Friday, August 28, 2015

बारावीसाठीही फेरपरीक्षा लवकरच पुणे - यंदा दहावीची फेरपरीक्षा ऑक्‍टोबरऐवजी जुलै-ऑगस्टमध्ये घेऊन विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये, यासाठी प्रयत्न करण्यात आले. या प्रमाणेच पुढील वर्षी बारावीची फेरपरीक्षादेखील लवकरात लवकर घेऊन विद्यार्थ्यांचा "बारावी नापास‘चा शिक्का पुसण्याचा विचार राज्य पातळीवर सुरू आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे जुलै-ऑगस्टमध्ये दहावीची फेरपरीक्षा झाली. या परीक्षेचा निकाल मंगळवारी लागला. त्यात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना यंदाच्याच वर्षी अकरावीत प्रवेश दिले जाणार आहेत. या प्रकारचा हा पहिलाच प्रयत्न होता. त्यानंतर पुढील वर्षी दहावीबरोबरच बारावीच्या विद्यार्थ्यांसाठीदेखील अशी फेरपरीक्षा घेण्याबाबत सरकार विचाराधीन आहे. यासाठी दोन्ही फेरपरीक्षा लवकर घेण्यासाठी तयारी दर्शविली आहे, अशी माहिती मंडळाचे सचिव कृष्णकुमार पाटील यांनी दिली.

No comments:

Post a Comment

Featured Post

HSC english Board practice paper for study

https://online.fliphtml5.com/ykpcc/hmpl/