Monday, July 27, 2015

बई माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांची भाषणे प्रेरणादायी असत. यापैकी एक, कलाम यांच्या ‘इंडिया २०२०’ या पुस्तकाचा पाया ठरणारे हे भाषण.. स्वातंत्र, विकास आणि ‘जगासह-जगासाठी भारत’ अशी त्रिसूत्री देणारे.. कलाम यांचा आनंद कशात होता, हेही विस्ताराने सांगणारे.. आपला इतिहास ३००० वर्षांचा आहे. अनेक ठिकाणांहून लोक येथे आले, त्यांनी आपल्यावर राज्यही केले आणि केवळ आपली भूमी कब्जात घेण्यावर न थांबता, आपल्या मनांवरही त्यांनी ताबा मिळवला. आक्रमणांचा हा इतिहास अलेक्झांडरपासूनचा आहे. ग्रीक आले, पोर्तुगीज आले, ब्रिटिश आणि फ्रेंच तसेच डचही येथे आले. या सर्वानी आपल्याला लुटले. जे आपले होते ते त्यांचे झाले. तरीही आपण मात्र कोणत्याही देशावर आक्रमण कधीच केलेले नाही. आपण जमिनीवर कब्जा केलेला नाही, आपण सांस्कृतिक अतिक्रमणे केली नाहीत, आपण कुणाची राष्ट्रे ध्वस्त केली नाहीत. असे का? मला वाटते, आपण इतरांच्याही स्वातंत्र्याचा आदर करणारे आहोत, म्हणून. म्हणूनच, माझे पहिले स्वप्न आहे स्वातंत्र्याचे. भारताला स्वातंत्र्याचे पहिले विराट दर्शन १८५७ च्या स्वातंत्र्यसमरातून झाले, असा माझा विश्वास आहे. हेच ते स्वातंत्र्य, जे आपण जोपासले पाहिजे, वाढवून बुलंद केले पाहिजे. आपण स्वतंत्र नसलो, तर कोणीही आपला मान राखणार नाही. माझे दुसरे स्वप्न आहे, विकास. जवळपास ५० वर्षे आपण ‘विकसनशील देश’ म्हणून राहिलो. आता वेळ आली आहे स्वतकडे विकसित देश म्हणून पाहण्याची. सकल राष्ट्रीय उत्पन्नाचा विचार केल्यास आपला क्रमांक जगातील पहिल्या पाच देशांमध्ये लागतो. अनेक क्षेत्रांत आपल्या देशाचा वाढदर दहा टक्के आहे. आपल्याकडली गरिबीची पातळी कमी-कमी होते आहे आणि आपल्या यशाची दखल आता जगाकडूनही घेतली जाते आहे. तरीदेखील आपण स्वतला विकसित - स्वावलंबी आणि स्वतवर विश्वास असलेला देश मानण्यास कचरत असू, तर आपला आत्मविश्वास कमी पडतो आहे, हेच त्यामागचे कारण. खरे ना? माझे तिसरे स्वप्न आहे.. भारताने जगासोबत आणि जगासाठी उभे राहावे, हे. आपण जगासाठी आणि जगासोबत उभे राहिलो नाही, तर आपल्याला मान मिळणार नाही, असेही मला वाटते. स्वतमध्ये शक्ती असेल, तरच शक्तींची साथ मिळते. आपली ही शक्ती म्हणजे केवळ लष्करी बळ नव्हे. आर्थिक सामथ्र्यसुद्धा आपण वाढवले पाहिजे.. हे दोन्ही बाहू सशक्त असले पाहिजेत. माझे भाग्य असे की, मला तीन महान मनाच्या माणसांसह काम करायला मिळाले. अंतराळ विभागाचे डॉ. विक्रम साराभाई आणि त्यांच्यानंतर प्रोफेसर सतीश धवन, आणि तिसरे डॉ. ब्रह्म प्रकाश- म्हणजे भारताच्या अणुइंधनाचे शिल्पकार. मी या तिघांना अगदी जवळून पाहू शकलो, ही आयुष्यात मला मिळालेली सर्वात मोठी संधी होती, त्या अर्थाने हा केवळ माझ्या नशिबाचा भाग म्हणावा लागेल, म्हणून मी भाग्यवान. माझ्या आयुष्यात चार महत्त्वाचे टप्पे आले : पहिला : ‘इस्रो’ मधली- भारतीय अंतराळ संशोधन संस्थेतली माझी २० वर्षे. ‘एसएलव्ही-३’ या भारतीय बनावटीच्या पहिल्याच उपग्रह-वाहक यानाच्या प्रकल्पाचा प्रमुख म्हणून- म्हणजे प्रकल्प संचालक म्हणून करण्याची संधी मला मिळाली. याच यानाने ‘रोहिणी’ हा उपग्रह पहिल्यांदा सोडला. ही दोन दशके माझ्या वैज्ञानिक आयुष्यात महत्त्वाची होती. दुसरा : ‘इस्रो’नंतर मी ‘डीआरडीओ’मध्ये (संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेत) गेलो आणि तेथेही, क्षेपणास्त्र वाहकांवर काम करण्याची संधी मला मिळाली. ‘अग्नी’चे परीक्षण १९९४ मध्ये सफल झाले, तेव्हा मला जणू स्वर्गप्राप्तीचा आनंद झाला होता. तिसरा: अणुऊर्जा विभाग आणि डीआरडीओ यांनी अणुचाचणीसाठी अत्यंत मोलाची भागीदारी केली, तेव्हाचा टप्पा. ११ आणि १३ मे १९९८ या दिवशी मी स्वर्गसुख तिसऱ्यांदा अनुभवले. माझ्या पथकासह माझा सहभाग या चाचणीमध्ये असल्यामुळे, भारत काय करू शकतो हे जगापुढे सिद्ध करून दाखवण्याची संधी मला मिळाली होती. आम्ही यापुढे ‘विकसनशील’ देश नसून विकसित देशांपैकी आहोत, हे भारताने सप्रमाण दाखवून दिले होते. भारतीय असल्याचा अभिमान ओसंडत होता माझ्यातून. ‘अग्नी’ क्षेपणास्त्र नुसते पुन्हा वापरता येण्याजोगे करून आम्ही थांबलो नव्हतो. त्यासाठी नवे साहित्यही आम्ही वापरले होते. हे साहित्य म्हणजे कर्ब- कार्बन, वजनाला अत्यंत हलके. चौथा : टप्पा जरा निराळा आहे. एके दिवशी हैदराबादच्या निझाम इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिकल सायन्सेसमधून अस्थिरोगतज्ज्ञ असलेले एक डॉक्टर माझ्याकडे आले. त्यांनीही, आम्ही ‘अग्नी’ साठी वापरलेले कार्बनआधारित साहित्य उचलून पाहिले, तेव्हा त्याच्या हलकेपणाने ते अचंबित झाले. तेवढय़ावर न थांबता, मला रुग्णालयात नेऊन त्यांनी काही रुग्णांशी माझी गाठ मुद्दाम घालून दिली. कितीतरी लहानलहान मुले होती तिथे. त्यांच्या पायांत धातूंच्या कॅलिपर होत्या. वजनाला या कॅलिपर तीनतीन किलो, म्हणजे मुलांसाठी जडच. पाय ओढावे लागत होते या मुलांना. डॉक्टर

No comments:

Post a Comment

Featured Post

HSC english Board practice paper for study

https://online.fliphtml5.com/ykpcc/hmpl/