Sunday, July 26, 2015

शिस्तीचे धडे First Published :27-July-2015 : 00:34:35 Last Updated at: 27-July-2015 : 00:18:59 औंध : खटाव तालुक्यातील औंध हे विद्येचे माहेरघर आहे. शिवाय पर्यटनस्थळ असल्यामुळे येथे दररोज पर्यटक व विद्यार्थ्यांची मोठी गर्दी असते. मात्र काही सडकसख्याहरींकडून कॉलेज सुटल्यानंतर बसस्थानक परिसर, कॉलेज आवारात स्टंटबाजी केली जात होती, त्यामुळे विद्यार्थिनींना असुरक्षित वाटत होते. याबाबत औंध पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी बसस्थानकात थांबून चांगलेच शिस्तीचे धडे दिले.कॉलेज सुटल्यानंतर औंध बसस्थानक परिसरात रोडरोमिओ, मोटारसायकल रायडर्स स्टंटबाजी करत असल्याचे प्रकार सुरू होते. याबाबत ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर औंध पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक्ष उदय देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार प्रशांत पाटील यांनी कॉलेज परिसर, बसस्थानक परिसरावर लक्ष ठेवून रोडरोमिओ, रायडर्सवर चांगलाच वचक निर्माण केला आहे. भयमुक्त वातावरण निर्माण केल्यामुळे औंधसह शेजारी खेड्यापाड्यातील पालकांमधून समाधान व्यक्त होत आहे.दरम्यान, एसटी बसमध्ये चढताना ढकलाढकलीचे प्रकार होत असतात. यातून वादावादी होऊन त्याचे पर्यवसान भांडणात होते. विद्यार्थ्यांना शिस्त लागावी, यासाठी हवालदार प्रशांत पाटील यांनी बसस्थानकात थांबून बसमध्ये चढताना प्रथम विद्यार्थिनी व नंतर विद्यार्थी अशी शिस्त लावली आहे. यामुळे विद्यार्थिनींनी ‘लोकमत’ला धन्यवाद दिले आहेत. (वार्ताहर) वाहतूक पोलीस प्रशांत पाटील यांनी सडकसख्याहरींवर चांगलाच वचक निर्माण केल्यामुळे चांगली शिस्त लागली आहे. हा उपक्रम असाच चालू राहावा. - मुराद मुलाणी, हॉटेल व्यावसायिक

No comments:

Post a Comment

Featured Post

HSC english Board practice paper for study

https://online.fliphtml5.com/ykpcc/hmpl/