" [ओत= ओतान अर्थात इलेक्ट्रोनस तर प्रोत म्हणजे प्रोटोनस होय....याचाच अर्थ हे जग इलेक्ट्रोन आणि प्रोटोन्स यांनी बनलेले आहे हे आपल्या धोतर नेसणारया, जटा वाढवणारया आणि जंगलात राहणारया ऋषींना माहित होते तर.......!!!!!] भरून राहिला आहे. जेव्हा तो मानव प्राणी अथवा प्राणी यांच्या नाकपुडीतून संचार करतो तेव्हा त्याला श्वास असे म्हणतात. हा श्वास एका वेळी डाव्या किंवा उजव्या नाकपुडीतून वाहत असतो. डाव्या नाकपुडीला चंद्र नाडी अथवा इडा असे म्हणतात. आणि उजव्या नाकपुडीला पिडा अथवा पिंगला असे म्हणतात. डाव्या नाकपुडीतून श्वास वाहात असताना तो कमी उष्ण असतो तर उजव्या नाकपुडीतून वाहताना श्वास तुलनेने थोडा जास्त उष्ण असतो. दिवसातील काही क्षण असे असतात की ज्या वेळेला श्वास दोन्ही नाकपुड्यानमधून वाहात असतो. या प्रकाराला "सुषुम्ना" नाडी असे म्हंटले जाते. सुषुम्ना नाडी अतिशय क्रूर समजली गेलेली असून या नाडीवर म्हणजे सुषुम्ना चालू असताना कोणतेही शुभ कार्य, मंगल कार्य अजिबात करू नये. अपयश येण्याची शक्यता जास्त असते. फक्त देवाची उपासना, ध्यान या वेळेस करावे. घराच्या बाहेर पडू नये. सर्वसाधारणपणे सकाळी ६, दुपारी १२, संध्याकाळी ६ आणि रात्री १२ वाजता सुषुम्ना नाडी विशेष करून चालू असते. म्हणूनच पूर्वी संध्याकाळी मुलांची दृष्ट काढताना "इडा पीडा टळो" असे म्हंटले जात असे. म्हणजे "इडा आणि पिडा" म्हणजे चंद्र आणि सूर्य नाकपुडी एकाच वेळेस चालू असणारी सुषुम्ना नाकपुडी जी या वेळेस चालू असते तिच्यामुळे होणारे त्रास दूर होवोत....शास्त्रीय भाषेत सांगायचे तर चंद्र नाकपुडी चालू असताना उजवा मेंदू आणि सूर्य नाकपुडी चालू असताना डावा मेंदू चालू असतो. आधुनिक विज्ञान सुद्धा हेच सांगते की एका वेळेस मेंदूचा एकच अर्धा भाग काम करत असतो असतो. मूर्ती शास्त्र - डाव्या सोंडेचा गणपती, उजव्या सोंडेचा गणपती यावरच आधारलेले आहे. सुषुम्ना नाडी चालू असताना दोन्ही मेंदू एकाच वेळेस काम करून एकमेकांशी जुळवणूक करून घेत असतात. दुसरया भाषेत सांगायचे तर मेंदूचा प्रत्येक एक भाग दुसर्या भागाच्या कार्यकालात शरीरात काय घडामोडी झाल्या आहेत हे समजून घेण्यात व्यस्त असतो. भारतीय अध्यात्म शास्त्रानुसार मन हे आत्म्यात विलीन झालेले असते. आणि आपले बाहेरच्या घडामोडींकडे थोडे दुर्लक्ष झालेले असते. त्यामुळे एखादी वाईट घटना घडू शकते......आता एखाद्या अडाणी मातेने इडा पिडा टळो असे म्हंटल्यावर "तथाकथित/सो called विज्ञानवादी हसणार नाहीत असा विश्वास आहे. ह्याच नाड्यांचे संयमान करण्यासाठी "रामदास स्वामी" आणि इतर योग्यांकडे "योगदंड किंवा कुबडी" असे. तसेच रामदास स्वामींच्या या कुबडी मध्ये गुप्ती सारखे शस्त्रही होते. ज्याचा उपयोग शत्रूशी वेळप्रसंगी लढण्यासाठी होत असे. जी नाकपुडी वाहणे चालू करायचे असते तिच्या उलट बाजूच्या काखेत हा दंड, आपला हात किंवा इतर एखादी वस्तू दाबून धरल्यास विरुद्ध बाजूची नाकपुडी वाहणे सुरु होते.] चंद्र स्वरावर आकुंचन होते तर सुर्यस्वरावर प्रसरण होते. चंद्र स्वरावर अर्थात चंद्र/इडा नदीवर म्हणजेच डावी नाकपुडी चालू असताना शुभ कार्ये, पाणी पिणे वगैरे कामे करावी. तर उजवी नाकपुडी चालू असताना क्रूर कामे, जिथे शक्ती जास्त आवश्यक अशी कामे, भोजन वगैरे करावे. उन्हात जाताना उजवी नाकपुडी चालू असताना गेले तर त्रास कमी होतो आणि याच्या उलट डावी नाकपुडी चालू असताना उन्हात हिंडले तर त्रास जास्त होतो. जेवताना आणि जेवल्या नंतर उजवी नाकपुडी चालू असेल तर पचन चांगले होते. म्हणूनच दुपारी जेवल्यावर वामकुक्षी घ्यावी असे जे म्हंटले जाते ते याचसाठी. "वाम" म्हणजे डावी बाजू. कुक्षी म्हणजे कूस. कुशी. डाव्या कुशीवर झोपल्याने उजवी नाकपुडी अर्थात सुर्यस्वर चालू होतो. सूर्य स्वर चालू झाल्याने शरीरातील ग्रंथी, आतडी प्रसारित होतात. पोटात पचनासाठी आवश्यक असले

No comments:

Post a Comment

Featured Post

step in Book review

Certainly! Here’s a detailed step-by-step guide for HSC English students on how to write a book review. This structured approach will help y...