Reach With Information AS A Guideline To Help The Students Throw The Different Links For Share Knowledge
Friday, November 27, 2015
Thursday, November 26, 2015
[26/11 20:10] 777pranav2010: te! +1188 Commit to be Fit +442 Don’t be a Brat burn that Fat +381 Seven days with out exercise makes one weak +281 No pain no gain +269 Rest a while and run a mile +244 Those who do not find time for exercise will have to find time for illness +132 Too Fit to Quit +94 Hustle to gain more muscle +92 Running to the Future +68 Move it or lose it +36 Why put off feeling good? +31 Use it or lose it. +25 Get a jump on your day! [26/11 20:21] 777pranav2010: Eat clean and green. Eat organic. I wear Red for heart disease and stroke awareness. What I like for me is GMO-free. Eat your greens to fit into your jeans. Eat right and light. Take care of your body and it will take care of you. Don't be a brat, burn that fat. Eat well, be well. Eat right, live strong. Rest a while and run a mile. You can't enjoy wealth if you're not in good health. Burn calories not gas. Eat wise, drop a size. Eat the best, leave the rest. Fruits & veggies - more matters. Keep in shape by eating grape. Hustle to gain more muscle. Ignore your health, it will go away. Your stomach shouldn't be a waist basket. Don't wait to lose weight. Jump and turn and feel the burn. It's fun to run. You'll huff and puff if you eat a lot of stuff. Exercise to be strong and your life prolong. You have to eat right for the fat to take flight. If you let the cake control, you'll look like a cinnamon roll. Stop wishing to lose weight and take action to change your fate. If losing weight is you goal, you must have some self-control. Know your farmer, know your food. Diet cures more than doctors. Nutrition: It can save your life! Running a mile will be worthwhile. Berries, apples, bananas, and pears, help reduce health worries and scares. Drop the fries and move those thighs! For good health's sake, run, jump, and shake. Just for the health of it! One day at a time. One workout at a time. One rep at a time. Commit to be fit. Healthy eating for a strong heart beating. Give up the fat, watch your belly go flat. Achieving and maintaining good health is a process which continues throughout our life. Regular exercise and healthy eating habits should help maintain your body and mind in a healthy state. At times, you may feel discouraged and not be able to regain your health from illness, obesity, or other similar conditions. The catchy and interesting slogans presented above should prove to be a source of inspiration at such times. Shashank Nakate July 30, 2013 Reprint Permission Share This Article Share Tweet Share Pin It WhatsApp Email Print Don't Miss List of 'Save the Environment' Slogans Catchy Slogans Slogan Ideas Funny Anti-drug Slogans Safety Slogans More From Buzzle Famous Advertising Slogans Funny Campaign Slogans Famous Commercial Slogans School Campaign Slogans Good Campaign Slogans Senior Class Mottos and Slogans Anti-smoking Slogans Good Popular Slogans Clever Campaign Slogans Senior Class Slogans Post A Comment Your Name Close
Monday, November 23, 2015
[http://lm.facebook.com/l.php?u=http%3A%2F%2Fwww.empsckatta.blogspot.in%2Fp%2Fdownloads.html%3Fm%3D1&h=mAQFrBZJ1&enc=AZNxY92MqMTu-JK5h5XXIe90vDzAbRRT4kGNBlcfxDZcgrdZKb9xUd0K8zWk_xtFQ8HIkYb0e0Lpyt3ss5hQR-3_iniQgal17EbR3OKyE67PGiF-3Z1t4ttmb8Jz7AA5sleLl2ZgfAGKvAmR15j3acaP&s=1] is good,have a look at it!
Sunday, November 22, 2015
Shiv Khera, (Popular author of 'Self Help' book, edited and translated free article on one of his web sites, saying that young young people should be aware of certain things) - Where are you five years from now? Only two things can answer the question. 1) Which books are you reading today? 2) And now you are compatible with anyone? If you do not even read good books, if there are not many good people around, then why should you tell someone else your future? I think young kids can remember a few things and if they do so wisely, they can take their life to a certain height. 1) Do what you like best! Do not forget that your competition is with someone else! Do the best, do something special in the first strike, that should be good! And the main thing that did it, prepare something special from it! 2) Be Involve If you do not want to solve the problem, then you also become part of that question, it will be self-sufficient. So leave the complaint continuously, which gets bored in front of it. So either work with it, or else close the diagnosis. 3) To do something more than the expectations of Xtra people, try to work a little more by trying harder! Do all the work and assignments, decide whether you will stretch something out! 4) Take the role of all the rounds, the wind has changed as it turns out. So you carry it with the waves. Keep loyalty from that, take the role and be firm on it. 5) Focus Do not forget what your goal is, what you want. If anything, your focus should not be shaken. 6) Choose friends to save a little. The leader is good, but his advisors are bad, we hear the sentence continuously. Do not be fooled by it, so choose a good friend and save it. Look at the successful people and see their friends, the impact of fellowship. 7) Trust your self. That is all but not your own confidence. The world looks good if you feel good about yourself. Mankind behaves fairly. So, just trust yourself, love yourself too. 8) Character captures. Someone's character is not ready in a night. Often, some people think about it, but they are different. So, pay a little attention to what your reputations are being prepared. Once the images are corrupted, there is a lot of work to repair. 9) Why the world? Ask yourself why you are living. What is your goal? Life is so beautiful, do not deny it. It is not said that, instead of doing nothing by failing to do something good and good! So find the direction of your survival. 10) The day has started to be happy that the phone is such a thing? Try to start the day better than that. Often the mood goes in small things and you do nothing. Just irritated Do not be so. So give yourself a dose of positive energy from the waking hour.
बोधकथा फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एक राणी आपले ओले केस सुकविण्यासाठी राजवाड्याच्या छतावर गेली होती. तिने आपला मौल्यवान कंठा काढून बाजूला ठेवला व केस विंचरू लागली. इतक्यात तिकडून एक कावळा आला. कावळयाला तो कंठा(गळ्यातील हार) म्हणजे काहीतरी खाण्याची गोष्ट वाटली व तो कंठा घेऊन कावळा उडून गेला. एका झाडावर बसून त्याने कंठा खाण्यासाठी प्रयत्न केले. मौल्यवान अशा कंठ्यामध्ये हिरे जडलेले होते. कठोर अशा हि-यांवर चोच मारून मारून तो थकला व त्याने ते खाण्याचा नाद सोडून दिला. तो कंठा तसाच झाडावर लटकत ठेवून त्याने आकाशात भरारी मारली ते अन्नाचा शोध घेण्यासाठी. इकडे राणीने केस विंचरले व तिच्या लक्षात एक गोष्ट आली की आपला मौल्यवान कंठा गायब झाला आहे. इकडेतिकडे शोध घेऊनही तिला तो सापडेना शेवटी ती रडत रडत राजाकडे गेली व म्हणाली,'' महाराज माझा प्राणप्रिय असा कंठा चोरीला गेला आहे. तुम्ही त्याचा शोध घेण्याचे आदेश द्या.'' राजा म्हणाला,'' दुसरे इतरही दागिने आहेतच की तुला. तोच कंठा कशाला पाहिजे.'' राणीने ऐकले नाही व तोच कंठा पाहिजे म्हणून हट्ट धरून बसली. राजाने कंठा शोधण्याचे आदेश दिले. सर्वजण तो शोधू लागले पण कोणाला काही तो कंठा सापडेना. राजाने कोतवालाला बोलावून सांगितले की आजच्या आज तू, सर्व शिपाई, सैनिक, प्रजा सगळे मिळून त्या हाराचा शोध घ्या. जो कोणी तो हार आणून देईल त्याला आपण अर्धे राज्य बक्षीस म्हणून देऊ अशी घोषणाही त्याने त्यावेळी केली. अर्धे राज्य बक्षीस मिळेल या आशेने सर्वजणच कामाला लागले. सगळीकडे शोधयंत्रणा सुरु झाली. शोधता शोधता अचानक कुणाला तरी तो हार सापडला. एका घाणेरड्या पाण्याच्या नाल्यामध्ये त्याला तो हार दिसला. पाणी इतके घाणेरडे होते की जवळून जातानासुद्धा किळस यावी, दुर्गंध सर्वत्र पसरला होता. पण त्या पाण्यात तो हार पडलेला दिसून येत होता. हार दिसताक्षणी अर्धे राज्य बक्षीसाच्या आशेने एका सैनिकाने त्या पाण्यात उडी मारली. सगळीकडे शोधले त्याने पण हार काही मिळाला नाही. हार जणू गायबच झाला. सैनिकाने मारलेली उडी पाहून कोतवालाच्या मनातही लोभ निर्माण झाला. त्यानेही अर्धे राज्य मिळविण्यासाठी त्या नाल्यात उडी मारली. पण हार पुन्हा गायब झाला. त्या दोघांना जसा हार दिसला तसा इतर प्रजाजनांनाही तो हार दिसला व सगळेजण बक्षीसाच्या आशेने त्या घाण पाण्यात उड्या मारू लागले पण हार कुणाच्याच हातात येत नव्हता. सगळेजण उडी मारताहेत पाहून मंत्री, सरदारही, मुख्य प्रधानजी यांनाही अर्ध्या राज्याची हाव सुटली व तेही घाणेरड्या पाण्यात उड्या मारू लागले. पण हार काही सापडेना. जेव्हा कोणी उडी मारे तेव्हा हार गायब होऊन जाई. हार सापडत नाही हे लक्षात आले की तो मनुष्य त्या पाण्याच्या वास सहन न झाल्याने पटकन पाण्यातून निघून बाहेर येई व तो बाहेर पडता क्षणी हार पुन्हा दिसू लागे. मंत्री, सरदार, मुख्य प्रधान यांनी घाणेरड्या पाण्यात उड्या मारून हार शोधण्यासाठी प्रयत्न केले हे राजाच्या कानावर गेले व त्याला वाटले की यांनी जर हार शोधला तर मला माझे अर्धे राज्य गमवावे लागेल. त्यासाठी राजाही तेथे आला व त्याने आपली राजवस्त्रे उतरवली आणि त्यानेही त्या नाल्यात उडी मारली. त्याचवेळेस तिथून एक संत जात होते. राजाला उडी मारलेली पाहिली आणि तो मोठमोठ्याने हसू लागले. त्यांनी विचारले हे काय चालले आहे.? सगळेजण असे चिखलात, घाणीत का माखला आहात?. राजा असणारा माणूस असल्या घाणेरड्या पाण्यात का उडी मारतो आहे? लोकांनी उत्तर दिले, राणीचा हार पाण्यात पडला आहे म्हणून सर्वजण पाण्यात उड्या मारत आहेत पण उडी मारताक्षणी कसा कोण जाणे तो हार गायब होतो आहे. संत अजूनच मोठ्याने हसू लागले. लोकांनी त्याना विचारले काय झाले? संत त्यावर म्हणाले,'' अरे वेड्यांनो तुम्ही ज्या हाराकडे पाहून पाण्यात उड्या मारत आहात तो हार झाडावर आहे आणि पाण्यात दिसते आहे ते त्याचे प्रतिबिंब आहे. खरा हार हा झाडावर आहे आणि तुम्ही प्रतिबिंबाला हार समजून पाण्यात शोधत आहात.'' लोकांच्या लक्षात खरा प्रकार आल्यावर लोक शरमिंदा झाले. तात्पर्य :- मानवी जीवनाची पण आज त्या लोकांप्रमाणेच अवस्था झाली आहे. जे आपल्याला पाहिजे आहे त्याच्या प्रतिरूपाकडे, प्रतिबिंबाकडे पाहून आपण ते मिळविण्याचा प्रयत्न करत आहोत. खरे सुख, समाधान, शांती, मनस्वास्थ्य हे शोधण्यापेक्षा आपण त्याची प्रतिरूपे, प्रतिबिंबे जवळ करत आहोत. यातून काही मिळण्यापेक्षा आपण कितीतरी गोष्टी गमावित आहोत. खरंय ना!!!"
Monday, November 2, 2015
[02/11 15:06] 777pranav2010: [02/11 15:02] 777pranav2010: पुस्तकालय पु.लं. चे काही किस्से-किस्से १ - २० १) त्यांच्या ओळखीच्या एक मुलीचे लग्न ठरले. योगायोगाने माहेरचे आणि सासरचे आडनाव एकच होते. हे कळल्यावर पु.लं. म्हणाले "बाकी काही म्हणा, पण मुलीने घराण्याचे नाव राखलं हो". २) माहेर चा एक जुना अंक वाचताना, भारती आचरेकरांची मुलाखत वाचली. त्यात त्या म्हणतात, त्यांची आई माणिक वर्मा ह्यान्चे लग्न ठरल्याची बातमी कळल्यावर पु.लं. पटकन म्हणाले 'हिने तर वर्मावरच घाव घातला' . ३) वसंत सबनीस हे तळवलकरांचे मित्र. एकदा ते सबनिसांच्या घरी गेले, तेव्हा तेथे पु.लं. बसलेच होते. वसंतरावांनी ओळख करून दिली, "हा मझा मित्र शरद तळवलकर" "हो का? अरे व्वा!" पु.ल म्हणाले होते, "चांगला मनुष्य दिसतो! नव्हे, हा चांगलाच असरणार!" "हे कशावरून म्हणतोस तू?" वसंतरावांनी पु.लं. ना विचारलं. "अरे, याच्या नावावरून कळतेय ते!" पु.ल. म्हणाले. याच्या नावात एकही काना, मात्रा, वेलांटी, उकार काही नाही. म्हणजे, हा माणूस सरळ असणारच!" ४) पु.लं.च्या "उरलंसुरलं" ह्या पुस्तकातील एक मजेदार संवाद " मित्रा कर्कोटका, मी तुला आता ह्या फोनवर भडकून बोलणा-यांचा आवाज लगेच खाली आणण्याचं एक गुह्य शास्त्र सांगतो. त्यानी तिकडे भडकून मोठ्याने आवाज चढवला की आपण इथनं फक्त, ' प्लीज जरा मोठ्याने बोलता का? ' असं म्हणायचं की तो आऊट. दोन वाक्यात आवाज खाली येतो की नाही बघ." ५) पुलंच्या लहानपणचा एक प्रसंग त्यांची चुणुक दाखविणारा आहे. ते पंधरा र्षाचे असताना लोकमान्य सेवा सघांत साहीत्य सम्राट न.चीं केळकराचं व्याख्यान होत. व्याख्यानानंतर श्रोत्यांना प्रश्न विचारण्याची मुभा होती. त्या काळी भारतांन फेडरेशन स्वीकारावं की स्वीकारु नये, यावर चर्चा चालु होती. शाळकरी पुरषोत्तम उभा राहीला आणी त्यानं तात्यासाहेबांन फेडरेशन स्वीकारावं, की स्वीकारू नये, असा प्रश्न धीटपणे विचारला. त्यावर तात्यासाहेबांनी उत्तर दिलं. "स्वीकारू नये, पण राबवावं" यावर पुरुषोत्तम म्हणाला, "मला आपलं उत्तर कळलं नाही." तेव्हा समजावणीच्या सुरात ते म्हणाले, "बाळ, आपल्याला कळेल, असाच प्रश्न लहान मुलांनी विचारावा." ह्यावर पुरुषोत्तम लगेच म्हणाला, "पुण्याला सध्या अंजीरांचा भाव काय आहे" तात्यासाहेबांच काही उत्तर येण्यापुर्वीच सभागह श्रोत्यांच्या हसण्यानं भरुन गेलं. ६) एका समारंभात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि पुलंची गाठ पडली. बाबासाहेब बोलण्याच्या ओघात बोलुन गेले. "तुमच्या घरी काय, तुम्ही आणी सुनीताबाई सारखे खो खो हसत असणार". ह्यावर गंभीरपणे पु.ल. ही त्यांना म्हणाले. "तुमच्या घरी सुद्धा बायको तुमच्यावर तलवरीचे सारखे वार करतेय आणि तुम्ही ते ढाल हाती घेउन चुकवताहात, असंच सारखं चित्र असतं का हो?" ७) पुलंच्या हजरजबाबीच्या अनंत कथा बिरबलाच्या गोष्टीप्रमाणे सांगितल्या जातात. 'आनदंवनातल्या ग्रामभोजनाच्या थाटात चाललेल्या एका भोजन समारंभात विविध क्षेत्रातली मातब्बर मंडळी सहभागी झाली होती. समोरच्या पंगतीत 'किर्लोस्कर' मासिकाचे संपादक मुकंदराव किर्लोस्कर बसलेले होते. मधुनच ते उठले व तो सुखसोहळा आपल्या केमे-यात बंद करण्याच्या कामात लागले. परत येऊन पाहतात, तर ह्यांच पान गेलेलं ह्यांची शोधक नजर पु.ल. लगेच उद,गारले, "मुकुंदराव, इथं संपादकीय पान नाहीये." ८) मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाच्या एका वर्धापनदिन सोहळ्यात पु.लं. यांनी सरकारी कामकाजातील दुबोध मराठी भाषेचा खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले,"रेडिओवरच्या मराठीतीन 'अमूक वृत्त पोलीस सुत्रांनी दिल' असं मी जेव्हा ऎकलं, तेव्हा पोलीससुत्र हे काय प्रकरण आहे, ते मल्ल कळेना! आता कळलं. 'सुत्र' हे इंग्रजी सोर्स चं भाषांतर आहे. पोलीस कचेरीतुन ही माहीती मिळाली, असं सांगितलं असतं, तर वृत्तनिवेदकला काय पोलिसांनी पकडलं असतं? म्हणजे आता आपल्या बायकोकडुन एखादी बातमी कळली, तरी ती 'मंगळसुत्रा'कडुन कळली, असं म्हणायला हरकत नाही!" ९) माणिक वर्मा या प्रसिद्ध गायिका. एका संगीत कार्यक्रमात सुधीर गाडगीळ त्यांची मुलाखात घेत होते. प्रेक्षकांच्या पहिल्या रांगेत बसून पु.लं. ही मुलाखात ऎकत होते. हसत खेळत चाललेल्या त्या मुलाखतीत गाडगीळांनी माणिक वर्मा यांना, त्यांच्या पतीबद्दल प्रश्न विचारला, "तुमची अन, त्यांची पहिली भेट नेमकी कुठं झाली होती?" लग्नाला खुप वर्षे होऊनही माणिक वर्मा या प्रश्नाला उत्तर देताना टाळाटाळ करीत होत्या. ते पाहुन पहिल्या रांगेतील पु.लं. उत्स्फुर्त्पणे मोठ्यानं म्हणाले, "अरे सुधीर, सारखं सारखं त्यांच्या 'वर्मा'वर नको रे बोट ठेवुस!" १०) कोल्हापूर आणी तेथील एकूणच भाषा व्यवहार म्हणजे पु. ल. च्या मर्मबंधातील ठेव. कोल्हापूरी समाजाइतकाच कोल्हापूरी भाषेचा बाज सागंताना ते म्हणाले, 'इथे रंकाळ्याला रक्काळा म्हणतात पण नगर्याच्या नंगारा करतात. कोल्हापूरातलं इंग्रजी शेक्सपीयरला देखील कबरी बाहेर येऊन आपल्या छातीवर हात बडवायला लावील असं आहे. त्यानं शेतात ऊसं लावला' याच इग्रंजी रूपांतर इथल्या मुन्सफानं एकदा ' He applied U'S In his farm असं केलं होतं आणि त्यावेळच्या शुध्दलेखनच्या नियमाप्रमाणं 'यू' वरती अनुस्वार द्यायलाही तो विसरला नव्हता. ११) एकाने आपल्या बायकोच्या पहिल्या डोहाळजेवणाला तिला पाताळाऎवजी पु.ल. चे 'हसवणूक' हे पुस्तक दिले. पुस्तकावर त्याने लिहीले, 'प्रिय ___हिस, तुझ्या पहिल्या दोहदभोजनाप्रसगीं पाताळाऎवजी पुस्तक देण्यामागील विशुध्द हेतु फसवणूक नसून हसवणूक हाच आहे. तुझाच___!' त्यावर ही त्याची पत्नी चिडली. तिने थेटं पु.ल. कडेच धाव घेतली. पु.ल. नी त्याच अर्पण पत्रीकेखाली स्वाकक्ष्ररीनिशी त्याला समजावले, 'आपल्याकडे नवर्यानं पत्नीवरील आपलं दाट प्रेम पातळानंच व्यक्त करायचं असतं, हे विसरायचं नसतं मिस्टर!" १२) नवीन शुध्दलेखनाचे नियम जर उच्चारानुसारी केले तर त्यानुसार होणारे शुध्दलेखन अधिक सुलभ व बिनचूक होईल, असं महामंडाळात घाटत होतं. त्यावर पु.ल. नी खालील छेद दिला, 'मी नुकताच एका ग्रामीण शाळेत गेलो होतो. तिथं मास्तर मुलांना शुध्दलेखन घालीत होते. ते म्हणाले, 'पोरांनो लिवा. कयाssssळs!' १३) हिंदुह्र्द्ययसम्राट बाळासाहेब ठाकरे यानां काही कारणास्तव हिंदुजा होस्पिटल मध्दे दाखल करण्यारत आले होते. ते ऎकताच पु.ल. उध्दारले, 'त्यांच्या खोलीच्या दरवाज्यावर आता 'गर्वसे कहो हम हिदंजा मे हे' असं लिहालया हरकत नाही.' १४) साहीत्य सघांत कुठल्याशा रटाळ नाटकाचा पहिलाच प्रयोग चालू होता. पु.ल. ना आर्वजुन बोलावले होते. नाटकाचा पहिला अकं चालू असता- नांच पडल्याचा आवाज झाला. शेजारचा घाबरुन पु.ल. ना म्हणाला, ' काय पडलं हो?' 'नाटक दुसरं काय?' पु.ल. उत्तरले. १५) कोल्हापुरला एकदा आमच्या नाटकाचा प्रयोग असतांना नाटकात काम करणारी एक मेत्रीण नुकतीच बाजारात जाऊन आली होती व अगदी रंगात येऊन मला सागंत होती, काय सुदंर सुदंर कोल्हापुरी साज आहेत गं इथल्या बाजारात., अप्रतीम नमुने आणि सूदंर कलाकुसर, अनं भरगच्च तर इतके की एक साज घातला गळ्यात की दुसंर काहीच घालायला नको.' हे ऎकत जवळपास असलेले भाई मीश्कीलपणे हळुच म्हणाले, 'खरं सागंतेस की काय?' क्षणभराने त्यातली खोच लक्षात आल्यावर ऎत्रिणीचीं लाजुन व आमची हसुन मुरकुंडी वळली. १६) 'वॆद्यकातली एकच गोष्ट या क्रीकेटमध्ये येऊन चपखल बसली आहे. ती म्हणजे त्रिफळा. खेळणारांचे येथे चुर्ण व्हावे. गोट साफ.' - इती पु.ल. १७) एकदा वसतंराव देशपांडे पु.लं. ना म्हणाले "हि मुलगी (सुनिताबाई) म्हणजे एक रत्न आहे'. ह्यावर पु.लं. लगेच म्हणाले 'म्हणुनच गळ्यात बांधुन घेतलय!! १८) एकदा आपली आणी सुनिताबाईंची ओळख करुन देताना पु.लं. म्हणाले की "मी 'देशपांडे' आणी ह्या 'उपदेशपांडे" १९) एकदा एक भोजन समारंभात पु.लं. च्या एक बाजुला श्रि ना.ग. गोरे आणि दुस-या बाजुला श्रि भुजंगराव कुलकर्णी बसले होते. पु.लं. म्हणाले, "आफतच आहे. एकिकडे नाग आहे तर दुसरीकडे भुजंग! !!" २०) एकदा पु.लं. ना एक कुकरी सेट गिफ्ट म्हणुन मीळाला. तो सेट सुनिता देशपांडे आपल्या भाचीला दाखवत होत्या. सुनिताबाईंचा 'सर्व काही जपुन ठेवण्याचा " स्वभाव माहित असल्यामुळे भाची सुनिताबाईंना म्हणाली " अगं, एवढा सुदंर सेट फुटु नये या भितीने तु तो कधी वापरणारच नाहीस का?" त्यावर पु.लं. पटकन म्हणाले "हो तर !! सुनीता मला कधी ओमलेट सुद्धा करुन देत नाही ... अंडी फुटतील म्हणुन !!!" [02/11 15:03] 777pranav2010: पुस्तकालय पु.लं. चे काही किस्से-किस्से २१-४० २१) पु.लं. चा वाढदिवस होता, एका मार्केट यार्डाच्या व्यापारी चाहत्याने त्यांच्या गळ्यात सफरचंदाचा हार घातला. पु.लं. त्या वजनाने थोडे झुकले. हे बघुन व्यापारी म्हणाला "काय राव, काय झाले येवढे"? पु.लं. म्हणाले, "बरे झाले तुम्ही नारळाचे व्यापारी नाही" घरात हशा पिकला होता ! २२) एकदा पु.लं. प्रवासात असताना त्यानां कोणीतरी भेटला, तो त्याचां चाहता होता. तो म्हणाला की माझी फक्त दोन व्यक्ती वर श्रद्धा आहे, एक ञानेश्वर आणी दुसरे तुम्ही. माझ्या खोलीत मी ञानेश्वरा च्या फोटो समोर तुमचा ही फोटो ठेवलाय. तर पु.लं. म्हणाले "अहो असं काही करु नका नहीतर लोक विचारतील, ञानेश्वरानी ज्याच्या कडुन वेद म्हणुन घेतले तो रेडा हाच का म्हणुन?" २३) पुलं एकदा चितळ्यांच्या दुकानात गेले, मिठाई खरेदी केली आणि खोक्यात बांधून द्यायला सांगीतले. दुकानातील व्यक्ती म्हणाली "खोक्याचा चार्ज पडेल". त्यावर पुलं म्हणाले (म्हणे), "अरे वा, म्हणजे मिठाई फुकट?" २४) एकदा पु.ल. एक खेड्यात उतरले होते. तिकडच्या शाळेच्या प्रिन्सिपलनी त्यांना शाळेत बोलावून त्यांचा सत्कार केला. पुलंनी दिलेल्या खुर्चीवर बसतच त्या खुर्चीचा हात मोडला. सगळी पोरं खो खो हसायला लागली. ओशाळलेले प्रिन्सिपल पुलना म्हणाले, "माफ करा पण हजारवेळा सांगूनही इकडच्या सुतारांकडून नीट कामच होत नाही." पुल मिश्किलीत म्हणाले, "अहो करवत (!) नसेल" २५) डो. श्रीरंग आडारकर यांचे चिंरजीव अशोक यांना त्याच्या विवाहनिमित्त पु.लनी पाठविलेले पत्र. "आजचा दिवस तुझ्या कोमल आयुष्याचा महत्त्वाचा.सुमारे चौतीस वर्षापूर्वी, जून महिन्यातच असाच एक महत्त्वाचा दिवस माझ्या आणि तुझ्या सुनीतामावशीच्या आयुष्यात आला होता." २६) स्वत:च्या खास विनोदी पध्द्तीत पु.ल.एके ठिकाणी म्हणतात," मुलगी अगर मुलगा सरळ वळणाची अगर वळणाचा कसा असतो कोण जाणे ! कारण वळण म्हटल्यावर ते सरळ कसे असणार ? भूमितीला बुचकळ्यात ढकलणारी ही सरळ वळणाची आड्वळणी व्याख्या आहे" २७) आपल्या पत्नीच्या सतत उपदेश करण्याच्या तथाकथित सवयीमुळे पु.ल. एकदा आपल्या पत्नीला-सुनीताईंना -म्हणाले," या घरात मी तेवढा देशपांडे आहे.तू ’उपदेश-पांडे’ आहेस." २८) भारती मंगेशकर ह्या दामु अण्णा मालवणकर ह्या प्रसीध्द्य विनोदी कलाकाराची कन्या.त्या दिसायला अतिशय सुरेख होत्या आणी दामू अण्णा तसे दिसायला खास नव्हते!त्यामुळे पु.लं. नी जेव्हा तीला पाहिले तेव्हा म्हणाले " हि मुलगी बापाचा डोळा चुकवुन जन्माला आली आहे !!!" २९) पु.लं.च्या एका सभेला अत्रे अध्यक्ष होते. आपल्या भाषणात ते म्हणाले, पु.ल. थोर साहित्यीक आहेत, त्यांनी खुप साहित्य नीर्मीती केली आहे. नंतर त्यांच्या कडें बघत ते पुढे म्हणाले सहाजिक आहे, त्यांच्या नांवात पु आणि ल दोन्ही आहे,मग निर्मीतिस काय कमी? ३०) पुलं एका समारंभाला जाण्यासाठी तयार होत असताना म्हणाले," मी कुठल्याही समारंभाला 'बो'लावल्याशिवाय जात नाही. ३१) एकदा पु लं चे पाय खूप सुजले होते. तेव्हा आपल्या सुजलेल्या पायांकडे बघत ते म्हणाले," आता मला कळले,पायांना पाव का म्हणतात ते!" ३२) पुण्यात भानुविलास नावाचे चित्रपटगृह होते. तर सुरुवातीला त्याला पत्र्याचे छप्पर होते. आणि त्याच्या छतातून उन्हाचे कवडसे पडत असत. एकदा पु.ल.(?) तिथे गेले होते आणि ते कवडसे पाहून म्हणाले "अगदी बरोबर नाव ठेवले आहे, भानुविलास!" ३३) 'वाऱ्यावरची वरात'चा रवींद नाट्य मंदिरातला रात्रीचा प्रयोग. दुसऱ्या दिवशी बोहल्यावर चढायचे होते. लालजी देसाई आपले काम आटपून घाईघाईने निघाले. विंगेत उभे असलेल्या पुलंनी अंधारातच हात धरला आणि म्हणाले... 'प्रयोग संपेपर्यंत थांब!' लालजींना कळेना. प्रयोग संपला. पण पुलंनी पडदा पुन्हा उघडायला लावला. लालजींचा हात धरून ते त्यांना रंगमंचावर घेऊन आले आणि प्रेक्षकांना म्हणाले, 'उद्या याची 'वरात' निघणार आहे, पण तो आजच 'वाऱ्यावर' स्वार होऊन आला आहे'...आणि प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. ३४) पुणे आकाशवाणीवर १९५५ मध्ये पु.ल. विशेष कार्यक्रमांसाठी प्रमुख म्हणून कार्यरत होते. जागेची अडचण असल्यामुळे एकाच मोठ्या खोलीत सगळे निर्माते एकत्र बसत असे. त्यांत पु.ल., कविवर्य बोरकर, व्यंकटेश माडगूळकर, मिरासदार अशी मंडळी असायची. त्यावेळचा एक प्रसंग . महात्मा गाधींची जयंती जवळ आली होती. तेव्हा २ ऑक्टोबरचे कार्यक्रम ठरवण्यासाठी केंद्र्संचालकानी निर्मात्यांच्या बैठकीत सूचना विचारल्या. कुणी काही कुणी काही कार्यक्रम सुचवले पु.ल. म्हणाले "गांधाजींना मौन प्रिय होते. तेव्हा आपण २ ऑक्टोबरला मौन पाळावे व एकही कार्यक्रम ठेवू नये." यावर संचालकांसह सर्व जण खळखळून हसले. ३५) एकदा एक 'कदम' नावाचे गृहस्थ पु लं कडे मुलगा झाल्याचे पेढे घेऊन आले.....पु लं नि आशीर्वाद दिला ....... 'कदम कदम बढाये जा' ३६) सुनीताबाईंसह वसंतराव देशपांडे आणि पुलंचा गाडीतून प्रवास सुरू असताना जेव्हा समोर एक मोठा गवा आक्रमक भूमिकेत येतो आणि वसंतराव सुनीताबाईंना इंग्रजीत काही तरी सूचना करतात, हे ऐकून "पुलं' म्हणतात, "त्या गव्याला इंग्रजी समजत नाही म्हणून वसंतराव इंग्रजीत बोलतात।' ३७) एका सगींत संमेलनाच्या भाषणात पु.ल. नी एक किस्सा सांगितला होता. ’एकदा एका शेताच्या बांधावरुन जात असताना एक शेतकरी शेतात काहीतरी काम करताना दिसला. आम्हा लेखकांना कुठे गप्पा केल्याशीवाय राहवत नाही. त्या स्वभावानुसार मी त्या शेतकराला विचारलं "काय हो शेतकरी बुवा, या झाडाला कोणते खत घातले तर त्याला चांगले टॉमेटो येतील?" त्यावर तो शेतकरी चटकन म्हणाला "या झाडाला माझ्या हाडांचे खत जरी घातलेत तरी त्याला टॉमेटो कधीच येणार नाहीत कारण ते झाड वांग्याचे आहे।" ३८) काळ बदलला, तशी माणसंही बदलली. स्पर्धेच्या जगात पाश्चात्त्य संस्कृतीचे वारे वाहू लागले. माणसं इंग्रजाळलेली झाली. अमेरिकन संस्कृती झपाट्यानं रुजू लागली. गणेशोत्सवाचा मूळ उद्देश दूर झाला आणि उत्सवाचं एकंदर स्वरुपच पालटलं. गणपतीच्या मिरवणुकीत चालणारे रोंबा, सोंबा, डिस्को नाच पाहून आणि प्रदुषणात भर घालणारी गाणी ऐकून ' पुलं ' गंभीर झाले. यावरची आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना ते एकदा गंमतीनं म्हणाले, ' आजकाल मला आपला गणपतीबाप्पा ' गणपतीपप्पा ' झाल्यासारखा वाटत ३९) आणीबाणीनंतरच्या निवडणुकांच्या प्रचारधुमाळीत तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी इंदिरा गांधींच्या वीस कलमी कार्यक्रमाची भगवद्गीतेशी तुलना केली होती. परंतु गीतेचे अध्याय अठरा असताना अशी तुलना मुख्यमंत्र्यांनी का केली असावी, असा प्रश्न पडल्याचं सांगून पु.ल. म्हणाले, ' मी पुन्हा गीता उघडली. सुरुवातीलाच ' संजय उवाच ' असे शब्द आढळले आणि मग मला सगळा उलगडा झाला !' पुलंनी जनता पक्षाच्या प्रचारसभेतून भाषण सुरू करताच ' त्यांना आत कंठ फुटला आहे ' असे उद्गार यशवंतराव चव्हाणांनी काढले होते. त्याचा समाचार घेताना पु.ल. म्हणाले, ' गळा यांनीच दाबला आणि बोलू दिलं नाही, आणि आता म्हणतात, कंठ फुटला. ते असो, पण निदान मी गळ्यात पट्टा तरी घातलेला नाही ! ४०) एक गाजलेल्या संगीत नाटकात एक सुप्रसिद्ध गायक नट कित्येक वर्षं श्रीकृष्णाची भूमिका करत होता. खरं तर, उतारवयामुळं ती भूमिका त्याला शोभत नव्हती, तरीही त्याचं आपलं श्रीकृष्णाची भूमिका करणं सुरूच होतं. प्रश्न होता, त्याला हे सांगायचं कुणी ? एका रात्री त्या नाटकाचा प्रयोग होता. प्रयोगापूर्वीची नेहमीची गडबड सुरू होती. तो नट पीतांबर नेसून, रत्नजडित अलंकार लेवून आणि डोक्यावर मुकूट चढवून, श्रीकृष्णाच्या संपूर्ण पेहरावात हातावरचा शेला आणि सुटलेलं पोट सावरत रंगपटात उभा होता. तेवढ्यात पु.लं. आपल्या काही मित्रांबरोबर रंगपटांत आले. क्षणभर त्या सजलेल्या श्रीकृष्णाकडे पाहतच राहिले. कदाचित त्या नटाचं त्याच्या तारुण्यातील देखणं रुप त्यांच्या डोळ्यासमोर क्षणभर तरळलं असावं. पु.लं.च्या मित्रांना त्यांचं हे त्याला न ओळखण्यासारखं पाहणं थोडं नवलाईचं वाटलं. न राहवून त्यांनी विचारलं, ' हे काय, भाई, ह्यांना ओळखलं नाही का ? अहो, हे आपले... ' पुलं त्यांना मध्येच थांबवत म्हणाले, ' अरे व्वा ! ओळखलं नाही, कसं म्हणता ? ह्यांना पाहूनच तर आज देवाला ' अवतार ' ध्यान का म्हणतात, ते समजल. [02/11 15:05] 777pranav2010: पुस्तकालय पु.लं. चे काही किस्से-किस्से ४१ - ६० ४१) एकदा पुल कुटुंब आणि वसंतराव कुठल्याशा अभयारण्यात गेले होते बहुधा राधानगरी. तिथे त्यांच्या कारसमोर एक महाकाय आणि मस्तवाल रानरेडा आला आणि त्यांच्याकडे खुनशीपणे बघू लागला. तेव्हा वसंतराव म्हणाले भाई, आय थिकं ही इस गोइंग टु चार्ज. पुल त्यांना म्हणाले, रेड्याला कळू नये म्हणून इंग्लिशमधे बोलतोयस वाटतं? हे ऐकल्यावर त्या भीतीदायक प्रसंगातही जोरदार हशा पिकला. ४२) एकदा पुलं पुण्यातील एका मिठाईच्या दुकानातून मिठाई आणायला गेले. त्या मिठाईवाल्यानं कागदात बांधून ती मिठाई दिली. कागदातल्या मिठाईकडे पाहत पुलंनी ' बॉक्स मिळेल का ?' म्हणून विचारलं. ' हो पण त्या बॉक्सला पैसे पडतील. ' दुकानदारानं टिपिकल पुणेरी पद्धतीनं उत्तर दिलं. ' अरे वा ! म्हणजे मिठाई फुकट , वाटतं ? लगेच पुलं उद्गारले. ४३) गप्पांच्या ओघात पुल एकदा म्हणाले, ' मामा या नावाची गंमतच आहे. त्याला शकुनी म्हणावं, तरी पंचाईत आणि अपशकुनी म्हणावं तरी पंचाईत. ' ४४) हौसेसाठी प्रवास करणा-या टूरिस्टला मराठीत काय म्हणावं, असा प्रश्न पुलंना कुणी तरी विचारला. त्यावर पटकन पुल म्हणाले, ' त्यात काय ? ' सफरचंद ' म्हणावं. ' मराठी प्रतिशब्दांच्या बाबतीत असंच एकदा बोलणं चाललं असताना पुलंनी विचारलं, ' एअरहोस्टेसला आपण ' हवाई सुंदरी ' म्हणतो, तर नर्सला ' दवाई सुंदरी ' का म्हणू नये ? आणि वाढणा-याला आपण जर ' वाढपी ' म्हणतो, तर वैमानिकाला ' उडपी ' का म्हणू नये ?' त्याच सुरात पुलं खूप दारू पिणा-याला ' पिताश्री ' किंवा ' राष्ट्रपिता ' म्हणतात ४५) अरुण आठल्ये आणि पुलं एकदा चायनीज रेस्टॉरंटमध्ये जेवण्यासाठी म्हणून गेले. चायनीज फूडचं वैशिष्ट्य सांगताना पुलं म्हणाले, ' चायनीज फूड स्टार्टस वुईथ चिलीज अॅण्ड एण्डस वुईथ लिचीज. ' चायनीज फूड पाहताच त्यांना आजची शिक्षणपद्धती आठवते. जेवण घेताना खूप जेवल्यासारखं वाटतं, पण थोड्याच वेळात भूक लागते, हे लक्षात घेऊन पुलं म्हणतात, ' आपल्या शिक्षणासारखं हे चिनी जेवण घेताना खूप घेतल्यासारखं वाटतं, पण प्रत्यक्षात पोट रिकामंच राहतं. ' चिनी स्वीट कॉर्न सूप फार प्रसिद्ध आहे. या जेवणात मका फार वापराला जातो. त्यावर पुलंचं भाष्य : ' चिनी भोजनाला सर्वात्मका म्हणायला हवं !' ४६) पुलंच्या ' सुंदर मी होणार ' या नाटकावर आधारित असलेला ' आज और कल ' हा हिंदी चित्रपट यशस्वी झाला नाही. त्याबद्दल बोलताना पुल म्हणाले, ' हा चित्रपट त्याच्या नावाप्रमाणं दोनच दिवस चालला. ' आज और कल !' ४७) १९६५ साली पु.लं. नांदेडच्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले. ती बातमी ऐकल्यावर अत्यानंदाच्या भरात श्री. श्रीराम मांडे यांनी ' पुलायन ' ही दिर्घ कविता एकटाकी लिहून काढली. त्यात त्यांनी ' पुलंकित ' शब्द प्रथम वापरला आणि नंतर तो खूपच लोकप्रिय झाला. ४८) ' माझे खाद्यजीवन ' या लेखात चिवड्यासंबंधी लिहिताना पुलं म्हणतात , '' चिवडा सोलापूरपेक्षा कोल्हापूरचा ! छत्रे यांचा ! महाराष्ट्रावर या तीन छत्र्यांचे अनंत उपकार आहेत . एक चिवडेवाले , दुसरे सर्कसवाले आणि तिसरे केरूनाना गणिती ! उपकार उतरत्या श्रेणीने घ्यावे ! कारण चिवडेवाल्या छत्र्यांनी कोल्हापूरच्या ' रम ' ला जी झणझणीत साथ दिली , ती असंख्य उघडे शेमले आणि काही चोरट्या झिरमिळ्या अस्मानात पोहोचवून आली ....'' हे वाचल्यानंतर कोल्हापुरी संगीत चिवड्याचे आद्य निर्माते छत्रे गहिवरून गेले . त्यांनी आपले वार्धक्य विसरुन स्वतःच्या हातांनी पुलंसाठी चिवडा केला . पंधरा - सोळा वर्षापूर्वीची गोष्ट आहे . त्यांनी पुलंना सांगितले , कित्येक वर्षांनंतर मी स्वतः खास चिवडा बनवतो आहे . तो स्विकारा . त्यांनी त्यापूर्वी स्वतःच्या हातांनी तयार केलेल्या चिवड्याचा डबा पाठवला होता . कुणाला ? लोकमान्य टिळकांना ! लोकमान्य विलायतेला निघाले होते तेव्हा ! ४९) '' हॅलो , शान्ताबाई ना ? मॉस्कोहून गोर्बाचेव्ह तुमच्याशी बोलू इच्छितायत . तुमच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी ... '' '' काय भाई , तुम्ही नाव कधी बदललंत ? अं ?'' फोनवरील व्यक्तीचा सुपरिचित आवाज बरोबर ओळखून , हसू आवरत शान्ताबाई पु . लं . ना दाद द्यायच्या ... बारा ऑक्टोबर हा ज्येष्ठ कवयित्री शान्ता ज . शेळके यांचा आणि आठ नोव्हेंबर हा मराठी माणसांचे लाडके व्यक्तिमत्त्व पु . ल . देशपांडे यांचा वाढदिवस . उभा महाराष्ट्र दरवर्षी ते आपलेपणाने साजरे करीत ; तर साहित्यक्षेत्रातील ही दोन मोठी माणसं एकमेकांच्या अशा ' खोड्या काढीत ' साजरा करीत . पण पु . लं . आणि सुनीताबाईंच्या विवाहाचा ' बारा जून ' हा ( भाईंचा स्मृतिदिनही हाच ) खास दिवस शान्ताबाईंनी आवर्जून सुनीताबाईंना भेटण्याचा दिवस असायचा . 50) एकदा पु ल शाळेत असताना त्यांना कोणीतरी म्हणाले, " ए देशपांडे तुमचे पूर्वज शेण वीकायचे ना ? " त्यावर पु ल लगेच म्हणाले, " हो ना तुमच्या पूर्वजांना शेण खायला लागायचा ना म्हणून वीकायचो आम्ही. " 51) एकदा शाळेत अर्ध-निद्रावस्थेत असताना गुरुजींनी पु.लं.ना दरडावून विचारले, "पुर्श्या! ओपोझिटचे स्पेलिंग सांग बघू..." पु.ल. घाबरून उठत म्हणाले, "ओ डबल प्पो.." 52) ‘पूल ७५’ हे पुस्तक पुलंना अर्पण करण्याचा समारंभ होता. त्या वेळी अगोदर जयंत नारळीकर यांचे भाषण झाले. आपल्या भाषणाच्या सुरवातीला ते म्हणाले, ” बंधू भगिनीनो असे मी म्हणत नाही. कारण श्रोत्यांमध्ये माझी पत्नी आहे. पुलंची बोलण्याची पाळी आली तेव्हा ते म्हणाले, “मला बंधू आणि बघिनी म्हनायाले काहीच अडचण नाही. माझी पत्नीच मला ‘भाई’ म्हणते!” 53) दिल्लीच्या प्रकाशकांच्या सभेत पुलं म्हणाले होते, “कसायानी आपल्या सभेचे अध्यक्षपद एखाद्या गायीला द्यावे तसे वाटतेय. 54) नाशिकला कॉलेजच्या स्नेहसंमेलनात केलेले धमाल भाषण. या भाषणात पुलं म्हणाले होते, ‘मी आज सकाळीच तुमच्या कॉलेजच्या मुलीला विचारले, तुम्हाला ज्ञानेश्वरांचे काय काय आहे? त्यावर ती म्हणाली, ‘ १० मार्कांचा ज्ञानेश्वर आहे’ मी पुढे विचारणार होतो कि, ‘माझे साहित्य किती आहे?” पण पहिल्या उत्तराने मला पहिला प्रश्न विचारण्याचा धीर झाला नाही. कारण द्यानेश्वारच १० मार्कांचा तर मला एक लक्षांश मार्क असेल कि नाही कोणास ठाऊक!” याच भाषणात पालकांच्या अज्ञाना बद्दल पुलं म्हणाले, एखाद्या मुलाने जर म्हटले कि, ‘मी ‘अर्धमागधी घेतो’ कारण ते स्कॉरिंग आहे.’ तर पालक म्हणतात, मग ‘पूर्णमागधी’ का नाही घेत?’ अर्धमागधीच का घेतो?’ पालकांच्या (पूर्ण) अगाध ज्ञानावर याहून वेगळे भाष्य करण्याची काहीच गरज नाही. 55) पु. ल. गेल्यावर आमचा कलकत्त्याचा समीक्षक मित्र शमिक बॅनर्जी पुण्यात आला होता त्याने ही आठवण सांगितली. पु. ल. दिल्लीच्या संगीत नाटक अकादमीचे पाच वर्षे मानद उपाध्यक्ष होते. एका बैठकीनंतरच्या भोजनोत्तर मैफलीत एक प्रसिद्ध नाटककार खूप सात्विक संतापले होते. त्यांना न विचारता त्यांच्या नाटकांचे कोणी अन्य भाषेत प्रयोग केले होते. त्यामुळे कॉपीराईटचा भंग होतो असा प्रकार होता. त्यांची अनेकांनी समजूत घातली पण त्यांचा राग धुमसत होताच. वाद वाढल्यावर पु. ल. तेथे असलेली हार्मोनियम काढून म्हणाले, मी आता तुम्हाला माझा प्रयोग करुन दाखवतो. त्याचा मात्र कॉपीराईट कोणाकडे नाही. कोणीही हा प्रयोग गावोगाव कोणत्याही भाषेत करावा, असे म्हणून पु. लं.नी हार्मोनियम वाजवणे सुरु केले. जरा रंग भरल्यावर ते आलाप आणि ताना घेऊ लागले. त्याला अर्थातच अभिनयाची जोड होती. पण एकही शब्द नव्हता. नंतर सर्वांच्या लक्षात येऊ लागले की आलापी आणि तानांमधून एक तरुण आपल्या प्रेयसीकडे प्रेमयाचना करतो आहे, तानांमधून ती तरुणी लाजते आहे. मग ताना मारीत त्यांचे प्रेम चालते. मग दोघांचे ताना आणि आलापीमधून लग्न होते. ताना मारीत बाळंतपण होते. मग भांडण... पुन्हा ताना... पुन्हा प्रेम जमते. ताना मारीत संसार फुलतो असा मामला पु. लं.नी एकही शब्द न उच्चारता केवळ ताना आणि आलापीमधून अर्धा तास जिवंत केला. समोरचे सगळे गडाबडा लोळायचे तेवढे राहिले होते. शमिक म्हणाला, 'कोणतीही तयारी, पूर्वसूचना नसताना हा माणूस इतका चोख परफॉर्मन्स देत असेल तर त्यांचे परफॉर्मन्स विषयीचे चिंतन किती परिपक्व असेल? ह्या माणसाभोवती महाराष्ट्राचे सांस्कृतिक जग केंद्रित का होते, ह्याचे जणू उत्तरच पु. लं.नी आम्हाला त्या अर्ध्या तासात दिले. ' ५६) पुलं एकदा बाबासाहेब पुरंदरेंना म्हणाले, 'अरे बाबा तू एवढे गड किल्ले चढतोस तर मला पण घेऊन जा एखाद्या गडावर.' बाबांनी त्यांना लगेच हो म्हटलं. तर पुलं म्हणाले "कोणत्या गडावर न्याल मला? " बाबा म्हणाले, 'तुम्ही म्हणाल त्या गडावर नेईन, तोरणा, राजगड, राजगड, प्रतापगड जे म्हणाल त्या गडावर जाऊया.' त्यावर पुलं मिश्किलपणे म्हणाले, 'जो गड समृद्र सपाटी पासून कमीत कमी उंचीवर असेल त्या गडावर ने'. खूप बाचाबाचीकरून मग बाबा आणि पुलं वसईच्या किल्यावर गेले.' ५७) पु. लं. चा शेवटचा चित्रपट म्हणजे ' गुळाचा गणपती '! त्यात सर्व काही पुलंचे होते. कथा , पटकथा , संवाद , गीते , संगीत आणि दिग्दर्शन , एवढेच नव्हे तर नायकाची भूमिकासुद्धा! हा चित्रपट सर्वत्र चांगला गाजला. पण पुलंची कमाई काय ? पुण्यात ' गुळाचा गणपती ' प्रकाशित झाला तेव्हा तो चित्रपट पाहण्यासाठी पुलंना साधे आमंत्रण सुद्धा नव्हते. पुलं , सुनीताबाई आणि मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष यांनी तिकिटे काढून चित्रपटाचा पहिला खेळ पाहिला! ५८) अरुण आठल्ये आणि पुलं एकदा चायनीज रेस्टॉरंटमध्ये जेवण्यासाठी म्हणून गेले. चायनीज फूडचं वैशिष्ट्य सांगताना पुलं म्हणाले, ‘ चायनीज फूड स्टार्टस वुईथ चिलीज ऍण्ड एण्डस वुईथ लिचीज. ‘ चायनीज फूड पाहताच त्यांना आजची शिक्षणपद्धती आठवते. जेवण घेताना खूप जेवल्यासारखं वाटतं, पण थोड्याच वेळात भूक लागते, हे लक्षात घेऊन पुलं म्हणतात, ‘ आपल्या शिक्षणासारखं हे चिनी जेवण घेताना खूप घेतल्यासारखं वाटतं, पण प्रत्यक्षात पोट रिकामंच राहतं. ‘ ५९) पु. ल. देशपांडे व मी आकाशवाणीवर एकत्र काम करत होतो. तेव्हा करारपद्धत असल्याने पगारात करार संपेपर्यंत वाढ होत नसे. एकदा आकाशवाणीच्या 27 केंद्रांचे प्रमुख संचालक आले होते. पुलंकडे पाहून ते म्हणाले, "देशपांडे, तुमचे पोट खूप वाढले आहे.' त्यावर पुलंनी तत्परतेने उत्तर दिले, ""धिस इज द ओन्ली इन्क्रीमेंट आय ऍम गेटिंग......'' - मंगेश पाडगावकर ६०) वृत्तपत्रात प. व. न. नावाने छापून येणाऱ्या सदरात पुलंच्या लेखन, नाटकावर टीका केली जायची. ते पुलंना आवडायचे नाही. एकदा जयंतराव टिळकांनी पुलंना ते सदर कसे वाटते हे विचारले. त्यावर पुल तातडीने म्हणाले, ""पवन जरा भलतीकडेच वाहत आहे...''- मंगेश पाडगावकर [02/11 15:13] 777pranav2010: पुस्तकालय व.पु.काळे संकलन -तप्तपदी "आयुष्यात जो अत्यंत महत्वाचा निर्णय असतो,की ज्या निर्णयामुळे सगळ्या भवितव्याला कलाटणी मिळण्याची शक्यता आहे,अशा क्षणी कुणावरही विसंबुन रहायचं नाही.आपला बेत फ़सला किंवा कुणीतरी उधळुन लावेल अशी परिस्थिती निर्माण होऊ द्यायची नाही.निर्णयाच्या क्षणी आपण स्वतंत्र असलं पाहीजे." "लग्नासारखा एक निर्णय आबाद किंवा बरबाद करायला पुरेसा असतो.अशा वेळी व्यक्ती स्वतंत्र हवी." "समस्या आणि उत्तर ह्यात वेळ म्हणजे Time Factor असतो.Forth Dimension म्हणतात तो Factor.म्हणुनच एका उत्तराची वेळ टळली की दुसरं उत्तर शोधावचं लागतं." "उत्तम आणि उच्च पदवी हीसुद्धा ऎपतच आहे.नुसत स्वाभिमान आहे,पण कोणतीच पात्रता नाही ती माणसं जास्तीत जास्त मग्रुर असतात." "एखादी व्यक्ती जाता-जाता जेव्हा आपल्याला अपेक्षित नसलेला कॉमेंट करते.तेव्हा त्यांच फ़क्त नवल वाटतं.पण केव्हातरी सगळ्या आयुष्याचा पट उलगडुन बसण्याचा क्षण येतो तेव्हाच त्या माणसाचे खरे विचार समजतात.पृष्ठभागावरुन नुसतचं वाहुन गेलेलं पाणी किती आणि जमिनीने धरुन ठेवलेलं किती हे ’बोअरवेल’ खणल्याशिवाय कळत नाही.वर्ष संपलं की आपण नवीन Calender आणतो.काही वाणसामानाबरोबर फ़ुकट येतात.कधीकधी Calender साठी आपण अनावश्यक वस्तुही घेतो.प्रत्येक महीन्याला वेगवेगळं चित्र असलेलं,कधी जाहीरपणे लावता न येणारं किंवा लावता येणारं,भारी Calender ही आपण पळवलेलं असतं.कितीही आकर्षक -आकर्षक म्हटलं तरी त्याच नाविन्य किती काळ? नाविण्याइअतकी चटकन शिळी होणारी दुसरी कोणतीही वस्तु नसेल.भिंतीकडेच पाहत आयुष्य घालवणार्या रिकामटेकड्यांना Calender वर कुठलही चित्र चालतं.व्यक्तीमत्व घडवणार्या माणसांच्या बाबतीत,तारखांचे चौकोन जास्त सचित्र असतात.प्रत्येक चौकोनावर वेगळं चित्र,वेगळा विचार,वेगळी प्रगती,वेगळं शिखर.तो पट जेव्हा जेव्हाउलगडला जातो तेव्हाच समोरच्या माणसाला जाणवतं की,प्रत्येक श्वासाचं दाम मोजुन श्याम विकत घेणारी गदिमांची नायिका आणि समोरचा माणुस एकच आहे.बुद्धी,मन आणि शरीराच दान करुन ह्या माणसाने Calender चा कालनिर्णय स्वतः विकत घेतला आहे."
Sunday, November 1, 2015
Subscribe to:
Posts (Atom)
Featured Post
राजा भगवंतराव ज्यू कॉलेज११ वी १२ वी कला व विज्ञान शाखेत शिकत असणार्या विध्यार्थ्यासाठी आरोग्य आणि शारीरिक शिक्षण विषयची लिंक...
-
EN GLIS H Y UVAKBHARATI Standard - XII BBIG TV CH 22 29 9954 The Coordination Committee formed by G.R. No. Abhyas - 2116/(Pra.Kra.43/...
-
Std. XI (Marks: 50) Time- Two and Half Hours Section I- Prose Q.1 (A) Read the extract and complete the activities given below. ...
-
"The Raja of Aundh" A short story by G. D. Madgulkar Translated by Vinaya Bapat. I had seen the Raja. He was never so pompous ...