Wednesday, August 5, 2015

मन नावाचा गुरु नवनवीन प्रयोग करणे ही युवा पिढीची खासियत. इतरांनी सल्ले दिले तरी स्वत:ला काय हवं याचा शोध घेणारी तरुणाई त्यांच्या ‘आतला आवाज’रुपी गुरुचं जास्त ऐकते. समोर ही दरी.. बाजूने धबधबा कोसळतोय. त्याचा तो धोस्स. करत घुमणारा आवाज पाण्यात किती ताकद असते याची जाणीव करून देणारा.. खाली पाहिलं तर फक्त शुभ्र फेसाळ प्रवाह. त्या सरळसोट कडय़ावरूनच रॅपलिंग करत खाली उतरायचं होतं.. आपापलं. एकटय़ाने. इन्स्ट्रक्टरच्या सगळ्या सूचना देऊन झाल्या. त्या सगळ्या कानावरून गेल्या . एवढंच काय ते जाणवलं. पण खरी आत जाणीव होत होती ती वेढत जाणाऱ्या भीतीची आणि फुफाटत सांडणाऱ्या पाण्याची. डगमगत, चाचपत उतरायला सुरुवात केली खरी. पण एका क्षणी पाय घसरला. तोंडावर आपटलेच जवळजवळ.. आणि अशा टप्प्यावर होते की परतीचा मार्ग नव्हता. त्याक्षणी लख्ख जाणवलं. कोणीही नाहीये आत्ता तुझ्याबरोबर. तुझी तू.. पडलीस तरी आणि सावरलीस तरी. सगळं लक्ष आत खोल एकवटलं गेलं.. मनातल्या भीतीला पार बाजूला सारत कोणीतरी आतून आधार देतंय हे जाणवलं आणि हिय्या करून तो अवघड टप्पा पार केला. या गोष्टीला आता काळ लोटला तरी ती ताजी असल्यासारखीच वाटते. कारण जाणवत राहतं, कोण होतं तेव्हा बरोबर? आपणच आपले. आणि आपला आतला आवाज.. आपला पहिला गुरू..!!! वाटाडय़ा, तत्त्वचिंतक आणि जिवाभावाचा पहिलावहिला मित्र..!! कळायला लागल्यापासून, ‘मी’पणाची जाणीव व्हायला लागल्यापासून हा आतला आवाज आपली सोबत करतोय हे आपल्याला अस्पष्टसं कळत असतं.. आई, बाबा, शिक्षक, मित्र या सगळ्यांकडून शिकता शिकता या आतल्या गुरूचं अस्तित्व मोठं होत जाऊ तसं प्रकर्षांने जाणवायला लागतं.. सुरुवातीला आपण सगळेच अगदी कच्चं मडकं असतो म्हणा ना. मग बोलणी खाऊन खाऊन, ढीगभर सल्ले ऐकून, आपल्या पालकांनी पाहिलेल्या पावसाळ्याच्या गोष्टी ऐकून आपण इथवर येतो. पण त्यादरम्यानही कोणाला तरी मनापासून गुरू स्वीकारणं ही प्रोसेस सुरू झालेली असते. मग आपण गणितात कितीही पक्के असलो तरी आपलं भाषेशी सगळ्यात जास्त जमतं आणि इनडोअर गेम्सपेक्षा ट्रेकिंगला आणि भटकायला आपल्याला खूप आवडतंय. अशी खास दिलकी बात हा आतला गुरूच सगळ्यात आधी ओळखतो. तेव्हापासूनच नात्याची ही वीण अधिकाधिक घट्ट व्हायला लागते. पटेल तेच स्वीकारणारी आणि स्वत:च्या आयुष्यातल्या माणसांबद्दल सडेतोड निश्चित मतं असणारी, अगदी कोणाकडून काय शिकायचं किंवा कोणाचं म्हणणं किती मनावर घ्यायचं हे स्वत: ठरवणारी आमची पिढी निर्णय घेताना या गुरूचं मत मात्र आवर्जून घेताना दिसते. आणि म्हणूनच ‘आय फॉलो मायसेल्फ’ हा अ‍ॅटिटय़ूड आत्ताच्या पिढीमध्ये दिसतो. ‘‘मला माझे केस थोडे विस्कटलेलेच आवडतात. कसा छान मेसी लुक येतो त्याला, काय हरकत आहे फ्रेश, बोल्ड रंग वापरायला. इट्स माय स्टाइल. कोणी सांगितलं दहावी, बारावीत एकदम चांगले मार्कस् मिळाले म्हणजे इंजिनीअर किंवा डॉक्टरच व्हायला हवं. मला मानसशास्त्रात जास्त रस आहे त्यापेक्षा. मी सरकारी नोकरीत लागण्यापेक्षा माझा व्यवसाय सुरू करेन. मग त्यासाठी थोडं थांबावं लागलं तरी चालेल किंवा अगदी पुढे जाऊन पाहिलं तर. मला नाही इतक्यात लग्न करायचं. आलेला मुलगा कितीही चांगला असला तरीही. नाही माझ्या मनाची आत्ता तयारी.’’ इथपर्यंतच्या प्रत्येक टप्प्यावर ही जनरेशन नेक्स्ट सजग असते ती त्यांच्या सुस्पष्ट विचारांमुळेच. आणि या विचारापर्यंत येऊन पोहोचायला मदत करतो हा आतला आवाज. आजच्या पिढीचं फेसबुक, हाईक, व्हॉट्सअ‍ॅपसारख्या व्हच्र्युअल रिअ‍ॅलिटीमध्ये रमणं हा टीकेचा विषय ठरतं खरं. पण, तीच पिढी जेव्हा स्वत:चे निर्णय स्वत: घेताना, बाकी कशाचाही कितीही दबाव आला तरी या आतल्या गुरूचाच कौल घेते तेव्हा त्यांच्यातलं गुरू-शिष्याचं नातं अधिकाधिक गहिरं होत असतं. ‘‘या हल्लीच्या काटर्य़ाना शिंग फुटलीत अगदी. कोणाचं म्हणून ऐकायला नको.’’ ही बोलणी या पिढीला काही नवीन नाहीत. पण तरीही स्वत: अनुभवणं, त्यावर विचार करणं, स्वत:च्या चुकांमधून शिकणं आणि सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे या आतल्या गुरूला मनापासून प्रतिसाद देणं हे या पिढीला सगळ्यांत जास्त भावतं. ‘कोणी म्हणतंय म्हणून करणं’ ते ‘मला योग्य वाटतंय म्हणून करणं’ इथपर्यंतचा हा सगळा प्रवास आहे. या सगळ्या प्रवासात स्वत:चा स्वत:शी साधला जाणारा संवाद आपल्याला आपल्या आतल्या गुरूपर्यंत घेऊन जातो. आपल्याला तो सगळ्यांत जास्त जवळचाही वाटतो. कारण आपण एखादी गोष्ट ‘का’ करावी याचं लॉजिकल उत्तर त्याच्याकडे असतं. आपल्या आजूबाजूला कधी माणसं असतात तर कधी नसतात. कधी कधी विचारायला प्रत्येक जण असूनही खरं उत्तर काही सापडत नाही. ‘ग्रॅज्युएशननंतर मास्टर्स, एमबीए की आणखीन काही, ‘त्या’ला किंवा ‘ती’ला हो म्हणू की नको. नक्की जमेल का आमचं? स्वीकारावा का हा शिफ्ट डय़ूटीचा जॉब?’ अशा अनेक प्रश्नांची उत्तरं द्यायला, त्यावर सल्ले द्यायला सगळे हजर असतात. पण आप

No comments:

Post a Comment

Featured Post

step in Book review

Certainly! Here’s a detailed step-by-step guide for HSC English students on how to write a book review. This structured approach will help y...