Friday, August 7, 2015

मनात राहिले [07/08 6:10 pm] Rautp,blogspot,in: उद्याचा उगवणारा दिवस माझा आहे म्हणून जगत असतो, पण उद्याचा दिवस आज म्हणून येतो, तो कालचा झालेला असतो. उद्याचा जन्मणारा बाळ आहे म्हणून तरसत असतो, पण उद्याचा माझा बाळ तरुण म्हणून होतो, तो दुसर्‍याचा झालेला असतो. उद्याची कोमललेली सकाळ आहे म्हणून तरळत असतो, पण उद्याची सकाळ संध्याकाळ म्हणून येते, आणि ती चंद्राची झालेली असते. उद्याचा मुलगा माझा आहे म्हणून वेडावून गेलेला असतो, पण उद्याचा मुलगा जावई म्हणून जातो, तो सासरचा झालेला असतो. उद्याची सोनकळी माझी आहे म्हणून सद्‌गदीत असतो, पण उद्याची सोनकळी सून म्हणून जाते, ती दुसर्‍या घराची झालेली असते. उद्याचा प्रत्येक क्षण माझा आहे म्हणून कंठत असतो, पण उद्याचा क्षण भूतकाळ म्हणून जातो, तो काळाचा झालेला असतो. मी जेव्हा आज मात्र माझा आहे म्हणून स्वतःवर मी पणा गाजवतो, पण आजचा मी हरवलेला म्हणून येतो, तो अहंकारात विलीन झालेला असतो. उद्याचं वाटणारं तारुण्य आहे म्हणून जोशात असतो, पण उद्याचं तारुण्य वार्धक्य म्हणून येतं, आणि तो उद्याचा मी म्हणूनच असतो. [07/08 6:11 pm] Rautp,blogspot,in: बोल माझे अनुभवाचे… गरिबी असली की त्या गरिबीतून आपल्याला खूप काही शिकावयास मिळतं असतं, खूप काही चांगले वाईट अनुभवही येतं असतात. श्रीमंत व्यक्तींना श्रीमंतीतून काही शिकावयास मिळतं असं तरी ते श्रीमंती शिकावयास मिळतं असणार नी अनुभवही तसेच श्रीमंती असणार, यात दुमत असेल असं वाटतं नाही. ज्यांना श्रीमंतीचा गर्व नाही किंवा अहंकार नाही, अशा व्यक्ती श्रीमंत असूनही गरिबांची दु:ख जाणतात, जवळून अनुभवतात. गरिबांना मदत करण्यास सदैव पुढे असतात. मदतीचा वसा त्यांनी घेतलेला असतो. अशा गर्व - अहंकार नसलेल्या श्रीमंतांची मने मोठी असतात याचाच अर्थ श्रीमंती असूनही त्याच्याजवळ मनाची श्रीमंती असते. गरीब असो की श्रीमंत असो, ज्यांच्याकडे मनाची श्रीमंती आहे, अशा व्यक्तींनी या मनाच्या श्रीमंती बरोबर नामस्मरणाची श्रीमंती वाढवावी. परमेश्वरानी आज जे काही आपल्याला दिले आहे, त्यांत सुख समाधान मानून परमेश्वराच्या नावाचा म्हणजेच नामाचा संचय करावयास हवा. हेच नाम किंवा आपण करीत असलेल्या नामस्मरणातून धनाचा संचय जरी होतं नसलं तरी परमेश्वरी नामाचा होतं असलेला संचय हा धन संचयापेक्षा खूप मोठा आहे, अमुल्य असा ठेवा आहे, हा नामाचा केलेला संचय आपल्याला सदैव उपयोगी पडत असतो. म्हणून प्रत्येकांनी नामाची गोडी लावून घेतली पाहिजे, एकदा का नामाची गोडी लागली की आपल्याकडून अखंडपणे नामस्मरण सुरु असते, अगदी चौवीस तास.. ज्या व्यक्ती नामस्मरण करीत आहेत त्यांना क्षणोक्षणी चांगली अनुभूती येतंच असते. पण जर का कुणी अजूनही परमेश्वरी नाम घेतं नसेल किंवा नामस्मरण करीत नसेल अशा व्यक्तींनी त्यांच्या आवडीच्या परमेश्वरचे नाम घ्यावयास सुरुवात करावी, नामाचा संचय करावा. परमेश्वरी अनुभूती आल्यावाचून रहाणार नाही. पहा विचार आणि कृती करून नामात [07/08 6:12 pm] Rautp,blogspot,in: अंधार आहे म्हणून रडत बसलात तर तुमच्या जीवनात उजेड पडण्याची अपेक्षा करू नका, अंधारासारख्या संकटाला दोष देत बसण्याऐवजी एक ज्योत पेटवण्याचे धाडस दाखवले तरच अंधार दूर होईल [07/08 6:12 pm] Rautp,blogspot,in: युष्याची ङायरी लिहणारा तर तो पांडुरंगच असतो, पण वाचणारे आपण असतो. जीवनात खुप काही हव असत, पण पाहिजे तेच भेटत नसत, सर्व काही नशीबात असत, पण आपल नशीब घङवण हे आपल्याच हातात असत..... परिस्थिती जेव्हा अवघड असते तेव्हा व्यक्ती ला "प्रभाव आणि पैसा " नाही तर "स्वभाव आणि संबंध " कामाला येतात [07/08 6:15 pm] Rautp,blogspot,in: चांगलीच विचारधारा जिंकण म्हणजे काय ते हरल्याशिवाय कळत नाही.दुःख म्हणजे काय ते अपेक्षाभंग झाल्याशिवाय कळत नाही.सुख म्हणजे काय ते दुस-याच्या हास्यात शोधल्याशिवाय कळत नाही..समाधान म्हणजे काय ते आपल्यात शोधल्याशिवाय कळत नाही.मैत्री म्हणजे काय ते जीव लावल्याशिवाय कळत नाही आपली माणस कोण ते संकटांशिवाय कळत नाही..सत्य म्हणजे काय ते डोळे उघडल्याशिवाय कळत नाही..उत्तर म्हणजे काय ते प्रश्न पडल्याशिवाय कळत नाही.जबाबदा-या म्हणजे काय हे त्या सांभाळल्या शिवाय नाही काळ म्हणजे काय हे तो निसटून गेल्याशिवाय कळत नाही.. मृत्यू म्हणजे काय हे तो समोर आल्याशिवाय कळत नाही... चालणारे दोन्ही पाय किती विसंगत, एक मागे, एक पुढे असतो, पुढच्याला अभिमान नसतो, मागल्याला अपमान नसतो, कारण त्याना ठाऊक असत क्षणात हे बदलणार असत, ह्याच नाव "जीवन" आहे. [07/08 6:17 pm] Rautp,blogspot,in: त्मकतेचा. अंतिम भेट .. तुझी अंतिम भेट सये विसरू कशी इतक्यात कोवळ्या त्या आठवणींची साठवण अजून ही हृदयात तू बोलकी शब्दातून कितीक भाव तुझा ओळखला नयनात उडत्या बटांची उधळण सारखीच बेभान जुल्मी वार्‍याच्या वेगात येताच जवळ मलमली भेटीत तूच घेतला मग हात हातात सांगून मी माझे शब्द तुजला झालो एकरूप दोघे क्षणार्धात राहिली काय अन् सरली काय देखिली कोठे वेला घड्याळ्यात स्पर्शलीस तू तर्जनी तळव्यावरती स्पर्श तुझ्या नखाचा आजही हृदयात झाले जे क्षण चार ते आपलेच विसरू कसा सांग सखी जीवनात भेटलीस तू होती पहिल्यांदाच अंतिम भेट तीच आपल्या दोघात ... [07/08 6:17 pm] Rautp,blogspot,in: एक सुंदर प्रार्थना..... देवा, मला इतकंच सुख दे की, मला आयुष्यभरासाठी पुरेल, माझी महती इतकीच असू दे की, कुणाचं तरी चांगलं होऊ दे, नात्यामध्ये इतकी आपुलकी असूदे की, जी फक्त प्रेमाने निभावली जातील, डोळ्यात इतकी लाज असूदे की, थोरामोठ्यांचा मान राखला जाईल, आयुष्यातील श्वास इतकेच असूदेत की, कुणाच्यातरी आयुष्याचे भलं करता येईल, बाकीचे आयुष्य तुझ्याकडेच ठेव म्हणजे इतरांनाही माझं ओझं होणार नाही [07/08 6:18 pm] Rautp,blogspot,in: आयुष्य कोणासाठी थांबत नाही फक्त आयुष्य जगण्याची कारण बदलतात.... सर्वच प्रश्न सोडवून सुटत नाहीत काही प्रश्न "सोडून" दिले की आपोआप सुटतात.. [07/08 6:19 pm] Rautp,blogspot,in: आयुष्यात जवळच्या व्यक्तिने केलेला विश्वासघात आणि योग्य ठिकाणी मिळालेली अयोग्य वागणूक माणसाला त्याच्या विचारांचे आणि जीवनाचे प्रवाह बदलण्यास भाग पाडतात.

No comments:

Post a Comment

Featured Post

step in Book review

Certainly! Here’s a detailed step-by-step guide for HSC English students on how to write a book review. This structured approach will help y...