Friday, July 31, 2015

News [01/08 7:15 am] Rautp.blogspot.in: 1 ऑगस्ट हाच खरा "मराठी राजभाषा दिन" काय मित्र-मैत्रिणीनो आता तुम्हीच एक माणुस म्हणून सांगा खरां मराठी दिन कोणता ?? प्रिय मित्र-मैत्रिणीनो "१ ऑगष्ट" हा दिवस म्हणजे "साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे" यांचा जन्मदिन. काही विशिष्ट जातीला कायम वरचे स्थान देण्यासाठी. एका पक्षाच्या महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्याने वि.वा.शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्मदिन 'मराठी भाषादिन' म्हणून जाहीर केला आणि तेव्हा पासून महाराष्ट्रातील मनुवाद्यानी 'मराठी दिनाचा' पुळका येवू लागला. जेमतेम १७ पुस्तके लिहिणारे कुसुमाग्रज आणि नुसत्या कादंबरीची संख्या ३५ असणारे "साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे" यांची तुलनाच होऊ शकत का??? तेव्हा उठा... जागे व्हा मित्र-मैत्रिणीनो... लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनातील महत्वाच्या घटना- १६ ऑगस्ट १९४७ ला अण्णाभाऊ साठे यांनी मुंबईत मोर्चा काढला. तथाकथित स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवसी हा या स्वातंत्र्याच्या विरोधातील मोर्चा होता.कम्युनिस्ट पक्षात अण्णाभाऊ कार्य करीत होते. हजारो लोकांच्या उपस्थितीत तो मोर्चा झाला. या मोर्चातील प्रमुख घोषणा होती... ये आझादी झुटी है, देश की जनता भुकी है !! १ मार्च १९४८ ला प्यारीसला जागतिक साहित्य परिषद झाली. या परिषदेचे निमंत्रण अण्णाभाऊ साठे यांना मिळाले होते परंतु जाण्यासाठी केवळ पैसे नसल्यामुळे ते या परिषेदेला जाऊ शकले नाहीत. २ मार्च १९७८ रोजी पहिले दलित साहित्य संमेलन झाले. या संमेलनाचे उद्घाटक म्हणून अण्णा भाऊ साठे होते. यात त्यांनी उद्घाटकीय भाषण केले. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कादंबरी वरून निघालेले चित्रपट- १ वैजयंता ‘ या कादंबरी वरून निघालेला चित्रपट ‘ वैजयंता ‘ साल - १९६१ कंपनी - रेखा फिल्म्स २ ‘ आवडी’ या कादंबरी वरून निघालेला चित्रपट ‘टिळा लावते मी रक्ताचा’ साल –१९६९ कंपनी-चित्र ज्योत ३ ‘माकडीचा माळ’ या कादंबरी वरून निघालेला चित्रपट ‘डोंगरची मेना’ साल - १९६९ कंपनी - विलास चित्र ४ ‘चिखलातील कमळ’ या कादंबरी वरून निघालेला चित्रपट ‘मुरली मल्हारी रायाची’ साल-१९६९ कंपनी -रसिक चित्र ५ ’वारणेचा वाघ’ या कादंबरी वरून निघालेला चित्रपट ‘वारणेचा वाघ’ साल - १९७० कंपनी - नवदिप चित्र ६ ’ अलगूज’ या कादंबरी वरून निघालेला चित्रपट ‘अशी ही सातार्याची तर्हा’ साल - १९७४ कंपनी - श्रीपाद चित्र ७ ’ फकिरा’ या कादंबरी वरून निघालेला चित्रपट ‘फकिरा’ कंपनी – चित्रनिकेतन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखित कादंबऱ्या- प्रकाशक – १) विद्यार्थिगृह प्रकाशन, पुणे २) चंद्रकांत शेट्ये, कोल्हापूर-२. १ आग २ आघात ३ अहंकार ४ अग्निदिव्य ५ कुरूप ६ चित्रा ७ फुलपाखरू ८ वारणेच्या खोऱ्यात ९ रत्ना १० रानबोका ११ रुपा १२ संघर्ष १३ तास १४ गुलाम १५ डोळे मोडीत राधा चाले १६ ठासलेल्या बंदुका १७ जिवंत काडतूस १८ चंदन १९ मूर्ती २० मंगला २१ मथुरा २२ मास्तर २३ चिखलातील कमळ २४ अलगुज २५ रानगंगा २६ माकाडीचा माळ २७ कवड्याचे कणीस २८ वैयजंता २९ धुंद रानफुलांचा ३० आवडी ३१ वारणेचा वाघ ३२ फकिरा ३३ वैर ३४ पाझर ३५ सरसोबत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखित नाटकाची पुस्तके- प्रकाशक - विद्यार्थिगृह प्रकाशन, पुणे १ बरबाद्या कंजारी २ चिरानगरची ३ निखारा ४ नवती ५ पिसाळलेला माणूस ६ आबी दुसरी आवृत्ती ७ फरारी ८ भानामती ९ लाडी दुसरी आवृत्ती १० कृष्णा काठच्या कथा ११ खुळवाडी १२ गजाआड पाचवी आवृत्ती १३ गुऱ्हाळ अण्णाभाऊ साठे यांचे शाहिरीचे पुस्तक- शाहीर दुसरी आवृत्ती १९८५, मनोविकास प्रकाशन मुंबई अण्णाभाऊ साठे यांचे प्रवास वर्णन पुस्तक- माझा रशियाचा प्रवास - सुरेश प्रकाशन पुणे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखित वगनाट्ये (तमाश्याची ) पुस्तके- १ अकलेची गोष्ट २ खापऱ्या चोर ३ कलंत्री ४ बेकायदेशीर ५ शेटजीचं इलेक्शन ६ पुढारी मिळाला ७ माझी मुंबई ८ देशभक्त घोटाळे ९ दुष्काळात तेरावा १० निवडणुकीतील घोटाळे ११ लोकमंत्र्याचा दौरा १२ पेंद्याचं लगीन १३ मूक निवडणूक १४ बिलंदर बुडवे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे लिखित प्रसिद्ध पोवाडे- १ नानकीन नगरापुढे २ स्टलिनग्राडचा पोवाडा ३ बर्लिनचा पोवाडा ४ बंगालची हाक ५ पंजाब- दिल्लीचा दंगा ६ तेलंगणाचा संग्राम ७ महाराष्ट्राची परंपरा ८ अमरनेरचे अमर हुतात्मे ९ मुंबईचा कामगार १० काळ्या बाजाराचा पोवाडा "हे जग, ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर नसून कष्टकरी-श्रमिकांच्या तळहातावर तरलेली आहे". अशा या दलिताचे जीवन खडकातून झिरपणाऱ्या पाझराप्रमाणे असते. ते जवळ जाऊन पाहा. मग लिहा. कारण 'जावे ज्याच्या वंशा तेव्हा कळे' हे तुकारामाचे म्हणणे खोटे नाही. म्हणून बहुजनांविषयी लिहिणाऱ्यांनी प्रथम त्याच्याशी एकनिष्ठ असले पाहिजे. तू गुलाम नाहीस , हे जग तुझ्या हातावर आहे, याची जाणीव करून घ्याव [01/08 7:18 am] Rautp.blogspot.in: Educational News शैक्षणिक बातम्या - राज्यात पंधरा टक्के शाळांमध्येच बायोमेट्रिक! मंगेश दाढे, नागपूर राज्यातील पंधरा टक्के सरकारी शाळांमध्येच बायोमेट्रिक्स मशिन लावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे विनापरवानगी दांडी मारणाऱ्या शिक्षक आणि कर्मचाऱ्यांवर लगाम कसा लावणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. २०१० मध्ये प्रत्येक शाळेत बायोमेट्रिक्स लावण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. साडेचार वर्षांत राज्यातील ४६ टक्के अनुदानित शाळांमध्ये बायोमेट्रिक्स मशिन लावण्यात आले. मात्र, सरकारी शाळांना सक्ती केल्यानंतरही डोळेझाक करण्यात आली. राज्यात ७५ हजार प्राथमिक आणि १९ हजार ६०० माध्यमिक शाळा आहेत. प्राथमिक शाळा ही दर एक किलोमीटर, तर माध्यमिक शाळा दर तीन किलोमीटर अंतरावर असावी, असा उल्लेख मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यात केला आहे. तरीपण, राज्य सरकारने यावर गांभीर्याने पावले न उचलल्यामुळे काही संस्थांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. याचिका निकाली काढताना न्यायालयाने या कायद्यानुसार शाळा असायला हवी, असे स्पष्ट केले होते. त्यानंतर काही शाळांमधील शिक्षक आणि कर्मचारी रजेवर जात असल्याचा अर्ज वरिष्ठांकडे सादर करीत नाही. विनापरवानगी रजा घेऊन शाळेत अनुपस्थित राहतात. त्याचा परिणाम अभ्यासक्रमावर होतो. याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत झालेल्या सर्वेक्षणातून ही बाब स्पष्ट झाली आहे. राज्यात १५ टक्के शाळांमध्ये बायोमेट्रिक्स मशिन नाही, असे सर्वेक्षणातून दिसून आले आहे. त्यासंदर्भातील अहवाल केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाला प्राप्त झाला. या मंत्रालयाने राज्यातील किती शाळांमध्ये अजूनही बायोमेट्रिक्स नाही, याबाबत माहिती मागितली आहे. त्या अनुषंगाने काही दिवसांपूर्वी सचिवस्तरावर एक बैठक झाली. येत्या मार्चपर्यंत सक्तीने बाय� [01/08 7:18 am] Rautp.blogspot.in: Educational News शैक्षणिक बातम्या - रात्रशाळांसाठी चांगले शिक्षक म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई रात्रशाळांमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. त्यासाठी या शाळांना चांगले शिक्षक उपलब्ध करून देण्याचा सरकारचा विचार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी शुक्रवारी विधान परिषदेत दिली. शिक्षक आमदार नागो गाणार यांनी राज्यातील रात्रशाळांना पूर्णवेळ शाळांचा दर्जा देण्याबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. 'रात्र शाळांमध्ये पाठ्यक्रम, परीक्षा पद्धती, अभ्यासक्रमही सारखा असताना सरकारने या रात्रशाळा आणि रात्र कनिष्ठ महाविद्यालयांना पूर्ण शाळा-महाविद्यालयांचा दर्जा द्यावा,' अशी मागणी त्यांनी केली. त्याला उत्तर देताना तावडे म्हणाले, 'रात्र शाळांना अनुभवी तज्ज्ञ शिक्षक देण्याची सरकारची भूमिका आहे. त्यासाठी विविध संघटनांच्या प्रतिनिधींसोबत बैठक घेऊन तज्ज्ञ शिक्षक कसे मिळतील याबाबत कार्यवाही केली जाईल.' पालिका शाळांच्या खोल्या परत मिळणार 'मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये ज्या संस्थांनी अनेक खोल्या बळकावल्या आहेत. त्यापैकी ज्या संस्था शिक्षण, ग्रंथालय अशी समाजहिताची काम करत असतील अशा संस्थांना अभय मिळेल. मात्र लाभाच्या इतर कामासाठी शाळांच्या खोल्यांचा वापर होत असलेल्या निर्दशनास आल्यास अशा संस्थावर मात्र कारवाई केली जाईल,' असे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सांगितले. 2 hrs · Educational News [01/08 7:19 am] Rautp.blogspot.in: Educational News शैक्षणिक बातम्या - ‘भटक्या’ मुलांना शैक्षणिक हमी यामिनी सप्रे, मुंबई भटक्या समाजाच्या उद्योग फिरस्तीमुळे त्यांना सतत वेगळ्या ठिकाणी जावे लागते. त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात कसे आणावे याबाबत आजवर ऊहापोह सुरू होता. तसेच या वर्गातील मुले शाळाबाह्य होण्याचे राज्यातील प्रमाण मोठे आहे. हीच बाब लक्षात घेऊन या मुलांच्या शैक्षणिक कारकिर्दीची एकत्रित माहिती साठवणारे आणि या मुलांच्या शिक्षणात सलगता आणणारे एज्युकेशनल गॅरंटी कार्ड विद्यार्थ्यांना देण्याचे सरकारने निश्चित केले असून, लवकरच त्याबाबतचा सरकारी निर्णय जारी करण्यात येणार आहे. राज्यातील शिक्षणाच्या दृष्टीने दुर्लक्षित असलेल्या आणि शिक्षणाधिकार कायद्यात समावेश होणाऱ्या मुलांच्या शिक्षणातील अडचणींबाबत विचार करण्यासाठी विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, शिक्षण सचिव आणि शिक्षण आयुक्त यांची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीला राज्यातील १८ जिल्ह्यांतील २६ स्वयंसेवी संस्थांचे ४७ प्रतिनिधी, शिक्षण, आदिवासी विकास व समाज कल्याण विभागाचे १५ राज्यस्तरीय व विभागस्तरीय शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार व शिक्षण आयुक्त भापकर उपस्थित होते. मुले शाळादाखल झाली तो दिवस, त्यांची शैक्षणिक प्रगती, विषय, सध्याच्या शाळेच्या मुख्याध्यापकांचा फोन नंबर आणि नव्या शाळेतील मुख्याध्यापकांचा नंबर आदी तपशील या कार्डमध्ये असेल. हे कार्ड विद्यार्थ्यांच्या पालकांना देण्यात येणार असून, या कार्डाच्या आखणीची अंतिम जबाबदारी सर्व शिक्षा अभियानाअंतर्गत केली जाणार आहे, असे नंदकुमार यांनी सांगितले. सुरुवातीला भटक्या समाजातील मुलांसाठी असणाऱ्या या योजनेची व्याप्ती भविष्यात वाढवण्याचाही विचार असल्याचे त्यांनी सांगितले. 'असर'चे चित्र पालटणार प्रथम या सामाजिक संस्थेमार्फत करण्यात येणाऱ्या 'असर' या सर� [01/08 7:19 am] Rautp.blogspot.in: Educational News शैक्षणिक बातम्या - "सर्व शिक्षा'चे कर्मचारी कंत्राटीच राहणार - - सकाळ वृत्तसेवा शनिवार, 1 ऑगस्ट 2015 - 12:00 AM IST Tags: sarva shiksha abhiyan, mumbai मुंबई - राज्यात मागील दहा ते बारा वर्षांपासून "सर्व शिक्षा अभियाना‘च्या माध्यमातून कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्यास शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आज विधान परिषदेत स्पष्ट नकार दिला. शिक्षक आमदार रामनाथ मोते यांनी "सर्व शिक्षा अभियाना‘च्या अंतर्गत कंत्राटी तत्त्वावर मागील दहा ते बारा वर्षांपासून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्याची मागणी तारांकित प्रश्नाद्वारे केली होती. 3 hrs · Educational News [01/08 7:20 am] Rautp.blogspot.in: Educational News शैक्षणिक बातम्या - बीसी शिष्यवृत्तीसाठी 220 कोटींची तरतूद - - सकाळ वृत्तसेवा शनिवार, 1 ऑगस्ट 2015 - 12:00 AM IST Tags: ebc scholarship , mumbai मुंबई - राज्यातील खासगी विनाअनुदानित संस्थेत व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना "ईबीसी‘ शिष्यवृत्तीचे वाटप करण्यासाठी चालू आर्थिक वर्षाकरिता 220 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या संदर्भातील प्रस्ताव मान्यतेसाठी वित्त विभागाकडे पाठवण्यात आला आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधान परिषदेत लेखी उत्तरात दिली. गतवर्षी या शिष्यवृत्तीच्या रकमेपैकी मिळालेल्या 33 कोटी 17 लाखांचे वाटप करण्यात आले आहे. काही संस्थाचालकांकडून थकीत शिष्यवृत्तीची मागणी केली जात आहे, अशी माहिती तावडे यांनी दिली. 3 hrs

No comments:

Post a Comment

Featured Post

HSC english Board practice paper for study

https://online.fliphtml5.com/ykpcc/hmpl/