*महाराष्ट्र शासन, शालेय शिक्षण विभागातर्फे इयत्ता 11 वी ऑनलाईन क्लाससाठी नावनोंदणी*
प्रिय विद्यार्थी, पालक, शिक्षक, मुख्याध्यापक, प्राचार्य,
शालेय शिक्षण विभागातर्फे इ. 11 वी आर्टस्, कॉमर्स व सायन्स शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी उच्च माध्यमिक विद्यालये सुरू होईपर्यंत दि. 02 नोव्हेंबर 2020 पासून मराठी व इंग्रजी माध्यमाचे ऑनलाईन क्लासेस सुरू करत आहोत.
यासाठी इच्छूक विद्यार्थ्यांनी https://covid19.scertmaha.ac.in/eleventh इथे नावनोंदणी करावी.
नावनोंदणी नंतर क्लासेस चे वेळापत्रक व आवश्यक तपशील ईमेल व मोबाईल क्रमांकावर प्राप्त होईल.
प्राचार्य/ मुख्याध्यापक यांनी या सुविधेबाबत विद्यार्थ्यांना अवगत करावे.
-
दिनकर पाटील
शिक्षण संचालक ( माध्यमिक व उच्च माध्यमिक)
संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे