Friday, July 24, 2015

[24/07 9:19 pm] Rautp.blogspot.in: विण्डोजप्रेमींसाठी खुशखबर म्हणजे लवकरच विण्डोज टेन येत आहे. अर्थात मायक्रोसॉफ्टने विण्डोज टेनचे डेमो व्हर्जन लोकांना उपलब्ध करून दिल्यामुळे टेनचे साधारण स्वरूप कसे असेल याचा अंदाज लोकांना आला असला तरीही विण्डोज टेनबाबत उत्सुकताही तेवढीच आहे. आता अवघ्या काही दिवसांतच म्हणजेच २९ जुलै रोजी मायक्रोसॉफ्ट विण्डोजचे नवीन रूप जगासमोर आणणार आहे ते म्हणजे विण्डोज टेन. जगभरात घरोघरी विण्डोज ऑपरेटिंग सिस्टीम वापरली जात असल्यामुळे विण्डोजच्या नवीन व्हर्जनबद्दल साऱ्या जगात उत्सुकता आहे. अर्थातच विण्डोज टेनचे डेमो व्हर्जन लोकांना खुद्द मायक्रोसॉफ्टने उपलब्ध करून दिल्यामुळे अनेकांना विण्डोज टेनचे साधारण स्वरूप कसे असेल, याबाबत अंदाज आलाच आहे. कोर्टाना : अ‍ॅपलने काही वर्षांपूर्वी आयफोन फोर एस बाजारात आणला होता. त्यामध्ये सीरी नावाचे पर्सनल असिस्टंट अ‍ॅप्लिकेशन उपलब्ध करून दिले होते. त्या काळी त्याची खूप चर्चाही झाली. आता त्याच धर्तीवर आधारित असे कोर्टाना नावाचे पर्सनल असिस्टंट अ‍ॅप्लिकेशन विण्डोज टेनसोबत आपल्याला उपलब्ध होणार आहे. हे अ‍ॅप्लिकेशन विण्डोज फोन एटवर चालणाऱ्या मोबाइलधारकांना नवीन नाही. पर्सनल असिस्टंट अ‍ॅप्लिकेशन म्हणजे आपण या कोर्टानाला प्रश्न विचारायचे आणि ती आपल्याला योग्य उत्तर देते. समजा, तुम्ही तिला सांगितले की, कोर्टाना, टेल मी अ जोक- की तुमचे वेब ब्राउजर वापरून हे अ‍ॅप्लिकेशन जोक शोधून काढेल आणि तुम्हाला तो वाचून दाखवेल. याच अ‍ॅप्लिकेशनचा वापर करून आपण आपल्या मीटिंग्जचे टाइम, अलार्म म्हणून साठवू शकता कुणालाही ठरावीक वेळेत ई-मेल पाठवू शकता, इत्यादी. आता ही कोर्टाना सीरीपेक्षा उपयुक्त ठरेल की नाही हे काही काळातच कळेल. परंतु मध्यंतरीच्या काळात व्हॉइस डिटेक्शन टेक्नॉलॉजीमध्ये बरेच काम झाले आहे, त्यामुळे याचे रिझल्ट सीरीपेक्षा लाभदायक ठरतील अशी आशा बाळगायला हरकत नाही. हे कोर्टाना अ‍ॅप्लिकेशन आपल्या होम स्क्रीनवर खाली सर्च बॉक्सच्या स्वरूपात उपलब्ध असेल. त्यामुळे आता सर्च करण्यासाठीचा सर्च बॅक्स आपल्याला स्टार्ट मेन्यूमध्ये पूर्वीसारखा शोधावा लागणार नाही. व्हच्र्युअल डेस्कटॉप : आताच्या विण्डोजमध्ये एक बाब म्हणजे व्हच्र्युअल डेस्कटॉप आपण जर एकाच वेळी अनेक अ‍ॅप्लिकेशन्सवर काम करत आहात आणि आपल्याला एका अ‍ॅप्लिकेशनवरून दुसऱ्या अ‍ॅप्लिकेशनवर जायचे असेल तर आपण ं’३ +३ुं वापरून शिफ्ट करू शकतो किंवा टास्कबारवर शोधून त्याद्वारे अ‍ॅक्सेस करू शकतो, परंतु आता यामध्ये आपल्याला व्हच्र्युअल डेस्कटॉप विण्डोज आणि टॅब बटन वापरून आपण टास्क व्ह्य़ूवर जाऊ शकता. आपल्या सोयीसाठी आपण अ‍ॅण्ड डेस्कटॉप बटणाचा वापर करून एका नवीन डेस्कटॉप स्क्रीनवर चालू अ‍ॅप साठवू शकता आणि गरज लागली की सहज अक्सेसही करू शकता. एज ब्राउजर : विण्डोज टेनमध्ये आपल्याला मिळणारे आणि एक महत्त्वाचे फीचर म्हणजे यात असणारे नवीन ब्राउजर इंटरनेट एक्स्प्लोरर आपणा सर्वाच्या परिचयाचे आहे, पण एक नवीन फीचरसह असणारे ब्राउजर विण्डोज टेन आपल्याला उपलब्ध करून देणार ते म्हणजे एज ब्राउजर यामध्ये असणाऱ्या काही फीचर्सपैकी एक म्हणजे रीिडग मोड आपण इंटरनेटवर एखादी महत्त्वाची माहिती वाचत असाल तर या रीडिंग मोडमध्ये बाकी स्क्रीन अ‍ॅनिमेशन ऑफ होते आणि आपल्याला वाचावयाचा कंटेण्ट आपण सहजतेने वाचू शकतो. शिवाय आपल्याला एखादी माहिती कुणाला सेंड करायची असेल तर त्यातील ठरावीक भाग आपण आपल्या सोयीने हायलाइटदेखील करू शकतो, यामुळेच मोझीला आणि क्रोमपेक्षा हे ब्राउजर उत्तम ठरू शकेल, अशी आशा मायक्रोसॉफ्टला वाटत आहे. इनबिल्ट अ‍ॅप्स : आपल्याला या विण्डोज टेनसोबत मिळणारी उत्तम बाब म्हणजे इनबिल्ट अ‍ॅप्लिकेशन्स. विण्डोज टेनसोबत आपल्याला स्काइप प्री-इनस्टॉल्ड असते, ज्यामुळे आपल्याला व्हिडीओकॉल्स करणे सोयीचे होते. याखेरीज गुगलच्या स्ट्रीट व्ह्य़ूला उत्तर म्हणून मायक्रोसॉफ्टने स्ट्रीटसाइड अ‍ॅप उपलब्ध करून दिले आहे, तसेच सर्व प्रकारच्या नोट्ससाठी वन नोट अ‍ॅप्लिकेशनही आपल्याला उपलब्ध होते. मायक्रोसॉफ्टच्या वन ड्राइव्ह आपण क्लाउड स्टोअरेज म्हणून वापरत असाल तर त्याच्याच विविध अ‍ॅप्लिकेशनद्वारे कोणत्याही डिव्हाइसवरून आपण डेटा सहज अ‍ॅक्सेस करू शकता यासाठीदेखील फोटो व्हय़ूअर आणि म्युझिक अ‍ॅप आपणांस मदतगार ठरतात. विण्डोज टेनसाठी कुणासाठी मोफत? - विण्डोज सेव्हन आणि एट, एट पॉइंट वन वापरणाऱ्यांसाठी मायक्रोसॉफ्ट विण्डोज टेनचे अपडेट मोफत उपलब्ध करून देणार आहे, त्यासाठी आपल्याला आपल्या डिव्हाइसवरून मायक्रोसॉफ्टच्या वेबसाइटवर अपडेटसाठी रजिस्टर करावे लागणार आहे. - ४ इंच ते ८० इंचाच्या सर्व विण्डोज डिव्हाइसेससाठी विण्डोज टेन उपलब्ध होऊ शकणार आहे. वरील सर्व फीचर्स हे विण्डोजने उपलब्ध करून दिलेल्या डेमो व्हर्जनमधील आहेत. मुळात २९ तारखेला विण्डोज लाँच झ [24/07 11:38 pm] mdm: एक छोटीशी गोष्ट विचार करायला भाग पाडेल...... एक श्रीमंत बाई साड्यांच्या दुकानात जाते. सर्व भारी भारी साड्यांची खरेदी झाल्यावर दुकानदाराला म्हणते, मला एक स्वस्तातली साडी द्या. मुलाच्या लग्नात मला माझ्या कामवालीला द्यायची आहे. बाई साड्या घेऊन निघून जाते. थोड्या वेळाने दुकानात एक गरीब बाई येते.ती दुकानदाराला म्हणते मला एक एकदम भारी साडी द्या, मला माझ्या मालकिणीला द्यायची आहे. तिच्या मुलाच्या लग्नात.......!! . . कोण आहे खरे श्रीमंत??? शुभ रात्रि [25/07 4:41 am] Rautp.blogspot.in: Jul 25, 2015 विशेष प्रतिनिधी, मुंबई राज्य शासनाच्या सेवेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वेतनावरील अवाढव्य खर्च कमी करण्यासाठी गट अ ते गट ड अशा सर्वच संवर्गातील २५ ते ५० टक्के रिक्त पदे भरण्यास बंदी घालण्यात आली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग व जिल्हा निवड समित्यांकडे पदभरतीसाठी पाठविण्यात आलेल्या प्रस्तावांचाही फेरविचार करावा, असे सामान्य प्रशासन विभागाने सर्व विभागांना व कार्यालयांना कळविले आहे. अपवादात्मक परिस्थितीत अत्यावश्यक पदे भरण्यासाठी सचिव समितीची परवानगी घेणे बंधनकारक राहणार आहे. नवीन नोकरभरतीवर या आधीच पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. राज्याला मिळणारा एकूण महसूल व अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वेतनावरील खर्च यात व्यस्त प्रमाण आहे. आर्थिक स्थैर्य राखायचे असेल तर, महसूलवाढीच्या दरापेक्षा वेतनवाढीचा खर्च जास्त असू नये, असे वित्त विभागाचे म्हणणे आहे. त्यानुसार वित्त विभागाने २ जून २०१५ रोजी एक आदेश काढून नवीन पदनिर्मिती व पदभरतीवर बंदी घातली आहे. त्यातून सिडको, एमएमआरडीए, पुणे महानगर विकास प्राधिकरण, नागपूर सुधार न्यास (एनआयटी) अशा काही आर्थिकदृष्टय़ा सक्षम असलेल्या संस्थांना वगळण्यात आले आहे. शासकीय सेवेतील पदे लोकसेवा आयोग व जिल्हा निवड समितीमार्फत भरण्यात येतात. या संस्थांमार्फत १६ जुलै २०१५ पर्यंत मागणीपत्र, निवड झालेल्या उमेदवारांच्या शिफारशी, नवीन पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करणे, या स्तरावर भरती प्रक्रिया असेल, तर ती पूर्ण करण्यास परवानगी देण्यात आली आहे. परंतु ज्या विभागांनी २ जून २०१५ पूर्वी निवड समित्या व लोकसेवा आयोगाकडे पद भरतीची मागणीपत्रे सादर केली आहेत, परंतु १६ जुलै २०१५ पर्यंत त्याबाबतची जाहिरात प्रसिद्ध केलेली नसेल, तर संबंधित विभागांनी त्या प्रस्तांवाचा फेरविचार करावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. वित्त विभागाच्या सूचना वित्त विभागाच्या सूचनांनुसार सामान्य प्रशासन विभागाने १६ जुलै रोजी एक आदेश काढून रिक्त पदे भरण्यावरही काही प्रमाणात र्निबध आणले आहेत. शिक्षक, पोलीस, ग्रामसेवक, तलाठी, आरोग्य परिचारिका, पशुधन परिवेक्षक, मत्स्यव्यवसाय विभागाचे तालुका स्तरावरील अधिकारी, वनरक्षक, कृषी साहाय्यक, पाटबंधारे विभागाचे कनिष्ठ अभियंता या संवर्गातील रिक्तपदांपैकी ७५ टक्के पदे भरण्यास मुभा राहणार आहे. त्याचबरोबर इतर संवर्गातील सरळसेवा कोटय़ातील रिक्त असणाऱ्या पदांपैकी ५० टक्के किंवा एकूण पदांच्या ४ टक्के जागा भरण्यास मान्यता मिळणार आहे [25/07 4:45 am] Rautp.blogspot.in: रांगोळी पुसली जाणार हे माहीत असूनही ती जास्तीत जास्त रेखीव काढण्याचा आपला प्रयत्न असतो., तसेच, आपले जीवनही पुसले जाणार आहे हे माहीत असूनही आपण ते रांगोळीप्रमाणेच जास्तीत जास्त सुंदर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. माणूस कधीच छोटा किंवा मोठा नसतो.. प्रत्येक माणूस आप-आपल्यापरीनं निसर्गाची 'एकमेव अप्रतीम कलाकृती' असतो.. कधीही कोणाची कोणाशी तुलना करू नये..अगदी स्वतःचीही [25/07 4:48 am] Rautp.blogspot.in: How does blood type diet work? D’Adamo says that ever individual has its own way of responding to foods, which is connected to the blood type. According him, lectins, or carbohydrate-binding proteins, attach to different blood type in a different way. The reaction between lectins and blood types can sometimes harm health. The doctor explained certain changes and side-effects in his book, but his main goal was to analyze which food are suitable for each blood type, and of course, the amount in which they should be consumed. Four basic blood types 1. Blood type A 20,000 years ago, in the developing stage of agriculture, this blood type went through the change of a lifetime. People with this blood type should be vegetarians, and they are also referred to as “the agrarians.” People with blood type A should avoid meat, and eat more fruits, veggies, beans, legumes and whole grains. In other words, organic and fresh foods are the real deal for these people, because they have a sensitive immunity. 2. Blood type O Dating since 30,000 years ago, this is the oldest blood type. Unlike other blood types, it requires protein-high nutrition. These are “the hunters.” People with blood type 0 should eat protein-loaded foods, including lean meat, poultry, fish and vegetables. They should avoid grains, beans and dairy products. To treat stomach ache and other health problems these individuals should take different supplements. 3. Blood type B “The nomads” can adapt to dairy products and have the most versatile digestive tract. This blood type appeared 10,000 years ago. People with blood type B should avoid corn, wheat, buckwheat, lentils, tomatoes, peanuts, and sesame seeds. According to D’Adamo, chicken can also cause some health problems. He recommends consuming large amounts of vegetables, eggs, certain meat and low-fat dairy products. 4. Blood type AB These are “the enigmas,” because this blood type is only 1,000 years ago. As this is the most recently developed type, the diet varies between blood type A and B. People with blood type AB should eat tofu, seafood, dairy, and green vegetables. D’Adamo says that these people struggle with heartburn, and they should avoid caffeine, alcohol, and smoked meat. If you still have not determined your blood type, ask your doctor. Food recommendations for each blood type: Blood type A Foods to eat: vegetables, whole grains (not pasta or bread), berries, figs, avocados, apples and peaches. Nuts and soy are the only proteins allowed. Foods to avoid: any kind of meat, dairy products, and kidney beans. Blood type O Foods to eat: red meat, poultry (chicken, turkey), seafood and other proteins. Speaking of veggies, eat more kale, spinach, kelp and broccoli. Foods to avoid: legumes (beans, peanuts, lentils), dairy products, eggs, wheat and grains. Blood type B Foods to eat: fruits, green vegetables, certain grains, red meat, fish, turkey. Foods to avoid: seeds, chicken, peanuts, lentils, corn, and buckwheat. Blood type AB Foods to eat: turkey, tofu, seafood and fish, vegetables, beans, watermelon, figs, apples, bananas, legumes. Foods to avoid: buckwheat, corn, red meat (causes stomach acid). Be careful when consuming alcohol and caffeine. Organic food is great for all blood types. Ask a nutritionist to help you improve your diet. Food groups are strict, and you do not have to worry about excess calories. Learn more about the positive and negative effect of the food you eat. If the members of your family have different diet, the Atkins diet is the real solution for you as it avoids entire food groups. Nutrition for one blood type fits one person, but it is unsuitable for other. To understand the whole concept, read Dr Adamo’s book. Ask your doctor or nutritionist for an advice, and introduce some healthy changes into your diet. Be careful if you are dealing with a special health condition. Source [25/07 5:04 am] Rautp.blogspot.in: पुढील वर्षी ‘ऑनलाइन’च? Maharashtra Times| Jul 25, 2015, 02.27 AM IST Share 0 पुढील वर्षी ‘ऑनलाइन’च? फोटो शेअर करा म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई यंदाच्या शैक्षणिक वर्षात अकरावीच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखांमध्ये मुंबई, ठाणे व रायगडमध्ये मिळून तब्बल ३९ हजार ५८७ विद्यार्थ्यांचा प्रवेश हा 'ऑफलाइन' प्रक्रियेने झाल्याची गंभीर दखल मुंबई हायकोर्टाने शुक्रवारी घेतली. पुण्यात संपूर्ण प्रवेशप्रक्रिया 'ऑनलाइन' राबवणाऱ्या राज्य सरकारने मुंबईत मात्र, वेगळी भूमिका घेतल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले आणि पुढील वर्षी पूर्ण प्रवेशप्रक्रिया 'ऑनलाइन' पद्धतीनेच करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश शालेय शिक्षण प्रधान सचिवांना दिले. राज्य सरकारने २८ मे २००९च्या 'जीआर'द्वारे सर्व प्रवेश 'ऑनलाइन'नेच करण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर शालेय शिक्षण संचालकांनी यावर्षी २७ जानेवारीला घेतलेल्या बैठकीतही ‌अधिकाऱ्यांना 'ऑनलाइन' प्रवेश प्रक्रिया राबवण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते. असे असताना जाणीवपूर्वक 'ऑफलाइन' प्रवेशांना वाव ठेवला जात असल्याचा आक्षेप पुण्यातील याचिकादार वैशाली बाफना यांनी अॅड. सुगंध देशमुख यांच्यामार्फत हायकोर्टाकडे नोंदवला होता. या प्रकरणी हायकोर्टाच्या न्या. नरेश पाटील व न्या. एस.बी. शुक्रे यांच्या खंडपीठाने आदेश देत, पुढच्या वर्षी 'ऑनलाइन'नेच प्रवेश होण्यासाठी आवश्यक उपाययोजना ठरवण्याचे निर्देश शालेय शिक्षण प्रधान सचिवांना दिले. त्याविषयी ५ ऑगस्टला अहवाल देण्यासही त्यांना सांगण्यात आले आहे. [25/07 5:05 am] Rautp.blogspot.in: यासंदर्भात उपसंचालक भीमराव फडतरे यांनी प्रतिज्ञापत्र करून 'ऑफलाइन'चे समर्थन करण्याचा प्रयत्न केला. 'जीआर'नुसार, ऑनलाइन प्रक्रियेनंतर ऑफलाइन प्रवेशांची मुभा सरकारने दिली आहे. तसेच, अंतिम निकालपत्र उशिरा मिळणाऱ्या 'आयजीसीएसई' (इंटरनॅशनल जनरल सर्टिफिकेट ऑफ सेकंडरी एज्युकेशन) बोर्डाच्या विद्यार्थ्यांच्या सोयीसाठीही ऑफलाइन प्रवेशांना सरकारने (सन २०१०चे पत्र) मुभा दिली आहे. त्याआधारे यंदा १० जुलैला 'ऑफलाइन'बाबतचे पत्र काढल्याचे स्पष्टीकरण फडतरे यांनी प्रतिज्ञापत्रात केले. मात्र, त्याने खंडपीठाचे समाधान झाले नाही. 'आयजीसीएसई' बोर्डाच्या अवघ्या पाचशे विद्यार्थ्यांसाठी तुम्ही पूर्ण धोरण कसे बदलता? आणि स्वतःच्याच 'जीआर'च्या उलट कसे वागता?' असे प्रश्न खंडपीठाने उपस्थित केले. पुण्यात सर्व प्रवेश 'ऑनलाइन' होण्यासाठी तीननंतर आणखी दोन फेऱ्या राबवण्याचे ठरवले असताना मुंबईबाबत वेगळी भूमिका घेतल्याबद्दल खंडपीठाने आश्चर्य व्यक्त केले. 'ऑफलाइनमुळे गुणवंत उपेक्षित' अकरावीचे आर्ट्‍स, कॉमर्स, विज्ञान, होम सायन्स, एचएससी व्होकेशनल आणि बायफोकल या शाखांमधील प्रवेश ऑनलाइननेच करण्याचा सरकारचाच २८ मे २००९चा 'जीआर' सुस्पष्ट आहे. असे असूनही मोठ्या संख्येने होणाऱ्या ऑफलाइन प्रवेशांमुळे गुणवान विद्यार्थींना चांगल्या कॉलेजांपासून वंचित रहावे लागत असेल, तर समाजातील गुणवत्तेला अर्थच नाही, असे गंभीर निरीक्षण न्या. नरेश पाटील व न्या. एस. बी. शुक्रे यांच्या खंडपीठाने शुक्रवारच्या सुनावणीत नोंदवले. मुंबई-पुणे शहरात नामांकित कॉलेजांसाठी स्पर्धा असते. या पार्श्वभूमीवर, ऑनलाइन प्रक्रिया महत्त्वाची असून गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना संधी मिळते. असे असताना मुंबईत जाणीवपूर्वक अशी व्यवस्था झाली आहे की, ऑनलाइनचा तीन फेऱ्यांचा सोपस्कार होतात. त्यानंतर होणाऱ्या ऑफलाइन प्रक्रियेत आपल्याला हव्या त्या कॉलेजमध्ये डोनेशन भरून प्रवेश मिळणार असल्याचे विद्यार्थ्यांना माहिती असल्याने अनेकजण जाणीवपूर्वक ऑनलाइन प्रक्रियेत सहभागी होत नाहीत, असे याचिकादारांतर्फे अॅड. सुगंध देशमुख यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणले. मुंबई, ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील कॉलेजांत तब्बल ३९,५८७ प्रवेश हे ऑफलाइन झाल्याचे त्यांनी निदर्शनास आण [25/07 5:08 am] Rautp.blogspot.in: आपण जे सतत करू, त्याप्रमाणे आपण घडत जातो. आपली सवयच संबंधित गोष्टीत आपल्याला तरबेज बनवते, असं ग्रीक तत्त्वज्ञ अॅरिस्टॉटल यांचं विधान आहे. जग वेगानं बदलत आहे, मात्र काळ कितीही पुढे गेला, तरी आनंद आणि यश मिळविण्याचे मार्ग कालातीत राहणार आहेत. पाहू या कोणते आहेत हे मार्ग... ध्येय हवं डोळ्यासमोर आपल्याला जे मिळवायचं आहे, जे ध्येय आहे, ते कायम डोळ्यांसमोर ठेवा. असं केल्यानं कितीही अडचणी समोर आल्या, तरी ध्येय गाठण्याची प्रेरणा कायम मनात राहिल. यासाठी आपली ध्येयं निश्चित करून ती चक्क कागदावर लिहून काढा. तुम्ही आपलं उद्दिष्ट पूर्ण करत असल्याचं चित्र डोळ्यांसमोर ठेवा. यशप्राप्तीसाठी मार्गदर्शन करणाऱ्या बऱ्याच पुस्तकांमध्ये या सवयीवर भर दिलेला दिसतो. आव्हानांना सामोरे जा 'समस्या' हा शब्द सगळीकडून काढून टाकून त्याऐवजी 'आव्हान' हा शब्द वापरा. त्यामुळे तुम्हाला अडचणीची वाटणारी परिस्थिती अचानक संधीमध्ये रूपांतरित होईल. दृष्टिकोनात असा बदल केल्यानं तुमच्यातील गुणांना वाव मिळेल, नव्या गोष्टी शिकण्याची संधी मिळेल आणि एखाद्या समस्येवर उत्तर शोधणाऱ्यांमध्ये तुमची गणना होईल. आनंदी माणसं संकटकाळी लपत नाहीत, तर ताठ मानेनं त्याला सामोरं जातात. शांत झोप घर, ऑफिस...या रोजच्या धावपळीमध्ये विश्रांतीही तेवढीच महत्त्वाची आहे. दगदगीनंतर पुरेशी झोप मिळाली नाही, तर त्याचा परिणाम आरोग्यावर निश्चितच होतो. रात्री उशिरापर्यंत जागणं, हे काही जणांना मॉडर्न जीवनशैलीला अनुसरून वाटत असेल; मात्र त्यामुळे तुमच्या आरोग्यावर अतिशय वाईट परिणाम होऊ शकतो. हे दुष्परिणाम तारुण्य सरल्यानंतर जाणवू लागतात. त्यामुळे रोज रात्रीची किमान आठ तास पुरेशी झोप होईल, याची दक्षता घ्या. त्यानंतर दुसऱ्या दिवसाची सुरुवात निश्चितच उत्साहानं होईल. स्वतःच्या क्षमता जाणा आपल्या क्षमता काय आहेत आणि आपण कुठे कमी पडतो, याची पुरेपूर जाणीव असणारे यशस्वी होतात. आत्मविश्वासामुळे तुमची वाटचाल सोपी होईल. रोज भेडसावणाऱ्या प्रश्नांची उत्तरं तुमची तुम्हालाच सापडतील. पोषाख साजेसा असावा तुमच्या कपड्यांवरून स्वतःबद्दलच्या भावना तयार होतात. त्याप्रमाणे तुमचं वागणंही बदलतं. त्यामुळे स्वच्छ, नीटनेटके, कामाला साजेसे कपडे घाला. त्यामुळे दिवसभर योग्य विचारांनी तुम्ही काम कराल. दिवसभर आपण काय काय काम करणार आहोत, ते ठरवून त्याप्रमाणे पोषाख असू द्या. पहिलं इम्प्रेशन चांगलं पडल्यामुळे कामाच्या ठिकाणीही सकारात्मक परिणाम होईल. नियमित व्यायाम नियमित व्यायाम केल्यानं शरीर सुदृढ राहतंच, शिवाय मेंदूलाही अधिक ऑक्सिजन पुरवठा होतो. व्यायामामुळे आनंददायी हार्मोन्स निर्माण होतात आणि मन ताजंतवानं राहतं. जॉगिंग पार्क असो, जिम असो किंवा टेरेस जसा जमेल तसा व्यायाम आवर्जून केला पाहिजे. वाचन वाढवा वाचनामुळे मनाचं पोषण होतं. सकाळी वृत्तपत्रं वाचा, रात्री झोपण्याआधी एखादं छानसं पुस्तक वाचा, अधूनमधून वेळ मिळेल तसं एखादं मासिक चाळा. असं केल्यानं मेंदूला आणि मनाला चांगला खुराक मिळेल. मनात तेढ ठेवू नका एखाद्याविषयी मनात तेढ ठेवू नका. कामाच्या ठिकाणी किंवा नातेवाइकांमध्ये अशी एखादी व्यक्ती असतेच जिच्याशी आपलं पटत नाही. मात्र, मनात तिच्याविषयी तेढ ठेवून स्वतःचा चांगला वेळ खराब करू नका. दुसऱ्याला माफ करण्याची सवय लावून घ्या. त्यामुळे तुम्ही सतत पुढे जात राहाल आणि आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करू शकाल. त्याचप्रमाणे स्वतःवरही चिडू नका, स्वतः केलेल्या चुकांबद्दल स्वतःलाही माफ करा. स्वतःलाही आणखी संधी द्या. प्रेमळ वागणूक हवी प्रेमानं केलेल्या छोट्या छोट्या कृतीही तुमचा दिवस छान करतील. लोकांशी शक्य तेवढं सौजन्यानं वागा. उदा. लिफ्टमधून जाताना दुसऱ्यासाठी दार उघडणं किंवा ऑफिसमधील सहकाऱ्यांची स्वतःहून विचारपूस करणं [25/07 5:25 am] Rautp.blogspot.in: काहीही म्हणा जेव्हा मनामधे भावना आणि विचार एकमेकांवर येऊन आदळतात तेव्हा सहसा भावनांचाच विजय होतो. पण प्रत्येकवेळा भावना पुढे विवश होऊन चालत नाही. कारण विचार हे तुमच भवितव्य घडवत असतात. म्हणून कधी कधी वेळ प्रसंगी कठोर होऊन विचार करावा लागतो अन भावना माराव्या लागतात. कारण त्यातच खरा विवेक सामावलेला असतो. [25/07 6:18 am] Rautp.blogspot.in: मंगेश दाढे, नागपूर रिक्त पदांच्या समांतर आरक्षणाची शहानिशा करूनच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे (एमपीएससी) प्रस्ताव पाठवावा, असे स्पष्ट आदेश सामान्य प्रशासन विभागाने प्रत्येक विभागाला दिले आहेत. राज्यात किती पदे रिक्त आहेत, याचे मागणीपत्र प्रत्येक विभागाला दरवर्षी एमपीएससीकडे सादर करावे लागते. त्यानुसार एमपीएससी वर्ग 'अ', 'ब' आणि 'क' श्रेणीच्या रिक्त जागांसाठी जाह‌िरात प्रसिद्ध करते. पण, अलीकडच्या काळात एमपीएससीला माहिती मिळण्यास विलंब होत असल्याने रिक्त जागांची भरती प्रक्रिया राबविण्यास अडचणी येतात. वारंवार रिक्त जागा किती, आरक्षण कोणत्या पदांसाठी आहे, याची माहिती एमपीएससीला प्रत्येक विभागाकडून घ्यावी लागते. तरीही, बरीच मंत्रालये कोणत्या पदांसाठी आरक्षण आहे, याची माहिती देण्यास टाळाटाळ आणि विलंब लावतात. त्यामुळे दरवर्षी आखण्यात आलेले एमपीएससीचे वेळापत्रकही विस्कळीत होते. एमपीएससीच्या वेळेची बचत व्हावी, कारभारात गती यावी, वारंवार आरक्षणाची शहानिशा करण्याची वेळ एमपीएससीवर येऊ नये, रिक्त जागांची जाह‌िरात वेळेत प्रसिद्ध व्हावी, यासाठी आरक्षणाची माहिती विविध विभागाकडून व्य‌क्तिशः जाणून घेण्याची आवश्यकता नाही, असे स्पष्ट निर्देशच सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव टिकाराम करपते यांनी प्रत्येक विभागाला दिले आहेत. यातून आगामी काळात एमपीएससीचे वेळापत्रक सुरळीत होईल. शिवाय, एमपीएससीकडे विलंबाने प्राप्त होणारया प्रस्तावावर लवकर निर्णय घेण्यास मदत होण्याची शक्यता आहे. अपंग, महिला, खेळाडू प्रवर्गाचा विचार प्रत्येक विभागात रिक्त पदे आहेत. यात अपंग, महिला आणि खेळाडूंना रिक्त पदांमध्ये आरक्षण देण्यात येते. सामान्य प्रशासन मंत्रालयाकडे प्रत्येक विभागाकडून रिक्त पदांचा अहवाल पाठविण्यात येतो. नमूद आरक्षणानुसार मागणीपत्रात अचूक माहिती नोंदवावी, प्रस्ताव काळजीपूर्वक तपासून सामान्य प्रशासन विभागाकडे पाठविण्याची आवश्यकता नाही, असेही सरकारने स्पष्ट केले आहे. याची थेट माहिती एमपीएससीला प्रत्येक विभागाने द्यावी, त्यामुळे रिक्त जागांची भरती तातडीने होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे

No comments:

Post a Comment

Featured Post

HSC english Board practice paper for study

https://online.fliphtml5.com/ykpcc/hmpl/