Sunday, August 16, 2015

[16/08 11:01] Rautp,blogspot,in: संवाद म्हटलं की कुणी तरी आपल्याशी बोलण्यासाठी असलं तर आपण संवाद साधू शकतो किंवा भ्रमणध्वनी - दूरध्वनीवरून आपणाला संवाद साधता येतो. विचारांची देवाण घेवाण होते. प्रत्यक्ष भेटता येतं नसलं तरीही या संवादांमुळे एक प्रकारे आत्मिक समाधान मिळतं. आपण ज्यावेळी घरात एकटे असतो, त्यावेळी आपण इतर कुणाशीही न बोलता आपल्या मनाशी किंवा अंतर्मनाशी बोला. मनाशी अंतर्मनाशी संवाद साधा. हा मनाशी अंतर्मनाशी होणारा संवाद आपल्याला खूप काही देवून जातो. आपलं मन शांत होतं आणि आपल्या स्वभावातही सकारात्मक बदल घडावयास सुरुवात होते. आपलं काय चुकलं किंवा इतरांशी आपण कसं बोलावयास - वागावयास हवं हे समजून आल्याने आपल्या स्वभावात होतं चाललेला बदल आपण स्वतः अनुभवू शकतो. आयुष्यात निश्चितपणे काही तरी चांगलं घडतं असल्याची जाणीव व्हावयास लागते. आपल्या आयुष्यात सकारात्मक बदल व्हावा असं वाटतं असेल तर आपल्या मनाशी अंतर्मनाशी संवाद साधणे गरजेचे आहे असं माझं मत आहे. विचार करा आणि संवाद साधा मनाशी अंतर्मनाशी. [16/08 11:02] Rautp,blogspot,in: फुलाने अपेक्षा केली का कधी काट्या कडुन आधाराची ? जमिनीने कधी वाट पाहिली का आभाळाच्या सावलीची? किना-याला वाटली का कधी भिती समुद्राच्या पाण्याची ? कधी वा-याने संगत धरली का शेवटपर्यत पाचोळ्याची ? अशीच लढाई आहे आपल्या जीवनाची फक्त आपल्यालाच आहे ती जिंकायची. [16/08 11:21] Rautp,blogspot,in: चा. लाचार हा मनुष्याचा सर्वात वाईट गुणधर्म आहे.कमकुवतपना,दुसरयांचा अन्याय सहन करने हां खरा लाचारिपना आहे.परिस्तिति मनुष्याला लाचार करते पण मन नाही करत.देवाने माणसाला चांगले धड़थाकट पना दिला असल्या मुळे त्याने लाचारी का करावी.लाचारि हां वैयक्तिक गुणदोष नसून मानसिक गुणदोष आहे.दुसर्यावर अवलंबून जीवन जगण्यापेक्षा मेंलेल काय वाईट?मनुष्य हां लाचारित जगताना त्याला खुप दुखाना तोंड द्यावे लागते व् समाजात त्याची किम्मत शून्य असते.अपमान हां लाचारिपनाचा मित्र असल्यामुळे त्या व्यक्तीला पदोपदि अपमान सहन करावा लागतो.म्हणून स्वता कमवा, कष्ट करा व् दुसर्यांनाही जगु दया.लाचारित न जगता कष्ट करून जगाव.कारण कष्टाचि मिठभाकरित स्वताचे कष्ट, ध्यैर्य आत्मविश्वास असते.तर लाचारित फक्त अपमानच असतो.म्हणून कोणत्याही गोष्टीसाठी लाचारिपना करु नका स्वावलंबाने व् कारकिर्दीत जगावे. 84कोटि लक्ष्य योनी नंतर मनुष्य जन्म प्राप्त होतो पण आपन मनुष्य जन्माचे सार्थक न करता त्या देहांला वेगवेगळ्या व्यसनात व् कर्म बन्धनात् अडकून त्या देहाला किड लावून त्या देहाचा नाश करतो.म्हणजे त्या देहाला चांगल्या मार्गाने न लावता अनेक व्यसनात अडकून व् वाममार्गाने त्या देहाचा नाश करतो.ह्यामुळे आपली जीवनात प्रगति होत नाही पण आपल्या आयुष्याच्या पूर्णपणे नाश करतो.म्हणून हां देह चंदनासारखा चांगल्या कर्मासाठी झिजवा व् वाईट व्यसनापासून दूर राहून जीवनाचा पुरेपुर आनंद घ्या. मग कशाला कोणत्या आजाराची किड आपल्या शरीराला पोखरेल.....!!! [16/08 11:25] Rautp,blogspot,in: मोगऱ्याची फुलं जरी झाकून ठेवलेली असली तरी मोगऱ्याच्या फुलांचा सुगंध लपून राहत नाही. अर्थात सर्व गंधीत फुलांच्या बाबतीत अस म्हणता येईल. आपल्या सर्वांना म्हणजे स्त्री असो की पुरुष असो, सर्वांना गंधीत फुले आवडतात. हे फुलांचे गंध मनाला होहारून, प्रसन्नही करतात. आपल्या ओळखीच्या स्त्रीला आपण गजरा किंवा गंधीत फुले दिली तर ती स्त्री तो मोगऱ्याच्या फुलांचा गजरा - गंधीत फुले आनंदाने घेते. कारण तिला आपला स्वभाव माहित असतो. त्याकारणे त्या स्त्रीला राग येतं नाही. मात्र एक गोष्ट ध्यानात घ्या की, अनोळखी स्त्रीला गजरा - फुले देवू नका, नाहीतर भलतेच घडायचे. एक विचारांत घ्या की, स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत काळाची माता आहे, अगदी त्याचप्रमाणे पत्नीशिवाय अन्य स्त्रिया या आपल्या माता आहेत हा विचार मनात रुजावयास हवा. स्त्रिया या महालक्ष्मीच्या, कुलस्वामिनीच्या, गृहलक्ष्मीच्या रुपात असतात. आपण कुठल्याही स्त्रीकडे वाईट नजरेने पाहिले असता, आपल्यावर संकटे आल्यावाचून राहत नाहीत, फक्त या संकटांची कारणे आपल्याला समजून येतं नाहीत. म्हणून स्त्रियांकडे बघण्याचा आपला दृष्टीकोन स्वच्छ, निर्मळ असावयास हवा. असा स्वच्छ, निर्मळ दृष्टीकोन असला की महालक्ष्मी, कुलस्वामिनी, गृहलाक्ष्मीची कृपा आपल्यावर असते. ज्यावेळी आपण ओळखीच्या स्त्रीला गजरा - फुले देतो त्यावेळी आपल्या मनात असा भाव असण्याची गरज आहे की मी हा गजरा एका स्त्रीला दिलेला नसून माझ्या मातेला, कुलस्वामिनीला गजरा - फुले अर्पण केली आहेत. अशा वेळी आपल्याला आपल्या मातेकडून, कुलस्वामिनी किंवा देवींकडून आशीर्वाद मिळतात. हे आशीर्वाद आपल्या आयुष्यात महत्वाचे आहेत यासच जरूर विचार करा. आपली दृष्टी किंवा आपला दृष्टीकोन स्त्रियांकडे पाहण्याचा स्वच्छ, निर्मल असल्यास आनंद आहे. पण अजूनही असा दृष्टीकोन ज्यांचा नसेल त्यांनी आपला स्तीर्याकडे पाहण्याच्या दृष्टीकोन बदलून मातेच्या आश्सिर्वादाची अनुभूती घ्यावी. आपले आयुष्य अधिकाधिक सुंदर करावे.

No comments:

Post a Comment

Featured Post

HSC english Board practice paper for study

https://online.fliphtml5.com/ykpcc/hmpl/