Sunday, August 16, 2015

[16/08 10:35] Rautp,blogspot,in: छोटी सी ज़िंदगी है, हर हाल में खुश रहो जो चेहरा पास ना हो, उसकी आवाज़ में खुश रहो … कोई रूठा हो तुमसे, उसके इस अंदाज़ में खुश रहो … जो लौट के नहीं आने वाले, उन लम्हों की याद में खुश रहो … कल किसने देखा है , अपने आज में खुश रहो … खुशियों का इंतज़ार किसलिए, दूसरों की मुस्कान में खुश रहो … क्यूँ तड़पते हो हर पल किसी के साथ को कभी तो अपने आप में खुश रहो। छोटी सी ज़िंदगी है, हर हाल में खुश रहो [16/08 10:40] Rautp,blogspot,in: आयुष्यात आपण जे जे काही करतो त्या प्रत्येक गोष्टीत आपल्याला यशस्वी व्हायचं असतं आणि त्यासाठी आपण काहीही करायला तयार असतो. कधी आपण यशस्वी होतो तर कधी अपयशी. आपला आत्मविश्वास आणि स्वाभिमान बहुतेकवेळा आपल्याला मिळालेल्या यश-अपयशावर ठरतो. आपण कोणती कामे करणार किंवा सोडून देणार हे देखील आपल्याला कोणत्या क्षेत्रात किती यश किंवा अपयश मिळालं यावरच ठरते. त्याप्रमाणे काही कामे आपण करतो तर काही सोडून देतो. पण काही गोष्टी अशा असतात कि ज्यावर आपलं पूर्ण आयुष्य अवलंबून असतं आणि ते आपण सोडू शकत नाही. पण कितीही मेहनत केली तरीही हवे असलेले यश काही केल्या आपल्याला मिळत नाही. अशावेळी लोकं आपल्याला सांगतात “कदाचित तुम्ही खूप नकारात्मक विचार करता आहात, त्या ऐवजी थोडा सकारात्मक विचार करा म्हणजे यश तुमचेच असेल”. मग लगेचच आपण ठरवतो देखील की आता मी फक्त आणि फक्त सकारात्मक विचारच करणार. पण जेमतेम १०/१५ मिनिटे आणि त्यानंतर पुन्हा आपण आपल्या जुन्या विचारांमध्ये कधी गुंतून जातो ते आपलं आपल्यालाही कळत नाही. काही सांगतात “दृष्टीकोन बदला म्हणजे जग बदलेल”, पण दृष्टीकोन बदलायचा कसा हे मात्र कुणीच सांगत नाही. किंबहुना जे आपल्याला सांगतात, त्यानाही माहित नसते की दृष्टीकोन कसा बदलायचा. ते जे सांगताहेत त्याप्रमाणे खरेच घडते किंवा नाही ह्याची पडताळणी त्यांनी केलेली नसते किंवा त्याचा अनुभव देखील घेतलेला नसतो. त्यानी ते कुठेतरी ऐकलेले असते आणि असे ऐकीव ज्ञान दुसऱ्यांना सांगायला एकदम मस्त वाटते म्हणुन ते ज्ञान??? आपल्याला चिटकवून, तसं करायला ते सांगून टाकतात. जे करायचं आहे ते कशाप्रकारे केले जाते हे जर माहित नसेल तर आपण ते करणार तरी कसे? शेवटी आपण तेच करतो जे पूर्वी करत होतो आणि तेच परिणाम मिळतात जे पूर्वी मिळत होते. फरक काहीच नसतो त्यामुळे आपण आपल्या आयुष्याचा रहाटगाडा नेहमीप्रमाणे तसाच पुढे ढकलत राहतो. मंत्र यशाचा ह्या एकदिवसीय सेमिनारमध्ये तुम्ही तुम्हाला हव्याहव्याशा वाटणाऱ्या यशासाठी स्वतःला तयार करून, कोणत्याही परिस्थितीपुढे हतबल होऊन नतमस्तक न होता, एक परिपूर्ण आयुष्य जगायला सुरुवात करता. [16/08 10:43] Rautp,blogspot,in: चमत्कार अगदी शेवटच्या क्षणीही होऊ शकतो....मग संकट कितीही मोठ असुद्या...फक्त आपण आपले प्रयत्न आणि विश्वास कायम ठेवा...... आयुष्यात चांगली माणसं नकळत मिळतात तोडणं हा क्षणाचा खेळ असतो पण जोडणं हा आयुष्याचा मेळ असतो [16/08 10:45] Rautp,blogspot,in: आपल्यासाठी कुणीही नसले तरी आपण सर्वांसाठी आहोत. ही सुंदर गोष्ट सुंदर फुलांकडून शिकावी. फुलांसाठी कुणीही नसतं, पण फुले ही सर्वांसाठी असतात आणि सर्वांना सारखाच सुगंध देतात, अगदी आनंदाने [16/08 10:52] Rautp,blogspot,in: काळ हा खरा सुधारक आहे. सुईन नुकत्याच जन्माला आलेल्या बाळाची नाळ कापते. पण ही कापाकापी त्याच्या प्राणरक्षणासाठीच असते. काळाचा क्रुरपणाही असाच आहे. तो खुन करत नाही, तर शस्रक्रिया करतो.त्याच्या एका डोळ्यात उन्हाळा असला असला तरी दुसर्या डोळ्यात पावसाळाही असतो . जगाच्या बागेतील या माळ्याच्या कमरेला चकचकीत कोयता चमकत असला तरी, दुसर्या हातात पाण्याची झारी नक्कीच असते. जग आपल्या वाटेवर काटे पसरायला बसलेलेच आहे. ते काटे चुकविता आले तर उत्तमच. पण दुर्देवाने एखादा काटा आपल्या पायात मोडलाच तर....

No comments:

Post a Comment

Featured Post

HSC english Board practice paper for study

https://online.fliphtml5.com/ykpcc/hmpl/