Tuesday, August 11, 2015

जीवनात यशस्वी होण्याची सहा सूत्रे 0 COMMENTSVIEWS: 406 जीवनात कुठल्याही क्षेत्रात प्रगती करण्यासाठी परमार्थ, नियमितपणा, समर्पण, मनोधैर्य, सामर्थ्य, आणि स्पर्धा हि सहा सूत्रे ओळखून पुढचे पाऊल उचलण्याची खरी गरज आहे. मग बघा, तुमचे ध्येय आपोआपच तुमच्याजवळ चालत येईल. सुप्रसिद्ध विचारवंत चार्ल्स गारफील्ड यांच्या मते, इथे दिलेल्या या सहा सूत्रांची योग्य अंमलबजावणी केल्यास कोणताही तरुण आपल्या करिअरमध्ये पुढे जाऊ शकतो. १) नियमितपणा : वेळ आणि काम यामध्ये अचूक ताळमेळ साधण्यासाठी योजनाबद्ध दैनदिन कार्यक्रम आखून घेणे आणि दृढ निश्चयाने त्यांचे पालन करणे यालाच नियमितता असे म्हटले जाते. जीवनात यशस्वी होण्याची सहा सूत्रे २) परमार्थपणा : बहुतेक लोकांना आभासी बाह्य वैभव आणि उच्च पदाची लालसा असते. परंतु आत्मसमाधानी असल्यास त्यापासून दूर राहता येऊ शकते आणि त्यामधून परमार्थ साधता येऊ शकेल. ३) समर्पण : आपल्या कामाला चॅलॅंज समजून कामासाठीच समर्पित होणे, हेच यशस्वितेचे तिसरे सूत्र आहे. ४) मनोधैर्य : संबंधित कामातून काय परिणाम होतील ? कसे होतील ? अशा नैराश्यापासून दूर राहात प्रचंड मनोधैर्याने केलेल्या कामातून यशस्वी होण्याचा मार्ग सुकर होत जातो. ५) सामर्थ्य : आपल्या शक्ती-सामर्थ्याच्या जोरावर आपण कुठलेही काम यशस्वीरीत्या पूर्ण करू शकतो. प्रत्येक मनुष्यामध्ये अदृश्य शक्तीचे अफाट असे भांडार असते. ते ओळखून जागृत करण्याची खरी आवश्यकता असते. ६) स्पर्धा : यशस्वी होण्याचे सहावे सूत्र म्हणजे तीव्र स्पर्धा हेच आहे. आजच्या या धकाधकीच्या जीवनात वरील सहा सूत्रांचे चिंतन करून त्यादृष्टीने प्रयत्न केल्यास तुम्ही यशापासून जास्त काळ दूर राहणर नाहीत.

No comments:

Post a Comment

Featured Post

english grammar and practice filphtml book

https://online.fliphtml5.com/ykpcc/xphi/